गूढ कॉस्टींगचे...

वेदश्री's picture
वेदश्री in काथ्याकूट
31 Aug 2009 - 5:55 pm
गाभा: 

ऑगस्ट महिन्यात घरगुती गॅसची सोय झाल्याने माझा जीभेचा आणि तब्येतीचा प्रश्न हे कळीचे मुद्दे निकाली निघाले आहेत. आर्थिक दृष्टीने बघता खर्चही कमी झाला आहेच (असे वाटतेय सद्ध्यातरी!) पण तो नक्की किती टक्क्याने कमी झाला हे समजण्यासाठी रोजच्या एकवेळच्या स्वयंपाकाचे कॉस्टींग काढून गणित मांडून फायद्या (आणि असेलच तर तोट्या)चे प्रत्यक्ष गणित काढायचे असे ठरवले. कॉस्टींग हा प्रकार मला नविन असल्याने अख्खा शनिवार नेटवर यासंदर्भात माहिती गुगलत बसले होते पण नक्की कल्पना येईल कॉस्टींगची असे काहीच मिळाले नाही. कोणाला याबाबत माहिती असल्यास अथवा अभ्यास असल्यास मार्गदर्शन करू शकाल का?

प्रतिक्रिया

दशानन's picture

31 Aug 2009 - 5:58 pm | दशानन

ह्म्म्म्म !

बरं बरं... हिशोब करुन सांगतो... थांबा !

क्रमश:

सर्वसाधारणपणे जेवढ्याला पदार्थ मिळतो त्याच्या सरळसरळ निम्माच त्याचा एकूण खर्च असतो आता ह्या हिशोबाने सुरुवात करा.
महिन्याचा २ वेळा डबा लावला असेल किंवा खानावळ असेल तर त्याचा खर्च समजा रु. ३००० आहे.
तर तुम्ही स्वतः स्वयंपाक सुरु केल्यावर तुमचा वाणसामान, भाजी, मसाले इ. कच्च्या तयारीचा खर्च + गॅस + वाहतूक = साधारण रु.२००० च्या आसपास जात असेल तर तुम्ही फायद्यात आहात(अगदी गेलाबाजार २५०० असेल तरीही फायदाच). शिवाय घरचे अन्न खाल्ल्याने तब्बेत नीट राहील ती वेगळीच. वरच्या पैशांचा सुकामेवा व फलाहार करु शकता!
लगेच कॉस्टिंग करु नका दोन ते तीन महिन्यानंतर जास्त अचूक अंदाज येईल. (एका दिवसाचे कॉस्टिंग अवघड जाईल महिन्याची सरासरी सोपी आणी अचूक येते.)

(अकाऊंटंट)चतुरंग

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

31 Aug 2009 - 6:14 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती

आज ३१ तारीख आहे, उद्यापासून सगळे खर्च नीट लिहून ठेव. खाण्यापिण्यावर किती खर्च होतो हे समजायला फार वेळ लागणार नाही.
चतुरंग म्हणतात तसं, दोन तीन महिन्यांत अंदाज येईल. पहिल्या महिन्याचा खर्च जरा जास्तच होईल, तेव्हा काळजी नको करूस.

अदिती

वेदश्री's picture

31 Aug 2009 - 8:52 pm | वेदश्री

मी कायमच रोज दोन डायर्‍या लिहिते (ज्याला माझेदोस्त चेटकिणीचा जीव असलेले दोन पोपट असे चिडवतात!) एक रोजच्या अनुभवांबद्दल आणि दुसरी हिशोबाची! डायरीतल्या माहितीतून जेवणाचा आजवर किती खर्च होत होता (स्वयंपाकाची घरी सोय नसल्याने बाहेर करावा लागणारा) ती माहिती माझ्याकडे आहे पण घरी स्वयंपाक करायचा झाल्यास योग्य असे नियोजन करून सर्व सोयी नीट होतील हे बघून महिन्यासाठीचे नियोजन अचूक कसे ठरवता येईल हे बघणे चालले आहे माझे.

आजवर माझे जेवणावर रोज दोन्हीवेळच्या जेवणाचे मिळून सरासरी ७५ रुपये खर्च व्हायचे. याच गणिताला धरून मला माझा घरचा स्वयंपाक साधारण किती खर्चाचा पडतोय हे काढायचे झाल्यास कसे काढायचे ते मी बघतेय. महाग पडत असेल तरीही हरकत नाही (कारण तब्येत संभाळणे जास्त महत्त्वाचे) पण मग मी कॉस्ट इफेक्टीव्हनेसचा नीट विचार करू शकेन असे वाटते.

