बोला!! स्त्री मुक्ती आंदोलन, झिंदाबाद!!!
लेखनविषय (Tags)
मानवतेच्या इतिहासात पुरुषांनी स्त्रियांना समान हक्क दिले नाहीत. त्यामुळे स्त्रियांवर अन्याय झाला. जसे जसे शिक्षणाचा प्रसार झाला माहिती ज्ञानाचा प्रसार झाला. मानवतेच्या एकूण जगाला समजून घेण्याच्या प्रक्रियेची उत्क्रांती होत आहे, लोकांची विचार करण्याची पद्धत बदलत चालली आहे. एकूण परिस्थिती बदलत आहे. २१ व्या शतकात देखील जर मनुष्य स्त्रियांना समान हक्क देवू शकत नसेल तर हे मानवतेच दुर्दैव समजावे. परंतु ह्या प्रश्नाची एक दुसरी बाजू देखील आहे. स्त्रियांना समान हक्क (Equality) देण्याच्या नावावर फेमिनीस्ट शक्ती स्त्री आणि पुरुषांना एकरूप (Identical) करण्याच्या घाट घालत आहेत किंबहुना ते त्याच्या हि पलीकडे कडे जाऊन ते Gynocentric (स्त्री केंद्रित) and Misandric (पुरुष द्वेषी) संस्कृती विकसित करीत आहेत.
एका वाक्यात मी असे म्हणेन कि हे जे काही चालले आहे ते "एका अतिरेकाचे उत्तर दुसर्या अतिरेकाने" देण्याचा प्रयत्न ह्या फेमिनीस्ट शक्ती करत आहेत. त्यासाठी त्यांनी अनेक घातक, अतिरेकी, अव्यवहारिक, हिंसक, द्वेषपूर्ण, मूर्ख आणि हास्यास्पद संकल्पना निर्माण केल्या आहेत त्याचा आपण अभ्यास करणार आहोत.
काही गोष्टी अश्या असतात कि ज्या तुमच्या आमच्या सारख्या सामान्य लोकांपर्यंत पोहोचत नाही म्हणून हा एक छोटासा प्रयत्न. जेंव्हा कोणतीही पाश्चात्य संकल्पना मिडिया वर स्वार होऊन आपल्या पर्यंत येते तर आपली गणती "मागासलेल्या विचारांचे" या सदरात होऊ नये म्हणून आपण लगेच हिर हिरीने त्या चर्चेत भाग घेवून तावा तावाने पाठींबा देतो कारण आपण "शिकलेले लोक" असतो. परंतु आपण कधी स्वतःचे डोके देखील चालवायला पाहिजे आपला देश, आपली संस्कृती, आपली गरज आपली माती आणि आपले प्रश्न त्याच बरोबर ह्या जगाचा वेग आणि दिशा याची योग्य ती सांगड घालून निर्णय घ्यायला पाहिजे असे मला वाटते.
फिलॉसॉफी ची प्रोफेसर Christina Hoff Sommers प्रसिद्ध अमेरिकन लेखिका, Who Stole Feminism? या पुस्तकाद्वारे फेमिनिझम चे दोन भिन्न वैचारिक शाखां वर प्रकाश टाकते. एक आहे Equity feminism आणि दुसरी आहे त्याच्या अगदी उलट Gender feminism
Equity feminism: फेमिनिझम च्या ह्या शाखेचा उद्देश आहे स्त्रियांना संपूर्ण नागरिक आणि वैधानिक समानता मिळावी. आणि ह्या शाखेचे मूळ तिच्या मते classical liberalism मध्ये आहे. या फेमिनिझम ची सुरवात साधारणता १९१३ च्या काळात झाली. या काळात जी चळवळ सुरु झाली तिला First-wave feminism म्हणतात. स्त्रियांना मतदानाचे हक्क मिळावे त्याच प्रमाणे शैक्षणिक तसेच आर्थिक क्षेत्रात स्वतंत्र मिळावे या साठी प्रामुख्याने ओळखले जाते. या काळात स्त्री पुरुष समानता यावर जास्त जोर होता.
Gender feminism: हे लेखिकेच्या मते Gynocentric (स्त्री केंद्रित) आणि Misandric (पुरुष द्वेषी) आहे. हि शाखा "लैंगिक भूमिकेची" (Gender role) आलोचना करते आणि त्याला समूळ नष्ट करण्याची भाषा करते. या प्रकारच्या फेमिनिझम ची सुरुवात साधारण १९६० पासून सुरु झाली तर ती १९८० पर्यंत कार्यरत होती. चळवळीच्या ह्या दुसर्या लाटेला Second-wave feminism म्हणून ओळखले जाते. ह्या लेखात आपण याच प्रकारच्या फेमिनिझम बद्दल ओळख करून घेणार आहोत. या फेमिनिझम मध्ये काळानुसार अनेक स्त्री फीलॉसॉफर,सैद्धांतिक, विचाराकांनी स्त्री मुक्तीवदाला स्त्री पुरुष समानते कडून हळू हळू Gynocentric (स्त्री केंद्रित) आणि Misandric (पुरुष द्वेषी) सिद्धांताकडे कसे कसे घेवून गेले आणि फेमिनिझम हे फेमिनिझम न राहता विद्रोह्वाद आणि उग्रवाद मध्ये याचे परिवर्तन कसे झाले हे आपण पाहणार आहोत. या सदरात ज्या काही संकल्पना ह्या फेमिनीस्ट विचारवंतांनी निर्माण केल्या आहेत, त्यांचा एक एक करून आढावा घेवूया
प्रतिक्रिया
माझ्या बाजूनं चर्चा संपन्न करतो
@ बिरूटे सर : मी चर्चा थांबवली होती पण खास तुमच्यासाठी
हम्म्म...
हे गंभीरपणे लिहीलेलं असेल तर फारच हास्यास्पद आहे.
धन्स.
विषयाचा आवाका अत्यंत व्यापक आहे
बुच..
(No subject)
या, व खाली दिलेल्या तुमच्या इतर प्रतिसादांसंबंधी...
मेघालय आणि केरळ
लेखाच्या विस्तारामुळे बहुतेकांनी तो पूर्ण वाचला नसावा
काही लेखांचे विषय वाचले की
खि ़खि ़खि ....
चर्चा वाचली.
नाही. जहीरला मी प्रतिसाद द्यायला सांगितलं होतं
निखळ करमणूक झाली
आत्तापर्यंत २ होमोसेक्श्युअल
प्रणयाच्या सूक्ष्म छटांचे मंथन
Pagination