सुगरणीचा खोपा

सुनील's picture
सुनील in कलादालन
25 Oct 2009 - 7:09 am

गेल्या महिन्यात काही मित्रांबरोबर वाईला गेलो होतो. तिथे फिरताना झाडावर टांगलेली सुगरणीची घरटी पाहिली. मित्राने त्याचे काही फोटोदेखिल काढले.

आज, मिपाच्या मुखपृष्ठावरील "खोपा" पाहून त्याची आठवण आली.

स्थळ - वाई
दिनांक - ५ सप्टेंबर २००९
आभार - (मिपाकर नसलेला) मित्र, सलील

अवांतर - तात्यांनी दिलेल्या गाण्यातील दुव्यात बहिणाबाई चौधरींचा उल्लेख संत बहिणाबाई असा आला आहे, ते चूक आहे. संत बहिणाबाई वेगळ्या आणि अहिराणी बोलीत सुंदर रचना करणार्‍या सोपानदेव चौधरींच्या मातोश्री बहिणाबाई वेगळ्या.

स्थिरचित्र

प्रतिक्रिया

विसोबा खेचर's picture

25 Oct 2009 - 8:13 am | विसोबा खेचर

सुंदर...

सलीलचे मिपातर्फे आभार..

तात्या.

सहज's picture

25 Oct 2009 - 8:31 am | सहज

निसर्गातील भुरळ घालणार्‍या अनेक मनोहारी गोष्टींपकी एक म्हणजे, लाजाळूचे झाड/झुडूप. आमचे एक आवडते झुडूप!!

मस्त कलंदर's picture

25 Oct 2009 - 10:36 am | मस्त कलंदर

लहानपणी खूप हौस होती.... सुगरणीची घरटी गोळा करण्याची.... एकदा मात्र त्या घरट्यात पिलू होतं..... त्याला ड्रॉपरने पाणी.. दूध पाजण्याचा प्रयत्न केला.. पण नाही जगलं ते!!!!! त्यानंतर पुन्हा कधी घरटं हवं म्हणून हट्ट नाही केला!!!! :(

मस्त कलंदर..
नीट आवरलेलं घर ही घरचा संगणक बंद पडल्याची खूण आहे!!!!

क्रान्ति's picture

25 Oct 2009 - 4:56 pm | क्रान्ति

सुरेख फोटो!

क्रान्ति
अग्निसखा

चतुरंग's picture

25 Oct 2009 - 10:05 pm | चतुरंग

आम्हाला दिसलेला 'खोपा' वेगळा आहे आणि शिवाय तो सुगरणीचा आहे की नाही हेही माहीत नाही! ;)

(खुद के साथ बातां : दरवेळी सुनीलरावांनीच चित्राचं विडंबन करावं असं थोडंच आहे? :?)

चतुरंग

सुनील's picture

26 Oct 2009 - 7:09 am | सुनील

खोप्याचा फटू तर खोप्याचा फटू पण समोर आरसा ठेवायला काय हरकत नव्हती बॉ! ;)

दरवेळी सुनीलरावांनीच चित्राचं विडंबन करावं असं थोडंच आहे? ;)

Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.