✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • नवीन लेखन
  • भटकंती

माझी बायपोलर डिसॉर्डर

श
शुचि यांनी
Mon, 04/21/2014 - 21:04  ·  लेख
लेख
मी डॉक्टर नाही, हे एक प्रांजळ आत्मकथन आहे केवळ या २ हेतूनी केलेल (१) की जर कोणी अशी लक्षणे अनुभवत असेल तर त्यांना मदत व्हावी (२) माझ्या समाधानाकरता की माझे सत्य सांगीतले, माझी कथा सांगीतली या धाग्यावर अवांतर न केल्यास उपकार होतील ____________________________________________
"मी उद्याची अपॉईंट्मेन्ट घेतली आहे, एकतर तू सायकिअ‍ॅट्रीस्ट कडे चल किंवा मला घटस्फोट दे. या दोनांव्यतिरीक्त दुसरा पर्याय मी तुला देत नाही."
आजवरच्या आयुष्यात मी ऐकलेले सर्वात प्रभावी अन निर्वाणीचे वाक्य/संवाद. ज्या वाक्याने अन पुढील घडामोडींनी संपूर्ण आयुष्यालाच एक सकारात्मक कलाटणी मिळाली असे हे वाक्य मी तब्बल ९-१० वर्षांपूर्वी ऐकले. ऐकले अन तेव्हा मी घाबरले. मला कळेचना माझा नवरा असे का म्हणतो आहे? म्हणजे भांडणे तर सर्वांकडे होतात. नवरा-बायको म्हटले की मतभेद हे अनिवार्यच नाही का? हां आता आमची वरचेवर होतात, रोज होतात, मी आदळाअपट करते अन तो घराबाहेर निघून जातो, मी रडते, धुसफुसते अन मग शांत होते पण म्हणून मी वेडी आहे? हा मला वेडी ठरवतोय? होय सायकिअ‍ॅट्रीस्ट्कडे जाणे/दाखविणे म्हणजे वेडे असणे हीच माझीदेखील समजूत होती. मला हे दिसत नव्हते, कळत नव्हते की मी अतिशय अ‍ॅग्रेसिव्ह होते आहे, सतत भांडते आहे, वस्तू फेकते आहे. रात्री मी दचकून उठे.... रोज रोज रोज!!! पण मला वाटे सर्वांना निदान बर्‍याचजणांना ही समस्या असते. मला बर्‍याच रात्री झोप नीट लागत नसे. कधी अतिशय शांतीचा अनुभव येई तर ९०% वेळा पूर्वायुष्यातील वाईट साईट प्रसंग आठवून, अंगाची लाही लाही होई. सतत चिडचिडेपणा, अति अन निरर्थक आवेश (अ‍ॅग्रेसिव्हनेस) अन भांडखोर वृत्ती. अन शिवाय माझी "साडेसाती" चालू आहे हे का नाही विचारात घेत हा? साडेसाती संपली की हे सर्व बंद होईल. होईल???? ______________________________________________________ दुसर्‍याच दिवशी आम्ही पटेल डॉक्टरांकडे गेलो. मी एक प्रश्नावली भरली व वाट पहात आम्ही वेटींग रुम मध्ये बसलो. खूप गर्दी होती. पण ते सर्व लोक वेडे होते अन माझी खात्री होती मी त्यातली एक नाही. माझा आत्मविशवासच दांडगा होता, अन स्वतःबद्दलच्या कल्पना अनरिअ‍ॅलिस्टीक!!! मला माहीत होते आम्हाला डॉक्टर "मॅरेज काऊन्सिलींग" बद्दल काही सांगतील अन मग सुट्टी!! पण आमची वेळ आली, डॉक्टरीण बाई ५-७ मिनीटे माझ्याशी बोलल्या अन निदान झाले - ------बायपोलर डिसॉर्डर!!!------ मला काही गांभीर्य लक्षात आले नाही कारण ते कळण्याची माझी मनस्थितीही नव्हती ना माहीती. त्या दिवशीच प्रिस्क्रिप्शन दिले अन प्रायोगिक तत्वावर माझी औषधे तत्काळ सुरु केली गेली. ____________________________________________________________ घरी आल्यावर मी वाचले अन मला कळले - हा एक गंभीर स्वरुपाचा मानसिक आजार आहे, मेंदूतील असंतुलनाचे निदर्शक असलेला. एक प्रकारची मूड डिसॉर्डर!!! या आजारात एखाद्या लंबकाप्रमाणे मूड हेलकावे खातो. नैराश्याची गर्ता अन उन्मादाचा पिसाटपणा या दोहोंच्या मध्ये मूड हिंदोळे घेत रहातो. भयंकर!!!! माझा विश्वासच बसेना.
नाही मी सांगते घरातच दोष आहे. वास्तुदोष!!! वास्तुदोष!! भूत आहे हो घरात. हे घरच पछाडलेले आहे. घर बदलले तर सर्व काही सुरळीत होईल. अगदी १००%.
..........मी २० वर्षाची असताना, या विश्वासातूनच आम्ही घर बदलले. कारण? कारण मला रात्री भयस्वप्ने पडत. दरदरुन घाम फुटे अन मी आई-बाबांकडे धाव घेई त्यांना तक्रार करे. मला इरॅशनल भीती वाटे - मी घर गिळेन याची, मी गादी गिळेन , मी टीव्ही गिळेन ........ अगदी अगदी इरॅशनल असे पण माझा कंट्रोल नसे. पण भयंकर भीती वाटे..... पॅनिक अ‍ॅटॅक्स!!! सर्वांची खात्री होती भूत अन वास्तुदोषाबद्दल. अर्थात घर बदलूनही काही फायदा झाला नाहीच मला रात्री किंचाळ्या ऐकू येणे चालूच राहीले. पण वेळेवर औषधोपचार न मिळाल्याने, माझी मात्र अपरिमीत हानी झाली - अभ्यासावर परीणाम झाला, लग्नानंतर कौटुंबिक स्वास्थ्याची पूर्ण वाट लागली. _____________________________________________________ पटेल डॉक्टरांनी ताबडतोब औषधे सुरु केली. पण ती लागू पडेनात, कधी दिवसा पेंग येई तर कधी रात्री ट्क्क जाग येई. कधी अत्यंत वाईट प्रसंग आठवून मी तासन तास गुडघ्यात डोके घालून बसे .... होय अगदी सार्वजनिक ठिकाणीही. रात्री कोणीतरी चापट मारुन जागे करते आहे असले भास होत. दचकून उठणे व निद्रानाश हे तर पाचवीला पूजले होते. बरेचदा वेळ अगदी संथपणे पुढे सरके, अक्षरक्षः गोगलगाईच्या गतीने. अन्य कोणाला त्याचा त्रास होत नसे पण मला अतिशय त्रास होई. या सर्वांचे कारण होते दर ३ दिवसांनी बदलणारी औषधे अन लागू न पडणे हा फॅक्टर. दुहेरी भीती ही असे की अरे बापरे औषधे संपली तर पुढे काय - शॉक ट्रीटमेन्ट??? पण घाबरण्याचे कारण नव्हते, आता अनेक अनेक अगणित औषधे निघालेली आहेत अन शॉक ट्रीट्मेन्ट्ची खरच फारशी गरजच उरलेली नाही. निदान असा विश्वास मला डॉक्टरीणबाई देत. शेवटी औषधांचे एक कॉकटेल सापडले, ती औषधे फाइन ट्यून झाली अन हळू हळू मी बरी होऊ लागले. अक्षरक्षः आमूलाग्र बदल घडू लागला. मूड, व्रुत्ती, विचार, स्वप्ने सार्‍यात बदल घडू लागला.अन अक्षरक्षः स्फिन्क्स पक्षासारखी झेप घेत मी बरी होऊ लागले. कधीही दुसर्‍याचा तीळमात्र विचार न करणारी मी, माझ्या घासातून घास वेगळा ठेऊ लागले. सततची चीड्चीड संपली, तिची जागा शांततेने घेतली अन मुख्य म्हणजे काही पूर्वायुष्यातील काही भयंकर प्रसंग आयुष्यात पहील्यांदा विस्मृतीत गेले. मला जग सकारात्मक भासू लागले. स्वप्नेही लॉजीकल सिक्वेन्स असलेली पडू लागली. कमाल आहे या औषधांची! जे जग खरच वैर्‍यासारखे भासे तेच आता आनंददायक वाटू लागले. ____________________________________________________ नवर्‍याने या आजारात अथक अथक अन निव्वळ अमेझिंग साथ दिली. हे माझे पूर्वसुकृत अन पुण्याइ का काय माहीत नाही पण जिथे सर्वांनी होय सर्वांनी त्याला सांगीतले होते की हिला वेड्यांच्या इस्पितळात फेकून दे, तिथे त्याने मला चिकाटीने त्या नरकातून बाहेर काढले. मला रोज व्यायाम करायची सक्ती केली, फक्त कॉम्प्लेक्स अन पौष्टीक अन्न खाण्याची सवय अंगी बाणवली. माझ्या झोपेच्या वेळा आम्ही "रिलीजसली" पाळू लागलो. आयुष्याला एक वलण आले, एक क्वालिटी आली. हा आजार बरा होत नाही. मी मेल्यावरच हा संपणार पण ... पण ....समाधानाची बाब ही की "अत्यंत प्रेडिक्टेबल अन मॅनेजेबल" आहे. औषधे-आहार-निद्रा व व्यायाम या चार भक्कम पायांवर डोलारा सांभाळला की हा आवाक्यात येतोच येतो. तरता येतो. आहे भयंकर पण वेसण तुमच्या हातात असते.
वर्गीकरण
लेखनविषय (Tags)
समाज
जीवनमान
राहणी
लेखनप्रकार (Writing Type)
अनुभव

