चलती का नाम गाडी- ३: नवी फीचर्स
चलती का नाम गाडी-१: टोयोटा रिकॉल
चलती का नाम गाडी-२ गुंतागुंत
मागील भागात गाड्यांच्या प्रकारांची गुंतागुंत कशामुळे असते हे आपण पाहिलं. आता पुढे तांत्रिक मुद्यांकडे जाताना आधी पाहूया काही वैशिष्ट्ये- बरीच हवी आणि नको असलेली पण घ्यावी लागणारी- किंवा भविष्यात येऊ घातलेली. जे मिपाकर आधीच प्रगत देशांत गाडी चालवतात त्याना यांत नवीन काहीच नाही. पण आपल्याकडे भारतीय गाड्यांमध्ये पण ते सर्व हळूहळू येत चाललंय म्हणून ही छोटीशी ओळख.
नव्या पिढीतल्या या फीचर्सची वर्गवारी करायची तर बेसिक फीचर्स- म्हणजे दिवे, वायपर्स, डोर लॉक्स, रिमोट किल्ली वगैरे इलेक्ट्रोनिक कंट्रोलरने चालणारी. त्यानंतर एक्स्टेंडेड फीचर्स - म्हणजे पॉवर विंडो, ए बी एस, एअरबॅग वगैरे. यात '' Nice to have'' फीचर्स पण असतात- म्हणजे ती असली तर बरेच, पण त्यासाठी जास्त पैसे मोजायची ग्राहकाची तयारी नसते. उदाहरणार्थ वरचीच फीचर्स पण त्यांना थोडं प्रगत करूया - म्हणजे उदा. वायपर्स- पाऊस आला की आपोआप चालू होणं आणि पाऊस वाढला की भराभरा चालणं. किंवा अंधारात गाडी घरी आणून लावली की ३० सेकंद हेडलाईट चालू रहाणं- अन आपण घरात गेलो की मग बंद होणं, किंवा खिडकीची काच बटणाने वरखाली होताना खिडकीत बोट अडकल्यास चिमटा बसू लागताच थांबणे ( anti-pinch) इत्यादी. म्हणजे आहे त्याच कंट्रोलरची क्षमता जरा वाढवली, संवेदक ( senosrs) वाढवले, की बऱ्याच जादूसारख्या वाटणाऱ्या गोष्टी साध्य होतात. मग स्पर्धेमुळे हळूहळू सगळ्याना त्याची सवय होते आणि एक्स्टेंडेड फीचर्स 'बेसिक' समजली जायला वेळ लागत नाही. अगदी दोनचार वर्षात.
आणखी पुढचा प्रकार म्हणजे प्रगत फीचर्स- याना काही अंत नाही. कमीत कमी किमतीत काय जास्तीजास्त देऊ शकता हा प्रश्न कुणीही ग्राहक विचारणारच! यामध्ये मुख्यत्वे सुरक्षितता, आराम, करमणूक, चोरी प्रतिबंधन आणि अश्वशक्ती यासंबन्धित वैशिष्ट्ये येतात. या सेगमेंट मध्ये किंमत हा मुद्दाच रहात नाही.
मध्यंतरी प्रवासात एक निवृत्त गृहस्थ भेटले होते. मी कार उद्योगामध्ये काम करतो हे कळल्यावर उत्साहात येउन गप्पा मारू लागले. म्हणाले, '' आपल्या देशात उपयुक्त अशी फीचर्स गाडीमध्ये असली पाहिजेत.'' मी म्हटलं म्हणजे कशी? तर म्हणाले, ''जसे गाडीला डावीकडे आणि उजवीकडे वळण्यासाठी इंडीकेटर असतात तसे ''यू टर्न'' इंडिकेटरचा दिवा पाहिजे- गाडीच्या मागच्या काचेवर -मध्यभागी. म्हणजे मागच्याला कळेल की हा उजव्या रस्त्यावर जाणार की यू टर्न घेणार?'' त्यांना म्हटलं, ''काका, असा दिवा कुठेच नसतो राव. यु टर्न घेताना पण डावी- उजवीकडे वळायचा दिवाच वापरतात. शिवाय लेनची शिस्त पाळली की झालं. प्रत्येक गोष्टीला दिवे कसे लावणार?'' मग विजयी मुद्रेनं म्हणाले, '' तेच तर! जे जगात करत नाहीत ते आपण भारतीयांनी करायला पाहिजे. भारतातल्या कंडीशन्सप्रमाणे बदलायला पाहिजे.''
