किटकोत्सव

अजय भागवत's picture
अजय भागवत in कलादालन
12 Sep 2009 - 8:29 pm

मागील वर्षी एका वनातल्या मुक्कामी काढलेली छायाचित्रे

म्हैसकिडा/ शेणकिडा:

पान नाकतोडा: हा झाडांमधे बेमालूम मिसळून जायचा- एखाद्या वाळलेल्या पानासारखा!

काटकी नाकतोडा: अक्षरशः वाळक्या काडीसारखा.

आणि शेवटी हे फूलपाखरांचे मिलन!!!

छायाचित्रण

प्रतिक्रिया

पाषाणभेद's picture

12 Sep 2009 - 9:17 pm | पाषाणभेद

अतीशय छान छायाचित्रे. निर्सगातील वैविध्य अचुकतेने टिपलेय.

वनात कॅमेरा नेला नव्हता काय?

-----------------------------------
काय! तुमच्या घरी कॉटवरील गादीखाली, दुकानांत मिळणार्‍या प्लॅश्टीकच्या पिशव्या ठेवत नाही? नक्कीच! तुम्ही अतीउच्च वर्गीय आहात.

- पाषाणभेद उर्फ दगडफोड्या

प्राजु's picture

12 Sep 2009 - 11:47 pm | प्राजु

अ प्र ति म!!
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/

बिपिन कार्यकर्ते's picture

13 Sep 2009 - 12:32 am | बिपिन कार्यकर्ते

अप्रतिम आहेत छायाचित्रं. दोन्ही नाकतोडे तर मस्तच.

बिपिन कार्यकर्ते

अथांग सागर's picture

13 Sep 2009 - 12:45 am | अथांग सागर

नाव द्या.
--अथांग सागर

स्वाती२'s picture

13 Sep 2009 - 3:29 am | स्वाती२

बिटल दिसतोय. पण कुठला ते माहित नाही. फोटो सुरेख.

अजय भागवत's picture

13 Sep 2009 - 7:27 am | अजय भागवत

नाव- फोटो पाहिल्या-पाहिल्या कवडीची आठवण आली; म्हणून कवड्या.
सिमेंट मधिल गारगोट्यांच्या तुकड्यांवरुन हा/ही एखाद्या अमेरिकन राज्यांतील आहे असे दिसते.

स्वाती२'s picture

13 Sep 2009 - 8:41 pm | स्वाती२

नेटवर शोधल्यावर कळले हा कोलोराडो पोटॅटो बिटल.

अथांग सागर's picture

14 Sep 2009 - 3:04 am | अथांग सागर

नामकरणाबद्दल धन्यवाद :) !!!

--अथांग सागर

स्वाती२'s picture

13 Sep 2009 - 3:26 am | स्वाती२

मस्त फोटो. पान नाकतोडा खास.

अजय भागवत's picture

13 Sep 2009 - 7:40 am | अजय भागवत

एक जाणवले का?

असे म्हणतात की, निसर्गाने किटक, पक्षी ह्यांना जे रंग दिले आहेत त्यात प्रमुख कारण म्हणजे नराने मादीला आकर्षून घेण्यासाठी त्याचा उपयोग व्हावा; कदाचित एव्हढ्या किटकराजमधून आपला जातभाई कोण हे ही त्यांना कळत असावे.

पण हे जे दोन नाकतोडे आहेत त्यांचा मुख्य उद्देश शत्रूंपासून बचाव हा आहे. "शत्रूंपासून बचाव" हे त्यांच्या आयुष्याचे ध्येय कसे असू शकते?

दुसरे असे की, अनेकदा असे म्हणले जाते की, काही पक्षी, पशू रंग पाहू शकत नाहीत. असे असते तर वरील दोन्ही उद्दीष्टे कुच्कामी होतील. त्यामुळे असे वाटते की, जगातील प्रत्येक सजीव सगळे रंग पाहू शकत असेल.

भाग्यश्री कुलकर्णी's picture

13 Sep 2009 - 7:48 am | भाग्यश्री कुलकर्णी

फोटो छान आहेत.काटकी नाकतोडा खरच अगदी काडीसारखाच वाटतोय.

दशानन's picture

13 Sep 2009 - 9:10 am | दशानन

सुंदर... !

लाकडी तर ज ब रा !

काय निसर्गाची कला आहे.... तो निसर्व व तो देवच जाणो !

अनिरुध्द's picture

13 Sep 2009 - 10:10 am | अनिरुध्द

काटकी किड्याला काडी कीडा असे देखील म्हणतात.

ऋषिकेश's picture

13 Sep 2009 - 12:04 pm | ऋषिकेश

छानच चित्रे..
ह्या काडीकिड्यांसारखा एक नमस्कार करणारा पण किडा आहे तो आठवला :)

ऋषिकेश
------------------
मध्यान्ह झालेली आहे. चला आता ऐकूया एक बडबडगीत "एक होतं झुरळ.. चालत होतं सरळ...."

अजय भागवत's picture

13 Sep 2009 - 11:08 pm | अजय भागवत

>>>एक नमस्कार करणारा पण किडा आहे तो आठवला

नाकतोड्याचाच भाऊबंद का हा? कुठे आढळतो?
वरील फोटोतले किटक सह्याद्रीतले आहेत.

चतुरंग's picture

13 Sep 2009 - 8:22 pm | चतुरंग

पहिल्या चित्रातला काळ किडा कसला मस्त चिलखती गाडी सारखा आहे!
बाकीचे नाकतोडे अफलातून कॅमाफ्लाजचे नमुने आहेत. हे सगळे अजिबात ओळखू येत नाहीत झाडात असताना.

ह्या उन्हाळ्याच्या सुरुवातीला पॅटिओत माझ्या सायकलीवर बसलेली एक चतुराची (ड्रॅगनफ्लाय) जोडी मी सकाळी सकाळी अशीच टिपली होती

चतुरंग

अजय भागवत's picture

13 Sep 2009 - 9:41 pm | अजय भागवत

अरे वा! बघता-बघता चांगलीच मैफिल जमली किटकांची. नेहमी निसर्गाशी जवळीक असणार्यांना असे अद्भूत किटक नेहमीच दिसत असतील. तुम्ही टिपलेला हा क्षणही अफलातून!

श्रावण मोडक's picture

13 Sep 2009 - 9:16 pm | श्रावण मोडक

छान.

सोनम's picture

13 Sep 2009 - 9:49 pm | सोनम

सर्व फोटो छान आहे.काटकी नाकतोडा अप्रतिम........... :) :) :)

"आयुष्यात हारजीतला काही मोल नसते! मोल असते ते झगडण्याला! निकराने,प्राणबाजीने शर्थीने झुंजण्याला!"

अभिजा's picture

13 Sep 2009 - 10:03 pm | अभिजा

सगळे फोटो छान! म्हैस किडा, फुलपाखरू, अथांग सागर यांचा 'लव्ह बग' खास!

अजय भागवत's picture

13 Sep 2009 - 11:14 pm | अजय भागवत

एक लिहायचे राहूनच गेले- ते दोन्ही नाकतोडे कमीतकमी ५ इंची असावेत. सकाळी हॉटेलरुमच्या बाहेरील व्हरांड्यात एका लाईटच्या प्रकाशाने त्याच्या अवती-भोवती खूप किडे/किटक जमले होते; त्यातीलच हे.

तो म्हैसकिडा उलटा केला की त्याला आपणहून सरळ होता येत नाही. त्यामुळे त्याच्या चिलखती त्वचेचा उपयोग तो जो पर्यंत पायावर चालतो आहे तो पर्यंतच. ह्याचा आकार मुठीत मावणार नाही इतका होता.

सहज's picture

14 Sep 2009 - 10:05 am | सहज

:-)

दिपक's picture

14 Sep 2009 - 10:33 am | दिपक

किटकोत्सवाच्या शुभेच्छा!

भारी आहेत सगळे किडेलोक.. अजुन पाह्यला आवडतील.:)