प्रतिक्रिया द्या
57078 वाचन

💬 प्रतिसाद (167)

प्रतिक्रिया

स्वतःचा असा अनुभव मिपासारख्या

डॉ सुहास म्हात्रे
Mon, 04/21/2014 - 21:18 नवीन
स्वतःचा असा अनुभव मिपासारख्या सार्वजनिक संस्थळावर टाकण्याचे मनोधैर्य आणि त्यामागची इतरांना फायदा व्हावा ही इच्छा केवळ स्पृहणीय आहे ! तुमचे कौतूक व अभिनंदन करायला शब्द नाहीत !!!
  • Log in or register to post comments

धन्यवाद इस्पिक एक्का जी.

शुचि
Mon, 04/21/2014 - 21:25 नवीन
धन्यवाद इस्पिक एक्का जी. माझ्या ओळखीतील बर्‍याच जणांना तर माहीत आहेच पण या संस्थळाद्वारे जर अन्य पीडीत व संबंधित लोकांना काही एक संदेश गेला तर उत्तमच. उन्हाळा सुरु झाला की "मॅनिआ" ची बरीच लक्षणे दिसू लागतात उदाहरणार्थ - चिडचिडेपणा, अत्यंत वाईट प्रसंगांची ठुसठुसणारी आठवण..... सतत सतत आठवण येणे. पण आउषढे फाईन ट्यून केली की ही लक्षणे केवळ अंतर्धान पावतात.
विज्ञानाच्या प्रगतीला सलाम ज्याने अनेकांना नरकयातनांतून वाचविले. संशोधकांची तर मानवजात केवळ ऋणी आहे इतकेच म्हणेन.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: डॉ सुहास म्हात्रे

