✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती

छायाचित्रणकलेच्या १७५ व्या वाढदिवसानिमित्त स्पर्धा क्र. २: "आनंद"

स
संपादक मंडळ यांनी
गुरुवार, 09/04/2014 - 14:37  ·  लेख
लेख
छायाचित्रणकलेच्या १७५ व्या वाढदिवसानिमित्त स्पर्धा नमस्कार! १९ ऑगस्ट १८३९ ला पॅरिसमधे छायाचित्रणकलेची अधिकृतरीत्या सुरुवात झाली. या घटनेला नुकतीच १७५ वर्षे झाली. या निमित्ताने मिपावर छायाचित्रणाची स्पर्धा घ्यावी असा एक प्रस्ताव श्री सर्वसाक्षी यांच्याकडून आला. मिपावर अनेक गुणी कलाकार, छायाचित्रकार आहेत. मिपा सदस्य-स्पर्धकांना कोणताही एक विषय देऊन एकच एक स्पर्धा घेण्यापेक्षा स्पर्धामालिका सुरू करावी असा निर्णय घेण्यात आला. मालिकेतील या दुसर्‍या स्पर्धेचा विषय "आनंद" हा आहे. या विषायानुरूप तुम्ही काढलेली छायाचित्रे इथे या धाग्यावर प्रकाशित करावीत ही विनंती. आजपासून आणखी ७ दिवस, म्हणजे ११ सप्टेंबरपर्यंत प्रत्येकी एक छायाचित्र इथे प्रकाशित करू शकता. त्यानंतर ७ दिवसपर्यंत म्हणजे १८ सप्टेंबरपर्यंत सगळे मिपा सदस्य परीक्षक म्हणून या चित्रांना १,२,३ असे अनुक्रमांक देतील. मतांची सरासरी काढून अंतिम निर्णय प्रकाशित केला जाईल. स्पर्धेचे अन्य नियमः १)प्रत्येकजण फक्त एकच चित्र अपलोड करू शकतो. २)सर्व सदस्य मतदान करणार असल्याने संपादकही सदस्य म्हणून स्पर्धेत भाग घेऊ शकतात. ३)यापुढेही अन्य विषय घेऊन ही स्पर्धा सुरू राहील. यात सदस्यही विषय सुचवू शकतात. ४)छायाचित्राचा exif data शक्यतो असावा. ५)ह्या शिवाय छायाचित्र कुठे काढलेले आहे, आदि माहिती चित्रासोबत शक्यतो द्यावी. ६)प्रोसेसिंग वैगरे केले आहे का याची माहिती द्यावी. ७)फक्त मोबाईलवरून काढलेल्या फोटोंसाठी स्वतंत्रपणे स्पर्धा घेण्यात येईल. पाहिजे तर अशी छायाचित्रे या स्पर्धेतही भाग घेऊ शकतात, पण क्रमांकाबद्दल अंतिम निर्णय मिपा सदस्यांचा असेल. ८)स्पर्धेच्या विजेत्यांना प्रशस्तीपत्रके ईमेल करण्यात येतील. आणि ही छायाचित्रे मिपा दिवाळी अंक २०१४ मध्ये वापरण्यात येतील. ९) एकदा सादर केलेले छायाचित्र कोणत्याही कारणासाठी बदलता येणार नाही. १०) मते देताना कृपया 'सेल्फी' देऊ नयेत ही विनंती. स्पर्धक हे मतदार असल्याने टेक्निकली असे करणे चूक नाही. पण इतरांचाही विचार व्हावा. स्पर्धेत जास्तीत जास्त मोठ्या प्रमाणावर सहभागी होऊन स्पर्धा यशस्वी करण्यास हातभार लावावा ही विनंती. सर्व स्पर्धकांना शुभेच्छा! पहिल्या स्पर्धेच्या नियमात बदल म्हणजे प्रत्येक स्पर्धकाला फक्त एक छायाचित्र सादर करता येईल. गुण देण्याची पद्धत पहिल्या स्पर्धेप्रमाणेच राहील. पहिल्या स्पर्धेत ज्यांची चित्रे विजेती ठरली नाहीत त्यांनी निराश न होता या स्पर्धेत पुन्हा चांगली छ्याचित्रे सादर करावीत ही विनंती. प्रत्येकाचा आवडता विषय वेगवेगळा असतोच! पुन्हा एकदा सर्वांना धन्यवाद आणि या तसेच पुढील स्पर्धांसाठी शुभेच्छा!
वर्गीकरण
लेखनविषय (Tags)
छायाचित्रण
लेखनप्रकार (Writing Type)
आस्वाद
प्रतिभा
विरंगुळा

