✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • नवीन लेखन
  • भटकंती

टवाळखोरांना एकत्र आणणारी "जमात-ए-कंपू"!

प
पिवळा डांबिस यांनी
Mon, 06/27/2011 - 23:36  ·  लेख
लेख
आज ओळख करून घेऊ, मिपावर जन्मलेल्या पण जागतिक झालेल्या संघटनेची. सर्व टवाळखोर मिपाकरांना एकत्र आणणारी "जमात-ए-कंपू"! इतिहासात पाहिले असता, मिपाची तात्याची गादी गेल्यावर टवाळखोर लोकांना मिपावर वाली उरला नाही. टवाळखोरांची अवस्था दारूण होऊ लागली होती. तसेच सामान्य मिपाकर तर हुच्चभ्रूंच्या चालीरितींकडे आकृष्ट होऊ लागले होते. मिपावरील साहित्यावरचा हा सर्वात मोठा धोका टाळण्यासाठी आणीबाणीच्या काळा आधी उस्ताद हलाल-मुर्गा बारामतीकर यांनी जमात-ए-कंपूची स्थापना भांडुप, मुंबई येथे केली. ही संस्था तळागाळातील टवाळखोर मिपाकरांना एकत्र आणण्याचे काम करते. हिची कोणतीही उपसंस्था नाही. टवाळखोरपणाचे एकमेव तत्व मिपाकरांपुढे ठासून मांडण्याचे काम या संस्थेमार्फत केले जाते. सुमारे २००८ पर्यंत भारतीय टवाळखोर मिपाकरांना एकत्र करण्याचे काम या संस्थेने केले. नंतर या संस्थेचा उत्कर्ष सुरू झाला आणि ही संस्था जगभरातील टवाळखोर मिपाकरांची एक प्रमुख संस्था बनली आहे. इंडोनेशियात या संस्थेने मागे एक भला मोठा बाजार उठवल्यापासून ती सर्व टवाळखोर बांधवांच्या आदरास पात्र झाली आहे. अमेरिकेतील टवाळखोर मिपाकर जमातीला एकत्र करण्याचे पवित्र कार्य श्री डांबिसमहाराज पिवळे यांच्या प्रेरणेने जोरात चालले आहे. जमात-ए-कंपूचे कार्यकर्ते गुप्त आयडीखाली राहतात. ते कधीही स्वतःच्या जन्मजात नांवाने लिहीत नाहीत. त्यांचा मुक्काम सदैव मिपावरच असतो. ते टवाळखोरीला उत्तेजन देतात. संस्थेतर्फे दर वर्षी मेळावा म्हणजेच मिपाकट्टा आयोजित केला जातो. याला मोठा प्रतिसाद लाभतो. पुण्यातला कट्टा सहाजिकच सर्वात मोठा असतो!!!! या संस्थेची सर्व कामे इंटरनेटवरच होतात. पण गुप्त निरोपांचे सर्व व्यवहार मात्र फोनवरून किंवा इतर संकेतस्थळे वापरूनच पूर्ण केले जातात. त्यामुळे या संस्थेची माहिती संचालक मंडळाला फारशी होत नाही. जमात-ए-कंपू कोणत्याही संपादकाशी एकनिष्ठ नाही त्यामुळे ही संस्था सदैव वादात असते!!!! काही नवे मिपाकर लोक या संस्थेवर दहशतवादी असल्याचे आरोप करतात. तसेच या संस्थेतून कार्यकर्ते मिळवून मग त्यांचे दहशतवादी बनवले गेले असल्याची शक्यताही नोंदवली जाते. पण या संस्थेचा मिपाकर सभासदाच्या वस्त्रहरणाशी कोणताही संबंध नाही. ही संस्था फक्त भिकार लेखनाचे वस्त्रहरण करते.... आमेन!!!! :)
वर्गीकरण
लेखनविषय (Tags)
धर्म
इतिहास
समाज
लेखनप्रकार (Writing Type)
विरंगुळा

प्रतिक्रिया द्या
22890 वाचन

💬 प्रतिसाद (131)

प्रतिक्रिया

हरकत नाही ...

