Skip to main content
मिसळपाव

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन
Submitted by जेपी on Sun, 12/14/2014 - 10:27
लेखनविषय (Tags)
मुक्तक
समाज
जीवनमान
लेखनप्रकार (Writing Type)
प्रकटन
अनुभव
प्रसंग १- वेळः २ महिण्यापुर्वीची. स्थळ:एका बँक मॅनेजरची केबिन.(मॅनेजर रिटायमेंटला वर्ष कमी असताना नागपुरातुन थेट बदली होऊन लातुरात आलेला) ग्राहक-आत येउ का सायेब मॅ- या ग्रा- सायेब आपल्याला ते हे पीक कर्ज पायजे. ...मॅनेजर कागदपत्र पाह्तो. मॅ- किती कर्ज पाहिजे ? ग्रा- द्या कि एक लाख काय. मॅ- एक लाख !! काय करणार एवढ कर्ज घेउन ? फेडण होणार आहे का ? ग्रा- सायेब आता तुमच्या पासुन काय लपवायच,एका लाखापेकी ३६,००० ची म्हस घ्याची. १४,००० चा कडबा घ्याचा. आन राहीलेला पन्नास तुमच्या बँकेत यफडी करु. काय !! मॅ- आहो पण हे परवडणार आहे का तुम्हाला.पिककर्ज वर्षभरात फेडाव लागेल ७% व्याजासहित कळतय का ? ग्रा- ते कळतय ओ आपल्याला. आता तुमास्नी कळत नसेल तर सांगतो. आता ३६,००० ची म्हस घेतली.म्हस २०० दिवस रोज ५ लिटर दुध देते. दुधाचा भाव ४० रु.लिटर. मंजे रोजचे २०० रु.झाले. २०० दिवसाच उत्पन्न ४०,००० झाल, नंतर म्हस गाभण राहील,तीला रेडकु झाल तर ईकुन टाकायच ५,००० ला.मंजे वर्सभरात म्हसन ४५,००० दिल कमवुन. आता तुमच्या बँकेतील यफडी केलेल्या पयशाच बोलु.बँक ९ % याज दिल.मंजे ५०,००० ला ४,५०० याज मिळल. बाजपता करा ठोक हिसोब,काय!!! मॅ- आता ते पण तुमीच सांगा. ग्रा-सायेब म्हसीन ४५,००० दिले.बँकेच्या यफडी ने ५४,५०० दिले टोटल झाली कि ९९,५०० काय. वरुन म्ह्स बि राहिली कि घरात बोनस म्हनुन,काय!! मॅनेजर - पण तुम्हाला व्याज भराव लागेल कि पिककर्जावर ७,००० त्याच काय? ग्रा- ह्यां... नियमीत कर्ज फेड केली तर सरकार निम्म याज भरतय की.. आणी.. मॅ- आणी काय आता ? ग्रा- आणी दुस्काळ जाहीर झाला तर याज बी माफ व्हईल.आन प्यॅकेज आल तर संमद कर्ज बी माफ व्हईल. काय!!!!! मॅ-*shok* ========================================================================== प्रसंग २- स्थळ-तलाठी कार्यालय वेळ-पंधरा दिवसापुर्वीची.. शेतकरी-मालक नुस्कान लय जास्त झालय आन तुमी पंचनामा लय कमी केलाय जरा वाढवा की पिकवीम्याची रोक्कम ? तलाठी-अरे धोंडीबा,मी काय करणार सरकारी निकषात ६०००/- मिळतील तुला. सरकार ठरवल ते घ्याच. शेतकरी- तेच म्हणतो आहे..सरकार काय बांधावर येऊन बघणार हाय का किती नुस्कान झाल ते,तुमीच आमच सरकार बघा काय तरी करा..जरा चार पयशे सुटु द्या गरीबाला. तलाठी- हम्म.. हे बघ आता मी काय सांगतो ते आईक.. तुझ्या पीकाच्या नुकसानीचा पंचनामा मी बदलुन देतो. ६,०००/- च्या जागी १०,०००/- करतो पण ८,०००/- तुझे आणी २,०००/- माझे. पटतय का बोल ? शेतकरी- मालक २ मंजे जास्त झाल जरा कमी करा.. तलाठी-हे बघ धोंडीबा, हे पीकविम्याची रक्कम आहे. पुढे दुष्काळ जाहीर झाला तर आणखीन मदत मिळेल. त्या पॅकेज मधे करु कमी जास्ती..... . . .शेतकरी गपचुप १०,०००/- पंचनामा घेऊन बाहेर पडतो. ============================================================================ प्रसंग ३- स्थळ - आमचा नेहमीचा कट्टा. वेळ - विधानसभेत ४ दिवसापुर्वि दुष्काळावर चर्चा चालु होती तो दिवस. एक- देवा काय वाटत...यावेळेस कितीच पॅकेज जाहीर व्हईल ? दुसरा- आर सरकारी तिजोरित खडखडाट हाय म्हन..काय जास्त अपेक्षा नाय ठेवाच्या आपण..सोयाबीनं माती खाल्ली यंदा. तिसरा- आर चांगल पाच धा हाजार कोटीच जाहीर व्हायला पायजे..म्या तर लाईट बिल भरला नाय आजुन यावर्सीच..च्या आयला....दणकुन पॅकेज नाय मीळाल तर आपुन हाय आन हे सरकार हाय बघुन घ्यु.. ============================================================================= ( लेखाद्वारे कुणाच्या भावना दुखावायचा हेतु नाही..गावपातळीवर परिस्थीति भिषण आहे..)
  • Log in or register to post comments
  • 51780 views
  • दुष्काळ आणी पॅकेज:काही किस्से २
  • दुष्काळ आणी पॅकेज: काही किस्से ३ (अंतिम)

