कामवाली
नमस्कार मंडळी,
हा कदाचित, भारतात राहण्यार्या भारतीय (आयटी वाईफ्/वर्किंग वाईफ/रिच नॉन वर्किंग वाइफ) गृहिणींचा जिव्हाळ्याचा विषय असेल. आजकाल चांगली कामवाली मिळणे कठीण गोष्ट आहे असे ऐकिवात आहे. ;)
गोष्ट तशी जुनी आहे. मी बेंगलोरात नवखाच गेलो होतो तेव्हाची. ऑफिस शहराबाहेर असल्याने जवळपास रहाणे क्रमप्राप्त होते, पगारही कमीच होता. लोटेगोल्लाहली नावाच्या खेड्यासम एरीआ मधे १ बीएचके जागेत रुमपार्टनर हवा आहे म्हणून अॅड लागली होती हापिसात. भाडं कमी होतं, पंजाबी रुम पार्टनर म्हणजे खाण्या आणि "पिण्याची' आबाळं होणार नाहीत अशी अपेक्षा करुन चांगभलं म्हंटलं.
शनिवारी संध्याकाळी रहायला गेलो. रविवारी सकाळी सकाळी, "बय्या, उटो". असा आवाज आला आणि चवताळून उठलो. तर एक बाई हातात झाडु घेऊन माझ्या समोर उभी होती. वय जास्त नसावं, मध्यम बांधा, काळा वर्ण, वय २४-२५ असावं, पाच साडे पाच फुट उंची, झोपेतुन उठल्याने काय होतय हे समजेना, तेवढ्यात पवन ( रुम पार्टनर) आला. ओये, उठ जा भाई, साफ सफाई का टाईम है.
मी रविवारच्या सकाळी ७ वाजता मनातल्या मनात चीडचीड करत चडफडत उठलो. ब्रश करत होतो तेवढ्यात ही बाई पुन्हा समोर उभी. "कपडा कौनसा धोना?" च्यामारी... मी नकारार्थी मान डोलावली, तेवढ्यात पुढचा प्रश्न "ब्रेकफास्ट क्या होना?"
"यार पवन, ये क्या टेंशन है यार?" - मी
"समझ जायेगा" - पवन
ब्रेकफास्ट टेस्टी होता. सोमवार पासून ऑफिस पुन्हा सुरु झाले. सकाळचा ब्रेकफस्ट आणि लंच ऑफिसमधेच व्हायचं, रात्री घरी गेल्यावर जेवण तयार असायचं. पण शनिवार रविवार ही बाइ मला काही उसंत देइना. पण हळू हळू सगळ्याची सवय झाली. मग बर्याच गोष्टी समजल्या.
ह्या बाईच नाव शांती होतं. सहसा नवरे बायकोला टाकतात, पण हिने दारुड्या, काम न करणार्या नवर्याला टाकून दोन मुलांची जबाबदारी उचलली होती. गेल्या सहा महिन्यात एकही सुटी घेतली नव्हती. सकाळी पाच वाजता ऊठुन मुलांना तयार करुन शाळेत सोडायची, मग दिवसभर ५-६ घरी धुणं भांडी करून पुन्हा मुलांना शाळेतुन घरी घेऊन जायची. शनिवारी आणि रविवारी मुलांना बरोबर घेऊन काम संपवूनच मग घरी जायची.
मलाही तिचं फार कौतुक वाटलं, वयाच्या २४-२५ व्या वर्षी दोन मुलं संभाळणारी ही माता गेल्या ३ वर्षात एकही नवी साडी न घेता, एकही रुपया औषधाखातर खर्च न करता झगडत होती. धुण्याच्या कपड्यात एखादी दहाची नोट असो, किंवा कोपर्यात पडलेलं एखादं रुपयाचं नाणं, कधी चोरीला गेलं नाही. घरात, इकडे-तिकडे पडलेले कपडे असो किंवा फ्रिजमधली एखादी खराब होत चाललेली भाजी कधी तिने न विचारता घरी नेली नाही. कधीही आमच्या जवळून जाण्याचा प्रसंग आलाच तर जाताना अंग चोरुन जाण्याची सवय तिचं चारित्र्य सिद्ध करत होती. कधीही शाळेत न गेलेली ही स्त्री हिंदीसहित ५ भाषा शिकली होती. तिला थोडंफार ईंग्रजी येतं हे समजल्यावर मला स्वतःचीच थोडी शरम वाटली होती हे इथे नमूद करतो.
मला तिच्या चिमुकल्या मुलांचा लळा लागला, शनिवारी, रविवारी ही मुले घरी यायची, खेळायची. मीही त्यांच्याबरोबर लहान होऊन खेळायचो, आम्हाला एकमेकाची भाषा येत नसली तरीही. मी त्यांची वाट बघायचो. ते आले की मीही त्यांची भाषा शिकायचा, बोलायचा प्रयत्न करायचो. एकदा मी त्यांच्यासाठी मॉंजीनीज् चा केक आणला, त्यावर शांती फार नाराज झाली.
मी "क्या हुआ?, केक है, बच्चे पसंद करेंगे"
ती: "नही बय्या, मै दिन मे एक बार कुकर मे बाथ (भात) लगाती हु, हमारा सारा दिन का काना (जेवण) उसी मे होता है. आप उनको केक देंगे और वो कल मुझसे फिर केक मांगेगे तो मै उनको नही दे सकती"
तिची गरीबी तिच्या करुण डोळ्यातून वहात होती आणि मी त्या माउलीकडे पहाण्या पलिकडे काहीही करु शकलो नाही.
एक दिवस "बय्या, ए लो, मिठाई." - शांती
मी: "क्या हुआ?"
शांती: "मेरी बेटी पास हो गई, टीचर कहते है अच्छे मार्क्स आये है"
मी; "ये लो, सौ रुपये, मेरी तरफ से उसको कुछ दे देना". तिने पैसे घेतले.
शांती; "बय्या, ये पैसे मे उसके स्टडी मे खर्च करेगी. मेरे बच्चे बी एक दिन आपके जैसे सहाब बनेंगे"
असं बोलुन ती पाठमोरी होताच माझ्या डोळ्यात हलकेसे पाणी तरारले.
आपला,
मराठमोळा.
वर्गीकरण
प्रतिक्रिया
आवडली - - - - - कथा !
लेखन आवडले. बाई जिद्दीची
लेखन आवडलं आमच्याकडे काम
लेख आवडला.
लेख नक्कीच आवडला रेवतीताईंचा
संवेदनशीलता दुर्मिळ चीज आहे
ह्म्म्म.... वास्तविक
बाईंच कौतुक वाटलं...बिनकामी
वाह वा. छान छान.
ममो - मराठमोळा श्रामो -
>>सुबक आकार येण्यासाठी काही
वाह वा. छान छान.
छान
+
+१
+१
१+ सहमत आहे!
+१
मस्त रे
मनातल्या भावनांमुळे डोळ्यात
सुंदर लेखन...
लेख छान
काही काही वाक्यातून अगदी
अगदी
अॅडी, व्यक्तीचित्रणाचा शेवट
कामवाली
छान !
अगदी हृद्य अशी छोटीशी आठवण!
अनुभव छान लिहिला आहे. त्या
छान लिहीलंय.
छान लिहिलंय, आमच्याकडंचा
माझ्या शेजारणीकडे जेंव्हा
लिखाण खूपच आवडलं.
त्यात परवा तिचा मुलगा एका
फरशी पुसत होता
ऋषिकेश..
+१
लिखाणातला अस्सलपणा जाणवला
छानच.
प्र.का.टा.आ.
पण ममो, तुम्ही गेल्या जन्मी
लेख
छान अनुभव रे ममो...