त्यांनी त्यासाठी टाटांना पत्र पण लिहिलं. त्याना आधी फक्त पोहोच आली, नंतर अजून एक पत्र आलं की ''धन्यवाद! तुमची सूचना अभियांत्रिकी विभागाला विचारार्थ पाठवली आहे.''आणि हे महाशय अपेक्षा करत होते की कधी ना कधी ही 'सोय' होईलच.अपेक्षा आणि नवकल्पना अमर्याद असतात. भरपूर सूचना येतात, त्यातल्या काही कल्पना खरंच चांगल्या असतात.
खरं तर मागच्या विंडशिल्ड वरील ती जागा ''राखीव'' आहे- चीमझल साठी ( CHMSL) म्हणजे ब्रेक लावला की stop lamp बरोबरच ही एल. ई. डी. वाली पट्टी पण लाल रंगात उठून दिसते. जेव्हा उंच वाहन आपल्या मागे आणि खूप जवळ असते तेव्हा आपण थांबल्यावर त्याला त्याच्या उंचीमुळे कारचे stop lamps दिसत नाहीत. म्हणून हा ''सेन्ट्रली हाय माउंटेड Stop Lamp'' असणे अनिवार्य आहे. सुरक्षिततेविषयीची जी फीचर्स आहेत ती वाहन कायद्यानुसार जगात सर्वत्र अनिवार्य आहेत. त्यात बदल करता येत नाहीत. तसेच त्याचं डिझाईन कुणाला तरी वाटलं म्हणून बदलता येत नाही. शिवाय इलेक्ट्रोनिक कंट्रोलर बंद पडला तर- (अशी शक्यता अत्यंत कमी असते तरीही) म्हणून या दिव्याला कंट्रोलर व्यतिरिक्त बाहेरून वेगळ्या वायरने थेट ब्रेक पेडलला जोडले जाते. त्यामुळे ब्रेक किंवा हात ब्रेक लावला की हा दिवा नक्की लागतो. आणि मागून येणारया वाहनाला थांबण्याची सूचना देतो.
सुरक्षिततेवरून एक आठवलं, काही वेळा आपण पहातो की अतिशय महागड्या आणि सुरक्षित समजल्या जाणारया गाडीचे अपघात होतात आणि त्यात प्रवासी जीव गमावतात. जर एअरबॅग सोफ्टवेअर मेन्यु मधून बंद केली असेल तर स्टीअरिंग वर किंवा समोर panel वर कुठेतरी तसे दर्शवले जाते. त्याकडे दुर्लक्ष करू नये. सीट बेल्ट वापरला 'च' पाहिजे. नाहीतर चांगली गाडी घेऊन काहीच उपयोग नाही. खरं तर सर्व फीचर्स माहित असलीच पाहिजेत. युझर मन्युअल पाहूनही सारे काही न समजल्यास डीलरला विचारून सेटिंग्ज करायला हवीत.
असेच अजून एक म्हणजे कॅमेरा वापरून खूप सोयी देण्यात आल्या आहेत - त्यात पार्किंग साठी मदत, लेन वॉर्निंग, ब्लाइंड स्पॉट मधील वाहनाची माहिती अशा सोयी आल्या आहेत. आपल्या गाडीत त्या असतील तर पूर्णपणे माहिती घेऊन वापरणे फायद्याचे ठरते.