Book traversal links for दुष्काळ आणी पॅकेजः काही किस्से १

  • दुष्काळ आणी पॅकेज:काही किस्से २ ›

प्रतिक्रिया

Submitted by प्रसाद१९७१ on Tue, 12/16/2014 - 14:07

In reply to @खटपट्या-एक एकर द्राक्ष बाग by जेपी

Permalink

@ जेपी - जर सरकारने बाग तयार

@ जेपी - जर सरकारने बाग तयार करायला एकरी ३ लाख दिले तर हे शेतकरी सरकारला ५० टक्के भागीदार करुन घ्यायला तयार आहेत का? आणि युरोप मधे निर्यात करुन जो पैसा मिळणार आहे तो का सरकारनी भरुन द्यावा? कॉस्ट भरुन द्या असे म्हणले तर ठीक आहे, पण होणारा प्रॉफिट का भरुन द्यावा. पीकविमा ही काय गोष्ट असते, एकरी ३ लाख खर्च करणार्‍या आणि युरोप ला द्राक्ष निर्यात करणार्‍या शेतकर्‍याला हा विमा काढता येत नाही का?
  • Log in or register to post comments

Submitted by आदूबाळ on Mon, 12/15/2014 - 08:33

Permalink

जेपी भाव, मस्त लिहिलंय.

जेपी भाव, मस्त लिहिलंय.
  • Log in or register to post comments

Submitted by सत्याचे प्रयोग on Mon, 12/15/2014 - 10:36

Permalink

प्रसंग १

प्रसंग १ खरच जसा च्या तसा घडावा रे देवा
  • Log in or register to post comments

Submitted by जेपी on Mon, 12/15/2014 - 14:30

In reply to प्रसंग १ by सत्याचे प्रयोग

Permalink

वरचे तिन्ही प्रसंग खरे आहेत..

वरचे तिन्ही प्रसंग खरे आहेत.. माझ्या नजरे समोर घडलेले.
  • Log in or register to post comments

Submitted by जेपी on Mon, 12/15/2014 - 10:39

Permalink

जरा थोडस मुक्तचींतन

वरील किस्से १० पेकी ५ जणांचे आहेत बाकीच्या ५ जणांची कंडीशन अवघड आहे.. शेती व शेतकरी या बद्दल विचार करताना,बर्‍याच गोष्टीचा धांडोळा घ्यावा लागेल. शेतीचा भुतकाळ्,वर्तमान,भविष्य्,राजकारण्,अर्थकारण्,निसर्ग आणी कोसाकोसावर बदलणारी परीस्थीती ,या सगळ्या बाबी विचारात घ्याव्या लागतील.कारण एक पायरी सुटली तर सगळ समीकरण चुकल.ईतकी सगळ्याची सरमिसळ झाली आहे. डोक्यातील विचार नेमक्या शब्दात पकडता येत नसल्यामुळे जाणीजे लेखनसीमा.. *biggrin*
  • Log in or register to post comments

Submitted by खटपट्या on Tue, 12/16/2014 - 04:35

Permalink

माहीती साठी लोकसत्तामधील

माहीती साठी लोकसत्तामधील अग्रलेख खाली देत आहे. http://www.loksatta.com/sampadkiya-news/state-government-under-debt-should-stop-financial-package-or-subsidy-of-farmers-suffer-loss-by-natural-calamity-1051676/?nopagi=1
  • Log in or register to post comments

