भटकंती व खादाडी २

विसोबा खेचर's picture
विसोबा खेचर in काथ्याकूट
22 Sep 2007 - 1:25 am
गाभा: 

भाग १ वरून पुढे सुरू...

मंडळी, ही पाहा आमच्या जाफरभाईच्या फॉकलंड रोडवरील (सध्याचे नांव पठ्ठे बापुराव मार्ग) हॉटेल दिल्ली दरबारमधली मटण बिर्याणी! चवीला खूप छान असते. सोबत सायीच्या दह्यातली कांद्याची कोशिंबीरपण मिळते. दिल्लीदरबारची ही बिर्याणी मुंबईत खूपच प्रसिद्ध आहे. आवडत्या स्त्री सोबत दोन छानसे ग्लेन फिडिचचे पेग मारावेत आणि त्यानंतर ही बिर्याणी खावी असं मला बर्‍याचदा वाटतं आणि काही काही वेळा माझी ही इच्छा पूर्ण होते! :)

जाफरभाईच्या दिल्लीदरबारातील मटण बिर्याणी-

आपला,
(मुंबईकर!) तात्या.

प्रतिक्रिया

गुंडोपंत's picture

22 Sep 2007 - 11:46 am | गुंडोपंत

सकाळी सकाळी गार हवेत
मस्त पैकी पांडवलेण्याला चढून यावे.
मग गाडी काढून थेट तसेच पंचवटी कारंज्यावर जाऊन, अंबिका रेस्टॉरंट मध्ये मिसळ साठी नंबर लावाठी. दाटीवाटीमधे बसून, खास सावजी मसाला असलेली मिसळ समोर येते. सोबत कांदा कोथिंबीर, शेव. ताजे, खमंग वासाचे पाव!
घास घेतल्यावर आवाज फुटणे बंदच! फक्त "रस्सा", "तर्री " असे घशातल्या घशात पुटपुटणे!

काही फालतू लोक इथे जास्तीची शेवही मागवतात, पण त्यात काही अर्थ नाही!
इथे फक्त'काळा रस्सा व तर्री 'मागणारे ष्टँडर्ड असतात.

एकदा आमच्या एका एकारांत मित्रवर्याने येथे दही मागताच, सगळे हॉटेल स्तब्ध होवून आमच्या कडे बघायला लागले होते!
त्याला गप्प बसून नाक पुसत खाण्याशिवाय गत्यंतरच राहिले नाही.

ही स्वर्गीय मिसळ संपेपर्यंत भलेभले स्वर्गीय होतात!!! बोलायचं कामच नाही...!
मग कारंज्यावरचा पांडे मिठाई च्या शेजारी असलेल्या टपरीवरचा चहा गरम चहा...
हे खाल्ल्यावर बरेच लोक अर्ध्यातासाने वगैरे बोलूही शकतात असे ऐकुन आहे!

मी मात्र मिसळ गरम चहा व त्यावर एकशेवीस तिनशे लावली की तासभर फारसे न बोलणेच योग्य धरतो.
या वेळी खाणे हा बोलण्याचा प्रकारच नाही; हे ध्यानात येते हो!

आपला
गुंडोपंत

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

23 Sep 2007 - 1:38 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

औरंगाबादला बाबा पेट्रोल पंप नावाचा बस स्टॊप आहे. इथेच "गणेश इडली वडा सेंटर" नावाचे एका अण्णाचे प्रसिद्ध हॊटेल आहे.
सकाळी नाष्ट्याला आणि दिवसभर इथे तोबा गर्दी असते, हा आहे 'उक्मा '(१० रुपये) ( मला दोन वाट्या भरुन लागतात) त्याच बरोबरइथे इडली वडा (१२ रुपये),उत्तप्पा (१२ रुपये),शिरा( १० रुपये), मसाला डोसा १५ रुपयात मिळतो. मराठी माणूस कामाची सुरुवात इथूनच करतो ! :)
उक्मा !
( खोब-याची चटणी लहान वाटीत तर उकमा मोठ्या वाटीत.)

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

सहज's picture

23 Sep 2007 - 1:41 pm | सहज

बरोब्बर भूकेच्या वेळी तुम्ही प्लेट आणलीत पुढे बिरूटेसाहेब. चॉकलेट पुडींग खाऊन वेळ मारून नेतोय. :-(

यन्ना _रास्कला's picture

8 Jun 2009 - 9:36 am | यन्ना _रास्कला

येवडा छान =P~ त म बिरयानी कस्ली भन्नाट फक्कड लागत आसेल. /:)
खायाला हवी बुव्वा.

*/*\*/*\/*\*/*\*/*\*/*\*/*\*/*\*/*\*/*\*/*\*/*
हितन २ कोसाव औटपोस्ट नाहि?

पोस्तात पोलीस काय करतोय...... मास्तर, दुसर कोन इचारनार?

विनायक प्रभू's picture

8 Jun 2009 - 9:39 am | विनायक प्रभू

आज काल पट्ठे बापुराव मार्ग म्हणतात का?
अगदी समर्पक नाव.
बिर्याणी वादातीत.

संदीप चित्रे's picture

8 Jun 2009 - 9:57 am | संदीप चित्रे

मटण बिर्याणी अप्रतिम दिसतेय...
योगायोगाने आज आमच्या घराजवळच्या 'अभिरूची'मधे मटण बिर्याणी खाऊन आलो आणि आता हा धागा बघतोय :)

---------------------------
माझा ब्लॉगः
http://atakmatak.blogspot.com