+१

मधुरा देशपांडे
Mon, 04/21/2014 - 21:46 नवीन
अगदी असेच म्हणते. इतक्या प्रामाणिकपणे हे लिहिणे सोपे नाही. तुम्ही आणि तुमचे कुटुंबीय सगळ्यांच्याच धैर्याला सलाम.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: डॉ सुहास म्हात्रे

+१

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
Sat, 04/26/2014 - 13:46 नवीन
शुची, इतक्या प्रामाणिकपणे हे लिहिणे सोपे नाही. तुम्ही आणि तुमचे कुटुंबीय सगळ्यांच्याच धैर्याला सलाम. -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मधुरा देशपांडे

+१

श्रीरंग_जोशी
Mon, 04/21/2014 - 22:42 नवीन
शुचि - हा लेख वाचल्यावर तुमच्या बद्दल वाटणारा आदर दुणावला. अवांतर - हा लेख वाचून झाल्यावर काही वर्षांपूर्वी वाचलेल्या 'शहाण्यांचा सायकिअ‍ॅट्रिस्ट - डॉ. आनंद नाडकर्णी' या लेखाची आठवण झाली.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: डॉ सुहास म्हात्रे

लेख घरी जाऊन नीट वाचणार आहे.

शुचि
Mon, 04/21/2014 - 23:31 नवीन
लेख घरी जाऊन नीट वाचणार आहे. दुव्याबद्दल धन्यवाद श्रीजो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीरंग_जोशी

शुचि...

पैसा
Mon, 04/21/2014 - 21:27 नवीन
सांभाळ... कधीही वाटलं तर हाक मार. निदान तुझ्याशी बोलेन, आणखी काही करू शकणार नाही. तू काही लढाया लढून जिंकलीस, पण युद्ध चालूच आहे. मध्यंतरी तुझ्या कुटुंबापासून दूर रहावं लागलं तरी कोसळली नाहीस, तुझा अभिमान वाटला. तुझ्या नवर्‍याचंही प्रचंड कौतुक. अ बिग हग टू यू. :) तात्कालिक नैराश्य खूपजणांना येतं, पण अशा प्रकारच्या लोकांना न दिसणार्‍या पण भयंकर त्रासदायक आजाराने खचून न जाणं फार थोड्यांना जमतं. पुढच्या लढ्यासाठी शुभेच्छा!
  • Log in or register to post comments

एक वेगळा विचार

सुबोध खरे
Mon, 04/21/2014 - 23:38 नवीन
"तुझ्या नवर्‍याचंही प्रचंड कौतुक." अगदी खरं. अशा आजारात बर्याच वेळेस त्या व्यक्तीच्या पती/पत्नीला सर्वात जास्त त्रास सहन करावा लागतो. कारण आपल्याला आजार आहे हे मनोरुग्णाला माहीतच नसते. त्यामुळे आपण विचित्र वागत आहोत हे रुग्णाला कळतच नसते.(lack of insight) पण त्या व्यक्तीच्या पती/पत्नीला आपला जोडीदार विचित्र वागत आहे हे कळत असते आणि फार मनस्ताप सहन करावा लागतो. बरेच जोडीदार तेवढे धैर्य दाखवू शकत नाहीत त्यामुळे आजार लवकर बरा होत नाही. त्यांना( आपल्या श्रीयुतना) याबद्दल एक सलाम मनोरुग्णाच्या बरे होण्यात त्याच्या जोडीदाराचा/ कुटुंबाच्या आधाराचा फार मोठा वाटा असतो या साठी आपल्या श्रीयुत यांचे अतिशय कौतुक आहे. आणि आपले कौतुक अशासाठी कि आपल्याला मानसिक आजार आहे हे मोकळेपणाने सार्वजनिक मंचावर सांगण्याला फार मोठी हिम्मत लागते. शिवाय आपले अनुभव प्रांजळपणे मांडण्याला फार मोठे मनोधैर्य लागते हे आपण बहुजन हिताय दाखवत आहात याबाबत आपले कौतुक करावे तेवढे थोडेच. सर्वसाधारणपणे बाकी सारे रुग्ण आपल्या डॉक्टरना सार्वजनिक ठिकाणी छान ओळख दाखवतात पण मनोविकार तज्ञ तेवढे सुदैवी नसतात.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पैसा

होय खरे साहेब जोडीदाराच्या

शुचि
Mon, 04/21/2014 - 23:42 नवीन
होय खरे साहेब जोडीदाराच्या त्रासाविषयीचे आपले विश्लेषण तंतोतंत खरे आहे. अक्षरक्षः १०१%!!!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुबोध खरे

+१

धन्या
Tue, 04/22/2014 - 10:49 नवीन
शुचिताई आणि त्यांचा नवरा दोघांनाही सलाम !!!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुबोध खरे

लई दम लागतो असं काही लिहायला.