प्रतिक्रिया द्या
76180 वाचन

💬 प्रतिसाद (88)

प्रतिक्रिया

घारापुरी येथील कल्याणसुंदर

प्रचेतस
गुरुवार, 09/04/2014 - 21:47 नवीन
घारापुरी येथील कल्याणसुंदर शिव अर्थात शिवपार्वती विवाह प्रतिमा. शिवाच्या चेहर्‍यावर समाधान, पार्वतीच्या चेहर्‍यावर शंकरासारखा पती मिळाला म्हणून सलज्ज आनंद तर हिमालयाच्या चेहर्‍यावर कृतार्थतेचा आनंद. Date taken 3/1/14, 2:15 PM Camera Canon EOS 550D Lens Canon EF-S18-55mm f/3.5-5.6 IS II Focal Length 18mm Exposure 1/25 F Number f/3.5 ISO 3200 Flash Not used कुठलेही पोस्ट प्रोसेसिंग केले नसून छायाचित्रातला अनावश्यक भाग गाळला जावा म्हणून चित्र कातरले आहे. Image removed.

नि़खळ, आणि निरागस

वेल्लाभट
गुरुवार, 09/04/2014 - 22:06 नवीन
कोथळीगडाच्या पायथ्याच्या पेठ गावातली ही दोन लहान मुलं. टायर चा गाडा खेळत होती, आम्हीही गेलो, गप्पा मारल्या. आमच्या प्रश्नांची इतक्या आनंदाने उत्तरं देत होते हे पठ्ठे, की... ते फोटोत टिपण्यावाचून राहू शकलो नाही मी. शहरातले छक्के पंजे अजून तिथे पोचले नाहीयेत, हे बघून आम्हालाही मनोमन 'आनंद' झाला. Image removed. फोटो विषयी : अ‍ॅपर्चर : एफ ४.५ शटर स्पीड : १/८०० फोकल लेन्ग्थ : १६ एम एम आयएसओ : २०० एक्स्पोजर : -०.३ स्टेप आणि पोस्ट प्रोसेसिंग : लेव्हल अ‍ॅड्जस्ट्मेंट

वल्ली आणि वेल्लाभट दोन्ही

पैसा
गुरुवार, 09/04/2014 - 22:16 नवीन
वल्ली आणि वेल्लाभट दोन्ही चित्रे खूप आवडली! दोन्ही चित्रात दैवी आनंद आहे, एक दगडात गोठवलेला, आणि एक जिवंत! वेल्लाभटा, त्या मुलांकडे टायरच्या गाडीशिवाय काही खेळणी नसतीलच, पण हा आनंद! मस्तच! नशीब तुझं एका अनोळखी माणसाला असा फोटो घेऊ दिला त्यांनी!

'घेऊ दिला' असं नाही हो;

वेल्लाभट
Fri, 09/05/2014 - 09:35 नवीन
गप्पा रंगलेल्या असताना हळूच्चकन मांडीवर ठेवलेल्या कॅमे-यातून शिताफीने हा फोटो मी टिपला, तेवढंच काय ते माझं श्रेय या फोटोमागचं.
↩ प्रतिसाद: पैसा

आपल्या आई-वडीलांना त्याच्या

किसन शिंदे
गुरुवार, 09/04/2014 - 22:55 नवीन
आपल्या आई-वडीलांना त्याच्या वयाचं होत पाण्यात खेळताना पाहून या छोट्याला झालेला कौतूक-मिश्रित आनंद. Image removed.

