✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती

रुपये ५०० आणि १००० च्या नोटांवर बंदी

ट
ट्रेड मार्क यांनी
Tue, 11/08/2016 - 21:38  ·  लेख
लेख
मोदी सरकारने रुपये ५०० आणि १००० च्या नोटांवर बंदी आणली आहे. लोकांकडे असलेल्या नोटा - ३ लाखांपर्यंत बँकांकडे व त्यावरील रक्कम आरबीआय कडे बदलून मिळेल त्यासाठी ३० डिसेंबर पर्यंत अवधी आहे. काळ्या पैश्यांविरोधात सरकारने उचललेले पाऊल स्वागतार्ह आहे. याआधी काळा पैसा जाहीर करण्यासाठी मुदत दिली होती आणि दंड भरून तो पैसा नियमित करून घेता येत होता. त्या योजनेचा काही लोकांनी लाभ घेतला, पण ज्यांना वाटत होते की मोदी यापलीकडे काही करणार नाहीत त्यांना मात्र हा फार मोठा धक्का आहे. असे सांगितले जात आहे की या बदल्यात ५०० आणि २००० च्या नोटा येणार आहेत ज्यांना ट्रॅकर आहे. त्यामुळे जिथे खूप प्रमाणात नोटा आहेत असे दिसेल ते ठिकाण ट्रॅक करता येईल. मला तरी हे स्वागतार्ह पाऊल वाटत आहे. तुम्हाला काय वाटतंय? हॅलो, धागाकर्त्याच्या परवानगीने ५०० व १००० च्या नोटा बदलण्यासाठी आवश्यक असणार्‍या फॉर्मची लिंक येथे टाकतो आहे. http://reviews.trekbook.in/download-pdf-request-slip-exchange-rs-500-rs-1000-notes/ कृपया १-२ कॉपीज जास्तं बरोबर ठेवा. अपंग व्यक्ती आणि जेष्ठ नागरिकांना वेळप्रसंगी एखादी कॉपी देता येईल. धन्यवाद.
वर्गीकरण
लेखनविषय (Tags)
धोरण
समाज
जीवनमान
लेखनप्रकार (Writing Type)
विचार
मत

प्रतिक्रिया द्या
307016 वाचन

💬 प्रतिसाद (1112)

प्रतिक्रिया

जर दुसऱ्या व्यक्तीचं

पिशी अबोली
Sat, 11/12/2016 - 22:51 नवीन
जर दुसऱ्या व्यक्तीचं authorization letter, आयडी इत्यादी असेल, तर ते अधिकचे 4 हजार पण अधिकृतपणे मिळू शकतात ना? का एका व्यक्तीला 4 हजार असा नियम आहे?
↩ प्रतिसाद: मृत्युन्जय

बॅंकेवर अवलंबुन आहे. काही

मृत्युन्जय
Sat, 11/12/2016 - 23:26 नवीन
बॅंकेवर अवलंबुन आहे. काही बँका फार ताठर भूमिका घेतात. बर्‍याच बँका बदलुन देतात. ओळख असेल तर प्रश्नच नाही.
↩ प्रतिसाद: पिशी अबोली

तुमच्या मित्राने तुम्हाला

संदीप डांगे
Sat, 11/12/2016 - 23:09 नवीन
तुमच्या मित्राने तुम्हाला चुना लावलाय ^^^ फारच कल्पना लढवताय सरजी! छान!
↩ प्रतिसाद: मृत्युन्जय

तुमच्याकडुन शिकतोय थोडे थोडे

मृत्युन्जय
Sat, 11/12/2016 - 23:26 नवीन
तुमच्याकडुन शिकतोय थोडे थोडे डांगे. धन्यवाद
↩ प्रतिसाद: संदीप डांगे

बाकी १० मिनिटात ८००० माझ्या

संदीप डांगे
Sat, 11/12/2016 - 23:14 नवीन
बाकी १० मिनिटात ८००० माझ्या ऑफिसमधल्या प्युन ने पण आणले. ^^^ पंतप्रधान साहेब बोलले, फक्त चार हजाराच्या नोटा बदलून मिळतील म्हणून, तुमचा पिऊन मला 20 हजाराच्या नोटा बदलून आणून देईल काय एका फटक्यात? नोटा बदलून बरंका, खात्यातील नको!
↩ प्रतिसाद: मृत्युन्जय

चार हजाराच्या नोटा एका बँकेत

मृत्युन्जय
Sat, 11/12/2016 - 23:24 नवीन
चार हजाराच्या नोटा एका बँकेत बदलुन मिळतात साहेब. दोन बॅंकातुन बदलुन आणल्या त्याने. बँकांची नावे आणि पत्ते हवेत का? मी तुमच्या सारखा हवेत गोळीबार नाही करत डांगे. खरे काय ते सांगितले. बाकी माझ्या ऑफिसचा असा कोणाचीही कामे करत नाही. धन्यवाद. त्याला माझ्या ऑफिसतर्फेच पगार मिळतो. ऑफिस माझ्या मालकीचे असले असते तर दोस्तीखात्यात त्याला कामाला लावले असते. पण ते पडले दुसर्‍याचे. त्यामुळे (२५ लाख बँकेत ठेवलेत म्हणुन)( दहा मिनिटात ९००० काढुन आणाणार्‍या तुमच्या मित्राला सांगा की.
↩ प्रतिसाद: संदीप डांगे

अरे वा! बरीच माहिती दिसते

संदीप डांगे
Sun, 11/13/2016 - 00:05 नवीन
अरे वा! बरीच माहिती दिसते आपल्याला! तीही मला प्रत्यक्ष माहित असल्यापेक्षा, गोळीबार कोण करतंय आता? असो. तुम्हाला डिफेन्ड करायचेच असेल तर बरेच अन्य जास्त महत्वाचे प्रश्न विचारलेत जिज्ञासूंनी, त्यांना आधी शंकासमाधान होत असेल तर बघा. तुम्हाला बरीच माहिती आहे म्हणून म्हटलं, नैतर म्हणाल मी सगळे प्रतिसाद वाचत बसत नाही,वेळ नाही, मला माहित नाही कोण काय लिहितय ते! आम्ही आहोतच पेश्शलमध्ये, थोडा धीरज रखीये!
↩ प्रतिसाद: मृत्युन्जय

तीही मला प्रत्यक्ष माहित

मृत्युन्जय
Sun, 11/13/2016 - 07:02 नवीन
तीही मला प्रत्यक्ष माहित असल्यापेक्षा, म्हणजे तुम्हीच एक सर्वज्ञ की काय? लोकांना थोडेफार कळते डांगे. आता आम्ही नसु तुमच्य एवढे हुषार. पण चार पावसाळे पाहिलेत आम्ही पण आणि याच देशात राहतो त्यामुळे कळणारच की. त्यात तुम्हाला अजुन शंका कुशंका असतील तर अजुन डिटेल्स देउ शकतो की. बाकी सगळे प्रतिसाद मी वाचतच नाही. शेवटच्या पानावर जे दिसले ते वाचले. तुम्हाला काही स्पेसिफिक शंका असतील तर इथेच विचारा, यथाशक्ती उत्तरे देइन (अर्थात मी काही अर्थतज्ञ नाही पण तरी जेवढे वाचले / ऐकले/ पाहिले / समजावुन घेतले आहे त्यावरुन उत्तरे देउ शकतो. )
↩ प्रतिसाद: संदीप डांगे

माझ्या बाबतीतल्या घटना माहित

संदीप डांगे
Sun, 11/13/2016 - 08:18 नवीन
माझ्या बाबतीतल्या घटना माहित असण्याइतके तुम्ही छातीठोक सर्वज्ञ विरळाच म्हणायचे, असो. अजून काही पावसाळ्याचे थेम्ब उरले असतील तर तेही शिंपडा बापडे, तेवढीच माझ्या ज्ञानात भर... :)
↩ प्रतिसाद: मृत्युन्जय

तुमच्या नाही तुम्हाला

मृत्युन्जय
Mon, 11/14/2016 - 10:38 नवीन
तुमच्या नाही तुम्हाला छातीठोकपणे अकाउंत मध्ये २५ लाख आहे म्हनुन ९००० मिळाले असे सांगणार्‍यांबद्दल होते ते. तुमच्याबाबतीत तो केवळ कार्यकारण भाव होता. आजच्या पुरते तुमच्यासाठी एवढे थेंब पुरेसे.
↩ प्रतिसाद: संदीप डांगे

बाकी, प्रत्येक सरकारी

संदीप डांगे
Sat, 11/12/2016 - 09:37 नवीन
बाकी, प्रत्येक सरकारी निर्णयाला विरोध करायला मी अंध विरोधक नाही, जे दिसतंय तेच बोलतो, काहींना पटत नसेल तर तो त्यांचाच प्रश्न आहे.
↩ प्रतिसाद: मोदक

ओके, तुमची उत्तरे येऊदेत, मग

मोदक
Sat, 11/12/2016 - 10:17 नवीन
ओके, तुमची उत्तरे येऊदेत, मग बोलू
↩ प्रतिसाद: संदीप डांगे

एक्साक्टली.... लखनौ ला मला जे

विशुमित
Sat, 11/12/2016 - 16:22 नवीन
एक्साक्टली.... लखनौ ला मला जे दिसलं तेच लिहलं ... त्यात काय काळं गोरं आहे हे मला पण समजतंय फक्त विचार करण्याचं काम मी दुसऱ्यांवर सोडून देतो. कृषी उत्पन्न दाखवू शकतो अश्या ५००-१००० च्या नोटा जमा करू शकतो का ? जाणकारांकडून उत्तरेच्या प्रतीक्षेत. तशी बऱ्याच जणांना जास्त घाई नाहीये अजून बरेच दिवस आहेत त्यांच्याकडे. तो पर्यंत बरेच पर्याय मिळतील.
↩ प्रतिसाद: संदीप डांगे

बरोबर आहे. आपण विचार करताना

अन्नू
Sat, 11/12/2016 - 09:22 नवीन
बरोबर आहे. आपण विचार करताना एका परिघामध्येच विचार करतो किंवा आपल्या आसपासच्या परिसरावरुन निष्कर्ष काढतो. परंतु वस्तुस्थिती खुप वेगळी आहे.
↩ प्रतिसाद: संदीप डांगे

अनधिकृतपणे पैसा पांढरा होतोय

राही
Sat, 11/12/2016 - 10:05 नवीन
आजच्या वर्तमानपत्रात बातमी आहे की जनधनयोजनेची आजतागायत एक रुपया किंवा पाच रुपये बॅलन्स दाखवणारी खाती अचानकपणे तट्ट फुगून नेमका ४९००० रुपये बॅलन्स दाखवू लागलीत. काही दिवसांनी सर्व काही स्थिरस्थावर झाले की हा बॅलन्स पुन्हा पाच रुपयांवर येईल हे उघडे गुपित आहे. बँकांकडे प्रचंड रक्कम जमा होऊन लिक्विडिटी खूपच वाढली आहे. त्यामुळे व्याजदरकपात होण्याचा संभव आहे. अर्थात ही वाढलेली लिक्विडिटी एकदोन महिन्यात (२००० रुच्या नोटांद्वारे विथ्ड्रॉवलमुळे) धाडकन कमी होणार हेही उघड आहे. पण दरकपात मात्र तशीच राहील. विक्री न झालेल्या घरांची इन्वेंटरी कमी झाली पाहिजे ना.

लिंक आहे का?

मोदक
Sat, 11/12/2016 - 14:10 नवीन
लिंक आहे का?
↩ प्रतिसाद: राही

Times Of India, Saturday, November 12, 2016

राही
Sat, 11/12/2016 - 16:37 नवीन
1) 'Dead' Jan Dhan a/cs now flush with cash. A large amount of cash has suddenly started flowing into previously inactive Jan Dhan accounts. Many such accounts, opened in 2014, which held only Re 1 or Re 2 till November 8, now have up to Rs 49000. Bank officials hinted that many account-holders were possibly being exploited by middlemen or the rich to park their cash. 2)Record deposits may lead to bank rate cut. Banks have received nearly Rs. 60,000 crore in deposits in the last three days...... Bankers expect the surge in deposits to bring down interest rates.
↩ प्रतिसाद: मोदक

+/-

अर्धवटराव
Sat, 11/12/2016 - 15:21 नवीन
अर्थात ही वाढलेली लिक्विडिटी एकदोन महिन्यात (२००० रुच्या नोटांद्वारे विथ्ड्रॉवलमुळे) धाडकन कमी होणार हेही उघड आहे.
(अति)सामान्यांच्या अकांउटमधे पैसे जमा करणे व ते परत विड्रॉ करणे हा ब्लॅक टु व्हाइट कन्व्हर्जनचा एक मार्ग नक्कीच आहे. पण एकंदर काळ्यापैशाची रक्कम बघता ते फारसं उपयोगाचं नाहि. शिवाय २००० च्या नोटा पाऊस पडल्यासारख्या उपलब्ध होतील काय हि शंकाच आहे. बेंकांची लिक्वीडीटी धाडकन वगैरे कमि होईल असं वाटत नाहि.
↩ प्रतिसाद: राही