युरोपात एक नवे फीचर येऊ घातलेय पुढच्या वर्षी. त्यात आता दोन जास्तीच्या एअरबॅग्ज गाडीला बाहेरून म्हणजे वायपर जवळ असणार आहेत. वळणावर गाडी हळू असताना सुद्धा रस्ता ओलांडणाऱ्या व्यक्तीला धक्का लागलां तर ही एअरबॅग बाहेर उघडेल. कारण धक्का बसलेली व्यक्ती गाडीवर येऊन डोके बोनेटवर आपटते. म्हणून तिथेही एअरबॅग्ज लावायच्या ! याला ''सुरक्षित धडक'' फीचर पण म्हणतात!
येत्या दशकात नव्याने येणारया धडक रोधक फीचर मुळे समोरचं वाहन जवळ येऊ लागलं की आधी आवाजी संदेश आणि तरी प्रतिक्रिया न झाल्यास गाडी स्वतः ब्रेक पण लावू शकेल. किमान धडकेची तीव्रता नक्कीच कमी करता येईल. शेवटी आपोआपीकरणच ते- करू तेव्हढ थोडंच.
टायर प्रेशर दर्शक पण असेच खूप उपयुक्त. हे फीचर मूळ गाडीत नसेल तर वेगळे बसवून मिळते. त्यात पाचव्या स्पेअर चाका सहित सर्व चाकांचा हवेचा दाब दाखवला जातो. ताशी सत्तर-ऐंशी कि. मी. पेक्षा जास्त वेगात चालवणार्यांना हे अत्यावश्यक आहे. यात प्रत्येक चाकातला सेन्सर गाडीतल्या मुख्य युनिटला सतत प्रेशर कळवत राहतो. प्रत्येक चाकाला आपला आयडी असतो. चालकाला डिस्प्ले वर ते दिसत रहाते. एखादं चाक असुरक्षित असेल तर सूचना देणारा आवाज पण येतो.
आत्ता गेल्या दोन वर्षात आपल्याकडे आलेली नवी फीचर्स जी पूर्वी बेसिक नव्हती, पण आता आहेत ती म्हणजे ऑटो स्टार्ट-स्टोप आणि पेसिव्ह एन्ट्री.यातल्या पहिल्या फीचरसाठी उच्च प्रतीचे बॅटरी सेन्सर लागतात. बॅटरीत पुरेसा चार्ज शिल्लक असेल तर सिग्नलला किंवा कुठेही थांबलो तर आपोआप इंजिन थांबते. निघताना पेडल दाबले की पुन्हा सुरु! पेसिव्ह एन्ट्री मध्ये आपल्याला किल्लीने गाडी उघडावी लागत नाही, किल्ली फक्त खिशात असेल तरी त्या बाजूचं दार अनलॉक होतं. अलीकडे याबरोबर सीट मेमरीपण जोडतात, म्हणजे आपल्याला हवी तशी सीटची स्थिती गाडीला 'शिकवून' ठेवायची आणि तीन वेगवेगळ्या चालक व्यक्ती आपल्याला हवी तशी आपल्या उंचीनुसार सेटीग्ज ठेवू शकतात. जी 'किल्ली' ड्रायव्हर सीट वर, तसे सीट चे सेटिंग!
आणखी एक फीचर्सचा प्रकार म्हणजे माहिती देणारी फीचर्स. ही मुख्यतः विविध संपर्क यंत्रणा वापरून चालकाला माहिती देतात. इन्फोटेनमेंट गटात करमणूक आणि माहिती हे दोन्ही देणारी फीचर्स येतात- माहितीसाठी मुख्यतः जी पी आर एस, आर एफ आणि सिमकार्ड द्वारे माहिती दिली जाते. पूर्वी नवे तंत्रज्ञान आले की वापराची काहीशी घाई केली जात असे, पण आता कडक तपासण्या आणि आंतराष्ट्रीय मानांकन/ प्रमाणपत्र असल्या शिवाय काहीही थेट वापरात येत नाही. पूर्वी जेव्हा नेव्हिगेशन सुरु झाले तेव्हा एका इंग्रज बाईनी म्हणे रेल्वे रुळावरून गाडी चालविली होती- कारण जशा सूचना मिळाल्या तशी ती चालवत राहिली. रेल्वे फाटकावर 'टर्न राईट' म्हटल्यावर वळली. मग रस्ता असा का आहे असा विचार येउन पहाते तर काय, रेल्वे रुळावरून जातोय हे कळताच हादरून गेली मग कळलं की ही नकाशाची चूक आहे, यात काहीशी अतिशयोक्ती असेलच, पण तंत्रज्ञान फक्त मदतीला ठीक आहे, त्यावर अंधविश्वास उपयोगाचा नाही. मर्फीचे नियम ठाऊक असणं चांगलंच!