या बंड्या चे नाव डेनिस का

किल्लेदार
गुरुवार, 09/04/2014 - 23:41 नवीन
या बंड्या चे नाव डेनिस का तसलेच काहीतरी होते . पार्कमध्ये माय-बापाबरोबर महाशय बसले होते. नाव घेतले की खाता खाता असा मस्त हसायचा की फोटो काढायचा मोह आवरला नाही. हिम्मत करून फोटो काढू का विचारले आणि सुदैवाने परवानगी मिळाली. मायबापाला जास्त इरिटेट न करता पटापट काही फोटोज टिपले. "आनंद" हा विषय आणि एकच फोटो असा नियम असल्यामुळे या विषयातला कदाचित माझ्याकडील एकमेव फोटो निवडताना त्रास झाला नाही. (लेन्स ५० मिमि . कॅनन ४५०D ) Image removed.

वाह!

किसन शिंदे
Fri, 09/05/2014 - 00:14 नवीन
अप्रतिम फोटो. किल्लेदार तुम्ही लैच झाक फोटो काढता बघा.
↩ प्रतिसाद: किल्लेदार

:)

किल्लेदार
Fri, 09/05/2014 - 11:04 नवीन
:)
↩ प्रतिसाद: किसन शिंदे

पहिल्या वहिल्या वाढदिवसाचा आनंद...

गणपा
Fri, 09/05/2014 - 00:06 नवीन
स्पर्धेसाठी नाही कॅमेरा जुना फिल्मवाला. बहुतेक कॅननचा होता. (तेव्हा माझ्याकडे डिजीटल कॅमेरा नव्हता.) स्कॅन करुन टाकल्यामुळे सुस्पष्टता तेवढी नाहीये. घरात पहिल्यांदाच इतकी सगळी माणसं एकत्र पाहुन बाईसाहेबांच्या आनंदाला इतकं उधाण आलेलं की एका जाग्यावर स्थिर उभी रहायला तयर नव्हती. कसं बसं भिंतीवरच्या तिच्या नावासकट तिला फ्रेममधे टिपायचा प्रयत्न केला. ****************************************************************************** पहिल्या वहिल्या वाढदिवसाचा आनंद.. Image removed.

भन्नाट आहे फोटो !

डॉ सुहास म्हात्रे
Fri, 09/05/2014 - 00:20 नवीन
भन्नाट आहे फोटो !
↩ प्रतिसाद: गणपा

काय हसू आहे!!

स्पंदना
Fri, 09/05/2014 - 06:00 नवीन
काय हसू आहे!!
↩ प्रतिसाद: गणपा

फारच छान

प्रशांत
Fri, 09/05/2014 - 09:02 नवीन
अप्रतिम...
↩ प्रतिसाद: गणपा

हेच बोलतो. अगदी निरागस हसू.

प्रचेतस
Fri, 09/05/2014 - 09:05 नवीन
हेच बोलतो. अगदी निरागस हसू.
↩ प्रतिसाद: प्रशांत

अनोखीचा 'अनोखा' फोटो. मस्तच

किसन शिंदे
Fri, 09/05/2014 - 09:11 नवीन
अनोखीचा 'अनोखा' फोटो. मस्तच आहे.
↩ प्रतिसाद: गणपा

चौपाटीवर (बीचवर) जायचं म्हणून

मराठे
Fri, 09/05/2014 - 00:24 नवीन
चौपाटीवर (बीचवर) जायचं म्हणून रूसून बसलेल्या छोट्याला जेव्हा इथल्या एका तलावाजवळ बनवलेल्या 'बीच' वर नेलं तेव्हा त्याचा आनंद गगनात मावत नव्हता. Finally at beach Image removed.