छोटा डॉन
Tue, 06/28/2011 - 13:06 नवीन
बिलकुल हरकत नाही. मात्र यमक पाहुन आम्हाला ती कविता असल्याचा संशय आला, किंबहुना ती काहीशी समजुही लागली, अहो असा कविता समण्याचा हा आयुष्यातला पहिलाच प्रसंग, म्हणुन आम्ही किंचित चौकशी केली. बाकी इतर किन्तु नसावा, प्रतिसाद छान असल्याचे आम्ही आधीच नमुद केले आहे. धन्यवाद :) - छोटा डॉन
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: वाहीदा

एखाद्याची दिलकी भाषा कन्नड

शिल्पा ब
Tue, 06/28/2011 - 21:15 नवीन
एखाद्याची दिलकी भाषा कन्नड असेल अन दुसर्या कुणाची फ्रेंच असेल अन ज्याने त्याने त्याच्या दिल्क्याच भाषेत लिहिले तर मग काय उरले? सहज एक विचार मनात आला, तुमची पोश्ट वाचुन म्हणुन टंकले इतकेच. बाकी कविता आम्हालाही थोडी समजली. असे क्वचित होते म्हणा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: छोटा डॉन

सहमत ...

छोटा डॉन
Tue, 06/28/2011 - 21:24 नवीन
एखाद्याची दिलकी भाषा कन्नड असेल अन दुसर्या कुणाची फ्रेंच असेल अन ज्याने त्याने त्याच्या दिल्क्याच भाषेत लिहिले तर मग काय उरले?
अगदी सहमत आहे बघा . असेही क्वचितच होते म्हणा. - छोटा डॉन
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शिल्पा ब

अपरिहार्य

श्रावण मोडक
Tue, 06/28/2011 - 22:13 नवीन
अपरिहार्यताच ही. सहमत न होऊन काय करणार तू तरी...! ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: छोटा डॉन

कंगोरा

आनंदयात्री
Tue, 06/28/2011 - 22:23 नवीन
>>अपरिहार्यताच ही. सहमत न होऊन काय करणार तू तरी...! याला अजून एक कंगोरा आहे. 'कन्नड' म्हटल्याने अपरिहार्यता आली आहे ;-) डान्याला भुले बिसरे गीत वैगेरे आठवले असणार !! - (पंकज उधास एकणार्‍या डान्याचा मित्र) आंद्या ट
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रावण मोडक

अग्गायायायायायाया......

धमाल मुलगा
Fri, 07/01/2011 - 18:27 नवीन
=)) तसं नव्हे आंद्याशेठ, डानराव आसेतूसिंधूहिमाचलप्रेमी आहेत. 'कन्नड'ची काय मोठी बात, तुम्ही 'बंगाली' म्हणाला असता तरी अशीच कळ उठली असती की. ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आनंदयात्री

मराठी

श्रावण मोडक
Fri, 07/01/2011 - 19:47 नवीन
मराठीच्या किती कळा उठल्या असतील याच्या विचारात पडलो आहे. ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: धमाल मुलगा

कळा कसल्या..

धमाल मुलगा
Fri, 07/01/2011 - 19:53 नवीन
चाफेकळ्या म्हणा. ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रावण मोडक

किंवा

आनंदयात्री
Fri, 07/01/2011 - 20:01 नवीन
किंवा कळा येउन कळवळला म्हणा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: धमाल मुलगा

बास रे!