आदूबाळ
Mon, 04/21/2014 - 21:30 नवीन
लई दम लागतो असं काही लिहायला. __/\__ बायपोलर ही "स्पेक्ट्रम डिसऑर्डर" आहे ना? म्हणजे एकाची बायपोलर दुसर्‍यासारखी नसते, असं.
  • Log in or register to post comments

+१

मी-सौरभ
गुरुवार, 04/24/2014 - 20:58 नवीन
__/\__
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आदूबाळ

>>> सायकिअ‍ॅट्रीस्ट्कडे जाणे

प्यारे१
Mon, 04/21/2014 - 21:30 नवीन
>>> सायकिअ‍ॅट्रीस्ट्कडे जाणे/दाखविणे म्हणजे वेडे असणे हीच माझीदेखील समजूत होती. मुख्य घोळ इथेच असतो. शरीराला जसा आजार होतो तसा मनालाही होतो आणि तो बर्‍याच केसेस मध्ये बरा देखील होतो हे नीट 'पोचत' नाही. चित्रपटांमधे दाखवलेल्या अतिशयोक्ती आणि अतर्क्य घटनांंमुळे आणखीनच भीती निर्माण होते. दुर्दैवानं बाबा, बुवा नि महाराज ह्या 'अधिकार नसलेल्या पण विनाजबाबदारी पैसा मिळण्याच्या' क्षेत्रात मानसिक आजार असलेल्या लोकांना आणलं जातं नि आजार आणखीच बळावतात. मानसिक आजारांमध्ये बर्‍याचदा झालेल्या/ केलेल्या स्वतःच्या अथवा कुटुंबियांच्या कळत नकळत दुर्लक्षामुळं आजार बळावलेल्या स्थिती पर्यंत आल्यानंतरच रुग्ण डॉक्टरांकडं आणला गेलेला असतो. औषध अवघड नि दीर्घ काळ घेण्याचं प्रमुख कारण उशीरा आणलं जाणं हे आहे. वन स्टीच अ‍ॅट अ टाईम सेव्ह्स नाईन असं इथं घडत नाही कारण मानसिक आजाराबद्दल असलेली भीती नि अकारण अथवा सकारण असलेलं सामाजिक दडपण! बर्‍याच संस्था मानसिक आजारांबद्दल काम करत आहेत मात्र त्या पुरेशा नाहीत. त्या वाढायला हव्यातच. सातत्यानं आवश्यक त्यातही टीन एजेस मध्ये अत्यंत आवश्यक असलेलं मानसिक आरोग्याचं क्षेत्र खूपच दुर्लक्षित राहीलेलं आहे, आपल्या समाजाकडून ठेवलं गेलेलं आहे. - इंजिनिअरींग करताना अ‍ॅन्टी डिप्रेसण्ट टॅबलेट्स चा भरपूर उपयोग झालेला प्यारे
  • Log in or register to post comments

इंजिनिअरींग करताना अ‍ॅन्टी

आदूबाळ
Mon, 04/21/2014 - 22:03 नवीन
इंजिनिअरींग करताना अ‍ॅन्टी डिप्रेसण्ट टॅबलेट्स चा भरपूर उपयोग झालेला
बाबौ! खरंच??
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्यारे१

हो! जौ दे! नको त्या आठवणी.

प्यारे१
Mon, 04/21/2014 - 22:12 नवीन
हो! जौ दे! नको त्या आठवणी. :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आदूबाळ

शुची ,तुझे कौतुक आणि हे इथे

अजया
Mon, 04/21/2014 - 22:27 नवीन
शुची ,तुझे कौतुक आणि हे इथे सांगण्याच्या धैर्याला सलाम.
  • Log in or register to post comments

+१

सखी
Mon, 04/21/2014 - 22:33 नवीन
शुची ,तुझे कौतुक आणि हे इथे सांगण्याच्या धैर्याला सलाम. ब-याचदा फार उशीरा या गोष्टी लक्षात येतात, आणि नंतर हळहळ होते. खाली बहुगुणींनी दिलेली माहीतीही अतिशय उपयोगी आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अजया

मिपावर येण्याचं सार्थक होतं ते अशा चर्चांनी

बहुगुणी
Mon, 04/21/2014 - 22:29 नवीन
"माझे सत्य सांगीतले, माझी कथा सांगीतली...अन्य पीडीत व संबंधित लोकांना काही एक संदेश गेला तर उत्तमच " एका पूर्णपणे public अशा संस्थळावर इतक्या सरळपणे वास्तव मांडणं आणि आपल्या समस्येतून इतरांना मार्गदर्शन करणं ही खरी प्रगल्भता, hats off to you, शुचि! तुमच्या दीर्घारोग्यासाठी मनःपूर्वक शुभेच्छा, आणि तुम्हाला व मदतीची गरज असणार्‍या इतर वाचकांना बायपोलर डिसऑर्डर या व्याधीसाठी उपयोगी पडावेत असे क्लिनिकल ट्रायल्स चे दुवे इथे मिळतील. आपल्या आसपास या व्याधीने त्रस्त असे कुणी असतील तर त्यांना कशी मदत करावी याची थोडक्यात माहिती (आधिक माहिती इथे मिळेल):
  • अशा रुग्णांना भावनिक आधाराची, सामंजस्याची, सहनशीलततेची आणि प्रोत्साहनाची गरज असते, ती ओळखा
  • अशा नातेवाईकांना, मित्र/मैत्रिणींना तुम्ही त्यांचं म्हणणं ऐकून घेण्याची गरज असते, ती ओळखून त्यांचे घटना/अनुभव-वर्णन न तोडता लक्षपूर्वक ऐका, आणि त्यांच्याशी शांतपणे, पण धीर देऊन बोला.
  • त्यांची भीती कशाने (कोणत्या प्रसंगांत) वाढते ते समजून घ्या.
  • त्यांच्या बरोबर उत्साहवर्धक कार्यांत भाग घ्या, उदाहरणार्थ, जोडीने फिरावयास जाणे, सहलींना जाणे, इत्यादि.
  • वेळीच सुरू केलेल्या आणि चालू ठेवलेल्या योग्य औषधोपचारांनी ते खूप बरे होऊ शकतात याची त्यांना मधूनमधून आठवण करून देत जा.
  • आत्मघातक विचार ही एक टोकाजवळची पायरी असू शकते, तेंव्हा असे विचार त्यांनी कधी तुमच्याजवळ व्यक्त केले तर ते कधीही दुर्लक्षित करू नका; अशा घटना तत्काळ त्यांच्या कुटूंबातील जबाबदार व्यक्तिला आणि शक्य असेल तर त्यांच्या डॉक्टरला कळवा.
  • Log in or register to post comments

अतिशय उत्तम दुवे व प्रतिसादही

शुचि
Mon, 04/21/2014 - 22:34 नवीन
अतिशय उत्तम दुवे व प्रतिसादही छानच. धन्यवाद.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बहुगुणी

मधुरा, पैसा, आदूबाळ , प्रशांत

शुचि
Mon, 04/21/2014 - 22:37 नवीन
मधुरा, पैसा, आदूबाळ , प्रशांत, अजया, सखी आपलेसुद्धा आभार.
  • Log in or register to post comments

प्रामाणिक कथन.