मागोवा..

दशानन
Fri, 09/05/2014 - 00:42 नवीन
Image removed.

सही आहे!

पैसा
Fri, 09/05/2014 - 18:47 नवीन
वेगळाच! आवडला फटु!
↩ प्रतिसाद: दशानन

+१

ज्ञानोबाचे पैजार
Wed, 09/10/2014 - 15:38 नवीन
दोन तीन वेळा नीट निरखुन पाहिल्या नंतर लक्षात आलं बेहद्द आवडला फोटो. पैजारबुवा,
↩ प्रतिसाद: पैसा

छोटा चित्रकार

चित्रगुप्त
Fri, 09/05/2014 - 01:52 नवीन
"पहा आजोबा, मी पण तुमच्यासारखं चित्र काढू शकतो ..." पहिल्यांदाच चित्र काढायला जमल्याचा आनंद. Image removed.

अखेर बाबांचा लॅपटॉप मिळाला!

बहुगुणी
Fri, 09/05/2014 - 03:00 नवीन
Image removed. HTC-1 मोबाईल फोनच्या कॅमेर्‍यावर काढलेला फोटो, EXIF data कसा काढायचा माहीत नाही चिमुरडीचे वय ११ महिने, स्थळ घरातील सोफा, बाबांची नजर चुकवून लॅपटॉपवर झडप!

लपुन छपुन गिरीधारी

स्पंदना
Fri, 09/05/2014 - 06:08 नवीन
हा असा खट्याळ आनंद फक्त या वयातच होउ शकतो. Image removed.

वाह

श्रीरंग_जोशी
Fri, 09/05/2014 - 09:24 नवीन
मिपावर या प्रकारच्या स्पर्धा व्हाव्या अशी सूचना देणारे सर्वसाक्षी अन त्यासाठी कष्ट घेणाऱ्या संपादकांचे आभार. 'आनंद' हा विषय रोचक वाटत असला तरी नक्कीच आव्हानात्मक आहे. सर्वच प्रवेशिका आवडल्या. किल्लेदार यांनी काढलेला फोटो तर बेबी प्रॉडक्टस बनवणाऱ्या कंपनीसाठी व्यावसायिक छायाचित्रकाराने काढलेला फोटो वाटतो. परंतु जवळजवळ सर्वच प्रवेशिका बाळांच्या किंवा लहान मुलांच्या फोटोंच्या येत आहेत ही बाब मात्र खटकली. लहान मुलं निरागस असतात त्यांचे आनंदी भाव टिपणे तुलनेने सोपे आहे. पण तरुण, मध्यमवयीन किंवा वृद्ध व्यक्तिंच्या आनंदी फोटोची एकही प्रवेशिका येऊ नये हे जरा निराशाजनक वाटते.

एकच दिवस झालाय जोशी साहेब

वेल्लाभट
Fri, 09/05/2014 - 09:30 नवीन
एकच दिवस झालाय जोशी साहेब जसे मानाचे गणपती मागून येतात, तसे सॉलिड सॉलिड मिपाकर अजून उतरवायचेत आपापल्या प्रवेशिका... धीर धरा :)
↩ प्रतिसाद: श्रीरंग_जोशी

हो हो, वाट पाहतो

श्रीरंग_जोशी
Fri, 09/05/2014 - 09:33 नवीन
:-). निदान काही प्रवेशिका प्रवाहापेक्षा वेगळ्या असतील अशी आशा आहेच.
↩ प्रतिसाद: वेल्लाभट

अगदी हेच. नेमके हेच लिहिणार

मृत्युन्जय
Fri, 09/05/2014 - 16:32 नवीन
अगदी हेच. नेमके हेच लिहिणार होतो. मी स्वतः देखील माझ्या मुलाचाच फोटो टाकणार होतो. एवढे सगळे मुलांचे फोटो बघुन आयडिया रद्द केली. खुपच एकसारखेपणा आला आहे धाग्यावर.
↩ प्रतिसाद: श्रीरंग_जोशी

हरकत नाही रे!

