मनसेचे भवितव्य

अक्षय पुर्णपात्रे's picture
अक्षय पुर्णपात्रे in काथ्याकूट
25 Oct 2009 - 9:49 pm
गाभा: 

विधानसभेच्या निवडणु्कीचे निकाल प्रसिद्ध झाल्यानंतर मतदारांनी दिलेला कौल स्थैर्याच्या दिशेने आहे असे काही विश्लेषक म्हणतात तर काही विश्लेषक विरोधकांकडे नसलेल्या पर्यायी कार्यक्रमाला दोष देतात. मात्र मनसेचा प्रभाव वाढला असल्याविषयी दुमत आढळत नाही. मनसेला मिळालेल्या जागा मुख्यतः (खडकवासला आणि कन्नडचा अपवाद सोडल्यास) मुंबईत आणि नाशिकमध्ये आहेत. या शहरांमध्ये आणि काही प्रमाणात पुण्यात मनसेने मांडलेले मुद्दे लोकांना पटत आहेत असे आढळते. पण मनसे हा एक समर्थ पादेशिक पक्ष म्हणून भविष्यात उभा राहू शकेल असे आपल्याला वाटते का? ग्रामीण महाराष्ट्रात मनसेला पाय रोवता येतील का? आणी शेवटचे म्हणजे मनसेच्या व्यक्तिकेंद्रीत नेतृत्त्वामुळे पक्षास अडथळा येऊ शकेल काय?

डिसक्लेमरः ही चर्चा उद्धव विरुद्ध राज किंवा घराणेशाही याविषयी नाही. शिवसेना वि मनसे असे या चर्चेचे स्वरूप नाही.

प्रतिक्रिया

एकलव्य's picture

25 Oct 2009 - 10:17 pm | एकलव्य

हा एक दुवा पाहा -- थोडे वेगळे विश्लेषण आहे. (आपल्याला वेगळे काहीसे आणि मनसेच्या भविष्याविषयी हवे म्हणालात त्यास हे लिखाण पूरक आहे असे वाटल्याने दिले आहे)

http://www.dailypioneer.com/211028/In-politics-it-is-the-future-that-mat...

Shiv Sena’s two dimensions . (His nephew Raj Thackeray walked into vacant space)
(१) In rural Maharashtra it is the regional, Marathi-centric alternative to the Congress, playing the democratic game with a slant but within the framework of conventional politics. Its urban manifestation is different. (२) In Mumbai, particularly, and in Pune, to a lesser degree, the Shiv Sena’s success has been through the sharp articulation of grievance and local pride, through a sensational rhetoric and, when required, violent agitation.

Mr Raj Thackeray picked up 23.35 per cent of the vote in Mumbai. Translate that figure into ground reality and it becomes more comprehensible. If roughly half the vote of Mumbai is Marathi, then the nephew took around half the Marathi votes cast. This is a huge swing, with an impact extending far beyond the 13 seats that he won.

श्री एकलव्य, दुव्याबद्दल धन्यवाद. श्री अकबर यांनी चांगले विश्लेषण केले आहे. राज ठाकरे यांनी मनसेच्या संस्थापनापुर्वी प्रदीर्घ आणि सखोल विचार करूनच मनसेच्या स्थापनेचा निर्णय घेतला. शिवसेनेच्या उतरत्या अवस्थेमुळे निर्माण होणार्‍या अंतराळास भरण्याच्या उद्देशापेक्षा त्यांचा उद्देश व्यापक असावा असे वाटते. ग्रामीण महाराष्ट्रात यापुर्वी शिवसेना फारशी यशस्वी ठरलेली नाही तसेच युतीशिवाय शिवसेना समर्थपणे उभी राहू शकली असती का याविषयी मी साशंक आहे. (याविपरीत कुणाचे मत असल्यास आणि सप्रमाण मांडल्यास मी आनंदाने माझे मत मागे घेईन.)

महाराष्ट्रात प्रादेशिक पक्ष निर्माण होण्याच्या दृष्टीकोनातून मनसे कितपत यशस्वी होईल याविषयी जाणून घेण्यास उत्सुक आहे.

llपुण्याचे पेशवेll's picture

26 Oct 2009 - 8:52 am | llपुण्याचे पेशवेll

चांगला लेख. पण अजून एक "If roughly half the vote of Mumbai is Marathi, then the nephew took around half the Marathi votes cast. This is a huge swing, with an impact extending far beyond the 13 seats that he wo".

यातले मुंबईतले अर्धे मतदार मराठी आहेत असे म्हटले आहे. कदाचित नोंदणीकृत मतदार मराठी असतीलही पण मला एक असा प्रश्न पडला आहे की मुंबईमधे मराठी लोक आहेत तरी किती(शिल्लक). कारण माझ्या परीचयातले बहुतेक मुंबईकर मराठी लोक मुंबईतल्या जागा विकून पुण्यात अथवा मुंबई उपनगरात जाऊन राहीले आहेत.
त्यामुळे मुंबईतला मराठी टक्का पुष्कळ घसरला आहे. यावर काही ठोस माहीती कोण देऊ शकेल का?

पुण्याचे पेशवे
आम्ही हल्ली सहीत वाक्यं लिहिणं बंद केले आहे.
Since 1984

सुनील's picture

26 Oct 2009 - 10:34 am | सुनील

मुंबईमधे मराठी लोक आहेत तरी किती(शिल्लक)
४० टक्क्यांपेक्षा कमी निश्चित नाहीत. आणि जर मुंबईच्या आसपासचा परिसर जमेस घेतला तर ५० टक्क्यांपेक्षा जास्त नक्कीच. बाकी राजकारणी मंडळी काहीही म्हणोत.

Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.

llपुण्याचे पेशवेll's picture

26 Oct 2009 - 9:01 pm | llपुण्याचे पेशवेll

मुंबई उपनगरे आणि नव्या मुंबईत असतीलही पण मूळ मुंबईत असतील असं आता वाटत नाही. त्याचा ठोस विदा आहे का कोणाकडे?
पुण्याचे पेशवे
आम्ही हल्ली सहीत वाक्यं लिहिणं बंद केले आहे.
Since 1984

अक्षय पुर्णपात्रे's picture

26 Oct 2009 - 9:13 pm | अक्षय पुर्णपात्रे

The linguistic/ethnic demographics are: Maharashtrians (42%), Gujaratis (19%), North Indians (24%) and South Indians making up the rest. (विकि दुवा)

भोचक's picture

26 Oct 2009 - 1:09 pm | भोचक

अक्षय छान चर्चाविषय. मनसे हा पक्ष सध्या मराठी हा मुद्दा घेऊन पुढे निघाला असला तरी राज यांच्या भाषणात अनेक नागरी मुद्दे येतात (निदान आत्ता तरी). अतिक्रमण, अरूंद रस्ते, कुचकामी ठरलेल्या पाणीयोजना, झोपडपट्टया वगैरे वगैरे. या मुद्यावंर प्रस्थापित पक्ष फारसे काहीच बोलत नाहीत. त्यात कॉंग्रेसने तर मुंबईत २००० पर्यंतच्या झोपड्या अधिकृत ठरवल्या आहेत. (तो त्यांचा मतदारही आहे.) त्यामुळे या सगळ्यांविषयी चीड असणारा एक वर्ग आहे. या झोप़ड्यात (निदान मुंबईत तरी) रहाणारा मराठी वर्ग कमी आहे. त्यामुळे नागरिकरणाला योग्य दिशा हवी असे म्हणणारे आणि मराठी अशा मंडळींचा पाठिंबा राजला मुंबईत मिळाला आहे. उर्वरित महाराष्ट्रात त्याने शहरांचा योग्य विकास व्हावा ही भूमिका घेऊन काम केल्यास त्याचा फायदा मर्यादीत का होईना पण नक्की मिळेल. शरद पवारांची एक मुलाखात मतदानाच्या दिवशी ऐकली. ते फार छान बोलले. महाराष्ट्र हे देशातील सर्वांत वेगाने आणि मोठ्या प्रमाणात शहरीकरण होणारे राज्य आहे. सहाजिकच या शहरांचे प्रश्न ग्रामीण भागाच्या तुलनेत निराळे आहेत. ते जाणून घेऊन त्याची सोडवणूक करण्यात राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते कमी पडतात. कारण ते नेतेही ग्रामीण भागातून आलेले आहेत, हेही पवारांनी मान्य केले आहे. राज्यात शहरी मतदारसंघांची संख्या १३० आहे. ही पुढेही वाढत जाणार. याचा अर्थ या शहरांचे प्रश्न मांडणार्‍या पक्षाला पुढे वाव आहे. कॉंग्रेस-राष्ट्रवादी यांचा आधार प्रामुख्याने (अपवाद वगळता) ग्रामीण भागात आहे. इथे मनसे महत्त्वाची भूमिका बजावू शकते.

तिकडे शिवसेनेने उद्धवने हक्काचा शहरी (आणि मराठी) मतदार सोडून ग्रामीण भागात शिवसेनेचे पाय रोवण्याचा प्रयत्न केला. पण त्यात त्यांना यश आले नाही. (याचा अर्थ त्याने शेतकरी आत्महत्येचा मुद्दा उचलला ही चुक केली असे नाही. उलट शिवसेनेला भावनिक आंदोलनांपासून 'जमिनी' प्रश्नांकडे नेण्याचा तो स्तुत्य प्रयत्नच होता. पण तो अपयशी ठरला.) विदर्भात शेतकर्‍यांसाठी मोठे आंदोलन करूनही त्यांना जेमतेम नऊ जागा मिळाल्या.

(भोचक)
हा आहे आमचा स्वभाव

[शरद पवार म्हणाले: ] 'महाराष्ट्र हे देशातील सर्वांत वेगाने आणि मोठ्या प्रमाणात शहरीकरण होणारे राज्य आहे. सहाजिकच या शहरांचे प्रश्न ग्रामीण भागाच्या तुलनेत निराळे आहेत. ते जाणून घेऊन त्याची सोडवणूक करण्यात राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते कमी पडतात. कारण ते नेतेही ग्रामीण भागातून आलेले आहेत'.

व्वा, वा!! ही उपरति व्हावयास ६० वर्षे जावी लागली? ह्या 'ग्रामीण भागातून आलेल्या' महाराष्ट्र काँग्रेसच्या सर्वच नेत्यांनी मुंबई सोन्याची अंडी देणारी कोंबडी म्हणून केवळ वापरली. त्यापलिकडे त्यांना तिच्याविषयी कधीही ममत्व नव्हते, आणि ह्यापुढेही नसेल. आणि 'महाराष्ट्र हे देशातील सर्वांत वेगाने आणि मोठ्या प्रमाणात शहरीकरण होणारे राज्य आहे' ह्याबद्दल साशंक आहे. गेल्या दशकात हैद्राबाद व बंगलोर बहुधा आपल्या सर्व शहरांपेक्षा खूपच जोमाने वाढली असावीत. काहीही झाले तरी ती आपापल्या राज्यांची शान बनून रहातील. आज मुंबईचे जे बकालीकरण झालेले आहे, त्याच्या उत्तरदायित्वातून काँग्रेसचे नेते इतक्या सहजी, थातूरमातूर सबबी देऊन सुटू शकू नयेत.

तुमचा प्रतिसाद हे सोडले तर पटला व आवडला.

चिरोटा's picture

26 Oct 2009 - 5:13 pm | चिरोटा

गेल्या दशकात हैद्राबाद व बंगलोर बहुधा आपल्या सर्व शहरांपेक्षा खूपच जोमाने वाढली असावीत. काहीही झाले तरी ती आपापल्या राज्यांची शान बनून रहातील

ह्या राज्यांचा(विशेष करुन कर्नाटकचा) सर्वांगिण विकास महाराष्ट्रापेक्षा जास्त आहे.केवळ धूर ओकणारे कारखाने आणि रस्त्यावर जास्त गाड्या म्हणजे विकास नव्हे.अजुन तरी येथील लहान मोठी शहरे,जिल्ह्याची ठिकाणे बकाल वाटत नाहीत.लोकसंख्या मर्यादित असली तर बरेच प्रश्न सुटतात.
भेंडी
क्ष्^न + य्^न = झ्^न

अक्षय पुर्णपात्रे's picture

26 Oct 2009 - 7:55 pm | अक्षय पुर्णपात्रे

श्री भोचक आणि श्री प्रदीप यांनी शहरीकरणाच्या मुद्यांकडे लक्ष वेधले आहे. महाराष्ट्रात शहरीकरण मोठ्या प्रमाणात होत असले तरीही ग्रामीण भागातील समस्या महत्त्वाच्या असून त्यांच्याकडे दुर्लक्ष करता येण्यासारखे नाही.

शरद पवार व त्यांचा पक्ष पश्चिम महाराष्ट्रात प्रबळ आहेत. स्वबळावर सत्तेत येण्यासाठी त्यांनी शहरी मतदारसंघांत पाय पसरणे आवश्यक आहे. मनसे आणि शिवसेना यांची परिस्थिती याउलट आहे. त्यांना ग्रामीण मतदारसंघांकडे लक्ष देणे आवश्यक आहे. (ग्रामीण मतदारसंघ ५०%पेक्षा जास्त आहेत.) त्या दृष्टीकोनातून श्री उद्धव ठाकरे यांनी प्रयत्न केल्याचे या निवडणुकीत दिसले. त्यांचा प्रयत्न अयशस्वी ठरला असे असले तरी भविष्यात या धोरणापासून लाभांश मिळणार नाही असे नाही.

मनसेला स्वतंत्र प्रादेशिक पक्ष बनायचे असल्यास केवळ शिवसेनेची मते फोडणे या पलिकडे जाणे आवश्यक आहे.