नितिन थत्ते's picture

31 Aug 2009 - 9:30 pm | नितिन थत्ते

>>महाग पडत असेल तरीही हरकत नाही (कारण तब्येत संभाळणे जास्त महत्त्वाचे)
शेवटी घरी स्वयंपाक करणे डबा लावण्यापेक्षा स्वस्त असते असेच उत्तर येईल पण ते खरे असेलच असे नाही कारण तो स्वयंपाक करण्यासाठी तुमचे जे एफर्ट (श्रम हा शब्द मुद्दाम वापरला नाही) खर्च होणार आहेत त्याचे वाजवी मूल्य तुम्ही किती धरणार त्यावर ते अवलंबून असेल.

नितिन थत्ते
(पूर्वीचा खराटा)

शाहरुख's picture

1 Sep 2009 - 1:56 am | शाहरुख

महाग पडत असेल तरीही हरकत नाही (कारण तब्येत संभाळणे जास्त महत्त्वाचे) पण मग मी कॉस्ट इफेक्टीव्हनेसचा नीट विचार करू शकेन असे वाटते.

महाग पडत असेल तरच कॉस्ट इफेक्टीव्हनेस का ??

नेहमीच कॉस्ट इफेक्टीव्ह रहा..म्हणजे मग हिशोब करत बसायचीही गरज नाही . तेव्हडाच एका डायरीचा खर्चही वाचेल आणि त्यात एखादा तुरडाळीचा आमटी-भात सुटेल.

आय एम स्टील इंटरेस्टेड इन द नंबर दो :-D

मॅथ्यु काकु आणि अली काकुना आमचा नमस्कार कळवणे..

चतुरंग,
माहितीपूर्ण प्रतिसादाबद्दल धन्यवाद.

प्रश्न असा आहे की मी वाणसामानाची खरेदी जर घाऊक प्रमाणात केली तर बरेच पैसे वाचतात, शिवाय हर चिल्लर गोष्टीसाठी दुकानात हेलपाटे करावे लागत नाहीत ते वेगळेच. मात्र अशा घाऊक खरेदीने प्रश्न असा निर्माण होतो की एकंदर खर्चाचे बजेट कसे करायचे हेच न कळून सगळाच अर्थकारभार कोलमडतो का काय असे वाटायला लागते.

काही गोष्टीत वर्षाचे (गहू, तांदूळ, डाळी, मीठ, साखर वगैरे) तर काहींचे महिन्या-दोन महिन्याला (साबुदाणा, कडधान्यं, मसाले वगैरे) तर काहींचे आठवड्याला (भाज्या, वगैरे) तर काहींचे दिवसाला (दूध, वगैरे) गणित असते! प्रोजेक्ट नवा असल्याने या गणितांबद्दल करायच्या 'रफ एस्टीमेशन'साठी कॉस्टींग उपयोगी पडेल असे वाटले म्हणून हा खटाटोप!

रोज हिशोब लिहिण्याची मला लहानपणापासूनच सवय असल्याने आताच्या या 'स्वयंपाकाच्या' प्रोजेक्टसाठी काही काळाने 'फेअर एस्टीमेट्स' काढू शकेनच मी. त्यावेळी नको तसे अनुभव आलेले निष्पन्न होऊ नये म्हणून रफ एस्टीमेट्समध्येच शक्य तितकी काळजी घ्यायचा प्रयत्न करायचा आहे.

सूहास's picture

31 Aug 2009 - 6:18 pm | सूहास (not verified)

रोजचा खर्च लिहुन ठेवावा..

सू हा स...

सागर's picture

31 Aug 2009 - 6:29 pm | सागर

वेदश्री जी,

कॉस्टींगचा अगदी कीस पाडायचा असेन तर पुढील प्रमाणे वर्गवारी करा
म्हणजे छोटेसे बजेटच तयार होईन आणि कुठे किती खर्च करायचा वा वाचवायचा ते पण ठरवता येईन

१. मासिक खर्च
२. त्रैमासिक खर्च
३. सहा महिन्यांनी येणारा खर्च
४. वार्षिक खर्च

१. मासिक खर्च
- लाईट बिल
- गॅस बिल
- टेलिफोन बिल
- मोबाईल बिल
- क्रेडिट कार्डाचे बिल
- पाणीपट्टी
- हॉटेल मधे खाण्याचा खर्च
- घरभाडे (किंवा प्रॉपर्टी टॅक्स - स्वतःच्या मालकीचे घर असेन तर)
- इतर (यात भाज्या, दूध, वर्तमानपत्रे, इस्त्री, किराणा असे गरजेप्रमाणे खर्च वाढवू शकता...