भारतात आपल्याला लवकरच काय काय नवीन दिसेल? तर बरेच काही! अपघाती गाडी स्वतःच अपघात झाल्याचा संदेश पाठवेल, चोरी झालेली गाडी ती कुठे आहे ते मालकाला कळवू लागेल, आपला आवाज ओळखून, समजून पडद्यावरच्या मेनूमध्ये पर्याय निवडले जाणे, ओटोपार्क मोडमध्ये गाडी टाकून स्वतः कशी पार्क होते ते बघत बसता येईल. गाड्या चोरीला जाण्याचं प्रमाण बरंच कमी होईल, समोरच्या काचेवर तुम्हाला कुणाचा फोन येतोय त्याचं नाव किंवा चेहरा दिसेल, अन ठरवता येईल की फोन घ्यायचा का नाही, स्क्रीनवर फेसबुक किंवा जो तत्सम प्रकार असेल त्यावर स्टेटस अपडेटवता येईल, अनेकांचा याला सकारण विरोध आहे- समर्थन करणारे म्हणतात की रेडीओचं च्यानल बदलतो तसंच हे सोपं आहे हे. पण सोशल मिडीया वर येणाऱ्या संदेशाचे मनावर विविध प्रकारे परिणाम होतील आणि ड्रायव्हरला विचलित करतील असा विरोधाकांचा आक्षेप आहे. महामार्गावर माणसांपेक्षा वाहनांचं नेटवर्क असणं जास्त चांगलं!
आज सहसा न दिसणारी कित्येक फीचर्स २०१६ पासून भारतात पण दिसू लागणार आहेत. पुढच्या टप्यात २०२० ला ती अनिवार्य होतील. वोल्वोच्या ह्या आणि इतर दुव्यावर माहितीपूर्ण क्लिप आणि अजून बरीच फीचर्स पहाता येतील! यातून एक महत्वाची गोष्ट दिसते ती म्हणजे आपल्याला- नवग्राहकाना समोर ठेवून सगळ्या कंपन्यांचं काही ना काही नियोजन चालू आहे. थोडक्यात काय, आज वीस लाखाच्या गाडीत असणारी वैशिष्ट्ये चारपाच वर्षात दहा लाखाच्या गाडीत येतील. अगदी नको म्हटलं तरी काही फीचर्स अगदी पाच लाखाच्या गाडीत पण येतीलच, कारण तोपर्यंत ती अगदीच 'बेसिक' झाली असतील! त्याबद्दल तांत्रिक माहिती पुढे घेऊच. चला, तर मग तयार होऊया उद्याच्या नवनव्या गाड्यांचा आनंद घ्यायला!
(क्रमश:)
Book traversal links for चलती का नाम गाडी- ३: नवी फीचर्स
वर्गीकरण
प्रतिक्रिया
माहितीपूर्ण लेखमाला. पुभाप्र.
आपोआपी करण जबरा.
आता गाड्यांवर आरएफाअयडी टॅग
छान.
हा पण भाग मस्त....
हा लेखही सर्वार्थाने उत्तमच.
भारी लिवताय हो...चालू राहुं
"त्या" आजोबांसारख्या ऐड्या
असेच काहिसे....
