बॉडी वर्ल्डस् व्हायटल - मानवी शरीराचे एक अनोखे प्रदर्शन
बॉस्टनच्या ऐतिहासीक फॅन्युएल हॉल एकेकाळी अमेरीकन स्वातंत्र्ययुद्धाच्या आखण्या करत असे. आत्ताच्या काळात तेथे नागरीकत्वाचा शपथविधी वगैरे सोहळे चालतात, खालच्या मजल्यावर केवळ खाण्यासाठी भरपूर दुकाने, बाहेर महागडी दुकाने आणि रेस्टॉरंट्स असा प्रकार आहे. सध्या ख्रिसमसच्यामुळे रोषणाई आहे, शनीवारी तर भरपूर पब्लीक थंडी असली तरी कोरडा दिवस असल्याने येऊन जाऊन मजा करत होते. अशा ठिकाणी या इमारतीच्या वरच्या मजल्यावर एक वेगळेच फिरते प्रदर्शन आले आहे. लेकीमुळे ते समजले - "बॉडी वर्ल्ड व्हायटल्स" असे नाव असलेले हे प्रदर्शन म्हणजे खरेखुरे मानवी देह हे त्यांचे प्लॅस्टीकीकरण करून त्यांचे अंतर्गत अवयव, नस, वाहीन्या, स्नायू दिसतील अशा पद्धतीने तयार करून प्रदर्शनास ठेवलेले. असले प्रदर्शन कसे असेल असे उगाच मनात कल्पनाविस्तार करत "यक्" असे म्हणून गेलो खरा, पण पाहील्यावर बरे झाले सांगितलेस म्हणून आम्हा दोघांना लेकीचे आभार मानावे लागले...
Gunther von Hagens (हेगन्स) नामक एका जर्मन डॉक्टरने १९७७ मध्ये प्लॅस्टीकीकरणाची (प्लॅस्टिनेशन) पद्धत तयार केली. या मधे सुरवातीस त्याने वैद्यकीय महाविद्यालयास लागणारे अवयव त्यातील पाणी आणि चरबी काढून त्यात काही पॉलीमर्स तसेच अॅसिटोनचा वापर करून ठेवले. त्यामुळे त्या अवयवांचे अक्षरशः प्लॅस्टि़कीकरण झाले. त्यांना स्पर्श करणे शक्य होऊ लागले, अंतर्गत रचना सहज दिसू लागली, वास/दुर्गंधी नाही आणि प्लॅस्टीकच झाल्याने कुजणे हा प्रकार देखील नाही! कालांतराने त्याने १९९७ मधे इन्स्टीट्यूट ऑफ प्लॅस्टीनेशन काढली आणि केवळ वैद्यकीय विद्यार्थ्यांना शिकवण्यासाठीचे अवयय/शरीर इतकाच उद्देश न ठेवता, विविध प्रकारचे काम करतानाचे देह त्याने तयार केले जेणे करून गाताना, पळताना, नाचताना, वगैरे माणसाचे अंतर्गत स्नायू कसे होतात ते सामान्यांना समजेल तसेच सामान्यांनाही आरोग्यासाठी शरीररचना अधिक पण सुलभपणे समजेल, असे चालते प्रदर्शन तयार केले. खालील छायाचित्रे मीच काढलेली आहेत. छायाचित्र काढायला परवानगी होती पण फ्लॅशवीना. त्यामुळे काही छायाचित्रे अंधारात दिसतील अथवा किंचित ब्लर्ड... पण त्यातून एका वेगळ्याच प्रदर्शनाचे आणि भन्नाट कल्पनेचे मिपाकरांना दर्शन होईल असे वाटते.
गायक
तलवारधारी...
विंगमॅन
आईस हॉकी खेळाडू
अॅक्रोबॅटीक कपल
डान्सर
सिगरेट ओढाणार्याचे (काळे झालेले) फुफ्फुस
पारंपारीक अमेरीकेन जेवण (महीन्यास $३४०)
पारंपारीक भारतीय जेवण (महीन्यास $४० कदाचीत आता जास्त असेल).
हृदयातील रक्ताभिसरण पद्धती
गायक
तलवारधारी...
विंगमॅन
आईस हॉकी खेळाडू
अॅक्रोबॅटीक कपल
डान्सर
सिगरेट ओढाणार्याचे (काळे झालेले) फुफ्फुस
पारंपारीक अमेरीकेन जेवण (महीन्यास $३४०)
पारंपारीक भारतीय जेवण (महीन्यास $४० कदाचीत आता जास्त असेल).
हृदयातील रक्ताभिसरण पद्धती
प्रतिक्रिया
छान! आवडले
खुलासा
छान !!!
दोन महीन्यांपुर्वी न्युयॉर्क
गंमतच आहे...
उत्सुक आहे.
खुपच भारी काय काय पहायला
मुलांसाठी माहितीपुस्तक
लिन्क दिसत नहिए
डाउनलोड
हैश्शा! अगदी कालच मुलाचे व
याबद्दल अगोदरही वाचले होते.
हुम्म्म
शरीरासंबंधीच्या प्रदर्शनात
जेवण
बाकीचे काही फोटो ईथे पहाता
धन्यवाद - पण म्हणजे
मस्त आयडिया आणि मुख्य म्हणजे
आगळे वेगळे प्रदर्शन !
च्यामारी... हे वेगळेच
वाह