Submitted by मराठी_माणूस on Tue, 12/16/2014 - 09:58

In reply to माहीती साठी लोकसत्तामधील by खटपट्या

Permalink

हा लेख पुर्वग्रह्दुषीत आणि

हा लेख पुर्वग्रह्दुषीत आणि एकांगी वाटतो. सधन शेतकरी डोळ्यासमोर ठेउन लिहला असे वाटते. गरीब शेतकर्‍या विषयी आगपाखड केली आहे. मताच्या पुष्ट्यर्थ कोणताही डेटा दीलेला नाही.
  • Log in or register to post comments

Submitted by खटपट्या on Tue, 12/16/2014 - 10:10

In reply to हा लेख पुर्वग्रह्दुषीत आणि by मराठी_माणूस

Permalink

तसे धरून चालले तरीही

तसे धरून चालले तरीही चाकरमान्यांची वर्णन केलेली कुचंबणा खोटी ठरत नाही.
  • Log in or register to post comments

Submitted by जेपी on Tue, 12/16/2014 - 10:42

In reply to तसे धरून चालले तरीही by खटपट्या

Permalink

हा लेख पुर्वग्रह्दुषीत आणि

हा लेख पुर्वग्रह्दुषीत आणि एकांगी वाटतो. सधन शेतकरी डोळ्यासमोर ठेउन लिहला असे वाटते. गरीब शेतकर्‍या विषयी आगपाखड केली आहे. कुठलाही पुर्वग्रह दुषित नाही.रोजच्या जगण्यात येणारे अनुभव मांडले आहेत. मताच्या पुष्ट्यर्थ कोणताही डेटा दीलेला नाही याचा डेटा ऑनलाईन मिळत आसता तर आज देश १०० वर्ष पुढे गेला आसता. मताच्या पुष्टयर्थ काय डाटा देउ,ऑनलाईन शोधत बसलो तर माझी शेती कोण पाहणार. वेळ होता ले़ख टाकला.
  • Log in or register to post comments

Submitted by मराठी_माणूस on Tue, 12/16/2014 - 10:44

In reply to हा लेख पुर्वग्रह्दुषीत आणि by जेपी

Permalink

माझे म्हणणे अग्रलेखाबद्दल आहे

माझे म्हणणे अग्रलेखाबद्दल आहे
  • Log in or register to post comments

Submitted by जेपी on Tue, 12/16/2014 - 10:49

In reply to माझे म्हणणे अग्रलेखाबद्दल आहे by मराठी_माणूस

Permalink

माझे म्हणणे अग्रलेखाबद्दल आहे

माझे म्हणणे अग्रलेखाबद्दल आहे तो लेख हि बरोबर आहे.मला काय म्हणायचे आहे ते खालच्या प्रतीसादात आहे. http://www.misalpav.com/comment/640266#comment-640266
  • Log in or register to post comments

Submitted by सुबोध खरे on Tue, 12/16/2014 - 09:36

Permalink

@ खटपट्या

@ खटपट्या मला जे खूप दिवस वाटत होते ते येथे फार स्पष्टपणे लिहिलेले आहे. आत्महत्येचे प्रमाण फक्त महाराष्ट्रात आणि जास्त करून विदर्भात दिसते याचे कारण नक्की कोणी सांगत नाही. २३ वर्षे लष्करात नोकरी केल्यावर मी भारताच्या सर्व राज्यात फिरून कोठेहि दुष्काळामुळे आत्महत्या करण्याचे प्रकार ऐकलेले नव्ह्ते. अगदी ओडीसा मध्ये अत्यंत गरीब शेतकरी हे उंदीर खाताना पाहिले आहेत पण आत्महत्या करताना नाही. सतीच्या प्रथे सारखे हे आत्महत्येचे उदात्तीकरण थांबविले पाहिजे . फक्त भूमि"धारक"चा आत्महत्या करतात भूमि"हीन" नाही मग त्यांना दुष्काळ नाही का? त्यांचा शेतीतील रोजगारहि बुडतोच कि. हीच गोष्ट मी लष्कराबद्दल बोलत असे(लष्करी अधिकाऱ्यांच्या भ्रष्टाचाराबद्दल) तेंव्हा सुद्धा मला संवेदनाहीन म्हणून बोलले जात असे.( २३वर्षे लष्करात काढल्यावर लष्कराबद्दल मला थोडेसे समजून आले असे मला वाटते). कारगिल च्या युद्धाचे वेळेस एका चर्चेच्या वेळेस मी उघडपणे म्हणालो कि आम्ही फक्त आमची नोकरी "इमाने इतबारे" केली यापेक्षा आम्ही काही जास्त देशभक्त नाही. केवळ लष्करी गणवेश घातला तर तुम्ही देशभक्त आठव नाही असे काही नाही. या उलट माझा भाऊ दोन कारखाने चालवितो आणि त्याने ४५ लोकांना रोजगार दिला आहे तेंव्हा तो जास्त देशभक्त आहे असे मला वाटते यावर बराच गदारोळ झाला. जय जवान आणि जय किसान म्हटले कि कसे पुरोगामी वाटते आणि त्यांच्या बद्दल कोणीही काहीहि वाईट बोलले तर चालणार नाही. तसे केले कि तुमच्या वर संवेदनाहीन आणि बुर्ज्वा असा शिक्का बसतो. परंतु लोकसत्तेने यावर स्पष्ट बोलण्याचे धैर्य दाखवले याबद्दल त्यांचे अभिनंदन करावे तेवढे थोडेच.
  • Log in or register to post comments