पैसा
Fri, 09/05/2014 - 17:26 नवीन
मुलांचे फोटो घरात असतातच आणि दुसरे म्हणजे आपल्याकडे सहसा आपल्या मुलांचे फोटोच जास्त असतात. विषय एक आहे म्हटल्यावर सारखेपणा जाणवेलच, पण तरी प्रत्येक फोटो वेगळा आणि स्वतःची एक कहाणी या फोटोंच्या मागे असतेच असते. येऊ दे तुझ्याकडे असलेला हॅप्पी फोटो!
↩ प्रतिसाद: मृत्युन्जय

मी तरी यापासून इन्स्पिरेशन

असंका
Tue, 09/09/2014 - 08:20 नवीन
मी तरी यापासून इन्स्पिरेशन घेणार नक्की!
↩ प्रतिसाद: पैसा

माझा पण एक

अनुप कोहळे
Fri, 09/05/2014 - 10:32 नवीन
हे portrait आहे खान साब ह्यांचे. हे एक हसरे व्यक्तिमत्व, ४० वर्षापासुन मध्यप्रदेश वन खात्यात रेंजर म्हणुन कार्यरत आहेत. सदासर्वदा आनंदी राहण्याचा त्यांचा स्वभाव मनाला सुखावून जातो. Camera: Canon EOS 6D Lens: EF 24-105 f/4 L IS USM Location: रुखड जंगल Shutter Speed: १/४० Aperture: f/4 Spot metering to allow background wash out and details on face preserve. Basic post processing and BW conversion in Lightroom. Image removed.

सहीच... आता पर्यंत आलेले फोटो

सुहास झेले
Fri, 09/05/2014 - 10:47 नवीन
सहीच... आता पर्यंत आलेले फोटो झकासच... माझ्याकडून एक पाकळी. सदर फोटो घारापुरी लेणी बघून परत येत असताना काढला आहे. तीन लहान पिल्ले आमच्या मागे-मागे येत होती, मग आम्ही थांबून बिस्किटं घेतली त्यांसाठी आणि त्यांना भरवत असताना काढलेला का क्लिक. फोटो पिकासा एडिटरने कम्प्रेस केलेला आहे.... (Camera: SONY DSC-W370, ISO: 80, Exposure: 1/125 sec, Focal Length: 6mm) . . Image removed.

एकाहून एक सरस!

पैसा
Fri, 09/05/2014 - 11:58 नवीन
****

स्पर्धेसाठी नाही

**** मला खरे तर यावेळचे फोटो जास्त आवडलेत आतापर्यंत. माझ्याकडून एक जुना फोटो. ७/८ वर्षापूर्वीचा. कॅमेरा खास नाही, जुना पोलोराईड. पण मुलाची आणि त्याच्या लाडक्या बोक्याची दिवाळी सुटीनंतरची गळाभेट. आणि दोघांचाही आनंद! Image removed.

माझ्याकडुनही एक एंट्री

nishant
Fri, 09/05/2014 - 14:16 नवीन
मेव्ह्ण्याच्या लग्नातला फोटो. Image removed. Camera NIKON D7000 Lens 18.0-105.0 mm f/3.5-5.6 Focal Length 65 mm Exposure 1/500 secs F Number f/6 ISO 400 Camera make NIKON CORPORATION Photo processed in Lightroom 4.4