आतिवास
Mon, 04/21/2014 - 22:41 नवीन
प्रामाणिक कथन. पुढील वाटचालीस शुभेच्छा.
  • Log in or register to post comments

Hats off !!

सूड
Mon, 04/21/2014 - 22:47 नवीन
Hats off !!
  • Log in or register to post comments

You are not alone.

आजानुकर्ण
Mon, 04/21/2014 - 22:53 नवीन
You are not alone.... मला एक ते दीड वर्षे GAD आणि Panic Disorderचा त्रास झाला होता. चार-पाच किलोमीटर सहज पळू शकणाऱ्या, गडकिल्ल्यांवर भटकंती करणाऱ्या मला दोन पायांवर उभे राहण्याचीही भीती वाटण्याइतका आत्मविश्वास गमावला होता. ऑफिसात मीटिंग वगैरे असताना अचानक चक्कर येऊन पडलो तर आधारासाठी भिंत किंवा खुर्ची जवळ असावी म्हणून धावतपळत आधीच मीटिंगमध्ये जाऊन सोयीस्कर जागा पकडल्याचे आठवले की आता हसू येते. मनावर कोरला गेलेला त्या आठवणींचा शेवटचा प्रसंग म्हणजे एकदा मॅनेजरने काही इनपुट्स घेण्यासाठी त्याच्या केबिनमध्ये बोलावले होते. त्याची केबिन बरीच मोठी होती आणि उपलब्ध खुर्च्यांवर इतर दोघेजण बसले होते. भिंत बरीच लांब होती. आता केबिनमध्ये मधोमध उभे राहावे लागणार हे पाहूनच त्रिशंकू अवस्था होऊन गरगरल्यासारखे होऊ लागले. कसाबसा वेळ काढला. ते पाच मिनिट अक्षरशः पाच तासांसारखे वाटले होते. काय बोललो आठवत नाही. कदाचित त्यावर्षीचे अप्रेजल गंडले असावे. ;) मात्र या प्रसंगाने 'आधाराला काही सापडले नाही तरी आपल्याला उभे राहता येते व काहीही होत नाही' हे समजण्यास मदत झाली असावी असे वाटते. I think that was moment of realization. त्यानंतर हळूहळू औषधे कमी करण्याची डॉक्टरांना विनंती केली. मनोविकारतज्ज्ञांच्या उपचारांमुळे आणि घरच्यांच्या पाठिंब्याने बराच फायदा झाला. दवाखान्यात विविध प्रकारचे रुग्ण पाहून मनोविकारांबाबतची पुस्तकी नसलेली अशी नवी माहिती कळाली. गोळ्यांचे साईड इफेक्ट्स आणि विथड्रॉल सिम्पटम्स फारच त्रासदायक होते. सुदैवाने गेली काही वर्षे कोणतीही गोळी घ्यावी लागत नाही याचा आनंद वाटतो. इंटरनेटवर या विकारांबाबत जास्त शोधत बसू नका हा एक अनुभवाचा सल्ला. :) शुभेच्छा...
  • Log in or register to post comments

आजानुकर्ण आपल्या प्रामाणिक

शुचि
Mon, 04/21/2014 - 22:56 नवीन
आजानुकर्ण आपल्या प्रामाणिक प्रतिसादाबद्दल आभारी आहे. आपली औषधे कमी झाली याचा आनंद आहे.
इंटरनेटवर या विकारांबाबत जास्त शोधत बसू नका हा एक अनुभवाचा सल्ला.
अगदी खरं आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आजानुकर्ण

हां लेख हे एक मुख्य कारण आहे

आत्मशून्य
Mon, 04/21/2014 - 22:59 नवीन
मिपावर स्वमग्नतेच्या लेखमालेचे अतिशय स्वागत असण्याचे.
  • Log in or register to post comments

शुचि मामी, हॅट्स ऑफ टू यू!!

किसन शिंदे
Mon, 04/21/2014 - 23:05 नवीन
शुचि मामी, हॅट्स ऑफ टू यू!! :) खुप जास्त अग्रेसिव्हनेस हा या आजाराचाच भाग असू शकतो का?
  • Log in or register to post comments

फक्त तज्ञ व्यक्तीच तो अदमासा

शुचि
Mon, 04/21/2014 - 23:22 नवीन
फक्त तज्ञ व्यक्तीच तो अदमासा घेऊ शकते. आपण लक्षणे सांगीतल्यावर, प्रश्नावली वगैरे भरुन घेऊन ते तुमची मुलाकत घेतात , प्रश्न विचारतात व काहीएक पद्धतीने निदान करतात. पण मॅनिया च्या फेझमध्ये अतिशय आनंदी व सकारात्मक (पॉझिटीव्ह) वाटते इतके की पेशंट रिस्की वागणूक देखील प्रदर्शित करतो. चूकीचे निर्णयही अति आत्मविश्वासाने घेतले जाऊ शकतात. मधे मधे अतिशय अ‍ॅग्रेसिव्ह वागणूकही घडते, चिडचिड्/इरिटेशन दिसून येते. विशेषतः उन्हाळ्यात मला हे त्रास जाणवतात. कटाक्षाने डोके थंड ठेवायच प्रयत्न आता करते कारण तेवढे आत्मभान डेव्हलप झाले आहे. पण औषधे लागतातच!!!!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: किसन शिंदे

ओह! समजावून सांगितल्याबद्दल

किसन शिंदे
Mon, 04/21/2014 - 23:28 नवीन
ओह! समजावून सांगितल्याबद्दल धन्यवाद. :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शुचि

लेख आवडला...