धमाल मुलगा
Fri, 07/01/2011 - 20:35 नवीन
आमच्या कानडाऊ विठ्ठलुची किती म्हणून चेष्टा कराल ते. ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आनंदयात्री

मराठी माणुस

आनंदयात्री
Fri, 07/01/2011 - 20:54 नवीन
मराठी माणुस एकवेळ मित्र गमावेल पण मित्राची चेष्टा करायची संधी गमावणार नाही. - आंद्यासाहेब कालेलकर
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: धमाल मुलगा

प्रतिसाद लिहिताना १०% हून

परिकथेतील राजकुमार
Tue, 06/28/2011 - 13:24 नवीन
प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक उर्दू अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक उर्दू अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक उर्दू अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक उर्दू अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक उर्दू अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक उर्दू अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक उर्दू अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक उर्दू अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक उर्दू अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक उर्दू अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक उर्दू अक्षरे वापरू नयेत. असे काय वाचायला मिळते का काय आता असे वाटले होते. असो.. बाकी तुमचे ऑरा छेदू द्यात...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: छोटा डॉन

=))

वाहीदा
Tue, 06/28/2011 - 13:41 नवीन
माझ्या प्रतिसादात अक्षरे देवनागरी आहेत शब्द उर्दू आहेत मान्य की जास्त उर्दूच आहेत अन मराठी कमी पण ऑरा छेदू़णे म्हणजे काय रे भाऊ ? ऑरा ला मराठीत काय म्हणतात रे भाऊ ? ;-)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: परिकथेतील राजकुमार

ऑरा ला मराठीत काय म्हणतात रे

माझीही शॅम्पेन
Tue, 06/28/2011 - 15:22 नवीन
ऑरा ला मराठीत काय म्हणतात रे भाऊ ?
माझ्या माहिती प्रमाणे ऑरा म्हणजे प्रभावळ किवा तेजो-मंडळ / तेजोमय प्रकाश आता ते भेदने माहीत नाही :( लेख अफलातून ! ____/|\_____ काही प्रश्न :) १. असा एक जमात-ए-कंपू" एकच आहे की बरेचसे स्लिपर सेल चे मिळून एक कंपू झाला आहे. २. एक आय-डि दोन कम्पुत असु शकतो का ? तसे असेल तर कम्पुतील लोक डबल क्रॉसिंग कसे ओळखतात ? ३. जमात-ए-कंपू" ह्यांची खुली आणि शस्त्रे कोणती ? ( जस नुकताच अंताक्षरी-अस्त्राचा प्रयोग एका धाग्यावर पाहिला )
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: वाहीदा

माझ्या माहिती प्रमाणे ऑरा

परिकथेतील राजकुमार
Tue, 06/28/2011 - 15:26 नवीन
माझ्या माहिती प्रमाणे ऑरा म्हणजे प्रभावळ किवा तेजो-मंडळ / तेजोमय प्रकाश आता ते भेदने माहीत नाही
शाफ चुक ! ऑराला शुद्ध शब्दात 'स्वत:ची लाल करणे' असे म्हणतात.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: माझीही शॅम्पेन

ऑराला शुद्ध शब्दात 'स्वत:ची

माझीही शॅम्पेन
Tue, 06/28/2011 - 15:36 नवीन
ऑराला शुद्ध शब्दात 'स्वत:ची लाल करणे' असे म्हणतात.
:) एखादा शब्द राहिला का ? आणि राहिला असेल तर तो छेदने म्हणजे काय ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: परिकथेतील राजकुमार

भावना पोचल्या ना? झाले तर मग

परिकथेतील राजकुमार
Tue, 06/28/2011 - 15:40 नवीन
भावना पोचल्या ना? झाले तर मग ;) छेदणे काय आणि मारणे काय एकच. तुम्हाला एक फार कूट शंका बॉ ! पल्याडच्या मानसिक अस्वस्थांच्या वृद्धाश्रमाला सदिच्छा भेट वैग्रे देऊन आलायत का येवढ्यात ? ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: माझीही शॅम्पेन

कूट शंका ... सध्या अतुल

माझीही शॅम्पेन
Tue, 06/28/2011 - 15:49 नवीन
कूट शंका ... :) सध्या अतुल कुलकर्णी यांचा हाय-टेन्शन हा क्रूरकर्म आपल कार्यक्रम फॉलो करतोय . .
पल्याडच्या मानसिक अस्वस्थांच्या वृद्धाश्रमाला सदिच्छा भेट वैग्रे देऊन आलायत का येवढ्यात ?
नाय बुवा तेवढा कोणाला वेळ आहे ! गेला आसाशील तर तुझा मॉल्यवन अनुभव टाक की.. :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: परिकथेतील राजकुमार

नाय बुवा तेवढा कोणाला वेळ आहे

परिकथेतील राजकुमार
Tue, 06/28/2011 - 15:55 नवीन
नाय बुवा तेवढा कोणाला वेळ आहे ! गेला आसाशील तर तुझा मॉल्यवन अनुभव टाक की..
तिकडे लिहिलेले तिकडे कोणी वाचत नाही. तर इकडे कोण वाचणारे ? Image removed. Image removed.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: माझीही शॅम्पेन

माहीती साठी धन्यवाद शॅम्पेन !

वाहीदा
Tue, 06/28/2011 - 17:50 नवीन
माझ्या माहिती प्रमाणे ऑरा म्हणजे प्रभावळ किवा तेजो-मंडळ / तेजोमय प्रकाश आता ते भेदने माहीत नाही माहीती साठी धन्यवाद मला वाटते, महावीर अन गौतम बुध्दाच्या प्रतिमेत हे तेजोवलय दिसून येते. I suppose AURA means a ring of positive energy around Spiritual personalities Gautam Buddha, Mahavir had Aura of Positive energy shows in their pictures. तेजोवलय छेदणे हे वाक्य अयोग्य वाटते असो इथे मिपावर काहीवेळा निगेटिव्ह एनर्जीच जास्त वावरतात. :-(
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: माझीही शॅम्पेन

किती वेळा सांगायचे ?

परिकथेतील राजकुमार
Tue, 06/28/2011 - 17:51 नवीन
प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: वाहीदा

कुल !

वाहीदा
Tue, 06/28/2011 - 18:03 नवीन
एवढे agitate अन annoy व्हायला काय झाले ? मला ज्यात सोईस्कर वाटेल त्यातच मी लिहणार ना भाऊ वाचायला त्रास होत आहे की आणखिन काही कारण असावे ?? राग राग का करतोस रे बाबा ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: परिकथेतील राजकुमार

हेच आम्ही सांगितले असते तर

शिल्पा ब
Tue, 06/28/2011 - 21:19 नवीन
हेच आम्ही सांगितले असते तर थयथयाट केला असता असे अनुभवावरून वाटले.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: वाहीदा

जल.. जल.. जल.. बेबो

वाहीदा
Wed, 06/29/2011 - 11:20 नवीन
जल.. जल.. जल.. बेबो हा शेवटचा प्रतिसाद
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शिल्पा ब

आम्हाला लग्गेच खरे

शिल्पा ब
Wed, 06/29/2011 - 11:25 नवीन
आम्हाला लग्गेच खरे ठरवल्याबद्दल धन्यवाद. जल जल म्हणजे पाणी का मला पराबद्दल जळजळ वाटते अशी तुमची विनोदी समजूत झाली हे काही समजले नाही. बाकी प्रत्येक वेळेस "हा शेवटचा प्रतिसाद" म्हणून पुढचा प्रतिसाद देताच तर उगाच असं कशाला लिहायचं तेसुद्धा काही समजलं नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: वाहीदा

वाहिदाजी सलाम---ही मुळ गझल---

अत्रुप्त आत्मा
Tue, 06/28/2011 - 15:04 नवीन
जगजित सिंग यांनी गायलेली आहे,अर्थात ही नज्म या प्रकारात मोडते.माझी अतिशय लाडकी गझल आहे ही,आपण केलेलं विडंबन उत्तम आहे...आपको हमारा सलाम.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: वाहीदा

दर्जेदार काव्य. आवडले.

इंटरनेटस्नेही
Fri, 07/01/2011 - 19:12 नवीन
दर्जेदार काव्य. आवडले. :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: वाहीदा

दर्जेदार काव्य. आवडले.

इंटरनेटस्नेही
Fri, 07/01/2011 - 19:12 नवीन
दर्जेदार काव्य. आवडले. :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: वाहीदा

च्या मारी....

प्रास
Tue, 06/28/2011 - 13:38 नवीन
हे तर भारीच आहे की...... मुंबईमधल्या कंपू कार्यालयास भेट देण्याचा मनसुबा धरणारा - प्रास. अरे, कुणी जमात-ए-कंपू कार्यालयाचा मुंबईतला पत्ता देतं का रे पत्ता? भांडुपचाही चालेल ;-)
  • Log in or register to post comments

अंमळ उशीर ..

धमाल मुलगा
Fri, 07/01/2011 - 18:25 नवीन
उशीरच केला की हो.. भांडूपातल्या कार्यालयाला कधीच टाळं लागलं. त्या भिंद्रनवालेला गजाआड केला की हो. आता ते केंद्र अंमळ नव्या मुंबईकडं सरकलंय अशी खबर आहे. :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रास

आवडले !

अजातशत्रु
Tue, 06/28/2011 - 14:26 नवीन
काहींनी आवर्जुन प्रतिक्रिया दिल्या आहेत, मि तरी आजच पाहीलेय त्यांना कंपूच्या आतले आणि बाहेरचे दोन्ही कडून मनसोक्त दाद मिळाली, (कोणत्याही कंपुत नसलेला)
  • Log in or register to post comments

(No subject)

बिपिन कार्यकर्ते
Tue, 06/28/2011 - 14:41 नवीन
Image removed.
  • Log in or register to post comments

जबरदस्त!

साती
Tue, 06/28/2011 - 14:53 नवीन
जबरदस्त! हे थत्तेचाचांपेक्षा लई भारी झालंय. तात्यांची गादी का गेली याची बखर मिळाल्यास कृपया संदर्भ देणे. :)
  • Log in or register to post comments

बाब्बो...

श्रावण मोडक
Tue, 06/28/2011 - 19:55 नवीन
तात्यांची गादी का गेली याची बखर मिळाल्यास कृपया संदर्भ देणे.
अगा बाब्बो... :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: साती

:)

स्वाती दिनेश
Tue, 06/28/2011 - 16:12 नवीन
मस्त! स्वाती
  • Log in or register to post comments

झक्कास

सविता००१
Tue, 06/28/2011 - 16:38 नवीन
खूप मस्त
  • Log in or register to post comments

आता कळलं

तिमा
Tue, 06/28/2011 - 17:58 नवीन
तुम्ही पि.डा. नांव का घेतले आहे ते. मजेशीर लिखाण. पण खरे प्रतिसाद वाचायला मिळाले नाहीत. नुसतं मेलो, खपलो यापलिकडचेही प्रतिसाद वाचायला आवडले असते.
  • Log in or register to post comments

हा धागा तुंम्ही टवाळखोरीचा

राजेश घासकडवी
Tue, 06/28/2011 - 20:13 नवीन
हा धागा तुंम्ही टवाळखोरीचा किंवा कंपूबाजीच अर्थ लावण्यासाठी उघडलेला नाही....अस तुमच म्हणण आहे,तर मग मी तुमच्याशी चर्चा थांबवतो...फक्त मिपाटवाळांमध्ये मधे एकिचं बळ आहे, हा युक्तिवाद तुंम्ही गांभीर्यानी तपासावा,अशी इच्छा मी या निमित्तानी व्यक्त करतो...मिपाटवाळांमधे अनेक कंपू पडलेले आहेत.आणी ते ऐतिहासिक काळापासुन एकमेकाला भडक भगवे, विचारजंती, संघिष्ट, हिरवे, कॉंग्रेसवाले आणि सर्वात वाईट म्हणजे संपादक म्हणुन झिडकारतात,भांडतात.जर तत्व खरी/प्रामाणिक असती तर असं झालं नसतं,हे तरी तुम्हाला पटावं,अशी आमची एक आपली इच्छा...(असं होईल अशी भविष्यवाणी जालिंदरगुरुजींनी पण वर्तवली होती)या अंतर्गत विषमतेची कारणं तुंम्ही तपासा...तुमच्या म्हणण्या प्रमाणे आंम्ही सर्व बिगर कंपूवाले, नवखे आयडी असंघटित/विभक्त आहोत,हे खर आहे.पण आज मिपावर सुद्धा (आणी एकंदरीत आंजावर) जेवढे लोक टवाळांमधे आले.त्यांच्यात आपापसात मतभेद नाही विषमता आहे.कारण ज्या तत्वांवरुन तुंम्ही ऐक्य करायला जाता,ती तत्वच विषमतावादी आहेत... लोक त्या तत्वांमुळे एक होत नाहित,तर भय/इहलौकिक फायदे हे नजरेसमोर ठेउन एक होतात...त्यामुळे हेतुची पुर्तता झाली,की आपापसात झगडे सुरु होतात...मिपावरील इतिहासात बहुतेक सर्व टवाळ कंपू नेहमी एकमेकांना संपवण्या साठी भांडणं करत आले,हे तर खर आहेच...त्याची दखल घ्या...आणी नीलकांत मिपाटवाळांना एकत्र आणु शकले नाहित हा काही त्यांचा दोष नव्हे...कुठल्याही सुधारकाला समाज स्वतःच्या आडमुठ्या /कर्मठ प्रव्रुत्तीमुळे दुर ढकलत असतो...हे त्या सुधारकाच अपयश नसुन त्या समाजाच दुर्दैव असत,हे तर उघड आहे...असो... आपण हे सर्व समजुन उमजुन घ्याल अशी,पुन्हा एकवार मी भाबडी आशा व्यक्त करुन ही चर्चा माझ्याकडुन थांबवतो... काव्यकीडा-लेखसेन...भरभर लिहितो मी कवनी आम्ही ''जन्मानी'' मिपाकर नसुन,मिपावर ''आमचा'' जन्म झालेला आहे....
  • Log in or register to post comments

आवरा...

श्रावण मोडक
Tue, 06/28/2011 - 20:22 नवीन
च्यायला, आवरा राव... हसून हसून कोलमडायची वेळ आली. ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: राजेश घासकडवी

या प्रतिसादास सडके म्हणावे

३_१४ विक्षिप्त अदिती
Tue, 06/28/2011 - 20:37 नवीन
या प्रतिसादास सडके म्हणावे काय?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: राजेश घासकडवी

एकवचनी

श्रावण मोडक
Tue, 06/28/2011 - 23:57 नवीन
एकच प्रतिसाद आहे. एकवचनी - सडका!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ३_१४ विक्षिप्त अदिती

वा, वा ,वा क्या बात है. घास-कडवी

अत्रुप्त आत्मा
Tue, 06/28/2011 - 23:48 नवीन
विडंबन ठिकठाक केलत,पण तुंम्हाला विषयाचा अभ्यास असता तर ते फक्त भाषिक पातळीवरच राहिलं नसतं...अर्थात गंभीर विषयांचं विडंबन होऊ नये अश्या काही मताचा मी माणुस नाही...फक्त ते आशय गर्भ झालं असतं तर अजुन मजा आली असती... बाकी मी भरभर कवनी लिहिणारा आहे अस तुंम्ही व्यक्त केलच आहे,फक्त तुमच्या सारखी भगवी कफनी माझ्याकडे नाहीये...(बराबर वळीकलं का नाय मी?) ... ...लाजेश खास-आडवी.......मग कुठेही असोत ते ओटी किंवा पडवी...ह्ही ह्ही ह्ही....
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: राजेश घासकडवी

ते काय बरं असतं?

राजेश घासकडवी
Wed, 06/29/2011 - 02:33 नवीन
हे आशयगर्भ वगैरे काय असतं, आपल्याला काय माहीत नाही ब्वॉ... आणि ते भगवी कफनीचं तर स्स्सूप्पकन् बाउन्सर गेलं. पण एक सांगावंसं वाटतं, फार टेन्शन घेऊ नका. अहो गमतीत चाललंय. मीही तसा तुमच्यासारखाच नवखा आहे इथे. आपल्यासारख्या नवख्यांनी एकमेकांशी भांडलं तर या कंपूबाजांसमोर आपला काय पाड लागणार? तेव्हा चिल.. आणि नावाच्या विडंबनाच्या बाबतीत काय बोलू? माझ्या नावाची प्रोफेशनल सही विडंबकाकडून शेकड्याने विडंबनं झालेली आहेत... त्यामुळे आल इज बेल. परा ग
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अत्रुप्त आत्मा

ओके ओके

अत्रुप्त आत्मा
Wed, 06/29/2011 - 02:40 नवीन
ऑल इज वेल...हम भी मजाक मजाक मे मजाक कर बैठे....चलने दो...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: राजेश घासकडवी

तुमचं नवखेपण गेलं नाही का

शिल्पा ब
Wed, 06/29/2011 - 03:04 नवीन
तुमचं नवखेपण गेलं नाही का अजुनही. नव्या नवरीला सुद्धा आठवड्याच्या आत घरात कामाला सुरुवात करावी लागते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: राजेश घासकडवी

आता काय बोलू...

राजेश घासकडवी
Wed, 06/29/2011 - 03:20 नवीन
अहो शिल्पावैनी, नीलकांतजींनी काय म्हटलं होतं? बहुतेक लोक मिपावर सदस्यत्व घेतल्यावर साताठ महिने घाबरत घाबरत वावरतात, वाचनच जास्त लेखन कमी असं करतात. त्यामुळे एक वर्षाच्या आसपास सदस्यत्व असलेले सगळे नवखेच. चांगली तीनेक वर्षं निर्ढावल्यावर तुम्ही जुने होता. तुमचा आयडी नंबर चार आकडी आहे ना? म्हणजे तुम्हीसुद्धा नवख्याच. हे तीन आकडी आणि दोन आकडी लोक खरे जुने, मुरब्बी, कंपूबाज... आता तुम्हाला हौसच असेल घरकाम करण्याची तर काय बोलू... म्हणवा स्वतःला जुन्या.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शिल्पा ब

बरं मग येत्या वर्षात तुम्ही

३_१४ विक्षिप्त अदिती
Wed, 06/29/2011 - 03:50 नवीन
बरं मग येत्या वर्षात तुम्ही पथ्यं सांभाळून घरकाम सुरू करणार का?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: राजेश घासकडवी

कंपूबाहेरच्या एखादा धागा जरा

परिकथेतील राजकुमार
Wed, 06/29/2011 - 12:16 नवीन
कंपूबाहेरच्या एखादा धागा जरा पब्लिकनी उचलुन धरला की हे घासुगुर्जी आणि राडीयाबै लगेच येउन तो धागा हायजॅक करतात. ते नाही जमले तर धाग्याची खरडवही करतात. ह्या जुन्या सदस्यांना ताकिद मिळणे गरजेचे आहे. घंटानाद..सध्या मुक्काम परभणी
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ३_१४ विक्षिप्त अदिती

>>>>घंटानाद..सध्या मुक्काम

प्यारे१
Wed, 06/29/2011 - 13:01 नवीन
>>>>घंटानाद..सध्या मुक्काम परभणी फु ट लो.... :) ए घंटा, आख्यान बंद केलं का? का तिथेपण घंटाच?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: परिकथेतील राजकुमार

हा हा ! वा गुरु !!

शाहरुख
Tue, 06/28/2011 - 20:29 नवीन
हा हा ! वा गुरु !!
  • Log in or register to post comments
  • «
  • ‹
  • 1
  • 2
  • 3
  • ›
  • »

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा