एक गाणे/कविता हवी आहे

अरुण वडुलेकर's picture
अरुण वडुलेकर in काथ्याकूट
1 Oct 2009 - 4:20 pm
गाभा: 

माझ्या लहानपणी माझी आई एक गाणे (कविता) नेहेमी म्हणायची.
ते गाणे जसेच्या तसे मला आता आठवत नाही.
मात्र ध्रुवपदातील एक ओळ चांगली आठवते. ती अशी,
अजुनि कसें येती ना परधान्या राजा
किरकिरती रातकिडे झाल्या तिन्हीसांजा

हे गाणे एक विवाहिता, जी कामावर गेलेल्या (किंवा परगावी गेलेल्या) आपल्या पतीची
वाट पाहाते आहे, त्याच्या प्रतिक्षेत म्हणत आहे. त्या काळच्या रीतिप्रमाणे ती पतीचे नांव सरळ सरळ घेऊ शकत नाही.
म्हणून ती, ज्या बैलगाडीने तो बाहेर गेला आहे आणि त्याच गाडीने परतही येणार आहे,
त्या गाडीच्या 'परधान्या - राजा' या बैलांची बैलांची नांवे घेऊन आपली काळजी व्यक्त करीत आहे.

सर्व काव्यरसिक मिपाकरांना विनंती की ही कविता आणि तिचा कर्ता कवि कोणास माहिती असेल
तर ती कृपया मिपावर द्यावी अथवा मला व्यनिने पाठवावी.

कृपाभिलाषी,
अरुण वडुलेकर

प्रतिक्रिया

उपास's picture

1 Oct 2009 - 5:07 pm | उपास

हे गाणं 'आठवणीतल्या कविता' ह्या कवितासंग्रहात मिळेल. श्रीधर फडकेनी गायलेल्या आठवणीतल्या कविता ह्या कॅसेट/ सीडीज मध्ये पण हे गाणे आहे.

मुक्तसुनीत's picture

1 Oct 2009 - 9:03 pm | मुक्तसुनीत

वाट तरि सरळ कुठे पांदितील सारी.. असे कायसेसे आठवते.

अनामिका's picture

1 Oct 2009 - 11:28 pm | अनामिका

सदरहू गाणे इथे उपलब्ध आहे.
http://www.esnips.com/web/lahaanpan
ही कविता कवी यशवंत यांची आहे
"अनामिका"
जो करी कर्म अहेतु,वेद तयास कळो न कळो रे।
ओळख पटली ज्यास स्वतःची,देव तयास मिळो न मिळो रे।

अरुण वडुलेकर's picture

2 Oct 2009 - 11:13 am | अरुण वडुलेकर

अनामिका,
या गाण्याचा दुवा तत्परतेने दिल्या बद्दल मन:पूर्वक धन्यवाद.

मुक्तसुनित,
आपल्याला आठवलेली ओळ बरोबर आहे.
अनामिका यांनी दिलेल्या दुव्यावर आपणही या गीताचा आस्वाद
घेऊ शकाल. धन्यवाद.

अरुणजी!
सदरची हि कविता माझी देखिल आवडती आहे.
आणि मुख्य म्हणजे लहानपणीच्या माझ्या आजोबांच्या सहवासात घालविलेल्या काही हळव्या क्षणांच्या आठवणी या कवितेशी जुळलेल्या आहेत , तसेच सुदैवाने माझ्या संग्रही हि कविता असल्याकारणाने मी त्वरेने तुंम्हास ती उपलब्ध करुन देऊ शकले इतकच.
"अनामिका"
जो करी कर्म अहेतु,वेद तयास कळो न कळो रे।
ओळख पटली ज्यास स्वतःची,देव तयास मिळो न मिळो रे।

Nile's picture

2 Oct 2009 - 11:49 pm | Nile

तुमचे संकलन आवडले. बरीच आवडती गाणी ऐकायला मिळतील आता. :)

अजुनि कसें येती ना परधान्या राजा

"अनामिका"
जो करी कर्म अहेतु,वेद तयास कळो न कळो रे।
ओळख पटली ज्यास स्वतःची,देव तयास मिळो न मिळो रे।

अरुण वडुलेकर's picture

2 Oct 2009 - 8:59 pm | अरुण वडुलेकर

अनामिका,
शब्दबद्ध कविताही दिल्याबद्द्ल पुन्हा एकदा धन्यवाद.

मस्तानी's picture

2 Oct 2009 - 11:36 pm | मस्तानी

मी सुद्धा खुप दिवसापासुन एक कविता शोधत आहे ...
मधुनच काही ओळी आठ्वत आहेत ...

दक्खन राणीच्या बसुन कुशीत
शेकडो पिले ही चालली खुशीत
...ड्युकचे नाकाड सरळ अजस्त्र
राहिले उभे हे शतके सहस्त्र
... पहा ना आई धबधबा केवढा
पहा ना चमेली पहा ना केवडा

ही कविता माहित असेल तर कृपया देवु शकाल काय? ...

पाषाणभेद's picture

3 Oct 2009 - 3:02 am | पाषाणभेद

मी सुद्धा खुप दिवसापासुन एक कव्य शोधत आहे ...

हे काव्य कुणाचे आहे ?
वंदना विटणकर की कुणी ?

हिरवा हिरवा ऋतु s s s हिरवा हिरवा ऋतु s s s || कड.||
अधिकच हे मन हिरवे s s जवळी असता तू ||

हिरवा हिरवा ऋतु s s s हिरवा हिरवा ऋतु s s s
हिरवा हिरवा ऋतु s s s हिरवा हिरवा ऋतु s s s || कड.||

हे गाणे दूरदर्शनवर बघितले व रेडूवर ऐकले होते.

-----------------------------------
- पासानभेद बांकेबिहारी
(बडे बाबू,
तहसिल कार्यालय,
गुडगूडी, ता. रामनगर, जि. पस्चिम चंपारन, बिहार)