Submitted by खटपट्या on Tue, 12/16/2014 - 10:12

In reply to @ खटपट्या by सुबोध खरे

Permalink

सहमत !

सहमत ! माझे एवढेच म्हणणे आहे की नोकरदार मंडळीसुध्दा आपल्या पोटसाठीच काम करतात. नोकरदार मंडळीसुध्दा आत्महत्या करतात. किंबहुना नोकरदारांच्या आत्महत्या शेतकर्‍यांपेक्षा जास्तच असतील.
  • Log in or register to post comments

Submitted by प्रसाद१९७१ on Tue, 12/16/2014 - 14:03

In reply to सहमत ! by खटपट्या

Permalink

मधे बातमी होती की गेल्या ४

मधे बातमी होती की गेल्या ४ वर्षात १२९ पोलिसांनी आत्महत्या केल्या. एकुण पोलिसांची संख्या बघता १२९ आत्महत्या ही खुपच मोठी संख्या आहे.
  • Log in or register to post comments

Submitted by चिगो on Tue, 12/16/2014 - 13:22

In reply to @ खटपट्या by सुबोध खरे

Permalink

धन्यवाद खरे साहेब..

सैनिक, सैन्य अधिकारी ह्यांच्याबद्दल मलाही आदर आहे, पण त्यांच्याबद्दल फेसबुकी उमाळे काढून स्वतःच्या देशभक्तीची सर्टिफीकेट्स फाडणार्‍यांच्या गर्दीत
कारगिल च्या युद्धाचे वेळेस एका चर्चेच्या वेळेस मी उघडपणे म्हणालो कि आम्ही फक्त आमची नोकरी "इमाने इतबारे" केली यापेक्षा आम्ही काही जास्त देशभक्त नाही. केवळ लष्करी गणवेश घातला तर तुम्ही देशभक्त आठव नाही असे काही नाही.
असा प्रतिसाद देणारा एक पुर्व सेनाधिकारी आहे, हे पाहुन खरंच बरं वाटलं.. तुम्हाला भेटावंच लागणार, बॉस..
  • Log in or register to post comments