मुक्त विहारि
Mon, 04/21/2014 - 23:32 नवीन
मनापासून आणि स्वानुभव लिहिल्याने जरा जास्तच आवडला. तुमच्या नवर्‍याचे जास्त कौतूक वाटले.
  • Log in or register to post comments

धन्यवाद मुवि.

शुचि
Mon, 04/21/2014 - 23:41 नवीन
धन्यवाद मुवि. आयुष्यात माझी पुण्यराशी कामात आली असेल ते हा नवरा मिळण्यात. कारण त्याने इतका आधार दिला आहे. अन अजूनही एकमेव माझ्या प्रकृतीच्या दृष्टीने तो माझ्यावर सक्ती करतो, काळजी घेतो. मला व्यायाम हा रोजचा रोज करावाच लागतो नाहीतर आमच्यात खडाजंगी ठरलेली आहे. माझे खाणेपीणे/पथ्य स्ट्रीक्ट आहे. अर्थात फार फॅटी/जंक हे वर्जित बाकी काही नाही. झोपेची वेळ ठरल्याने खूप गोष्टी जसे कुटुंबाबरोबर रात्री पिक्चर पहात धमाल करणे हे वर्ज्यच झाले आहे. ज्या काळात माझी औषधे सापडत नव्हती त्या काळात त्याने कमालीचा पेशन्स दाखवला. म्हणजे नवरा आहे म्हणून नाही तर माझ्या हृदयात एक माणूस म्हणून इतकं ऊंच स्थान त्याने मिळवलय! आम्ही अनेक अनेक औषधे ट्राय केलेली शेवटी डॉक्टरांनी अ‍ॅबिलिफाय मला सुचवली. पण ती काही लागू पडेना तेव्हा याने बरोबर नीरीक्षण करुन डॉक्टरांना सुचविले की १००मिलीग्रॅम ऐवजी एकदा ५० मिलीग्रॅम ट्राय करुन पाहता का? कारण ती औषधांच्या मात्रांना फार सेन्सिटीव्ह आहे. अन डॉक्टरांनी ऐकले अन खरच गेली १० वर्षे ही माझी मूड स्टॅबिलायझर आहे. एकेक खरच ऋणानुबंधच्च्च असतात.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मुक्त विहारि

सॉरी १ मिलीग्रॅम ऐवजी, ०.५

शुचि
Mon, 04/21/2014 - 23:50 नवीन
सॉरी १ मिलीग्रॅम ऐवजी, ०.५ मिलीग्रॅम!!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शुचि

__/\__

अत्रुप्त आत्मा
Mon, 04/21/2014 - 23:49 नवीन
__/\__
  • Log in or register to post comments

_/\_

यसवायजी
Mon, 04/21/2014 - 23:52 नवीन
_/\_
  • Log in or register to post comments

प्रामाणिकपणे केलेले लेखन

रेवती
Tue, 04/22/2014 - 00:01 नवीन
प्रामाणिकपणे केलेले लेखन आवडले. तुझ्या जोडीदाराचे कौतुक आहे.
  • Log in or register to post comments

शुचि तुमच्या बद्दल मलाही आदर

अनन्या वर्तक
Tue, 04/22/2014 - 01:06 नवीन
शुचि तुमच्या बद्दल मलाही आदर वाटतो. अगदी प्रामाणिक पणे स्वतःबद्दल लिहिले आहे तुम्ही. तुमचे पुढील आयुष्य असेच आनंदाचे आणि सुखाचे जावे म्हणून माझ्याकडून तुम्हा दोघांना शुभेच्छा.
  • Log in or register to post comments

बायपो... तुम्हाला ?

आत्मशून्य
Tue, 04/22/2014 - 01:21 नवीन
वॉव! डिडंट सॉ इट कमींग... नाही, तुमच्या जालिय लिखाणात मिष्कीलता, वैताग, बालिशपणा, विज्ञान, काव्य, शास्त्र, विनोद, अध्यात्म, सुस्पष्ट तर्कसंगतीचा अभाव, वगैरे वगैरे वगैरे सर्व नेहमीच आढळले. आपल्या अगदी खुळचट लिखाणालाही एक सात्विक निरागसपणाची जोड दिसली, म्हणुनच जास्तिजास्त निखळ अल्लड छबीच कायम मनात उभी आहे. पॉइंट इज, कधिच म्हणजे कधिच अक्रस्ताळेपणा मात्र असा आढळला नाही. आणि तुम्ही स्वतःला बाइपोलार जाणता ...? ऐकावे ते नवलच. तुम्हाला मानाचा मुजरा, मैत्रीचा सलाम आणी (हा) प्रेमाचा प्रतिसाद.
  • Log in or register to post comments

सलाम !!!

