महाराष्ट्रातील राजकारणाची कुंडली...

विकास's picture
विकास in काथ्याकूट
22 Oct 2009 - 6:48 am
गाभा: 

अजून थोड्याच वेळात महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणूकांचा निकाल लागणार आणि तमाम राजकारण्यांचा निकाल लागणार... तर अशा या निवडणूकीत म.टा. मधे म्हणल्याप्रमाणे आघाडीस इजा-बिजा-तिजाचे तर युतीस सत्तांतराचे वेध लागले आहेत. तर अशा या बातम्यांमधे एक म.टा.मधे सविस्तर लेख आला आहे ज्यात राजकारण्यांच्या कुंडल्या मांडत सत्तेमधे "येऊन येऊन येणार कोण..." याचे अंदाज बांधले आहेत.

मटामधील या लेखामधले कळीचे विधान खालील प्रमाणे:

वरील सर्व विवेचनाचा विचार करता येणारी विधानसभा ही त्रिशंकु असण्याची शक्यता वाटत नाही. कारण सत्ताधारी पक्षाच्या कुंडलीत दशमस्थानात आलेले बुध , शनि , रवि , शुक्र हे चार ग्रह आल्याने सत्ताधारी पक्षाचे स्थान अधिक बळकट झाले आहे. त्यामुळे सोनिया काँग्रेसला ८० ते ९० , राष्ट्रवादी ४५ ते ५५ जागा मिळण्याची शक्यता आहे. शिवसेनेला ५५ ते ६५ , भाजपाला ३५ ते ४५ जागा मिळतील.

आता जर ते अंदाज बरोबर ठरले (आणि तसे ते कुंडली/भविष्यामुळे नाही पण एकूणच खरे ठरण्याची शक्यता आहे) तर मग अनिस भविष्यवेभत्त्याचे ज्ञान मानणार का तरी देखील अंधश्रद्धाच म्हणणार? ;)

तसेच या धाग्यासंदर्भात जर अजून कुणाला असल्या खर्‍या/खोट्या ठरलेल्या राजकीय भविष्यांबद्दल माहीती घालावी ही विनंती.

प्रतिक्रिया

पाषाणभेद's picture

22 Oct 2009 - 9:20 am | पाषाणभेद

या निवडनूकीत आलेले बंडखोरांचे पीक, नेत्यांच्या पिलावळीचा परीणाम, मतदारांची उदासीनता, वाटलेले पैसे, झालेले दारूकाम, निष्ठेची केलेली राखरांगोळी व राजकारण्यांना विकला गेलेला चौथा स्तंभाची (मेडीआ) भुमीका पहाता प्रत्यक्ष परमेश्वरही कुंडली पहायला आला तरी तो चुकेल त्यात मर्त मानव भविष्यकथन करणारा काय व सांगणार कप्पाळ?

आधूनिक विचार करणारे या तथाकथीत भविष्यकथनाबाबतीत जराही विचार करणार नाहीत. (केवळ राजकीयच नव्हे तर वैयक्तिकही बाबतीत).

"त्यामुळे सोनिया काँग्रेसला ८० ते ९० , राष्ट्रवादी ४५ ते ५५ जागा मिळण्याची शक्यता आहे. शिवसेनेला ५५ ते ६५ , भाजपाला ३५ ते ४५ जागा मिळतील. "

अरे आकड्यांना काही किंमत आहे की नाही?
८० ते ९० काय?
४५ ते ५० काय?

अरे जेथे एक उमेदवारच माघार घ्यायला १० कोटी घेतो तेथे निवडून आलेला अपक्ष आमदार कितीला विकला जाईल? काही अंदाज?

आणि मटा वाले १० /१० चा फरकाने 'भविष्य' सांगतात!

बाकी 'अंदाज' चालू द्या.
--------------------
पासानभेद
महारास्ट्र मैं ५० गनमेन सिकूरीटी आदमी चाहीये | (लाईसेन जरूरी नहीं | खाली आपकेपास हतियार होना जरूरी |)
आकर्षक वेतन, खानापिना, रहना|
हमें तुरंत संपर्क करें |

सुनील's picture

22 Oct 2009 - 9:17 am | सुनील

विधानसभा जर त्रिशंकू राहिली नाही तर सर्वात जास्त दु:ख राज ठाकरेंना होईल! त्याखालोखाल आठवले, विविध पक्षांचे बंडखोर इ.इ.

असो, आता फक्त काही तासांचाच अवधी आहे. चित्र स्पष्ट होईलच. तेव्हा पुन्हा काथ्याकूट करूच ;)

Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.

चिरोटा's picture

22 Oct 2009 - 9:46 am | चिरोटा

काँग्रेस/राष्ट्रवादीवाले आघाडीवर आहेत असे NDTV वर दिसतेय्. ह्यावेळी सेना/भाजपवाले सत्तेवर आले नाहीत तर पुढच्या पंधरा वर्षातही येतील असे वाटत नाही.अपक्ष बर्‍याच ठिकाणी आघाडीवर दिसता आहेत. त्यांचा बँक बॅलन्स वाढणार असे दिसते.
भेंडी
क्ष्^न + य्^न = झ्^न

विसोबा खेचर's picture

22 Oct 2009 - 10:29 am | विसोबा खेचर

तूर्तास तरी आघाडी सरकार जोरात आहे!

तात्या.

Nile's picture

22 Oct 2009 - 11:57 am | Nile

हा हा हा! ज्योतीषी बेरकी राजकारणी पण दिसतोय! (आत्तापर्यंत च्या निकाला नुसार ;) )

प्रदीप's picture

23 Oct 2009 - 10:16 am | प्रदीप

आताच मिड डे मधे हे वाचले

कुणीतरी हा म्हातारा कधी पायउतार होईल ह्याचे भविष्य सांगून दाखवावे! अध्यक्षपद सोडण्याचे मुहूर्त शोधणेच अद्यापि चालू आहे, असे दिसते. शेवटी बहुधा परिस्थिती अशी येईल, की त्याची जरूरीच रहाणार नाही. 'ना रहेगा बाँस, ना बजेगी बाँसूरी' अशी काहीतरी हिंदी म्हण आहे ना? तमाम हिंदूंचा विश्वासघात करण्यार्‍या भाजपचा शेवट होण्याचा सुदिन लवकरच येवो, अशी त्या ईश्वरचरणी प्रार्थना. आणि तसा तो लवकरच यावा, ह्याकरिता अडवाणीच त्या पक्षाचे अध्यक्ष रहावेत, अशी मनोमन इच्छा!