२. त्रैमासिक खर्च
- विमा पॉलिसीचे हफ्ते
- नवीन कपड्यांची खरेदी
- एखाद्या कार्यक्रमापोटी येणारा खर्च ( प्रवास, गिफ्ट, इ.)

३. सहा महिन्यांनी येणारा खर्च
- विमा पॉलिसीचे हफ्ते
- इतर.... (यात तुम्हाला हवे ते खर्च वाढवा)

४. वार्षिक खर्च
- यातही तुम्हाला हवे ते खर्च वाढवा)

बजेटींगसाठी २-३ एक्सेल शीट्स मायाजालावर उपलब्ध आहेत. त्यांची खरेच मदत होईन तुम्हाला

(अवांतर: सखोल कॉस्टींगच्या मागे नका लागू... मोघम बजेट जुळवता आले तरी बरीच बचत होते... असा बंगळुरात मी आल्यानंतरचा माझा तरी अनुभव आहे. आधी मी पण सखोल कॉस्टींग पहायचो... आता नाही :) )

(कॉस्टींगचा विद्यार्थी) सागर

दशानन's picture

31 Aug 2009 - 6:33 pm | दशानन

अरे.... सेम टु सेम माझाच प्रतिसाद.... फक्त मी अजून टंकला नव्हता... !

;)

अवांतर : सागर, च्।आन आयडीया आहे .. ह्यावेळी मी पण करुन बघावे म्हणतो कॉस्टींग !

सागर's picture

31 Aug 2009 - 7:26 pm | सागर

...

अवांतर : सागर, च्।आन आयडीया आहे .. ह्यावेळी मी पण करुन बघावे म्हणतो कॉस्टींग !

राजे तुम्ही कशा-कशाचे कॉस्टींग करणार?
हिशेबातच महिना जाईन तुमचा :D
दर तीन महिन्यांमागे एखादे हाड मोडून घेता आहात.. ;)

अगदी भन्नाट कल्पना डोक्यात घोळत असतील तर कॉस्टींग वर एक खास लेख लिहा...

कॉस्टींग (कॉस्ट-कटींग) मुळे वैतागलेला - सागर
यातला क र्‍हस्व आहे ;)

अवलिया's picture

31 Aug 2009 - 7:05 pm | अवलिया

२. त्रैमासिक खर्च
- विमा पॉलिसीचे हफ्ते

३. सहा महिन्यांनी येणारा खर्च
- विमा पॉलिसीचे हफ्ते

तरीच... मराठी संकेतस्थळाचे कॉस्टिंग जमते !

--अवलिया
============
यॉर्कर भल्याभल्यांची दांडी उडवतो... म्हणुन पक्षपाती पंच त्याला नोबॉल ठरवतात.

सागर's picture

31 Aug 2009 - 7:27 pm | सागर

नाना आले :)

दशानन's picture

31 Aug 2009 - 7:38 pm | दशानन

हाच हाच विचार मनात आला होता... पण तुम्ही टंकला !

मी राजे "मनकवडा" दिसतोय असे दिसतेय एकंदरीत ;)

वेदश्री's picture

31 Aug 2009 - 8:33 pm | वेदश्री

सागर,
हा काथ्याकूट कॉस्टींगबद्दल आहे, बजेट ठरवण्याबद्दल नाही. सखोल आणि काटेकोर बजेट ठरवण्यातच नाही तर तसे ते व्यवहारात अवलंबायलाही मी अगदी पटाईत आहे.

कॉस्टींगचा अगदीच सरधोपट अर्थ घ्यायचा झाला तर अमुक एक वस्तू निर्माण करण्यासाठी येणारा एकंदर खर्च.

आपण मदत करण्याचा प्रामाणिक प्रयत्न केलाय असे वाटत असूनही सांगावे लागतेय की तुमचा प्रतिसाद हा अवांतर आहे. असो.

सागर's picture

31 Aug 2009 - 8:51 pm | सागर

माझे टंकन वाया गेले... =))

पण माझा प्रयत्न प्रामाणिक होता .. तुमची डिमांड नक्की कळाली नाही म्हणून हा घोळ...

अनुभवावरुन सांगतो - कॉस्टींग हा डोक्याचा भुगा पाडणारा विषय आहे. ग्रॅज्युएशनच्या वेळी मी ३ वर्षे चांगला कीस पाडला आहे... :)
आता कॉस्टींगच्या नावाने पण अंगावर शहारा येतो...