फुगे आवडत नाही असे म्हणणारे

स्पा
Fri, 09/05/2014 - 14:54 नवीन
फुगे आवडत नाही असे म्हणणारे लहान मुल अजूनतरी मला दिसलेले नाही प्रत्येक लहान मुलाच्या आयुष्यातला आनंदाचा क्षण Image removed. फोटो विषयी : अ‍ॅपर्चर : एफ १.८ शटर स्पीड : १/३५० फोकल लेन्ग्थ : ३५ एम एम आयएसओ : १०० एक्स्पोजर : ० स्टेप पोस्ट प्रोसेसिंग साठी फोटो शॉप वापरलंय. लेयर अ‍ॅड्जस्ट्मेन्ट

सगळ्याप्रकारचे फोटू पहायला

रेवती
Fri, 09/05/2014 - 17:19 नवीन
सगळ्याप्रकारचे फोटू पहायला आवडतील. लहानांपासून थोरांपर्यंत! मला सगळेच आवडले, भयंकर गोड आहेत.

स्पर्धेसाठी नाही

प्रचेतस
Fri, 09/05/2014 - 17:41 नवीन

स्पर्धेसाठी नाही

आमच्या एका खवचट मित्राचा निरागस आनंदाने ओतप्रोत भरलेला फोटू. =)) Image removed.

अरेवा

श्रीरंग_जोशी
Fri, 09/05/2014 - 17:48 नवीन
हा तर आमच्या एका प्रेमळ मित्राचा प्रेमळ फोटो आहे. त्यांनी खादीची वस्त्रे परिधान केलेली दिसत आहेत. कपाळावर टिळा, केसांमध्ये जेल (gel), चेहर्‍यावर निरागस हास्य अन खेळकर देहबोली. मोरसुद्धा जवळ आलाय. स्पर्धेसाठी असता तर पहिल्या तीनात नक्की आला असता याबद्दल खात्री आहे.
↩ प्रतिसाद: प्रचेतस

हेच म्हणतो. वल्लीशेठ एक लंबर

सौंदाळा
Fri, 09/05/2014 - 17:52 नवीन
हेच म्हणतो. वल्लीशेठ एक लंबर आलाय फोटो. खवचट मित्र फोटोत एकदम निरागस दिसतोय ;)
↩ प्रतिसाद: श्रीरंग_जोशी

@मोरसुद्धा जवळ आलाय. >>>

अत्रुप्त आत्मा
Fri, 09/05/2014 - 18:29 नवीन
@मोरसुद्धा जवळ आलाय. >>> =)) मोर जवळा आला नाही, =)) मी त्याच्या जवळ गेलोवतो! =)) पाठिवरनं पण हात फिरवलेला.. :) आयुष्यात हा पाळीव मोर अनुभवयाला मिळतोय म्हटल्यावर कोन सोडेल चानस! पण पुढे तिथे(पवनानगर डॅम परिसर) तिथल्या काहि पोरांनी 'ए..फोटो..फोटो.." असा आरडाओरडा करून त्या मोराला चिडवलं. त्यातल्या एका नागमुद्रेनी वेडाऊन दाखवणार्‍या पोरावर तो मोर..असा काहि पंख फडफडवून गेला,की ते अचरट कार्ट त्याच्या क्यॅमेर्‍यासह कडेच्या झाडीत कोसळून ओरबाडलं. झाडी मुळे ओरबाडण्यावर निभावला.नायतर मोरानी त्याला नो मोअर करणाराच हल्ला केलावता.
↩ प्रतिसाद: श्रीरंग_जोशी

मोराचा तुरा आणि तुमच्या

आनन्दिता
Fri, 09/05/2014 - 20:18 नवीन
मोराचा तुरा आणि तुमच्या केसांचा फुगा यात एक चिवित्र साम्य आहे :)
↩ प्रतिसाद: अत्रुप्त आत्मा

क ह र!!!

आनन्दिता
Fri, 09/05/2014 - 20:15 नवीन
क ह र!!! =))
↩ प्रतिसाद: प्रचेतस

आंSsssssss

अत्रुप्त आत्मा
Fri, 09/05/2014 - 20:18 नवीन
आंSsssssss =)) दुत्त.... दुत्त!!! =))
↩ प्रतिसाद: आनन्दिता

स्पर्धेसाठी नाही

पैसा
Fri, 09/05/2014 - 17:51 नवीन

स्पर्धेसाठी नाही

अगदी! गणपती आणि त्याबरोबर घरी आलेल्या मुलानातवंडांच्या मेळ्यात रहायचा आनंद! असाच ७/८ वर्षांपूर्वीचा आहे. Image removed.

मस्तच

विकास
Fri, 09/05/2014 - 19:32 नवीन
खूप छान / प्रसन्न भाव आहेत.. हा फोटो पाहून मला "सुखी माणसाचा सदरा" दिसला!
↩ प्रतिसाद: पैसा

हा फोटो स्पर्धेसाठी नाही

असंका
Sun, 09/07/2014 - 13:00 नवीन
हा फोटो स्पर्धेसाठी नाही म्हटल्यावर किती स्पर्धकांनी सुटकेचे नि:श्वास सोडले असतील!
↩ प्रतिसाद: पैसा

असाच एक

विकास
Fri, 09/05/2014 - 19:20 नवीन
असाच एक फोटू...(स्पर्धेसाठी नाही) स्थळः बेलफास्ट, न्यूयॉर्क राज्य. ४-५ वर्षांपूर्वीचा फोटो आहे. Image removed.

मस्त!

पैसा
Sun, 09/07/2014 - 14:20 नवीन
आई आणि बछडी दोघीही खूश!
↩ प्रतिसाद: विकास

माझी प्रवेशिका

जातवेद
Fri, 09/05/2014 - 21:47 नवीन
टोक्यो मधे तुफान बर्फ पडल्यानंतर बघायला बाहेर पडलेली चिमुरडी, कॅमेरा: Canon 550D | लेन्स: Canon 50mm | f/2.8 | ISO100 Image removed.

ही माझी मुलगी !

sagarparadkar
Fri, 09/05/2014 - 22:22 नवीन
डिस्नेलॅण्डला गेल्यावर अशी आनंदली !! Image removed.

आनंदाचे डोही..

सर्वसाक्षी
Fri, 09/05/2014 - 23:14 नवीन
Image removed. बहिणीच्या सासु-सार्‍यांच्या लग्नाच्या ५० व्या वाढदिवसानिमित्त झालेल्या घरगुती सोहळ्यात उत्सवमूर्तींना सुवासिनी औक्षण करतानाचा टिपलेला क्षण. Camera NIKON D60 Lens - Nikkor 18-55 Focal Length 24mm Exposure 1/60 F Number f/4.2 ISO 400

आनंद... त्याचा... माझा...

समर्पक
Sat, 09/06/2014 - 18:13 नवीन
आणि आता तुमचा... Image removed. Canon EOS REBEL T3i f/4.5 1/125s ISO-100 70mm "मोर हवा असेल तर आपणच मोर व्हायला पाहिजे असे एका मराठी कथाकाराने लिहिले होते, ते आठवले. मोर हे आनंदाचे रूप. जगण्याला आनंदाचा स्पर्श न झालेली माणसे मोर होऊ शकत नाहीत. कुणाला असा मोर दिसला तर तो दुस-याला दाखवावा म्हणजे तो आनंदून जातो. म्हणजे आनंद वाटायचा असतो. ही वृत्ती अंगी बाळगली पाहिजे..." - डॉ.नरेंद्र गंगाखेडकर (पु. शि. रेग्यांच्या 'आनंदभाविनी' लच्छीच्या व्यक्तीचित्रणा वर आधारित. कादंबरी-'सावित्री')

+१

राघवेंद्र
Mon, 09/08/2014 - 20:25 नवीन
खुप आवडला
↩ प्रतिसाद: समर्पक
  • 1
  • 2
  • ›
  • »

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा