Skip to main content
मिसळपाव

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन
Submitted by साहित्य संपादक on Wed, 12/16/2015 - 08:29
लेखनविषय (Tags)
कला
लेखनप्रकार (Writing Type)
सद्भावना
आस्वाद
नमस्कार मंडळी, यापूर्वीच्या छायाचित्रणकला स्पर्धांना दिलेल्या प्रतिसादाबद्दल अनेक धन्यवाद. याच मालिकेतल्या नव्या स्पर्धेची घोषणा करताना आम्हाला अत्यंत आनंद होत आहे. या वेळचा विषय आहे - कृषी. येथे शेतांची किंवा फळबागांची छायाचित्रे अपेक्षित आहेत. मिपाकरांनी सुचवल्यानुसार यंदा स्पर्धकांचे नाव प्रवेशिकेबरोबर न लिहिता मतदानाचा धागा प्रकाशित करायचे आम्ही ठरवले आहे. यासाठी इच्छुक स्पर्धकांनी आपल्या प्रवेशिका साहित्य संपादक या आयडीला व्यक्तिगत संदेशाद्वारे पाठवाव्यात. प्रवेशिका पाठवण्याचा शेवटचा दिवस आहे ३० डिसेंबर. प्रवेशिकेबरोबर छायाचित्रणाच्या ठिकाणाची थोडक्यात माहिती आवर्जून पाठवा. दर वेळी प्रवेशिकांबरोबर विषयाशी संबंधीत अवांतर छायाचित्रे 'स्पर्धेसाठी नाही' या शीर्षकाच्या प्रतिसादाने प्रकाशित केली जातात. यंदाही तुम्ही अवांतर छायाचित्रे या धाग्यावर प्रतिसादांद्वारे प्रकाशित करू शकता. स्पर्धेचे नियम पूर्वीप्रमाणेच आहे. यापूर्वीच्या छायाचित्रणकला स्पर्धांचे दुवे
मानवनिर्मित स्थापत्य ~ आनंद ~ ऋतु ~ उत्सव प्रकाशाचा ~ भूक व्यक्तिचित्रण ~ शांतता ~ चतुष्पाद प्राणी ~ सावली कृष्णधवल छायाचित्रे ~ प्रतीक्षा ~ पाऊस ~ माझ्या घरचा बाप्पा ~ जलाशय
टीप - मिपावर छायाचित्रे प्रकाशित करण्यासंबंधी मदत येथे उपलब्ध आहे.
  • Log in or register to post comments
  • 15036 views

प्रतिक्रिया

Submitted by एस on Wed, 12/16/2015 - 11:03

Permalink

वा! खूपच वेगळा विषय आहे. आपला

वा! खूपच वेगळा विषय आहे. आपला कंफर्ट झोन सोडून विचार करण्यास छायाचित्रकारांना भाग पडेल अशी आशा.
  • Log in or register to post comments

Submitted by एस on Wed, 12/16/2015 - 11:04

Permalink

वा! खूपच वेगळा विषय आहे. आपला

वा! खूपच वेगळा विषय आहे. आपला कंफर्ट झोन सोडून विचार करण्यास छायाचित्रकारांना भाग पडेल अशी आशा.
  • Log in or register to post comments

Submitted by कपिलमुनी on Wed, 12/16/2015 - 11:50

Permalink

कृषी

कृषी म्हणजे शेती विषयक म्हणजे शेतीची मशागत करतानाची ईई छायाचित्रे चालतील का ? की केवळ पिकांचीच हवी आहेत याचा खुलासा / विवेचन / डिटेल्स अपेक्षित
  • Log in or register to post comments

Submitted by साहित्य संपादक on Wed, 12/16/2015 - 17:23

In reply to कृषी by कपिलमुनी

Permalink

हो चालतील

प्रत्यक्ष शेतातली किंवा फळबागेतली कुठल्याही प्रक्रियेची छायाचित्रे चालतील.
  • Log in or register to post comments

Submitted by जागु on Wed, 12/16/2015 - 12:05

Permalink

वा जिव्हाळ्याचा विषय.

वा जिव्हाळ्याचा विषय.
  • Log in or register to post comments

Submitted by जागु on Wed, 12/16/2015 - 12:36

Permalink

पेण येथिल तांदळाची शेती.