सागर

शैलेन्द्र's picture

31 Aug 2009 - 8:59 pm | शैलेन्द्र

सोप आहे हो,

दोन प्रकार होतात त्यात,

फिक्सड खर्च आणि व्हेरिएबल खर्च.

जेवणा संदर्भात फिक्सड कॉस्टींग मधे फार काही येत नाहि.
फक्त गॅस घेण्याचा खर्च.(शेगडी, सीलेंडर नाही.) व भांडे.. त्या खर्चावर वार्षीक ३०% डेप्रिशीअश्न पकडा. व त्या खर्चाला १२ ने भागुन महीण्याचा खर्च काढा. त्यात शेगडीच्या रकमेवर लागलेले(किंवा लागु शकले असते असे व्याज मिळवा. हे झाले फिक्स खर्च)

आता बदलते खर्च, जसे वाणसामान,भाजी, गॅस, ने आणन्याचा खर्च, नुकसान, (हवे असल्यास तुमची स्वतःची मजुरी), हे सगळे बदलते खर्च कारण तुम्ही स्वयंपाक केलात तरच हे खर्च होणार. हे तुमच्या खर्‍या ऊपयोगानुसार बदलणार. हा सगळा महीण्याचा खर्च काढा.

आता दोघंची बेरीज करा. जो येइल त्या खर्चाला तुम्ही महिण्यात किती वेळा स्वयंपाक केला त्याने भागा म्हणजे तुम्हांला एका वेळच्या जेवणाचे कॉस्टींग मीळेल.

जर हा तुमच्या बाहेरील जेवणाच्या खर्चाहुन जास्त असेल तर यु आर इन लॉस. :)

now remember one more thing...

cost = expenses incurred

&

value= cost + perceived benefits...

so decide, if u want to find out cost or value?

नितिन थत्ते's picture

31 Aug 2009 - 8:10 pm | नितिन थत्ते

गुगलून काढावे असे कॉस्टिंगमध्ये गहन काहीच नसते. वर लोकांनी खर्च लिहायला सांगितला आहे तेच बरोबर आहे. त्यावरून कॉस्टिंग काढता येईल.

(तुम्हाला १ वेळच्या क्ष माणसांच्या जेवणाचे कॉस्टिंग का काढायचे आहे ते कळले नाही. असे कॉस्टिंग करणे फार अवघड आहे कारण कॉमन खर्चापैकी किती जेवणावर झाला याचे अ‍ॅपोर्शनिंग करता येणार नाही)

नितिन थत्ते
(पूर्वीचा खराटा)

मिसळभोक्ता's picture

31 Aug 2009 - 10:36 pm | मिसळभोक्ता

तुम्ही स्वयंपाकात (आणि किराणा आणण्यात, भांडी घासण्यात) जो स्वतःचा वेळ खर्च करताहात, त्याचाही समावेश करा, म्हणजे डबा लावणे स्वस्त आहे, हे कळेल.

(शनवारचा अख्हा दिवस गुगलण्यात घालवल्यामुळे त्या दिवसाचाही खर्चात समावेश करा. म्हणजे हाटेलात खाणे परवडेल. इतर अनेक मिपाकरांचा - विशेषतः आमचा - वेळ ह्या काथ्याकुटात खर्च केल्यामुळे फाइव्ह स्टार हाटेलात जेवणे परवडले असते तुम्हाला.)

-- मिसळभोक्ता

विजुभाऊ's picture

1 Sep 2009 - 9:28 am | विजुभाऊ

ग्लोबल व्हीलेज च्या आऊट्सोर्सिंग च्या कॉन्सेप्ट मध्ये असे म्हंटले आहे की
तुमची ज्यात कोअर कॉम्पिटन्सी असेल त्यावर्च लक्ष्य द्या. उगाच प्रत्येक गोष्ट स्वतः करण्याचा अट्टहास धरु नका.
म्हणजे तुम्ही स्वैपाक जेवढ वेळ घालवता तेवढ्या वेळात तुम्ही ज्यात तज्ञ आहात अशा कामवर लक्ष्य केंद्रीत करा. स्वैपाक ही अ‍ॅक्टीव्हीटी आऊट्सोर्स करा. (ते काम ज्यात तुमची कोअर कॉम्पिटन्सी नाही असे काम करण्यात वेळ आणि कष्ट वाया घालवु नका)
असे केल्याने प्रॉडक्ट ची क्वालीटी आणि प्रॉडक्टव्हीटी मेन्टेन करता येते)

पास हा शब्द जर इंग्रजी असेल तर नापास हा शब्द कोणत्या भाषेतला आहे

अवलिया's picture

1 Sep 2009 - 9:37 am | अवलिया

अगदी हेच म्हणतो.. हल्ली शायर कथालेखन का करतात हा मला पडलेला प्रश्न आहे.

--अवलिया
============
यॉर्कर भल्याभल्यांची दांडी उडवतो... म्हणुन पक्षपाती पंच त्याला नोबॉल ठरवतात.

सखाराम_गटणे™'s picture

1 Sep 2009 - 9:42 am | सखाराम_गटणे™

+२
आणि किर्तनकार सॉफ्ट्वेअर कंपनी का चालवतात, हा मला पडलेला प्रश्न आहे.

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

1 Sep 2009 - 10:29 am | ३_१४ विक्षिप्त अदिती

पोटाचा, तब्येतीचा प्रश्न येतो तिथे कोअर कंपीटन्सीचा काय संबंध?? शिवाय एकच एक गोष्ट करून कंटाळा येईल, एफिशियन्सी कमी होईल त्याचं काय??

कोर कंपिटन्सी नसलेली सगळीच कामं आऊटसोर्स करायची का?? ;-)

अदिती

शाहरुख's picture

1 Sep 2009 - 10:47 am | शाहरुख

हा हा हा :-D

मग हे ही काम आउटसोर्स केलं तर चालेल का? :W
पोटाच्या प्रश्नात कसली आलीये कोर एफीशिअन्सी? उगा आपलं काहीतरी मॅनेजमेंट फंडे मारायचे झालं! X(
कामं आउटसोर्स करणारे पुख्खा झोडायला मात्र बरे वेळेवर येतात? :?
(खरं तर इथे आणखी बरेच फंडू विचार मनात येताहेत पण जाऊदे... :B )

जेवण बनवणे हे एक अतिशय आनंदाचे काम असते. हां कंटाळा येतो, मी नाही म्हणत नाही, पण नवरा-बायकोने बरोबर जेवण तयार करणे हा एक वेगळाच विरंगुळा असतो. शिवाय पौष्टिक आणी ताजे अन्न मिळून तुमची तब्बेत निश्चितच चांगली रहाते. तुम्ही एकटे असाल तर कोणी मित्र मैत्रीण बरोबर घेऊन जेवण बनवा, कधी कोणी शेजारच्या काकू-मावशी-ताईंना बोलवा. एक क्रिएटिव काम केल्याचा आनंद असतो.

(बल्लव)चतुरंग

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

1 Sep 2009 - 12:30 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती

(खरं तर इथे आणखी बरेच फंडू विचार मनात येताहेत पण जाऊदे...)

मग एक विडंबन होऊन जाऊ द्या!! ;-)

अदिती

मिसळभोक्ता's picture

2 Sep 2009 - 2:33 am | मिसळभोक्ता

तुम्ही एकटे असाल तर कोणी मित्र मैत्रीण बरोबर घेऊन जेवण बनवा, कधी कोणी शेजारच्या काकू-मावशी-ताईंना बोलवा. एक क्रिएटिव काम केल्याचा आनंद असतो.

शेजारणी बरोबर क्रियेटिव्ह काम करणे, म्हणजे मार खाण्याची लक्षणे आहेत !

त्यापेक्षा हाटेलात जाणे सेफ !

-- मिसळभोक्ता

शाहरुख's picture

2 Sep 2009 - 3:35 am | शाहरुख

शेजारणी बरोबर क्रियेटिव्ह काम करणे, म्हणजे मार खाण्याची लक्षणे आहेत !

डिपेंडस् :-D

चतुरंग's picture

2 Sep 2009 - 4:18 am | चतुरंग

तसेही होऊ शकते, क्रिएटीविटीची डेफिनिशन काय आहे त्यावर ते अवलंबून असेल! ;)

(क्रिएटिव)चतुरंग

अभिज्ञ's picture

1 Sep 2009 - 9:41 am | अभिज्ञ

एकट्याच रहात असाल तर बाहेर खाणे/जेवणाचा डबा हे सर्वात स्वस्त पडते.
एक बदल म्हणून कधीतरी घरी स्वयपाक करू शकता परंतु एका माणसाकरीता ते कधीच स्वस्त पडत नाही.

मी स्वतः १० वर्षे एकटा राहून हे सर्व प्रकार करून पाहिलेले आहेत.
ह्याबद्दल माझे निरिक्षण असे.
१. एकट्या करीता जरी स्वयपाक करणार असाल तरी ब-याच गोष्टी जमवाव्या लागतात.त्यात बरेच भांडवल खर्ची पडते.
जसे गॅस, भांडी, कुकर, ताटे,पॅन,.......
२. लागतील म्हणून बरेचसे पदार्थ खरेदी केले जातात
जसे साबुदाणा, पोहे, रवा, भाजणी, तांदुळ, गव्हाचे पीठ, मैदा,तुर डाळ्,चणा डाळ,मुग डाळ ........
३. ह्यातल्या ब-याचशा गोष्टी पुर्ण पणे वापरल्या जात नाहीत.
त्या एकतर खराब होउन वाया जातात, वा तशाच पडून राहून शेवटी फेकून दिल्या जातात.
४. हे करून पाहू- ते करून पाहु वगैरे विचार करून बरेचसे मसाले/पदार्थ घेतले जातात जसे पावभाजी मसाला,फिश करी मसाला,पास्ता, ....
ह्यापैकी प्रत्यक्षात फारच कमीवेळा ह्यांचा वापर केला जातो.
५. घरीच स्वयपाक आला की मग भांडी घासणे आले, तो खर्च आला.
६. घरात जरी स्वयपाकाचे नाना पदार्थ असतील तरी आळसामुळे वा वेळेअभावी बहुतांश वेळा "मॅगी" वा "ब्रेड-ऑम्लेट" वरच काम भागवले जाते.
७. बहुतांश वेळेला जेवण झाल्यावर स्वयपाक उरतोच व ९०% वेळेला तो फेकुन दिला जातो.
८. चहाला लागते म्हणून मग दुध वगैरे आणले जाते. बहुतांश वेळा हे दुध शिल्लक राहून नासतेच.
९. मुख्य खर्च म्हणजे "वेळ". ह्या सर्व प्रकारात बराच वेळ मोडतो. जसे भाजी आणणे, स्वयपाकाची तयारी करणे, स्वयपाक करणे, जेवण झाल्यावर परत तिथली साफसफाई करणे,भांडी घासणे वगैरे ठिकाणी बराच वेळ वाया जातो.

हे सर्व अनुभव घेतल्या नंतर एका माणसाकरीता जेवायचा पर्याय विचाराल तर बाहेर जेवणे हे सर्वात उत्तम.अर्थात जिथे जेवणार असाल ते हॉटेल चांगले असेल हे अपेक्षित.

अभिज्ञ.
--------------------------------------------------------
पॉझिटिव्ह थिंकिंग....? अजिबात जमणार नाहि.

सखाराम_गटणे™'s picture

1 Sep 2009 - 9:45 am | सखाराम_गटणे™

>>घरात जरी स्वयपाकाचे नाना पदार्थ असतील तरी आळसामुळे वा वेळेअभावी बहुतांश वेळा "मॅगी" वा "ब्रेड-ऑम्लेट" वरच काम भागवले जाते.
जेवण करायला कोणी ठेवले तर??
थोडासा महाग पर्याय आहे.

अवलिया's picture

1 Sep 2009 - 9:49 am | अवलिया

त्यापेक्षा ठेवलेल्याला जेवण करायला लावले तर... सोपा पर्याय आहे.

--अवलिया
============
यॉर्कर भल्याभल्यांची दांडी उडवतो... म्हणुन पक्षपाती पंच त्याला नोबॉल ठरवतात.

दशानन's picture

1 Sep 2009 - 9:45 am | दशानन

छान !

गुड !

पण राव... प्रयोग करायला काही तरी वाव मिळावा म्हणून घरी वरील सामान असावे असे माझे मत आहे, तुम्ही काय म्हणता ? कधी किचन मध्ये प्रयोग केले आहेत ? गोड मोदक तर सर्वजण तयार करतात मी परवा खारट मोदक तयार केला :D नवीन गोष्टीचा उदय असाच होतो.. तेव्हा त्यांना परावृत करु नये...

अवलिया's picture

1 Sep 2009 - 9:47 am | अवलिया

तु़झ्या घरातील 'सामानांची' यादी दे बरे जरा !

--अवलिया
============
यॉर्कर भल्याभल्यांची दांडी उडवतो... म्हणुन पक्षपाती पंच त्याला नोबॉल ठरवतात.

सुबक ठेंगणी's picture

1 Sep 2009 - 9:53 am | सुबक ठेंगणी

घरात जरी स्वयपाकाचे नाना पदार्थ असतील तरी आळसामुळे वा वेळेअभावी बहुतांश वेळा "मॅगी" वा "ब्रेड-ऑम्लेट" वरच काम भागवले जाते.

किंवा बाहेरून तयार पदार्थ विकत आणले जातात.

बहुतांश वेळेला जेवण झाल्यावर स्वयपाक उरतोच व ९०% वेळेला तो फेकुन दिला जातो.

किंवा पुढे शिळा सप्ताह किंवा`वांगी सप्ताह` साजरे करावे लागतात.

ह्या दोन्हीमुळे तब्येत आणि मूडही खराब होतो.

(ह्याउलट घरी केलंच नाही की 'कॉस्टिंगसारखे गहन प्रश्नही पडत नाहीत. :P )

पर्नल नेने मराठे's picture

1 Sep 2009 - 12:30 pm | पर्नल नेने मराठे

७. बहुतांश वेळेला जेवण झाल्यावर स्वयपाक उरतोच व ९०% वेळेला तो फेकुन दिला जातो.

मी रात्री टिफ्फिन लावलाय, २ भाज्या असतात, त्यात १ नावडती असते,सलाड पन खुप असते, ते उरते. कधी कधी पोळी १च खाल्ली जाते. सो उरलेले सगळे मी फ्रिज करुन सकाळी ऑफीसला येताना प्युनला आणते. त्याला फक्त १-२ दिरामची ऱोटी/खबुस विकत घ्यावे लागते. त्यात त्याचे पुर्ण लन्च होते. कधी कधी मी विसरते, तेव्हा तो विचारतो. म्हण्जेच त्याला जेवण आवडते.
मुम्बैत अस्ताना मी माझ्या बाइला देत असे, तिचा सकाळ्चा ब्रेक्-फास्ट होइ.
क्रुपया अन्न टाकु नका, "अन्न हे पुर्ण ब्रह्म."

चुचु

सुधीर काळे's picture

2 Sep 2009 - 6:32 am | सुधीर काळे

ब्राव्हो, चुचु! You are great!! अनुकरणीय उदाहरण आहे. अन्न तर वाया जात नाहींच, पण गरीबाचं पोट भरतं.
'दिराम'वरून तू मध्यपूर्वेत काम करतेस असं दिसतंय. झकास. आपल्या देशाचं नाव उज्ज्वल करते आहेस यात शंका नाहीं.
सुधीर
------------------------
छत्रपती शिवाजी आंतरराष्ट्रीय विमानतळावर मराठी भाषेतील फलक लागलेच पाहिजेत.

१.५ शहाणा's picture

1 Sep 2009 - 9:43 am | १.५ शहाणा

बजेटींगसाठी २-३ एक्सेल शीट्स मायाजालावर उपलब्ध आहेत.
काही दुवा महित आहे का ?

दशानन's picture

1 Sep 2009 - 9:49 am | दशानन

माझ्याकडे आहे बजेटींगसाठी एक्सेल फाईल !

कुणाला हवे असेल तर rj.jain@gmail.com मेल करा !

समाजसेवक !

राजे ;)

१.५ शहाणा's picture

1 Sep 2009 - 9:51 am | १.५ शहाणा

समान म्हणजे किरणा सामानच ना?

JAGOMOHANPYARE's picture

1 Sep 2009 - 12:30 pm | JAGOMOHANPYARE

अभिज्ञ शी सहमत..... अन्न नासाडी हा प्रमुख भाग आहे... पण हा हळू हळू समजतो व टाळता येतो........ त्यामुळे लगेच पहिल्या महिन्यात खर्चाचे एक्सेल मान्डायच्या फन्दात पडू नका..... तसेच टिपिकल पाच पन्नास पदार्थ असलेले ताट विसरा.... सिन्गल आयटम फूड वर लक्ष केन्द्रीत करा, निदान सकाळी तरी... सन्ध्याकाळी पोळी, भाजी, कोशिम्बीर असा थाट्माट कदाचित जमवू शकाल... गेला एक महिना प्रयोगानन्तर मला दुपारच्या डब्यासाठी चान्गली डिश तयार करता आली... १. भात करा.. त्यातच ( रात्रभर भिजवलेली) कुठलीही डाळ टाका, आवश्यकतेनुसार भाज्याही टाका आणि हे सर्व उकडून घ्या. फक्त मीठ घाला.. २. नन्तर दही ( इथे योगर्ट मिळते) घालून दही भात करा... ३. फोडणी गरम करून मिसळा.... २०- २५ मिनिटात डबा तयार होतो..... याचा एक फायदा म्हणजे दुपारी गरम करायला लागत नाही.... गार भात, भाज्या, वरण खाववत नाही मला तरी. ओवनसाठी ऑफिसमध्ये झुम्बड असते.... .. पण हा दही भात असल्याने प्रॉब्लेम नाही... बरोबर गाजर, काकडी, एखादे फळ , लोणचे पुरेसे आहे... डाळ, कडधान्ये भाताबरोबरच स्वाहा होतात... न्यूट्रीशन महत्वाचे आहे, विसरू नका... सकाळी सन्ध्याकाळी चहा घरी असेल( म्हनजे ऑफिसमध्ये नसेल तर) ब्रेड एक दोन स्लाईस... एवढे ब्रेड तुम्ही ऑफिस मध्येही नेऊ शकाल.. हे दिवस भर पुरेसे ठरते.... रात्री उपलब्ध वेळेनुसार पहा.. मला पिठले भात, वरण भात, कढी भात योग्य वाटते.बरोबर एक ग्लास दूध... . ( मालदीव मध्ये बेसन पीठ मिळत नाही... :( .. मी महिनाभर वण वण करत आहे, त्यासाठी .. अजून नाही मिळाले मला :( ...) शक्यतो अन्न नासवू नका... शिजवलेले अन्न पूर्ण सम्पवावे या मताचा मी आहे.. कमीच असावे... पूर्वी खेड्यात अचानक येणारे पाहुणे, साधू, शेवटची गाडी चुकली म्हणून राहिलेले मित्र.. असले प्रकार असायचे म्हणून अन्न जास्त शिजवावे, हे समजू शकते... असे रात्री उरलेले अन्न खायला भिक्षेकरी, कुत्री, गायी असे पर्यायही दुसर्‍या दिवशी खेड्यात मिळायचे व हे अन्न रोजच्या रोज त्यानाच दिले जायचे... पण शहरात ही जास्त अन्नाची परम्परा साम्भाळायची आणि दुसर्‍या दिवशी पुन्हा शिळे अन्न आपणच खायचे , ही मेन्टॅलिटी मला न समजणारी आहे... अचानक आलेल्याला फळे, दूध, बिस्किटे, ब्रेड असे पर्याय असतातच की!

आमच्या ऑफिस मध्ये मुलीनी राईस कुकर ठेवला आहे... त्यात दुपारी त्या भात करतात १० ते १५ मिन. लागतात .आणि सॅलड.. बाहेरून फक्त चिकन्/फिश करी आणतात...

स्वता स्वयपाक केल्याने खर्च कमी येतो, हे निश्चित आहे... पण हे वाचलेले पैसे फळे आणि दूध यात गुन्तवणे हे भविष्याच्या दॄष्टीनी चान्गले आहे.. ( मी डॉक्टर आहे, पण मी इन्शुरन्स कम्पनीत मेडिक्लेम सेक्शन मध्ये काम करतो... त्यामुळे लोक निरोगी राहण्यात माझा जास्त फायदा आहे.. तेवढेच भविष्यात क्लेम कमी होतील !)

तेन्नालीराम's picture

1 Sep 2009 - 3:03 pm | तेन्नालीराम

मॅडम,
ज्याला डब्यातले जेवण आवडते त्याने कधीही घरी स्वयंपाक करू नये. कशाला करायचा? मी तरी असे कधीही करत नाहीं. कारण भांडी घासणे वगैरे गोष्टी स्वयंपाकापेक्षा भयंकर असतात. तुम्ही नोकरी करत असाल आणि एकट्या रहात असाल तर भांडी घासायला मोलकरीण येणार कधी असाही प्रश्न येतोच.
पण डब्यातले जेवण आवडत नसेत तर करावा आपला-आपला स्वयंपाक! तो प्रॉब्लेम नसेल तर आरामात दुसर्‍याने रांधलेले जेवण जेवावे. खर्च हा महत्वाचा मुद्दा नाहीं.
ते. रा.

विश्वजीत's picture

4 Sep 2009 - 1:29 am | विश्वजीत

तुमचा पुढचा काथ्याकूट काय असणार त्याचे अंदाज :

१. मोलकरीण की डिशवॉशर
२. नाक्यावरचा फळवाला की मार्केटयार्ड
३. वरण फोडणीचे करावे की भात फोडणीचा करावा
४. भात करपला तर तो अनुभवांच्या डायरीत नोंदवावा का हिशेबाच्या

JAGOMOHANPYARE's picture

6 Sep 2009 - 10:19 am | JAGOMOHANPYARE

त्याच्या पुढचा काथ्याकूट...

झुरळ, माश्या, उन्दीर यानी खाल्लेल्या अन्न्नाचे एक्सेल कसे ठेवावे.. ? :)