खटपट्या
Tue, 04/22/2014 - 01:22 नवीन
सलाम !!!
  • Log in or register to post comments

शुचि ताई या प्रकारे लिहायला

दिव्यश्री
Tue, 04/22/2014 - 01:38 नवीन
शुचि ताई या प्रकारे लिहायला खरचं एक वेगळी ताकद लागते असे मला वाटते . ती फारच कमी लोकांकडे असते . नवर्‍याने या आजारात अथक अथक अन निव्वळ अमेझिंग साथ दिली. हे माझे पूर्वसुकृत अन पुण्याइ का काय माहीत नाही>>> तुमचे पूर्वसुकृत अन पुण्याइ असेलच . मला वाटते आपल्या आई - वडिलांचे आशीर्वाद आणि त्यांची पुण्याई देखील आपल्या पाठीशी असते कायमच . तुमच्या नवऱ्याला सलाम . जोडीदाराची अशा वेळेस फारच परवड होते . त्यांनी सगळी परिस्थिती व्यवस्थित हाताळली . तुम्ही कधीही व्यनि करा , हाक मारा मला शक्य ते मी करण्यचा नक्की प्रयत्न करेन . देवाजवळ प्रार्थना करेन तुम्ही नेहमी आनंदी राहाव्यात . मनापासून शुभेच्छा . :)
  • Log in or register to post comments

टाकीचे घाव सोसल्याशिवाय देवपण येत नाही.

आयुर्हित
Tue, 04/22/2014 - 01:51 नवीन
आपले अभिनंदन व आपल्या पतीदेवांना धन्यवाद. देवाने त्यांनाही आपल्याला गरजेच्या वेळी याग्य प्रकारे साथ देण्याची सुबुद्धी दिली.खरे तर हे संस्कारच असतात, आई वडिलांनी त्यांना घडवताना दिलेले! त्यामुळे तुमच्या सासू सासरे यांनाही धन्यवाद. अशा या दुर्धर प्रसंगातून आपण व आपले कुटुंब तावून सुलाखून निघालेले आहे व आपल्याया खात्री आहे की कोण आपला सच्चा साथीदार आहे तो! आता एकच म्हणेन "कॅरम रमवानू, जूस पिबानू, मज्जानी life" फक्त Queen घेण्यासाठी(आपले goals साध्यकरण्यासाठीच) सदैव प्रयत्नशील रहा! लोकांच्या कल्याणासाठी खूप मोठे कार्य आपल्या हातून नक्कीच घडेल अशी आशा बाळगतो.
  • Log in or register to post comments

बापरे! वाचता वाचता माझेच

प्रभाकर पेठकर
Tue, 04/22/2014 - 02:04 नवीन
बापरे! वाचता वाचता माझेच हातपाय गार पडू लागले. किती भयंकर संकट तुमच्यावर, नवर्‍यावर, घरच्या सर्वांवर आलं होतं. मानसोपचार तज्ञाकडे जाण्याची निकड ओळखणं, प्रत्यक्ष तिथे जाणं, त्यांचं निदान मान्य करणं, औषधोपचाराला मान्यता, सकारात्मक प्रतिसाद देणं अनेक अनेक अडचणी. प्रत्येक पायरीवर माघारी फिरण्याची, नकारात्मक भूमिकेत शिरण्याची केव्हढी ती शक्यता. प्रत्येक क्षणाक्षणाला संघर्ष. स्वतःशीच. मला ह्यातून बाहेर पडायचंच ह्या निर्धारानेच. त्यातून होणारे क्लेष, ते सहन करण्याची मानसिक शक्ती.... सर्व सर्व जिवनच उध्वस्थावस्थेत जाण्याची भिती. ह्या सर्वावर तुम्ही मात केलीत. तुम्हाला सुज्ञ आणि धैर्यवान साथीदार लाभला हे तुमचे भाग्यच म्हंटले पाहिजे. त्यांचे मनभरून कौतुक. आहार, औषध, व्यायाम आणि निद्रा चारही सूत्रांवर तुमचे कायम नियंत्रण राहो आणि भविष्यातील आयुष्य निर्विघ्न पार पडो अशी इच्छा व्यक्त करतो.
  • Log in or register to post comments

___/\___

सानिकास्वप्निल
Tue, 04/22/2014 - 03:24 नवीन
अनुभवकथन आवडले, अगदी मनापासून, प्रामाणिकपणे लिहिले आहे त्यामुळे जास्तं भावला शुचीताई सिंपली ग्रेट ___/\___ खूप खूप शुभेच्छा तुम्हाला.
  • Log in or register to post comments

मम आत्मा गमला हा, न कळत न वळत हृदय तळमळत...

नंदन
Tue, 04/22/2014 - 04:41 नवीन
स्फुट आवडलं. माझ्या जवळच्या आप्तांपैकी एक व्यक्तीही बायपोलर डिसऑर्डरने ग्रस्त आहे. एका बुद्धिमान, आनंदी व्यक्तीचं मलूल, कुठलीच उमेद न राहिलेल्या डॉपलगॅन्गरमध्ये होणारं रुपांतर पाहणं फार त्रासदायक. लिथियम बेस्ड् औषधांनी फरक पडतो; पण प्रचंड झोप येणं, अनुत्साह वाटणं, भूक न लागणं - यासारख्या साईड इफेकख्यामुळे तो पर्यायही तितका व्यवहार्य नाही. तुमच्यासारखेच गुणकारी औषधांचे कॉकटेल कधीतरी सापडेल अशी आशा आहे.
तुम्हाला सुज्ञ आणि धैर्यवान साथीदार लाभला हे तुमचे भाग्यच म्हंटले पाहिजे. त्यांचे मनभरून कौतुक. आहार, औषध, व्यायाम आणि निद्रा चारही सूत्रांवर तुमचे कायम नियंत्रण राहो आणि भविष्यातील आयुष्य निर्विघ्न पार पडो अशी इच्छा व्यक्त करतो.
अगदी असेच.
  • Log in or register to post comments