मी टाटा च्या पिक्सेलची वाट पहातो आहे
जबरदस्त!! मार डाला - काय कार
सही रे सही.
सीट गरम करुन पार्श्वभाग
सीट मेमरी /हीट/ वेन्ट आणि आता
मसाजर ड्राईवर सीटला लावू नये!
मस्त चालू आहे अजून येवूद्या
टोयोटा प्रियस् च्या
प्रियस बद्दल ऐकलंय पण अशी
होय, पण मुद्दलातच तिची किंमत
५० kmpl चा माईलेज देणारी टोयोटा प्रिउस
महिंद्राची महिंद्रा रेवा ही
क्लीन आणि ग्रीन टेक्नोलॉजी
लिहिताना चुकले खरे,
अजून चुकताय :)
आमची सध्याची हायब्रिड आहे.
टेस्लाबाबत सहमत. म्हणजे मला
बरे आहे राईड हुकली तेच
बरे आहे राईड हुकली तेच
माहिती बद्दल धन्यवाद लंबुटांग
कारण सोलर पॅनल्स ची एफिशियन्सी
सोलर एणर्जी वापरलेल्या
सॉरी कार्स हा माझा प्रांत नाही
- गाडी पूर्ण थांबलेल्या स्थितीतून सुरू करताना इलेक्ट्रीक मोटरकडून मिळालेली ऊर्जा वापरली जाते. जवळ जवळ २० किमीप्रतितास इतका वेग होईपर्यंत (फक्त सर्वसाधारण स्थितींमधे. बाकी सर्व हायब्रीड गाड्यांमधे प्रचंड प्रमाणात सॉफ्ट्वेअरचा वापर करून विविध पॅरामीटर्स विचारात घेऊन मग स्विचींगचा निर्णय घेतला जातो)
- आता तुमच्या इंजिनची प्रचंड ताकद ज्या १% काळासाठी वापरावी लागते ते मुख्य कारण काढून घेतल्यामुळे पारंपारिक इंजिन कमी अश्वशक्तीचे, हलके, केवळ एकाच स्पीडवर चालणारे ज्यात जास्तीत जास्त इंधन बचत होईल असे वापरता येते. ह्याचे दुसरे काम बॅटरी चार्ज करणार्या जनरेटरला चालवणे हेही असते.
- आता इंजिनचे स्वतःचे वजन कमी झाले तरी बॅटरीचे वाढीव वजन असतेच. त्यामुळे मग अजून इंधन बचत करायला वजनाने हलके धातू/ इतर मटेरीअल्स वापरणे, टायर्स कमीत कमी घर्षण असलेले वापरणे वगैरे वगैरे गोष्टी केल्या जातात.
- सर्वात महत्वाचे म्हणजे हवेशी होणारे घर्षण कमी करण्यासाठी अतिशय एरोडायनॅमिक डिझाईन बनवले जाते.
असो तर तुमच्या प्रश्नाचे उत्तर द्यायचे झाले तर कार जर का १० किमिप्रतितास वेगाने गेली तर बहुतांश काम इलेक्ट्रिक मोटरने केले जाईल.१०० ज्यूल वर अत्यंत कमी शक्ती
खूप छान आणि उप्युक्त माहिती.
फीचर्स खूप असतात पण आपल्याला
पुढचा भाग?
सर्वांचे खूप आभार!
लिहा हो तुम्ही
पॉवर स्टेअरींग, ट्युबलेस
वाचकांना कंटाळा आला तर आधी बंद करता येईल!
+१
वाचतेय. रोचक लेखमाला.
वाचकांना कंटाळा आला तर आधी
ऑटो स्टार्ट-स्टोप
चांगला प्रश्न आहे!
किमतीमध्ये फार फरक नसावा असा
शॉलीड लेखमाला येवुदे अजुन.
शॉलीड लेखमाला
येवुदे अजुन.पुभाप्र
एअरबॅग सोफ्टवेअर मेन्यु मधून
मस्त लेख!