मी, किशोर कुमार आणि कराओके……
भारतात आणि इतर जगातही प्रथितयश, नामांकित गायक आतापर्यंत अनेक होऊन गेले… अजूनही आहेत….गाण्यात किंवा एकंदरीत सगळ्या प्रकारच्या संगीतातच मनाला उभारी देण्याची प्रचंड ताकद आहे.नैराश्यासारख्या मानसिक अवस्थेत संगीतच मनाला नवी संजीवनी देतं.अनेकांना अनेक प्रकारचे संगीत आवडतं.मला स्वतःला विशेष शास्त्रीय किंवा सुगम संगीत वगैरे प्रकार कळत नाहीत.माझ्या कानाचा ठाव घेणारा एकमेव आवाज म्हणजे किशोर कुमार….कॉलेजमध्ये असल्यापासून जर कोणाची गाणी आवडत असतील तर ती फक्त ह्याच मनुष्याची ….ती आवड अजूनही कायम आहे आणि आयुष्यभर राहील.
त्याचा आवाज कुठेही म्हणजे अगदी चालता चालता रस्त्यात जरी आला तरी पाउल पुढेच टाकवत नाही आणि तिथेच माझी तंद्री लागते मग बरोबर कोणीही असो…… मूड कुठचाही असो… तो बदलण्याचं सामर्थ्य फक्त ह्याच आवाजात ! आनंद, निराशा, उत्साह, वैश्विक सत्यकथन, वात्रटपणा वगैरे प्रकार ह्या आणि ह्याच स्वरात गोड लागतात…. तो गातो तेव्हा तो फक्त एकटा गात नसतो … त्याच्या आवाजात आपलंच मन गातंय असा अनेकदा भास होतो. काही आवाजच असतात असे… दैवी… आत खोल काळजात रुतून मनाचा ठाव घेणारे……
मला त्याची गाणी ऐकल्यानंतर वाटायचं की मला सुद्धा त्याच्यासारखं गाता यावं….किंबहुना मी जर गाऊ लागलो तर त्याच्यासारखाच गाईन असं नेहमी वाटायचं…पण अस्मादिकांचा आवाज म्हणजे (जाउदे, त्याविषयी न बोललेलंच बरं !) त्याकाळी म्हणजे साधारण १९९८-९९ साली सीडी, इन्टरनेट वगैरे गोष्टी इतक्या सर्रास उपलब्ध नव्हत्या त्यामुळे त्याची गाणी मिळवायची कुठून ? फक्त कसेट मिळायच्या, त्याही बऱ्यापैकी महाग होत्या. बाजारात शोधाशोध करून त्याच्या गाण्यांचं पुस्तक तर विकत आणलं आणि त्याची बरीचशी गाणी अक्षरशः पाठ केली. एक टेपरेकॉर्डर पण बाबांच्या मागे लागून विकत घेतला. गाणी तर पाठ झाली पण सुरांचं काय ? मला त्याच्यासारखं छान गाता यावं म्हणून मोठ्या आशेने एक संगीताचा क्लास सुरु केला (त्याने कुठलेही गाण्याचे शिक्षण घेतले नव्हते हे माहित असूनही !) पण गाणं काही जमेना… सूर आणि पेटी यांचा मिलाप काही केल्या होईना… पेटी वाजवली कि सूर विसरायचा आणि सूर धरला कि पेटी वाजवणं … अखेर त्या गुरूंनी माझा आणि मी गाणे शिकण्याचा नाद सोडला! प्राथमिक सारेगम झालं होतं फक्त पण त्याने काय होतंय ?
शेवटी मनात एक विचार आला की किशोरकुमारचा प्रत्यक्ष आवाज आपल्या बरोबर असताना आपण कशाला कुठे जाउन गाणं शिकायचं ? हे स्वरांच महाविद्यालय आपल्या बरोबर असताना कशाला कोणाची शिकवणी हवी आहे ? मी ठरवलं जितक्या जमतील तितक्या कसेट मिळवायच्या आणि त्यांच्या सुराबरोबरच आपला सूर मिसळायचा,मग काहीही होवो… झालं, साधना सुरु झाली. सुरुवातीला गाण्याबरोबर गाणं म्हणताना किशोरचे स्वर्गीय सूर आणि माझा गर्दभीय आवाज मिळून निराळं व्यंजन तयार व्हायचं … दिवस रात्र तहान भूक विसरून मी फक्त किशोरचीच गाणी म्हणत बसायचो … झपाटल्यासारखा रात्री अपरात्री उठून कधीही हा उद्योग सुरु करायचो… अनेकदा मला किशोरसारखं गाता येत नाही म्हणून अक्षरशः रडायचो सुद्धा, पण कुठे तो आणि कुठे मी ! सतत सराव करून करून माझा आवाज खरच हळूहळू बदलू लागला आणि सूर, ताल आणि लय यांचा थोडाफार अंदाज येऊ लागला. त्यानंतर घरात फक्त किशोर किशोर आणि किशोरच !! टेपरेकोर्ड ऐकून घरचे वैतागले आणि तो विकून टाकायची पण धमकी दिली मला … अगदी देवाच्या दर्शनाच्या रांगेत उभं राहूनही माझं तेच चालू असायचं …. आईवडिलांना मी बहुतेक वाया जातोय वगैरे स्वप्नं पडायला लागली पण मी ठाम होतो. आणलेली कसेट मला व्यवस्थित तोंडपाठ झाली अगदी त्या गाण्यातल्या ठेहरावांसकट….असे अनेक महिने निघून गेले….माझे कॉलेजमधले कितीतरी मित्र अतिशय सुंदर गाणी म्हणायचे. मलाही कधीतरी तसं गाणं कॉलेजच्या कार्यक्रमात म्हणता यावं म्हणून माझा आटापिटा चालू होता.
अखेर सतत त्याच गोष्टीचा ध्यास घेतल्यामुळे मला किशोरची बहुतेक गाणी पाठ झाली पण मला गाणं येतंय की नाही हे कसं कळणार? कारण त्यात त्याचे स्वर आणि पार्श्वसंगीत एकत्रच होतं. दरम्यानच्या काळात कधीतरी मला "कराओके" या प्रकाराचा सुगावा लागला आणि अलीबाबाच्या गुहेत प्रवेश मिळाल्यासारख वाटलं. मग दिवस रात्र ती सीडी आणि मी …कुठेही जाणे नाही, येणे नाही, खाणे पिणे नाही …फक्त कराओके आणि मी, बस ! माझी भीड आवाज सुटल्यामुळे चेपू लागली आणि अखेर माझ्या कॉलेजच्या शेवटच्या वर्षी किशोरची मनोमन आठवण काढून तोंड उघडलं आणि अहो आश्चर्यम …. ते गाणं चक्क जमलं की हो ! मग काय …. धमाल …. त्यानंतर पुढच्या पोस्ट ग्रजुएशनच्या दरवर्षीच्या कार्यक्रमात माझं गाणं ठरलेलंच. गम्मत म्हणजे तालमीच्या वेळेला न जमलेलं गाणं स्टेजवर मात्र चपखल जमून जायचं,कसं ते देवच जाणे !
आता मी ह्या प्रकाराला बराच सरावलो आहे.त्याच्यासारखं नाही तर निदान त्याची बरीचशी गाणी गाउन मला खूप बरं वाटतं. मला स्वतःला प्रचंड मानसिक शांतता मिळते ह्यातून…आज अजूनही कधी कंटाळा आला तर मी, करोके आणि गाणी आणि… दे धमाल ! एक मात्र नक्की की थोडाफार तानसेन व्हायला आधी उत्तम कानसेन असावंच लागतं. आता फक्त एकाच ध्यास आहे… "योडलिंग"चा … बघूया कसं आणि कधी जमतंय ते !
जय हो बाबा किशोर कुमारम !!
प्रतिक्रिया
वा.. गाते रहो...
Warning:लेखापेक्षा प्रतिसाद मोठा होऊ शकतो!
तुमच्या आवाजाची एक ऑडियो क्लिप टाकायला पाहिजे होती!
आमची फोटो डकवायची मारामार....
किशोर कुमार, मन्ना डे, हेमंत कुमार,तलत मेहमूद,
सहमत मुक्तविहारि,
गाणे ऎकवा की नुसते कवतिक
कुठलीही कला कॅलिडोस्कोपिक असते...
जीवाच्या जवळचा विषय. किशोर कुमार!
हे हे हे
एक लंबर. गुरू हो जाओ शुरू. ;)
आय एम इण
SOS
"आ के सीधी लगी दिल पे ऐसे
वा वा!
हायला भारीच.
सुरेख
किशोर
पानी रे पानी तेरा रंग कैसा जिसमे मिलाएं जाय उसके जैसा
! किशोरभक्त नाखुप्रत्येक वाक्यास...
कराओके रेकॉर्ड करायची स्वस्त अन सोपी पद्धत
ब्रेव्हो !
कारावोके
+१
गाता येत नाही
ह्या निमित्ताने एक किशोर कुमार मिपा कट्टा करुया !
किशोरकुमारवर
किशोर कुमारला आमचा सदैव दंडवतच आहे!
आपापल्या आवाजातली किशोर ची
तेच म्हणतोय...
:(
मीडियाफायरवर अपलोड करा नाहीतर
सॅन्डीभाय, इथे अपलोड करा.
हायला मापं छुपेरुस्तुम निघाले
किशोरदांना
जय हो बाबा किशोर कुमारम !!
वाह मापं ,सुंदर लिहीलत.....बेहद खुष झालो