गावच्या विकासासाठी पैसे वापरू शकतात

विकास...
Sat, 11/12/2016 - 20:33 नवीन
समजा खेडेगावमधील १०० जण धन खात्यामध्ये प्रत्येकी रु. ४९,००० जमा झाले तर त्या गावामधील लोक एकत्र येऊन ते गावच्या विकासासाठी पैसे वापरू शकतात गावामध्ये शाळा, विहिरी आणि इतर कामे करू शकतात.
↩ प्रतिसाद: राही

हे पैसे कमिशन बेसिसवर पांढरे

सतिश गावडे
Sat, 11/12/2016 - 21:49 नवीन
हे पैसे कमिशन बेसिसवर पांढरे करायला दिले असण्याची शक्क्यता आहे. त्यामुळे एकदा ते पांढरे झाले की खातेदाराला कमिशन देउन मुळ मालक ते पैसे काढून द्यायला सांगणार खातेदाराला.
↩ प्रतिसाद: विकास...

१९७८ आणि आर के लक्ष्मण

राही
Sat, 11/12/2016 - 10:20 नवीन
१९७८ साली नोटा रद्द केल्या गेल्या त्यावेळचे हे आर के लक्ष्मणांचे एक मार्मिक व्यंगचित्र, जे आजही तितकेच समर्पक आहे. https://www.scoopwhoop.com/RK-Laxmans-Cartoon-From-1978-When-Large-Curre... हे आजच्या मटामध्ये छापलेय.

एक शंका आहे, परवा टीवी वरील

साधा मुलगा
Sat, 11/12/2016 - 13:09 नवीन
एक शंका आहे, परवा टीवी वरील एका चर्चेत रिअल इस्टेट च्या दरावर याचा फरक पडणार नाही असे सांगितले, कारण फक्त जुन्या नोटा जाऊन नवीन नोटा आल्याने रिअल इस्टेट वर कसा फरक पडेल असा चर्चेचा सूर होता. समजा एक ब्लॉक विकत घ्यायचाय १०००० चा रेट आणि १००० चौ. फु. जागा म्हणजे १ कोटी रुपयाला पडतोय. पूर्वी याच जागेसाठी ८० लाख रु. बँक लोन + व्हाईट मनी आणि उरलेले २० लाख (ज्यात मुख्यत्वे ५०० आणि १००० च्या नोटा आहेत असे गृहीत धरू ) हे कॅशने (यात काळे का पांढरे असोत दोन्ही काळे होणार आहेत.) असा व्यवहार असेल. आता त्याच ब्लोकसाठी वरचे २० लाख कॅश स्वरुपात देता येणार नाहीयेत, कारण सगळ्या ५००,१००० नोटा बाद आहेत. तर मग बिल्डर ते २० लाख कवर करायला रेट वाढवणार न? कि जास्त टक्स पडेल म्हणून सध्या ८० लाखावर चालवून घेईल आणि नंतर दुसर्या काही मार्गाने वसूल करेल? हा व्यवहार आता कसा होईल कि काही दिवसासाठी ठप्प होईल?

ठप्प होईल..

संदीप डांगे
Sat, 11/12/2016 - 13:12 नवीन
ठप्प होईल..
↩ प्रतिसाद: साधा मुलगा

अगदीच ठप्प होण्याचे काय कारण

हतोळकरांचा प्रसाद
Sat, 11/12/2016 - 20:00 नवीन
अगदीच ठप्प होण्याचे काय कारण असावे?
↩ प्रतिसाद: संदीप डांगे

चला, ठीक आहे, सांगतो.

संदीप डांगे
Sat, 11/12/2016 - 23:02 नवीन
चला, ठीक आहे, सांगतो. विक्रेता जुन्या नोटा घेत नै, खरेदीदार नवीन आणू शकत नाही, व्यवहार ठप्प. व्हाइट मध्ये व्यवहार करणारे मेन बिल्डर्स, पण सर्व बिल्डरांसोबत व्यवहार करत नाहीत, बहुसंख्य लोक आपापसात करतात, तिथे ड्युटी वाचवण्यासाठी, आपले उत्पन्न सरकारला दिसू नये म्हणून ब्लॅक ने व्यवहार करतात, ते आता करू शकत नाहीत, म्हणजे ठप्पच! पण- जुन्या नव्या नोटांच्या चकरात प्रॉपर्टीचे खूप व्यवहार होत आहेत असा आजचा फिल्ड रिपोर्ट, काय कसे ती काही दिवसात उघड होईलच!
↩ प्रतिसाद: हतोळकरांचा प्रसाद

फक्त काळे पैसेवालेच व्यवहार

हतोळकरांचा प्रसाद
Sat, 11/12/2016 - 23:52 नवीन
फक्त काळे पैसेवालेच व्यवहार करतात असं काही आहे का? आमच्यासारखे पंढरेवालेही करतात की! व्यवहार कमी होतील असं म्हणू शकतो पण ठप्प कसे काय? आणि काळेवाल्यांचे ठप्प झाले तरी त्यात वाईट वाटण्यासारखं काहीच नाही. खरंतर तोच सरकारचा उद्देश नाहीये का?
↩ प्रतिसाद: संदीप डांगे

कोणाला वाईट वाटतंय असं इथे

संदीप डांगे
Sun, 11/13/2016 - 00:08 नवीन
कोणाला वाईट वाटतंय असं इथे कोणत्या प्रतिसादावरून वाटलं बुवा, वैयक्तिक तर मला फार आनंद होईल, किमती झपाटयाने उतरतील, गरजू घरं घेऊ शकतील!
↩ प्रतिसाद: हतोळकरांचा प्रसाद

वाईट वाटत नाहीये ना, झालं तर

हतोळकरांचा प्रसाद
Sun, 11/13/2016 - 00:48 नवीन
वाईट वाटत नाहीये ना, झालं तर मग अजून काय हवं!
↩ प्रतिसाद: संदीप डांगे

ह्या प्रतिसादाला काय अर्थ आहे

संदीप डांगे
Sun, 11/13/2016 - 08:21 नवीन
ह्या प्रतिसादाला काय अर्थ आहे? स्वतःच दृश्य बनवता आणि स्वतःच असं काही नाही म्हणून खुश होताय! वा, छान!
↩ प्रतिसाद: हतोळकरांचा प्रसाद

डांगेजी, मी मिपाच्या मेन

हतोळकरांचा प्रसाद
Sun, 11/13/2016 - 10:29 नवीन
डांगेजी, मी मिपाच्या मेन बोर्डवर वैयक्तिक टीका करण्यात विश्वास ठेवत नाही. तुमच्या एकूणच प्रतिक्रिया आणि फील्ड रिपोर्टवरून हा निर्णय तुम्हाला रुचला नाही असे माझे मत बनले होते जे तुमच्या वरील प्रतिसादावरून तसे नाही असे सांगितलेत. यात चूक असे काय? तरी असो, यावर इथे चर्चा करणे विषयाशी अवांतर ठरेल. खरडफळा किंवा व्यनि वर चर्चा करू. बाकी तुम्हाला वाईट वाटले असल्यास किंवा राग आला असल्यास आपली सपशेल दिलगिरी!
↩ प्रतिसाद: संदीप डांगे

नाही, मलाही तुमच्या

संदीप डांगे
Sun, 11/13/2016 - 11:07 नवीन
नाही, मलाही तुमच्या प्रतिसादावरून तसे, वाटले, तुम्हीही राग मानू नका! मला निर्णय रुचला नाही असे कुठेच ध्वनितही केलं नाहीये, निर्णय शंभर टक्के योग्य हे पहिल्या दिवसापासून माझे मत आहे आणि ते आताही आहेच, ढिसाळ नियोजनाबद्दल आक्षेप आहे व तो मी मांडतोय, शिवाय जे रोज अनुभवास येतंय तो अनुभवही,
↩ प्रतिसाद: हतोळकरांचा प्रसाद