पेण येथिल तांदळाची शेती. Image removed.
  • Log in or register to post comments

Submitted by पैसा on गुरुवार, 12/17/2015 - 14:53

In reply to पेण येथिल तांदळाची शेती. by जागु

Permalink

स्पर्धेसाठी नाही चालणार ग

साहित्य संपादक आयडीला व्यनि करून पाठव स्पर्धेचा फोटो.
  • Log in or register to post comments

Submitted by असंका on गुरुवार, 12/17/2015 - 12:02

Permalink

मंजे जे छायाचित्र इथे

मंजे जे छायाचित्र इथे सदस्यनामासह प्रकाशित होतंय ते आपोआप 'स्पर्धेसाठी नाही'/'बाद झालं' असं समजायचं का?
  • Log in or register to post comments

Submitted by पैसा on गुरुवार, 12/17/2015 - 14:52

In reply to मंजे जे छायाचित्र इथे by असंका

Permalink

हो ना!

संपूर्ण गुप्त मतदान व्हावे असा प्रयत्न आहे, म्हणून प्रवेशिका सा सं आयडीला व्यनि करून पाठवा असे लिहिले आहे ना.
  • Log in or register to post comments

Submitted by मोहन on Fri, 12/18/2015 - 11:46

Permalink

सा सं प्रवेशिका पोहोचल्याची

सा सं प्रवेशिका पोहोचल्याची पोच - पावती देतील का?
  • Log in or register to post comments

Submitted by साहित्य संपादक on Fri, 12/18/2015 - 12:18

In reply to सा सं प्रवेशिका पोहोचल्याची by मोहन

Permalink

हो

हो, आता पर्यंत मिळालेल्या प्रवेशिकांना पोचपावती देण्यात आली आहे.
  • Log in or register to post comments

Submitted by साहित्य संपादक on गुरुवार, 12/31/2015 - 10:35

Permalink

आतापर्यंत मिळालेल्या प्रवेशिका

श्रावणात कोकणात भटकंती करत असताना.. Image removed. EXIF: Camera - NIKON D90; Lens - 10.0-20.0 mm; f/4.0-5.6; ISO - 400 Exposure - 1/100 sec; Aperture - 10.0; Focal Length - 10mm महाबळेश्वर नजिकच्या एका खेड्यातील शेत Image removed. कर्नाटकातील उत्तर कन्नडा जिल्ह्यातील दांडेली तालुक्यातील उळवी जवळच्या एका खेड्यातील पिकुन कापणीला आलेली भातशेती Image removed. Camera NIKON D3300; ISO 400; Exposure 1/400 sec; Aperture 11.0; Focal Length 55mm; Focal Length (in 35mm film) 82; Lens 54-201mm f/4-5.7 Flash not used डहाणू येथील एक आंब्याची बाग Image removed. या बागेत संकरित जातीच्या आंब्यांची झाडे असल्याने ह्या कैर्या इतक्या खाली लगडलेल्या आहेत. तसेच हे आंबे चवीलाही गोडच होतात. पुणे-कराड रस्त्यात मन मोहुन टाकणारी झेंडुच्या फुलांची शेती Image removed. भात-लावणी/ पेरणी Image removed. डिटेल्स: कॅमेरा -७००डी; लेन्स- कॅनन ७०-३०० एम्‌.एम्‌ लेन्स टॅमेरॉन; आय्‌.एस्‌. ओ. - १०० एफ्‌ स्टॉप- एफ्‌ ४.०; एक्स्पोजर टाईम- १/५०० सेकंद; मोड- अपॅर्चर प्रायोरिटी पोस्ट प्रोसेसिंग- लाईटरूम - कलर करेक्शन आणि फ्रेम क्रॉपिंग स्थळ- सिंहगड पायथा विसापूर किल्ल्याच्या पायथ्याशी असलेली भातशेती Image removed. सावडव ता. मालवण येथे भात शेतीची लावण करताना Image removed. कर्नाटकातील मद्दूर येथे टिपलेले भातशेतीचे छायाचित्र Image removed. राजुरी येथील द्राक्षबाग Image removed. कॅमेरा - सॅमसंग e७ मध्य प्रदेशातील एका खेड्यात सुरू असलेली शेतीची कामे (फेब्रुवारी २००४) Image removed. EXIF: Canon Powershot A60, f5.6, 1/1000 sec, 16.2mm इंटरनॅशनल क्राॅप रीसर्च सेंटर, हैदराबाद, पाटणचेरु Image removed. रत्नागिरी मधील पारंपारीक शेती Image removed. तळपत्या उन्हात कांद्याला पाणी देणारा शेतकरी. Image removed. EXIF: Shot on DJI PHANTOM 3 Quadcopter Shutter Speed 1/509; f/2.8; ISO 100; Lens 20 mm Fix पहाटे चिपळूण रेल्वे स्थानकाबाहेरील हे द्रुश्य. Image removed. कोवळ्या उनामुळे शेतीला नवीनच चमक आली आहे. टीपः चित्रे मोठ्या आकारमानात पाहण्यासाठी त्यांवर क्लिक करावे.
  • Log in or register to post comments

Submitted by प्रचेतस on गुरुवार, 12/24/2015 - 09:24

In reply to आतापर्यंत मिळालेल्या प्रवेशिका by साहित्य संपादक

Permalink

छायाचित्रे आवडली.

छायाचित्रे आवडली. विसापूर किल्ल्याच्या पायथ्याशी असलेले तर एकदम सुपर्ब.
  • Log in or register to post comments

Submitted by असंका on Sat, 12/26/2015 - 12:16

In reply to छायाचित्रे आवडली. by प्रचेतस

Permalink

विसापूर किल्ल्याच्या

विसापूर किल्ल्याच्या पायथ्याशी असलेले तर एकदम सुपर्ब.
+१
  • Log in or register to post comments

Submitted by अजया on Sat, 12/26/2015 - 12:28

Permalink

रंगीबेरंगी झेंडुची शेती आवडली

रंगीबेरंगी झेंडुची शेती आवडली.
  • Log in or register to post comments

Submitted by डॉ सुहास म्हात्रे on Sat, 12/26/2015 - 14:18

Permalink

सुंदर चित्रे !

सुंदर चित्रे ! चित्रांना क्रमांक दिले तर मतदान करणे जास्त सुलभ होईल.
  • Log in or register to post comments

Submitted by साहित्य संपादक on Sat, 12/26/2015 - 20:45

In reply to सुंदर चित्रे ! by डॉ सुहास म्हात्रे

Permalink

चित्रांना क्रमांक

चित्रांना क्रमांक मतदानाच्या धाग्यात देण्याची योजना आहे. त्या धाग्यातला अनुक्रम वेगळा असू शकतो.
  • Log in or register to post comments

Submitted by साहित्य संपादक on Tue, 12/29/2015 - 10:29

Permalink

शेवटचे दोन दिवस

प्रवेशिका पाठवण्याची मुदत उद्या संपत आहे. इच्छुकांनी कृपया नोंद घ्यावी.
  • Log in or register to post comments

Submitted by प्रीत-मोहर on Tue, 12/29/2015 - 10:56

Permalink

चित्र क्र. २, ५ आणि ८ खूप

चित्र क्र. २, ५ आणि ८ खूप आवडली
  • Log in or register to post comments

Submitted by कविता१९७८ on Tue, 12/29/2015 - 22:56

Permalink

ईंटरनॅशनल क्राॅप रीसर्च सेंटर

ईंटरनॅशनल क्राॅप रीसर्च सेंटर कॅम्पस , हैदराबाद, पाटणचेरु
  • Log in or register to post comments

Submitted by कविता१९७८ on Tue, 12/29/2015 - 22:58

In reply to ईंटरनॅशनल क्राॅप रीसर्च सेंटर by कविता१९७८

Permalink

ईंटरनॅशनल क्राॅप रीसर्च सेंटर

ईंटरनॅशनल क्राॅप रीसर्च सेंटर कॅम्पस , हैदराबाद, पाटणचेरु Image removed.
  • Log in or register to post comments

Submitted by प्रीत-मोहर on Wed, 12/30/2015 - 10:26

Permalink

आपले फायनल वोट फोटो क्रमांक ९

आपले फायनल वोट फोटो क्रमांक ९!!!!! इतका अप्रतिम फोटो आहे!!!!
  • Log in or register to post comments

Submitted by खेडूत on Wed, 12/30/2015 - 10:50

Permalink

सुंदर चित्रे आणि आयोजन...!

सुंदर चित्रे आणि आयोजन...!
  • Log in or register to post comments

Submitted by palambar on गुरुवार, 12/31/2015 - 00:02

Permalink

फोटो नं. १० कर्नाटक मद्दुर

फोटो नं. १० कर्नाटक मद्दुर येथिल भातशेति छान फोटो आहे. आभाळाचा रंग व शेतिचा रंग काय जुळ्लाय.
  • Log in or register to post comments

Submitted by palambar on गुरुवार, 12/31/2015 - 00:13

Permalink

मि एक फोटो पाठ्वला आहे, अगदि

मि एक फोटो पाठ्वला आहे, अगदि शेवटच्या सेकंदाला. पोचला का? कळ्त नाहिए.
  • Log in or register to post comments

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password

© 2026 Misalpav.com