अजुन काय हवे ...

विवेकवि's picture
विवेकवि in जे न देखे रवी...
4 Mar 2008 - 7:59 pm

एकच चहा, तो पण कटींग...
एकच पीक्चर, तो पण टेक्स फ्री...
एकच साद, ती पण मनापासुन...
अजुन काय हवे असते आपल्या मित्रांकडून

एकच कटाक्श, तो पण हळूच...
एकच होकार, तो पण लाजून...
एकच स्पर्श, तो पण थरथरून...
अजुन काय हवे असते आपल्या प्रियेकडून

एकच भूताची गोष्ट, ती पण रंगवून...
एकच श्रीखंडाची वडी, ती पण अर्धी तोडून...
एकच जोरदार धपाटा, तो पण शिवी हासडून...
अजुन काय हवे असते आपल्या आजीकडून

एकच मायेची थाप, ती पण कुर्वाळून...
एकच गरम पोळी, ती पण तूप लावून...
एकच आशिर्वाद, तो पण डोळ्यात आसवे आणून..
अजुन काय हवे असते आपल्या आईकडून.

एकच कठोर नकार स्वईराचाराला, तो पण ह्रुदयावर दगड ठेउन...
एकच सडेतोड उपदेश, तो पण घोघर्या आवाजातून...
एकच नजर अभिमानाची, आपली प्रगती पाहून...
अजुन काय हवे असते आपल्या वडिलांकडून

सगळ्यांनी खूप दिले, ते पण न मागून...
स्वर्गच जणु मला मिळाला, तो पण न मरुन...
फाटकी ही झोळी माझी, ती पण वाहिली भरुन..
अजुन काय हवे मला माझ्या आयुष्याकडून

कवि माहित नाही.....

प्रतिक्रिया

एकच कटाक्श, तो पण हळूच...
एकच होकार, तो पण लाजून...
एकच स्पर्श, तो पण थरथरून...
अजुन काय हवे असते आपल्या प्रियेकडून

थोडी अधिक अपेक्षा असली, थोडे अधिक हवेसे असले, तरीही चालेल. (माझ्या दोन्ही आज्यांनी श्रीखंडाची वाटी अर्धी तोडली नाही, आणि शिवी देऊन धपाटा दिला नाही. पण "जे न देखे रवी" म्हणून कवीचे म्हणणे चालवून घेऊ...)

बाकी "समाधानी असावे" हा उपदेश तसा पटतो. पण इथे पाक थोडा जास्तच गोड झाला आहे. मुरंब्यात थोडे लिंबू पिळा, असे अज्ञात कवीला सांगावेसे वाटते.

सुधीर कांदळकर's picture

4 Mar 2008 - 10:02 pm | सुधीर कांदळकर

चुकला. ते फारच व्यवहारी आहेत. कविता भावनेतून येते, बुद्धीतून येते. विशिष्ट मूडची असते. त्यांच्या व्यवहारकोरड्या मनाला हे पटणार नाही. पहिला कटाक्ष, पहिला स्पर्श, आज्जीची पहिली भुताची गोष्ट, बाळाची पहिली हाक, बाळाचे पहिले पाऊल, या सर्व पहिल्या अनुभवांची सर पुन्हा कशी येणार? अशा काही खास गोष्टीबद्दल ही कविता असावी.

अनुभवाची खोली महत्वाची असते. लांबी रुंदी वा संख्या नाही. म्हणुन तर कवी वेडा असतो.

असो. कविता छान आहे. शुभेच्छा.

धनंजय's picture

4 Mar 2008 - 10:31 pm | धनंजय

नाही. या सर्व गोष्टींचे महत्त्व पटते. उलट त्यातील प्रत्येक माझ्यासाठी एकेका कवितेच्या लायकीचे भाव आहेत. माझ्या टीकेचे ते मूळ नाही. भरमसाठ यादी देऊन प्रत्येकाचा भाव कमी होतो - त्या अनुभवाच्या विशिष्ट मूडचे काय राहाते? शेवटी "अजून काय हवे" हेच अतिमिठ्ठे पालुपद माझ्या लक्षात राहाते.

माझे व्यवहारकोरडे नसल्याचा, एक-एक अनुभव आवडण्याचा नमुना येथे बघावा :
http://www.misalpav.com/node/990#comment-12708

सुवर्णमयी's picture

4 Mar 2008 - 11:46 pm | सुवर्णमयी

कविता चांगली आहे पण शेवटचे कडवेच नसते किंवा सगळ्यांनी दिले न मागून इथेच कविता थांबली असती तर मला जास्त प्रभावी वाटली असती.
श्रीखंडाची वाटी आणि धपाटा याबद्दल माझेही मत धनंजय म्हणतात तसेच आहे.
शेवटी त्याला जे जे लिहायचे त्याची कवीला मोकळीक आहेच की! (ते वाचून काय म्हणायचे याचे स्वातंत्र्य वाचकांना सुद्धा)
इथे कवी अज्ञात आहे म्हणून बचावला ! नाही तर सुरु मारामारी!
सोनाली

विसोबा खेचर's picture

5 Mar 2008 - 11:48 am | विसोबा खेचर

एकच मायेची थाप, ती पण कुर्वाळून...
एकच गरम पोळी, ती पण तूप लावून...
एकच आशिर्वाद, तो पण डोळ्यात आसवे आणून..
अजुन काय हवे असते आपल्या आईकडून.

सुरेख..!

तात्या.

शरुबाबा's picture

5 Mar 2008 - 12:20 pm | शरुबाबा

एकच कठोर नकार स्वईराचाराला, तो पण ह्रुदयावर दगड ठेउन...
एकच सडेतोड उपदेश, तो पण घोघर्या आवाजातून...
एकच नजर अभिमानाची, आपली प्रगती पाहून...
अजुन काय हवे असते आपल्या वडिलांकडून