तुम्ही म्हणता त्या प्रमाणे जर

जयंत कुलकर्णी
Sat, 11/12/2016 - 14:25 नवीन
तुम्ही म्हणता त्या प्रमाणे जर किमती कमी झाल्या नाहीत तर अजून एक गंमत होऊ शकते. समजा एक लाखाला एक फ्लॅट आहे. त्यातील अंदाजे चाळीस हजार विकत घेणार्‍याला रोख मागितले जातात. म्हणजे त्याला आता साठ बँकेतून उभे करावे लागतात. चाळीससाठी सरकारला, बेंकेला कसलिही काळजी करायचे कारण नव्हते ती आता करावी लागेल. सब प्राईमसारखी परिस्थिती येथे उद्भवली नाही कारण बँक पूर्ण घर गहाण ठेवत असे ज्यात त्यांनी फक्त साठच घातले आहेत. आता त्यांना एक लाखाच्या ऐशी टक्के लोनची व्यवस्था करावी लागेल याचाच अर्थ बेंकांना जवळ जवळ ३० टक्के जास्त रक्कम उभी करावी लागेल नाहीतर हा सेक्टर बुडीत जाईल... तरुण आता घरे कशी घेऊ शकतात हे मला पडलेले एक कोडे आहे.... अर्थात तज्ञांचे मत मला मान्य असेलच. मी मोडींनी जी काळा पैसा नस्ट करण्यासाठी पावले उचलली आहेत त्याला माझा पूर्ण पाठिंबा आहे पण सगळ्या बाजुंचा विचार व्हावा म्हणून...
↩ प्रतिसाद: साधा मुलगा

नाहीतर हा सेक्टर बुडीत जाईल...

अर्धवटराव
Sat, 11/12/2016 - 15:15 नवीन
अशक्य. सेक्टर बुडीत जायला सर्प्लस सप्लाय आणि फुगवलेली डिमांड लागते. भारतात तसा सीन नाहि. राहत्या घरांचा किंवा जमिनीचा प्रॉब्लेम फंड अलॉकेशन नसुन ति जमीन वा घर नेमकी कुठे, आणि कुठल्या सोयींनी युक्त आहे हा आहे. त्या मूळ डिमांडमधे काळी लॉबी काळा हस्तक्षेप करुन समस्या वाढवते. अन्न, पाणि, आणि वीजेएव्हढीच रिअल इस्टेटचा बिझनेस ज्येनुइन आहे.
↩ प्रतिसाद: जयंत कुलकर्णी

त्यातील अंदाजे चाळीस हजार

हतोळकरांचा प्रसाद
Sat, 11/12/2016 - 20:04 नवीन
त्यातील अंदाजे चाळीस हजार विकत घेणार्‍याला रोख मागितले जातात.
माझ्या माहितीनुसार हे प्रमाण 80:20 आहे. काही बँका 85% पण लोण देतात.
↩ प्रतिसाद: जयंत कुलकर्णी

वरचे 20 लाख रुपये देता येत

हतोळकरांचा प्रसाद
Sat, 11/12/2016 - 19:56 नवीन
वरचे 20 लाख रुपये देता येत नाहीयेत तर 1 कोटींचा फ्लॅट घेतला जाणार नाही. ८० लाखांच्या फ्लॅटला प्रेफेरेन्स दिला जाईल. काळा पैसा आहे म्हणून फ्लॅट घेणाऱ्यांची संख्या घटेल म्हणजेच मागणी घटेल आणि म्हणून दर कमी होतील. म्हणजे बांधकाम व्यावसायिक हे लोकांची क्षमता नसल्यामुळे नफा मार्जिन कमी करतील असं एका वृत्तवाहिनीच्या चर्चेत डीएसकेंनी सांगितलं.
↩ प्रतिसाद: साधा मुलगा

ही शक्यता नाकारता येत नाही पण

जयंत कुलकर्णी
Sat, 11/12/2016 - 22:11 नवीन
ही शक्यता नाकारता येत नाही पण बँकांची जोखीम वाढणार हेही बहुतेक खरे असावे...
↩ प्रतिसाद: हतोळकरांचा प्रसाद

2000 रुपयांची नवीन नोट आली

ग्रेंजर
Sat, 11/12/2016 - 13:38 नवीन
2000 रुपयांची नवीन नोट आली म्हणे बाजारात

कृपया बनावट नोट असे वाचावे

ग्रेंजर
Sat, 11/12/2016 - 13:44 नवीन
कृपया बनावट नोट असे वाचावे
↩ प्रतिसाद: ग्रेंजर

ती कलर xerox होती हो, सहज

साधा मुलगा
Sat, 11/12/2016 - 14:07 नवीन
ती कलर xerox होती हो, सहज ओळखता येते.
↩ प्रतिसाद: ग्रेंजर

फिल्ड रिपोर्टः "तीन दिवस सहा

संदीप डांगे
Sat, 11/12/2016 - 14:47 नवीन
फिल्ड रिपोर्टः "तीन दिवस सहा मशीन लावून नोटा मोजण्याचे काम चालू होते, पंधरा करोड कॅश मोजली, त्यात ८०-९० लाख रुपये बनावट नोटा निघाल्या." :))

कुठे ?

चाणक्य
Sat, 11/12/2016 - 15:06 नवीन
.
↩ प्रतिसाद: संदीप डांगे

हा रिपोर्ट तुम्हाला फर्स्ट

कॅप्टन जॅक स्पॅरो
Sun, 11/13/2016 - 09:33 नवीन
हा रिपोर्ट तुम्हाला फर्स्ट हँड कसा मिळाला बरं? हा रिपोर्ट कॉन्फिडेन्शिअल असायला हवा.
↩ प्रतिसाद: संदीप डांगे

कप्तान, मी इथे उगाच मनाला

संदीप डांगे
Sun, 11/13/2016 - 10:09 नवीन
कप्तान, मी इथे उगाच मनाला येईल ते टाकत नाही.आपापला परीघ! शिवाय ते पंधरा कोटी काळा पैसा आहेत असं कुठं म्हटलंय? अकौंटेड करन्सीहि असू शकतेच! मुद्दा फक्त खोट्या नोटा किती प्रमाणात आहेत एवढाच!
↩ प्रतिसाद: कॅप्टन जॅक स्पॅरो

फील्ड रिपोर्ट पेक्षा बातमीचा

हतोळकरांचा प्रसाद
Sun, 11/13/2016 - 10:16 नवीन
फील्ड रिपोर्ट पेक्षा बातमीचा स्रोत सांगितला तर बातमी जास्त विश्वासार्ह वाटणार नाही का?
↩ प्रतिसाद: संदीप डांगे

कोणी विश्वास ठेवलाच पाहिजे

संदीप डांगे
Sun, 11/13/2016 - 10:20 नवीन
कोणी विश्वास ठेवलाच पाहिजे असा आग्रह नाही, मी काही अधिकृत पत्रकार, बातमीदार नाही.
↩ प्रतिसाद: हतोळकरांचा प्रसाद

ओके!

हतोळकरांचा प्रसाद
Sun, 11/13/2016 - 11:09 नवीन
ओके!
↩ प्रतिसाद: संदीप डांगे

मी तुम्हाला तुम्ही मनाला येईल

कॅप्टन जॅक स्पॅरो
Sun, 11/13/2016 - 10:57 नवीन
मी तुम्हाला तुम्ही मनाला येईल ते टाकताय असं किंवा थापा मारताय असं म्हणत नाहिये. हि माहिती कॉन्फिडेन्शिअल असायला हवी आणि ती तुम्हाला राजरोसपणे कशी मिळतीये हे विचारतोय. हि माहिती गंभीर आहे.
↩ प्रतिसाद: संदीप डांगे

काही लोक गळक्या तोंडाचे असतात

संदीप डांगे
Sun, 11/13/2016 - 11:11 नवीन
काही लोक गळक्या तोंडाचे असतात किंवा जाम टेन्शन मध्ये असतात, म्हणून मिळते माहिती. रोज वेगवेगळ्या क्षेत्रातल्या लोकांशी थेट संबंध येतो, तेव्हा समजतच. काही जणांचे धाबे दणाणले तेही बघतोय, एकूण मजेदार आहे सर्वच प्रकरण!
↩ प्रतिसाद: कॅप्टन जॅक स्पॅरो

ओके.

कॅप्टन जॅक स्पॅरो
Sun, 11/13/2016 - 11:21 नवीन
ओके.
↩ प्रतिसाद: संदीप डांगे

त्यात ८०-९० लाख रुपये बनावट

मृत्युन्जय
Mon, 11/14/2016 - 11:48 नवीन
त्यात ८०-९० लाख रुपये बनावट नोटा निघाल्या." मग आता हे ८० - ९० लाख बँकेत जमा करणार का? कारण सामान्य माणूस नक्कीच घेणार नाही ५०० / १००० च्या नोटा.
↩ प्रतिसाद: संदीप डांगे
  • «
  • ‹
  • 8
  • 9
  • 10
  • 11
  • 12
  • 13
  • 14
  • 15
  • 16
  • ›
  • »

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा