आंतरराष्ट्रीय

रिओ पॅरालिम्पिकमधे भारताला ४ पदकं......अभिनंदन

_मनश्री_'s picture
_मनश्री_ in क्रिडा जगत
10 Sep 2016 - 10:08 pm

रिओ पॅरालिम्पिक मधे उंच उडीमध्ये १.८९ मीटर उडी मारून सुवर्णपदक जिंकणाऱ्या मरियप्पन थांगावेलू आणि याच प्रकारात 1.86 मीटर उडी मारून ब्राँझ पदक मिळवणारा वरुण भाटी या दोघांचे मनःपूर्वक अभिनंदन ......
रिओ पॅरालिंपिकमध्ये या दोघांनी भारताचे पदकांचे खाते उघडले आहे

1

क्रिडाजगतातील कुंभमेळा... रिओ ऑलिंपिक..आणि घडामोडी ..

shawshanky's picture
shawshanky in क्रिडा जगत
5 Aug 2016 - 4:23 pm

आजपासून रिओ ऑलिम्पिक २०१६ ची दमदार सुरूवात होणार असून क्रीडा ज्योत महान फुटबॉलपटू पेले यांच्या हस्ते प्रज्वलित होईल अन् आकाश उजळून सोडणाऱ्या आतशबाजीने खेळाडूंच्या स्पर्धेला प्रारंभ होईल. या ऑलिम्पिक महाकुंभाची ओपनिंग सेरमनी रिओतील माराकाना स्टेडियममध्ये होणार आहे. या स्पर्धेसाठी दाखल झालेल्या भारतीय खेळाडूंकडून साऱ्यांनाच अपेक्षा आहेत.

दक्षिण आफ्रिकेची चिवट चिकटेगिरी आणि ..........!!!!

shawshanky's picture
shawshanky in क्रिडा जगत
8 Dec 2015 - 8:29 am

अत्यंत संथ फलंदाजीमुळे संपूर्ण क्रिकेटविश्‍वाचे लक्ष वेधलेल्या चौथ्या क्रिकेट कसोटी सामन्यामध्ये भारताने दक्षिण आफ्रिकेवर 337 धावांनी दणदणीत विजय मिळविला. चार सामन्यांच्या मालिकेमध्ये 3-0 विजय मिळवत भारताने कसोटी क्रमवारीमध्येही दुसऱ्या क्रमांकावर झेप घेतली. सलग पाच सत्रे खेळून काढण्याचे आव्हान पेलण्याचा दक्षिण आफ्रिकेने पुरेपूर प्रयत्न केला. मात्र, तळातील फलंदाज आवश्‍यक असलेला चिवट प्रतिकार करू शकले नाहीत आणि सामन्याच्या अखेरच्या दिवशी शेवटच्या सत्रामध्ये दक्षिण आफ्रिकेचा डाव 143 धावांत गुंडाळला गेला.

सायकल समुह

निनाद's picture
निनाद in क्रिडा जगत
1 Dec 2015 - 4:46 am

व्हॉट्सअ‍ॅपवर सायकल समुह करण्याचे योजले आहे.

या समुहामुळे,

  • सायकलप्रेमी एकत्र आणणे,
  • सायकल संदर्भात एकमेकांना मदत करणे
  • दुरुस्तीबद्दल मदत करणे
  • आणि प्रोत्साहन देणे

असे सर्वसाधारण प्राथमिक उद्देश आहे.
तसेच सायकल विषयक स्पर्धा किंवा भेटी वगैरेही यात अंतर्भूत असू शकेल.

तुमच्या सुचवण्यांचे स्वागत आहे.
समुहात सामील होण्यासाठी आपले मोबाईल क्रमांक कृपया व्यनि ने पाठवावेत.

हा समुह फक्त सायकल या विषायसाठीच मर्यादित असेल याची नोंद घ्यावी.

आपला
(सायकलवाला)
निनाद

ओन लाईन गेम

मम्बाजी सर्वज्ञ's picture
मम्बाजी सर्वज्ञ in क्रिडा जगत
27 Oct 2015 - 7:26 pm

कुणी ओन लाईन गेम खेळता का? तुम्ही खेळत असलेल्या खेळांची नावे आणि कोणत्या साईट/प्लाटफोर्म वर खेळता ते सांगणार का?
मी xbox 360 वर modern warfare 3 खेळतो आणि chess.com वर बुद्धिबळ खेळतो. MW3 साठी क्लान मेम्बर्स शोधतोय, कुणाला इंटरेस्ट असेल तर व्य नि करा.