ऊड ऊड रे प्लोव्हू... ३०,००० किमीची फेरी मारून येऊ ! : ०६ : चिमुकल्या साँगबर्डचे नाव छोटे, लक्षण मोठे...
लेखनविषय (Tags)
===================================================================
ऊड ऊड रे प्लोव्हू... ३०,००० किमीची फेरी मारून येऊ ! :
०१ : प्लोव्हरची महाभरारी... ०२ : महाभरार्यांबद्दल थोडेसे...
०३ : प्रवासी पक्षांची दिशादर्शक प्रणाली... ०४ : डोळे हे चुंबकीय गडे !...
०५ : बगळ्यांची माळ फुले अजुनि अंबरात... ०६ : चिमुकल्या साँगबर्डचे नाव छोटे, लक्षण मोठे...
===================================================================
कदाचित, एक चिमुकलासा सुंदर साँगबर्ड हे गुपित उघड करायला शास्त्रज्ञांना मदत करेल !
प्रवासी पक्षांच्या मार्गांचे अनेक नकाशे आतापर्यंत नक्की केले गेलेले आहेत. त्यातले दोन बहुसंशोधित क्षेत्रांवरील मार्गांचे प्रातिनिधिक नकाशे खाली दिले आहेत...
...
डावीकडे : अमेरिका खंडावरून व त्याला लागून असलेल्या समुद्रांवरून जाणारे मार्ग आणि
उजवीकडे : प्रशांत महासागरावरून आणि त्याला लागून असलेल्या भूभागांवरून जाणारे मार्ग
चिमुकल्या साँगबर्डचे नाव छोटे, लक्षण मोठे
साँगबर्ड किंवा ओसाईन्स (Oscines) या नावाने ओळखली जाणारी एक छोट्या आकाराच्या पक्षांची जमात आहे. सुमारे ५ कोटी वर्षांपूर्वी पृथ्वीवरील सर्व भूभाग गोंडवन नावाने एकत्रित होते तेव्हा ही पक्षीजमात आताच्या ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड व अंटार्क्टिका या जागेवर उत्क्रांत झाली आणि नंतर सर्व जगभर पसरली. या पक्षांची लांबी (डोके ते शेपटीचे टोक) साधारणपणे १६ सेमी व विस्तारलेल्या पंखांचा आवाका २३-२९ सेमी असतो. म्हणजे हे पक्षी आकाराने चिमणीपेक्षा थोडेसे मोठे आहेत. या पक्षीजमातीत अंदाजे ४,००० प्रजाती आहेत आणि त्या जेवढ्या त्यांच्या दृश्य गुणधर्मांवरून (आकार, रंग, पंखाचा विस्तार, इ) ओळखल्या जातात त्यापेक्षा जास्त त्यांच्या कर्णमधुर आणि कलापूर्ण गायनपद्धतीमुळे ओळखल्या जातात... जणू गायकीची वेगवेगळी घराणीच आहेत ती ! :)...
स्वॅलोचा एक प्रकार (Hirundo_abyssinica) व इस्टर्न यलो रॉबिन (Eopsaltria australis)
पाठीवर जिओलोकेटर बसवलेला वूड थ्रश प्रकाराचा नर पक्षी
लेखमालेतील सर्व फोटो लेखाखाली दिलेल्या यादीत उर्धृत केलेल्या जालावरील संदर्भलेखांतून किंवा इतर जलस्रोतावरून घेतलेले आहेत.
===================================================================
प्रतिक्रिया
हा भागही माहितीपूर्ण.
चौथा मुद्दा खरोखरच चिंतेचा
सांगोपाम्ग
+ १
छान व वेगळी माहिती मिळत आहे
मस्तच.
खूपच छान लेखमाला. तुमच्या
मस्त...
सर्व वाचकांसाठी आणि
अतिशय माहितीपूर्ण
खूपच छान लेखमाला.
खूप माहितीपूर्ण.
46 birds fall from sky in