ओबामा ला नोबल पुरस्कार मिळाला. ह्याचा उपयोग जगातिल अनेक जण करत आहेत. काहि बातम्या :
१. अमेरीकेतील एक नामांकित विद्दापीठ " नोबल पुरस्कार जिंकण्याच्या क्लुप्त्या ( ट्रिक्स अॅन्ड टिप्स) असा कोर्स सुरु करणार आहे.
२. भारतातील तीन विद्दार्थी "ओबामा यांना नोबल पुरस्कार मिळण्याची कारणे" ह्या विषया वर पि एच डि साठि शोध निबंध सादर करणार आहेत.
३. "झट पट नोबल" चे कोचींग क्लासेस मुंबईत सुरु झाले आहेत. (ईविंनीग बॅच, विकएन्ड बॅच ची हि सोय आहे)
४. नोबल पुरस्कार मिळवायचा १० (दहा) वर्षाचा अनुभव असलेले १५३ रेझुमे अमेरीकेती विविध कंपन्यां कडे भारतातील काहि कॅन्डिडेड्स , नी पाठवले आहेत.
५. अनेक संशोधक ,नोबल पुरस्कार मिळु नये म्हणुन ,स्वतः चे शोध कार्य बंद करत आहेत.
६. अमेरीकन सरकार देशातील खेड्या पाड्यातील प्रत्येकाला नोबल पुरस्कार मिळावेत ह्या हेतुने "फास्ट ट्रॅक" नोबल प्रशिक्षण वर्ग "स्टिम्युलस पॅकेज" चे डॉलर खर्च करुन सुरु करत आहे. ह्या मुळे प्रत्येक नोबल पुरस्कारा बरोबर मिळणारया १.४ मिलियन डॉलरस मुळे अमेरीकि अर्थ व्यवस्था मजबुत होइल असा श्री गायटनर यांचा अंदाज आहे.
पुढिल बातम्या जशायेतिल ( व सुचतिल ) तशा "ब्रेकिंग न्युज" ह्या सदरा खाली वाचावयास मिळतील.
प्रतिक्रिया
11 Oct 2009 - 9:25 am | प्रशांत उदय मनोहर
"नोबेल" आहे त्या पुरस्काराचं नाव.
आपला,
(त्रस्त) प्रशांत
---------
फळाची अपेक्षा ठेवू नये...ते विकत घ्यावे किंवा घरात उगवावे.
:?
माझा ब्लॉग - लेखणीतली शाई
11 Oct 2009 - 11:06 am | विष्णुसूत
त्रस्त मनोहर पंत,
क्षमस्व !
आमच्या सारख्या अडाणि माणसाला "नोबेल" आणि "नोबल" एकच कि हो ! भावना पोहचल्या म्हणजे झालं. आमच्या विठ्ठ्ला ला तो पुरस्कार आता मिळाला आहे त्यामुळे नक्की उच्चार काय ते जाणुन घेयला आवडेल . जर आपल्याला काहि संदर्भ देता आला तर तो देण्याची कृपा करावी. असो!
आपण त्या नोबेल का नोबल बाईंच्या झग्यातुन पडलात म्हणुन आपल्याला स्वीडिश उच्चार बरोबर माहित असावेत असा समज चुकिचा नसावा. असो.
असे त्रस्त होउ नका नाहितर परत कुठे तरी भरकटायचात.
आपल्या नावाची शिफारस अम्ही "भरकटलेले उच्चार शास्त्र" ह्या वर्गिकरणात "मपा गौरव नोबल पुरस्कारा" साठि जरुर करु.
:)
11 Oct 2009 - 12:55 pm | ज्ञानेश...
आल्फ्रेड नोबेल हा पुरूष होता हो!
"Great Power Comes With Great Responsibilities"
12 Oct 2009 - 10:02 am | विष्णुसूत
ज्ञानोबा,
मला क्षमा करा हो. अल्फ्रेड नोबल हा पुरुष होता हे मला माहित नव्हते.
माझ्यावर रागावु नका हं.
(स्वगत: "झग्यातुन पडणे" हि फ्रेज आजकाल वापरत नाहित का?
माझ वय झालं हे आता लक्षात येयला लागलय. लोकांनी आता मला काका न म्हणता अजोबा म्हणले तरी चालेल ! )
11 Oct 2009 - 9:47 am | श्रीकृष्ण सामंत
एका वाक्याचा अर्थ लक्षात घेऊन सांगायचं तर,
"धर्म संस्थापना्र्थाय संभवा मी युगे युगे"
हे म्हणणं खरं करण्यासाठी ह्या "पंढरीच्या विठ्ठलाने " -ओबामाने- ह्यावेळी अमेरिकेत जन्म घ्यायचं ठरवलेलं दिसतंय असं मला वाटतंय.
रि.प पक्षाच्या शंभर कौरवानी गेली आठ वर्ष अमेरिकेत आणि जगात धुमाकूळ घालून मनुष्यधर्म बुडवला.बुशरूपी दुर्योधनाने इराकच्या द्रौपदीचं वस्त्रहरण करून लाखो निरपराध लोकांना यमसदनी पाठवलं.
सादाम जरी दुष्ट असला तरी ९/११ ला तो कारणीभूत नव्हता.ब्रिटनचा पंतप्रधान टोनी ब्लेअर शकूनीमामा त्याला सामील झाला होता.
www.shrikrishnasamant.wordpress.com
श्रीकृष्ण सामंत
"कृष्ण उवाच"
shrikrishnas@gmail.com
11 Oct 2009 - 10:01 am | उग्रसेन
"पंढरीच्या विठ्ठलाने " -ओबामाने- ह्यावेळी अमेरिकेत जन्म घ्यायचं ठरवलेलं दिसतंय असं मला वाटतंय.
जय हरी ! वारक-यांनो चलो अमेरिका. :)
-बाबुराव
11 Oct 2009 - 11:00 am | विष्णुसूत
वाह वाह सामंत साहेब,
क्या बात है ! तुम्ही अगदि सुरेख उपमा दिली आहेत.
12 Oct 2009 - 10:14 am | सुधीर काळे
"संभवामि युगे युगे" असा आहे त्या श्लोकाचा शेवट!
इथं मी म्हणजे "मी स्वतः" असा अर्थ नाही!
क्षमस्व!
सुधीर
------------------------
देवा, ज्या गोष्टी मी बदलू शकतो त्या बदलायची व ज्या गोष्टी मी बदलू शकत नाही त्या स्वीकारण्याची शक्ती व या दोन्हीतला फरक समजण्याइतकी विवेकबुद्धी मला दे!
11 Oct 2009 - 2:38 pm | चिरोटा
मराठी पत्रकार कामाला लागले-
http://www.loksatta.com/index.php?option=com_content&view=article&id=145...
ओबामा-मुत्सद्दी शांतीदूत .
लेखातले एक वाक्य-
मग "अमेरिकेने त्यांची सर्व अण्वस्त्रे नष्ट केली आहेत" ही बातमी आम्ही पामर कधी वाचणार?Milatary Industrial Complex चे अमेरिकन पुढार्यांवरील प्रभुत्व कमी होणार की नाही?
भेंडी
क्ष्^न + य्^न = झ्^न
11 Oct 2009 - 2:39 pm | दशानन
>>>अमेरिकेकडे सर्वाधिक अण्वस्त्रे आहेत, म्हणूनच अण्वस्त्रे नष्ट करण्यासाठी पुढाकार घेण्याची जबाबदारीही अमेरिकेवर येऊन पडते
मला हे कळत नाही आहे लोक असली स्वप्न का बघतात ?
अमेरिका अथवा कुठला ही देश एवढा मुर्ख नसावा की आपल्या शत्रु जवळ / मित्राजवळ शस्त्र आहे तरी ही आपल्या हातातील शस्त्र खाली टाकून शेळीला दुध पाजायला जाईल.
आजच्या जगात हे शक्य आहे ? कुठला मित्र कधी शत्रु होईल हे सांगणे जेथे अशक्य आहे तेथे आपले शस्त्र टाकण्याचा / नष्ट करण्याचा धोका अमेरिका का घेईल ? व आपण तरी घेऊ का असला धोका ? पाकिस्तान / चीन असे डोक्यावर नाचत असताना ? एकच धाक राहिला आहे तो पण जर नष्ट करायला घेतला तर... हाल विना दात व विषाच्या सापा सारखा होऊन जाईल व हे आतंकवादी देश जग भर दंगा करत फिरतील !
11 Oct 2009 - 2:41 pm | प्रभो
एकच धाक राहिला आहे तो पण जर नष्ट करायला घेतला तर... हाल विना दात व विषाच्या सापा सारखा होऊन जाईल व हे आतंकवादी देश जग भर दंगा करत फिरतील !
--प्रभो
----------------------------------------------------------------------------------
काय संगावे स्वतः विषयी,आहात तुम्ही सूज्ञ !! एका सारखे एकच आम्ही,बाकी सगळे शून्य !!
12 Oct 2009 - 11:49 am | विष्णुसूत
"ओबामा पुरस्कार स्विकारणार नाहि. "
अशी अधिकृत ब्रेकिंग न्युज आहे (ट्विटर)
http://www.nbc.com/saturday-night-live/video/clips/powerball-cold-open/1...
http://www.nbc.com/saturday-night-live/video/episodes/?vid=1163334#vid=1...
SNL चे वरील दोन कार्यक्रम बघुन ओबामा व्यथित झाला आहे. नोबल पिस प्राइज जो पर्यंत महात्मा गांधिना मिळत नाहि तो पर्यंत ते न स्विकारण्याचा , ओबामा विचार करत आहे !
अमेरीकेच्या अर्थ व्यवस्थे ला सुधारण्या साठि तुर्त फक्त कॅश अॅवार्ड स्विकारावे असे अनेक लोक ओबामा ला आग्रह करत आहेत.