राजच्या आडून....

भोचक's picture
भोचक in काथ्याकूट
30 Oct 2009 - 10:42 am
गाभा: 

मागे मी माझ्या 'राज ठाकरे आणि प्रसारमाध्यमे' या लेखात हिंदी भाषक प्रदेशातील माध्यमे आणि लोक राजच्या आंदोलनाकडे आणि तद्अनुषांगिक उद्भवलेल्या प्रश्नांकडे कसे पहातात हे लिहिले होते. आता झी न्यूजचा प्रमुख अँकर पुण्यप्रसून वाजपेयी नई दुनियात प्रसिद्ध झालेल्या या लेखात कसे तारे तोडले आहेत ते वाचा. या मंडळींनी राज ठाकरे, बाळासाहेब ठाकरे यांच्यावर राजकीय टीका जरूर करावी, त्याला काही हरकत नाही. पण त्यांच्या आडून आता मराठी माणसावरच टीका करण्याचा अश्लाघ्य प्रयत्न होतो आहे. मुळात हा लेख नीट माहिती घेऊन लिहिलेला नाही. त्यामुळे त्यात वाजपेयींच्या वैचारिक मांडणीपेक्षा बौद्धिक दिवाळखोरीच जास्त दिसून येते.

प्रतिक्रिया

अविनाशकुलकर्णी's picture

30 Oct 2009 - 10:55 am | अविनाशकुलकर्णी

वाजपेयी ने फिर जहर उगला

घाशीराम कोतवाल १.२'s picture

30 Oct 2009 - 11:32 am | घाशीराम कोतवाल १.२

काय भोचकराव अहो कोण कुठला पुण्यप्रसून वाजपेयी त्याने तोडलेले अकलेचे तारे काय घेउन बसलात तुम्ही अहो आपल्या मिपापेक्षा तरी नई दुनिया जास्त वाचली जात नसेल अहो त्या पेक्षा आपल मिपा सरस आहे राव फाट्यावर मारा त्या भडव्या पुण्यप्रसून वाजपेयीला गेला उडत तो

**************************************************************
"मराठी संकेतस्थळ चालावे ही तो तमाम मराठी वाचकांची इच्छा"
सौजन्य अदिती

llपुण्याचे पेशवेll's picture

30 Oct 2009 - 12:48 pm | llपुण्याचे पेशवेll

हे लिहीणारा भैय्या शिव्या द्यायच्याही लायकीचा नाही आहे.
पुण्याचे पेशवे
आम्ही हल्ली सहीत वाक्यं लिहिणं बंद केले आहे.
Since 1984

टारझन's picture

30 Oct 2009 - 1:13 pm | टारझन

मजा घ्या नं लेको .. कह्याला त्रागा करून घ्यायचा ?

- टोचक

गणपा's picture

30 Oct 2009 - 1:27 pm | गणपा

आयुष्यात फार कमी क्षण विरंगुळ्याचे मिळतात, तेव्हा असे विनोद हातचे सोडुनका. वाचा हसा(वाटल्यास कीव करा) आणि द्या सोडुन.

पाषाणभेद's picture

30 Oct 2009 - 2:12 pm | पाषाणभेद

भोचकसाहेब, वेबदुनिया तुमची आहे ना? (म्हणजे तुम्ही तेथे वारंवार असता ना?)
मग तुम्ही त्या प्रसन्याला सत्य परिस्थिती सांगा ना.

राज ठाकरेंनी जे जे मुद्दे मांडले आहेत ते ते मुद्दे ईतर राज्यांतले लोक आधीच पाळत आहेत.

उदा. आसामात बिहारी मजूर येवू देत नाहीत, साऊथ ईंडीयात भैये लोक कमी आहेत, प्रत्यक्षात दिल्ली व युपीतही बिहारी लोकांना कमी लेखले जाते, आस्ट्रेलीयात भारतीय लोकांवर हल्ले होत आहेत व सरकार बघते आहेत, मला वाटते ब्रिटनमध्येही असलेच काहीतरी आहे.

वरील सगळे उदाहरणे काय आहेत? एक समुदाय दुसर्‍या समूदायाला काही प्रमाणात सामावून घेवू शकतो पण जास्त प्रमाणात नाही. कोठेतरी ठिणगी पडतेच. राज ठाकरे प्रवृत्ती ही एक ठिणगीच आहे. त्याची आग होइल व त्यात तिला न मानणारे जळतीलच.

असो. आपल्याला राज ठाकरेचे मत मान्य आहे (समर्थन नाही.) तर तुम्ही त्या प्रसन्याला फोडा तेथे.

--------------------
पासानभेद
(महारास्ट्र मैं नौकरी जाने के लिये हमे कन्टॅक करें |)

दिलीप वसंत सामंत's picture

30 Oct 2009 - 8:15 pm | दिलीप वसंत सामंत

हे दुर्लक्षिण्यासारखे नक्कीच नाही. आपली माणसे, भाषा, संस्कृती, आर्थिक व सामाजिक प्रश्न यावर कधीही एक न होणे हाच आपला मूळ स्वभाव. असे प्रश्न सगळ्यांचेच असतात पण वेळ आल्यास इतर प्रांतीय नेहमी एक होतात. हेच पहा ना संयुक्त महाराष्ट्रासाठी झगडलेल्यांना, लाठ्या काठ्या खाल्लेल्याना, काँग्रेसच्या पोलिसांचे अनन्वित अत्याचार सहन करून, १०५ हुतात्म्यांचे बलिदान देऊन मुंबईसह संयुक्त महाराष्ट्र मिळविणार्‍यांना बाजूला सारून मराठी लोकांनी त्या महाराष्ट्राला कडाडून विरोध करणार्‍या, यावच्चंद्र दिवाकरौ मुंबई सह महाराष्ट्र होऊ देणार नाही असे सांगणर्‍या काँग्रेसलाच सत्ता दिली. हा संदर्भ आताच्या निवडणुकीचा नसून संयुक्त महाराष्ट्राच्या आंदोलनाच्या वेळेचा आहे. त्यावेळेस आताप्रमाणे परप्रांतीय मोठ्याप्रमाणात (निदान निवडणुकीवर परिणाम घडवून आणण्याइतके) येथे नव्हते. मराठी लोकांनीच तेव्हा काँग्रेसला निवडून दिले. आपण फक्त आपसात भांडून संपणार. पक्षातून नेते स्वार्थासाठीच बाहेर पडतात. एक पक्की विचारसरणी नसल्यामुळे पूर्ण विरुद्ध बाजूच्या पक्षात जातात.
राजने निदान शिवसेना मूळ विचारापासून दूर जात असल्याचे सांगून पक्ष सोडला व स्वतंत्र पक्ष काढला.(सध्यातरी). पण बाकीचे ?

आशिष सुर्वे's picture

30 Oct 2009 - 5:54 pm | आशिष सुर्वे

हा लेख एक विनोद म्हणून दुर्लक्षित न करता, त्याचा निषेध केला पाहिजे.
घराला वाळवी लागली तर तिचा बंदोबस्त वेळीच करायला हवा नाही का??
-
कोकणी फणस

विसोबा खेचर's picture

30 Oct 2009 - 6:04 pm | विसोबा खेचर

साले भिकारचोट लोक आहेत!

दशानन's picture

30 Oct 2009 - 6:09 pm | दशानन

कुत्र्यांची पिलावळ... भुंकत आहे .... चालायचेच... !

हत्ती कधी कुत्रीं भुंकत आहेत म्हणून मागे तरी वळून बघतो का ? नाही ना.. चालू दे !

जय महाराष्ट्र !

*****

मराठी माणसावर मराठी माणसाकडूनच महाजालावर जोपर्यंत अन्याय होत आहे तो पर्यंत मी चचणार नाही