Submitted by हाडक्या on Tue, 12/16/2014 - 17:16

In reply to धन्यवाद खरे साहेब.. by चिगो

Permalink

+१ चिगो,

+१ चिगो, डॉक्टर साहेब, अगदी १००% सहमत, आमच्या एका आर्मीतल्या इंजिनिअर मैत्रिणीशी यावरून वॉट्सपवर जोरात वाद झाला होता ते आठवले. वरून "संवेदनाहीन आणि बुर्ज्वा " ठरण्याच्या भितीने इतर मंडळी विषय मिटवायला लागली आणि अ‍ॅडमिन बाई तर तिच्यावर काही कारवाई होईल की काय अशी भिती व्यक्त करु लागल्या (अतिशयोक्ती नाही!).. एखाद्या गोष्टींबद्दल थोडे विरुद्ध बोलण्याची आपल्याकडे इतकी अतिरेकी भिती का निर्माण व्हावी ? संवाद शक्यच नसावा असे विषय झालेत हे.
आत्महत्येचे प्रमाण फक्त महाराष्ट्रात आणि जास्त करून विदर्भात दिसते याचे कारण नक्की कोणी सांगत नाही. २३ वर्षे लष्करात नोकरी केल्यावर मी भारताच्या सर्व राज्यात फिरून कोठेहि दुष्काळामुळे आत्महत्या करण्याचे प्रकार ऐकलेले नव्ह्ते. अगदी ओडीसा मध्ये अत्यंत गरीब शेतकरी हे उंदीर खाताना पाहिले आहेत पण आत्महत्या करताना नाही. सतीच्या प्रथे सारखे हे आत्महत्येचे उदात्तीकरण थांबविले पाहिजे . फक्त भूमि"धारक"चा आत्महत्या करतात भूमि"हीन" नाही मग त्यांना दुष्काळ नाही का? त्यांचा शेतीतील रोजगारहि बुडतोच कि. हीच गोष्ट मी लष्कराबद्दल बोलत असे(लष्करी अधिकाऱ्यांच्या भ्रष्टाचाराबद्दल) तेंव्हा सुद्धा मला संवेदनाहीन म्हणून बोलले जात असे.( २३वर्षे लष्करात काढल्यावर लष्कराबद्दल मला थोडेसे समजून आले असे मला वाटते). कारगिल च्या युद्धाचे वेळेस एका चर्चेच्या वेळेस मी उघडपणे म्हणालो कि आम्ही फक्त आमची नोकरी "इमाने इतबारे" केली यापेक्षा आम्ही काही जास्त देशभक्त नाही. केवळ लष्करी गणवेश घातला तर तुम्ही देशभक्त आठव नाही असे काही नाही. या उलट माझा भाऊ दोन कारखाने चालवितो आणि त्याने ४५ लोकांना रोजगार दिला आहे तेंव्हा तो जास्त देशभक्त आहे असे मला वाटते यावर बराच गदारोळ झाला. जय जवान आणि जय किसान म्हटले कि कसे पुरोगामी वाटते आणि त्यांच्या बद्दल कोणीही काहीहि वाईट बोलले तर चालणार नाही. तसे केले कि तुमच्या वर संवेदनाहीन आणि बुर्ज्वा असा शिक्का बसतो.
  • Log in or register to post comments

Submitted by सुबोध खरे on Tue, 12/16/2014 - 18:15

In reply to धन्यवाद खरे साहेब.. by चिगो

Permalink

चिगो साहेब केंव्हा भेटताय?

चिगो साहेब केंव्हा भेटताय? मी नेहमी तयारच असतो.
  • Log in or register to post comments

Submitted by घाटावरचे भट on Tue, 12/16/2014 - 11:02

Permalink

नोकरदारांचं पॅकेज

अहो नोकरदार मंडळी सदैव पॅकेजच्या मागे तर असतात. नवीन नोकरी लागली रे लागली, की जो तो विचारतो 'पॅकेज किती?' म्हणून...
  • Log in or register to post comments

Submitted by योगी९०० on Tue, 12/16/2014 - 12:38

Permalink

मस्त?

मस्त किस्से असे म्हणवत नाही पण चांगल्या पद्द्तीने मांडले गेले आहेत. बाकी सर्वच शेतकरी गांजलेले नसतात आणि मदतचा किंवा सरकारी सवलतीमुळे स्वतःचा फायदा कसा करून घेतला जातो यांचे उत्तम उदाहरण.. (मध्ये एकदा व्हाट्सअ‍ॅप वर एका शेतकर्‍याच्या त्याच्या ४ कोटीच्या गाडीसकट फोटो होता..त्यावरुन खात्री झाली की सर्वच शेतकरी गरीब नसतात).
  • Log in or register to post comments

Submitted by बाबा पाटील on Wed, 12/17/2014 - 12:23

In reply to मस्त? by योगी९००

Permalink

गाडीवाला शेतकरी नाही

महाराष्ट्रातला एक मोठा ट्रान्सपोर्ट व्यवसायिक आहे.अंदाजे २००० ट्रक
  • Log in or register to post comments

Submitted by स्पंदना on Fri, 12/19/2014 - 03:33

In reply to गाडीवाला शेतकरी नाही by बाबा पाटील

Permalink

अहो नाही हो.

अहो नाही हो. शेतकर्‍याने कार घेतली आहे ४ कोटीची. फोटो होता.
  • Log in or register to post comments

Submitted by श्रीरंग_जोशी on Fri, 12/19/2014 - 03:47

In reply to गाडीवाला शेतकरी नाही by बाबा पाटील

Permalink

ते हे असावेत

Image removed. श्री विजय गायकवाड त्यांच्या रोल्स रॉइससोबत. फटु जालावरून साभार.
  • Log in or register to post comments

Submitted by अनुप ढेरे on Fri, 12/19/2014 - 09:47

In reply to ते हे असावेत by श्रीरंग_जोशी

Permalink

हा माणूस रांजणगाव MIDC च्या

हा माणूस रांजणगाव MIDC च्या आजूबाजूचा आहे काय?
  • Log in or register to post comments

Submitted by सुबोध खरे on Tue, 12/16/2014 - 15:17

Permalink

शेतीच्या उत्पन्नावर आयकर

शेतीच्या उत्पन्नावर आयकर अजिबात नाही यासारखा विनोद दुसरा नसेल कारण २.५ लाख रुपये उत्पन्नावर मुळातच आयकर नाही म्हणजेच वीस हजार रुपये महिना ५ लाख रुपयापर्यंत १० टक्के कर आहे म्हणजे जो शेतकरी महिना ४१ हजार रुपये पेक्षा जास्त उत्पन्न मिळवतो तो महिन्याला २ हजार रुपये सुद्धा कर देऊ शकत नाही? (वर्षाला २५ हजार रुपये). वर शेतीच्या पम्पाला कितीही वीज फुकट, खताला, कीटक नाशकला सबसिडी. "गरीब" शेतकरी म्हणजे जो २० हजार पेक्षा कमी उत्पन्न मिळवणारा. त्याला मुळातच कर नाही मग त्यावर उत्पन्न मिळवणारे शेतकरी आहेत त्यांना का कर लावत नाहीत?आंधळं दळतंय आणि कुत्र पीठ खातंय, चालू द्या हा सगळा चावटपणाचा बाजार आहे. लष्करातील सर्वाना पूर्ण कर लागू आहे मग शेतकर्यांना का नाही. कारण साधे आहे लष्करी लोक एक गठ्ठा मत देत नाहीत. शेतकर्यांना कर लावणे हे करण्याची कोणत्याही राजकारणी माणसाची हिम्मत नाही. जाता जाता __जसे सर्व मागास् वर्गीयाना क्रिमी लेयर लावण्याची कोणीही हिम्मत करीत नाही. क्रिमी लेयर हा महिना ५०, ०००/- रुपयापेक्षा जास्त उत्पन्न असलेला गट आहे.या क्रिमी लेयरचा फायदा त्याच जातीतील खऱ्या गरिबांना होईल.पण लक्षात कोण घेतो. "शेती उत्पन्नाला कर लावणे किंवा सर्व मागास वर्गीयांना क्रिमी लेयर लावणे हि राजकीय हाराकिरी होईल."
  • Log in or register to post comments

Submitted by अनुप ढेरे on Tue, 12/16/2014 - 16:53

In reply to शेतीच्या उत्पन्नावर आयकर by सुबोध खरे

Permalink

याच कारणामुळे शेतीमधून बराच

याच कारणामुळे शेतीमधून बराच काळा पैसा पांढरा करता येतो. अनेक ठेकेदार वगैरे काळा पैसा शेतीतून आलेले उत्पन्न म्हणून दाखवतात अस ऐकलं आहे.
  • Log in or register to post comments

Submitted by जेपी on Tue, 12/16/2014 - 15:39

Permalink

शेतकर्याला व्होट बॅंक कोण

शेतकर्याला व्होट बॅंक कोण बनवल आणी आत्महत्या विर्दभ-मराठवाड्यात प्रामुख्याने का होतात? आत्महत्या कधीपासुन वाढल्या ?काय उपायाने थांबतील ?याविषयी नंतर विस्ताराने लिहीण.
  • Log in or register to post comments

Submitted by सुबोध खरे on Tue, 12/16/2014 - 18:17

In reply to शेतकर्याला व्होट बॅंक कोण by जेपी

Permalink

लवकर आणि विस्ताराने लिहा

लवकर आणि विस्ताराने लिहा नक्की काय कारणे आहेत ते आम्हालाही कळेल.
  • Log in or register to post comments

Submitted by असंका on Tue, 12/16/2014 - 22:22

Permalink

शेती उत्पन्न हा स्टेट लिस्ट

शेती उत्पन्न हा स्टेट लिस्ट चा भाग आहे, त्यामुळे केंद्र सरकार त्यावर सरळ सरळ उत्पन्न कर आकारू शकत नाही. राज्य सरकारे आकारू शकतात. मात्र फार पूर्वीपासूनच शेती उत्पन्नावर केंद्र सरकारने अप्रत्यक्षपणे कर बसवलेला आहे. जर शेतीव्यतिरीक्त इतरही उत्पन्न असेल तर या पद्धतीमुळे सरकारला अधिक कर मिळतो.
  • Log in or register to post comments

Submitted by बाबा पाटील on Wed, 12/17/2014 - 12:24

Permalink

वरती खरडणारे .....

किती जण शेतात राबतात ?
  • Log in or register to post comments

Submitted by मुक्त विहारि on Wed, 12/17/2014 - 13:47

In reply to वरती खरडणारे ..... by बाबा पाटील

Permalink

मी अजिबात नाही.....

शेती करायची मनापसून इच्छा आहे. पण आपले दयाळू सरकार आम्हाला शेती विकत घेउ देत नाही, कारण आमच्याकडे ७/१२चा उतारा नाही.
  • Log in or register to post comments

Submitted by बॅटमॅन on Wed, 12/17/2014 - 14:33

In reply to वरती खरडणारे ..... by बाबा पाटील

Permalink

त्याने नक्की काय होणार?

त्याने नक्की काय होणार? शेतात न राबणार्‍यांच्या प्रश्नांना बगल देऊन असा प्रश्न विचारल्याने काही सिद्ध होत नाही.
  • Log in or register to post comments

Submitted by प्रसाद१९७१ on Wed, 12/17/2014 - 14:35

In reply to त्याने नक्की काय होणार? by बॅटमॅन

Permalink

आणि उद्या बॅट्या शेती करायला

आणि उद्या बॅट्या शेती करायला लागला तर तो नक्कीच ह्या रडगाण गाणार्‍या शेतकर्‍यांपेक्षा चांगले करेल.
  • Log in or register to post comments

Submitted by जेपी on Wed, 12/17/2014 - 21:37

In reply to आणि उद्या बॅट्या शेती करायला by प्रसाद१९७१

Permalink

बॅटमॅन नांगर हाकतोय असे

बॅटमॅन नांगर हाकतोय असे चित्र डोळ्या समोर आले...आणी हसुन मेलो.. बाकी तंबी दुराईचा उद्धव ठाकरे बद्दलचा लेख आठवला...आन पुन्हा हसुन मेलो...
  • Log in or register to post comments

Submitted by सुबोध खरे on Wed, 12/17/2014 - 19:16

In reply to वरती खरडणारे ..... by बाबा पाटील

Permalink

@ बाबा साहेब

@ बाबा साहेब जर मी शेती करत नसेन किंवा केली नसेल तर मला त्या प्रश्नातील काहीच समजत नाही/समजणार नाही हे म्हणणे बरोबर नाही. या न्यायाने आज भारतीय लष्कराच्या विचारवृंदात ( THINK TANK) मध्ये फक्त लष्करी अधिकार्यांचाच भरणा असायला पाहिजे. तसे बरोबर नाही ज्याने या विषयाचा सखोल अभ्यास केला आहे तो माणूस या विचारवृन्दात समाविष्ट केला जाऊ शकतो.असे अनेक अत्यंत हुशार आणी चतुरस्त्र सिव्हिलीयन्स( ज्यांनी युद्ध भूमी पाहिलेलीसुद्धा नाही). यात आहेत आणी त्यांची मोलाची भर/मदत लष्कराच्या डावपेच आणी नीती साठी होते आहे. राहली गोष्ट लष्कराबद्दल बोलण्याची-- मग विक्रांत हि मोडीत काढावी कि नाही या सारख्या विषयाबद्दल( असा धागा कुणीतरी काढला होता) फक्त माझ्य्सारखा एखादाच( कदाचित मिपावर मी एकटाच असेन) बोलू लिहू शकेल ज्याने विक्रांत वर कधीतरी काम केले आहे.
  • Log in or register to post comments

Submitted by जेपी on Wed, 12/17/2014 - 14:32

Permalink

@मुवि-

@मुवि- आपल दयाळु सरकार आधीच एक पळवाट काढुन ठेवत.पुन्हा गपचुप येऊन सांगत"हे बघ इकडे पळवाट आहे.तुला पळता येत का बघ!!"
  • Log in or register to post comments

Submitted by मुक्त विहारि on Wed, 12/17/2014 - 22:49

In reply to @मुवि- by जेपी

Permalink

@ जेपी...

धन्यवाद...
  • Log in or register to post comments

Submitted by टवाळ कार्टा on Wed, 12/17/2014 - 16:54

Permalink

बाकी किस्से पन येउदे की

बाकी किस्से पन येउदे की
  • Log in or register to post comments

Submitted by मुक्त विहारि on Wed, 12/17/2014 - 22:55

In reply to बाकी किस्से पन येउदे की by टवाळ कार्टा

Permalink

अनुमोदन

पाणी वाहते ठेवा...
  • Log in or register to post comments

Submitted by खटपट्या on Wed, 12/17/2014 - 23:20

In reply to अनुमोदन by मुक्त विहारि

Permalink

आणि स्कोअर किती करायचा तेही

आणि स्कोअर किती करायचा तेही सांगा !!
  • Log in or register to post comments

Submitted by जेपी on गुरुवार, 12/18/2014 - 10:45

In reply to आणि स्कोअर किती करायचा तेही by खटपट्या

Permalink

आणि स्कोअर किती करायचा तेही

आणि स्कोअर किती करायचा तेही सांगा !! नर्व्हस नाईंटी चा शिकार होणार नाही एवढे पाहा *wink*
  • Log in or register to post comments

Submitted by टवाळ कार्टा on गुरुवार, 12/18/2014 - 10:46

In reply to आणि स्कोअर किती करायचा तेही by जेपी

Permalink

अग्गाग्गा...कित्ती ती काळजी

अग्गाग्गा...कित्ती ती काळजी
  • Log in or register to post comments

Submitted by मुक्त विहारि on गुरुवार, 12/18/2014 - 11:31

In reply to अग्गाग्गा...कित्ती ती काळजी by टवाळ कार्टा

Permalink

डोंट वरी..

होवून जावु दे... हाकानाका...
  • Log in or register to post comments

Submitted by सुबोध खरे on Wed, 12/17/2014 - 19:19

Permalink

अति अवांतर -- आमची काही

अति अवांतर -- आमची काही वडिलोपार्जित शेती आहे. आणी मी शेतात कामही केले आहे( स्वतःच्या नसेल तरीही). तेंव्हा कागदोपत्री मी शेतकरीसुद्धा आहे.
  • Log in or register to post comments

Submitted by अभिजित - १ on Wed, 12/17/2014 - 23:09

Permalink

द्राक्ष निर्यातीतून १६६० कोटींचे परकीय चलन

http://www.loksatta.com/maharashtra-news/1660-worth-of-foreign-currency-from-grape-exports-1052098/ युरोपीय राष्ट्रांचे कृषी मालाबाबतचे कठोर निकष पूर्ण करत द्राक्ष उत्पादकांनी २०१३-१४ या हंगामात तब्बल एक लाख ९२ हजार मेट्रीक टन निर्यात करून देशाला १६६० कोटी रुपयांचे परकीय चलन मिळवून दिले. या निर्यातीत महाराष्ट्राचा ९८ टक्के आणि त्यातही नाशिकचा ७० टक्के हिस्सा आहे.
  • Log in or register to post comments

Submitted by टवाळ कार्टा on Wed, 12/17/2014 - 23:35

In reply to द्राक्ष निर्यातीतून १६६० कोटींचे परकीय चलन by अभिजित - १

Permalink

पण नाशीक म्हणजेच अख्खा

पण नाशीक म्हणजेच अख्खा महाराष्ट्र नाही ना :(
  • Log in or register to post comments

Submitted by थॉर माणूस on गुरुवार, 12/18/2014 - 09:38

In reply to पण नाशीक म्हणजेच अख्खा by टवाळ कार्टा

Permalink

मला वाटतं या माहितीचा संदर्भ

मला वाटतं या माहितीचा संदर्भ गारपीटी मुळे द्राक्षबागा उध्वस्त झालेल्या शेतकर्‍यांनी सरकारकडे भरपाई मागण्याचा आहे.
  • Log in or register to post comments

Submitted by टवाळ कार्टा on गुरुवार, 12/18/2014 - 10:18

In reply to मला वाटतं या माहितीचा संदर्भ by थॉर माणूस

Permalink

माझा प्रतिसाद बाकी चर्चेसाठी

माझा प्रतिसाद बाकी चर्चेसाठी होता जी इन जनरल सगळ्या शेतकर्यांच्या तक्रारींसाठी चालु आहे
  • Log in or register to post comments

Submitted by जेपी on गुरुवार, 12/18/2014 - 10:46

In reply to माझा प्रतिसाद बाकी चर्चेसाठी by टवाळ कार्टा

Permalink

देशी पिणार्‍या लो़कांना

देशी पिणार्‍या लो़कांना वाईनची सवय लावली कोणी हे पाहणे रोचक आहे.
  • Log in or register to post comments

Submitted by टवाळ कार्टा on गुरुवार, 12/18/2014 - 10:48

In reply to देशी पिणार्‍या लो़कांना by जेपी

Permalink

तेच ना...दारु बदलली आणि

तेच ना...दारु बदलली आणि सांगितले बघा तुमचे रहाणीमान उंचावले...
  • Log in or register to post comments

Submitted by टवाळ कार्टा on गुरुवार, 12/18/2014 - 10:49

In reply to तेच ना...दारु बदलली आणि by टवाळ कार्टा

Permalink

चायला वाईन चांगली की वाईट हा

चायला वाईन चांगली की वाईट हा १००+ धाग्याचा विषय होउ शकतो का?
  • Log in or register to post comments

Pagination

  • First page « First
  • Previous page ‹ Previous
  • पान 1
  • पान 2
  • पान 3
  • Next page Next ›
  • Last page Last »

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password

© 2026 Misalpav.com