नंदन, बायपोलर व्यक्तींनी

शुचि
Tue, 04/22/2014 - 19:31 नवीन
नंदन, बायपोलर व्यक्तींनी रोजच्या रोज एका विशिष्ठ वेळी व्यायाम करणे हे अति-अति निकडीचे असते. I cannot enough iterate the importance of it. एक दिवस जरी मिस झाला तरी दुसर्‍या दिवशी लेथार्जिक वाटते,मूड एकदम ड्ल होऊन जातो वगैरे. हे त्या त्या औषधांच्या दुष्परीणामांमुळेच होते. पण त्यांच्यावर मात करायची असेल तर व्यायामाची जोड अति आवश्यक असते. अर्थात एवढं होऊनही सगळं आलबेल (परफेक्ट) वाटेलच असे नाही पण खूप सुधारणा जाणवते. किंबहुना मी वाचलेल्या माहीतीनुसार, व्यायाम हा शरीराच्या स्वास्थ्याहूनही जास्त मेंदूच्या स्वास्थ्यासाठी करायचा असतो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नंदन

सर्वच मिपाकरांचे आभार. खरं तर

शुचि
Tue, 04/22/2014 - 04:44 नवीन
सर्वच मिपाकरांचे आभार. खरं तर या विषयावर लिहायचे होते पण कसे अन कितपत ते कळत नव्हते. मूकवाचक, इस्पिक एक्का, वल्ली, शरद जी या सर्वांचे अन्य सुगरणी चे धागे वाचतानाच हे लक्षात आलेले की सारेजण त्यांना इण्टेन्सली जे वाटते , आवडते त्याबद्दल लिहितात अन त्यातून समाजाला, सर्वाना काहीतरी भरीव मिळते, वैचारिक चालना मिळते. मला या विषयावर सांगावेसे वाटत होते. अर्थात मी फार सखोल अभ्यास केलेला नाही याचे कारण काय सापडेल अन काय औषधांचे दुष्परिणाम दृष्टोत्पत्तीस पडतील या चिंतेपायी मी या विषयावर फार सर्फींग करत नाही. त्यामुळे खूप दुवे व माहिती तर नाही देउ शकले पण अनुभवकथन मात्र १००% सत्य केले आहे.
  • Log in or register to post comments

अर्थात मी फार सखोल अभ्यास

तुमचा अभिषेक
Tue, 04/22/2014 - 14:02 नवीन
अर्थात मी फार सखोल अभ्यास केलेला नाही याचे कारण काय सापडेल अन काय औषधांचे दुष्परिणाम दृष्टोत्पत्तीस पडतील या चिंतेपायी मी या विषयावर फार सर्फींग करत नाही. हे तसे योग्य करता. मलाही एक तुलनेत दुर्मिळ असा पोटाचा आजार आहे जो शरीराच्या बरेच ठिकाणी आघात करून जातो पण ते सारे होईलच असे नाही म्हणून मी सुद्धा त्यावर स्वतातर्फे संशोधन करत नाही अन्यथा नको ते नजरेस पडून ती भिती मनात राहील. डॉकने देखील अप्रत्यक्षपणे हाच सल्ला दिलाय. असो, बाकी हे लिहिण्याच्या धाडसाबद्दल प्रणाम सलाम नमस्ते ! तसेच तुमच्याकडे पाहता हे असे काही असू शकते हे तुम्हीच सांगितले नसते तर विश्वासही बसला नसता. याबद्दल विशेष कौतुक.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शुचि

अरे हो आणि तुमच्या नवर्‍याचे

तुमचा अभिषेक
Tue, 04/22/2014 - 14:04 नवीन
अरे हो आणि तुमच्या नवर्‍याचे कौतुक राहीलेच. मला वाटायचे की मीच काय तो एक जगात भारी नवरा आहे ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: तुमचा अभिषेक

शुचि तुझे व तुझ्या नवर्‍याचे

यशोधरा
Tue, 04/22/2014 - 05:09 नवीन
शुचि तुझे व तुझ्या नवर्‍याचे खूप कौतुक. शुभेच्छा!
  • Log in or register to post comments

Hats off

बोबो
Tue, 04/22/2014 - 06:36 नवीन
तुम्ही आणि तुमचे कुटुंबीय सगळ्यांच्याच धैर्याला सलाम.
  • Log in or register to post comments

असं काही लिहायला आणि कबुली

कॅप्टन जॅक स्पॅरो
Tue, 04/22/2014 - 07:24 नवीन
असं काही लिहायला आणि कबुली द्यायला प्रचंड मानसिक ताकद लागते. शुचि तुमच्या आणि तुमच्या कुटुंबियांच्या जिद्दीला सलाम.
हा आजार बरा होत नाही. मी मेल्यावरच हा संपणार पण ... पण ....समाधानाची बाब ही की "अत्यंत प्रेडिक्टेबल अन मॅनेजेबल" आहे
बी पॉसिटीव्ह. गर्तेमधुन बाहेर आला आहात. आपली पथ्यं व्यायाम पाळुन आयुष्य मस्त एंजॉय करा. कदाचित असही होईल लवकरं काही शोध लागेल आणि ह्याच्यावर कायमचा उपचार सापडेल. युनिव्हर्स गिव्ह्स यु व्हॉट यु क्रेव्ह फॉर, मे बी नॉट ईमिजिअटली बट ईव्हेच्युअली. :)
  • Log in or register to post comments

तुम्हाला आणि तुमच्या श्रीं ना

प्रमोद देर्देकर
Tue, 04/22/2014 - 08:42 नवीन
तुम्हाला आणि तुमच्या श्रीं ना _/\___ आणि खूप खूप शुभेच्छा.
  • Log in or register to post comments
  • 1
  • 2
  • 3
  • 4
  • ›
  • »

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा