माझ्या देशाचे नाव भारत आहे.

mahalkshmi's picture
mahalkshmi in काथ्याकूट
4 Aug 2009 - 8:08 pm
गाभा: 

भारत माझा देश आहे.
हिन्दुस्तान का म्हणायचे?
भरत हा दुश्यन्त आणी शकुन्तला यान्चा मुलगा होता.भरत हा एक महान चक्रवर्ती राजा होता.त्याच्यामुळे आपल्या देशाला भारत हे नाव मिळाले आहे.
स्तान हा शब्द परशियन अथवा फारसी मधुन आला असावा.कारण बहुतेक मुसलमान देशान्ची नावे अशी आहेत,पाकीस्तान,अफगाणीस्तान,
उझबेकीस्तान,कझाकस्तान,ताजीकीस्तान,किरगीझस्तान इत्यादी.

प्रतिक्रिया

Dhananjay Borgaonkar's picture

4 Aug 2009 - 8:15 pm | Dhananjay Borgaonkar

हिंदुस्तान का म्हणायचे..

स्तान या शब्दाचा अर्थ तेथील रहीवासी..हिंदुस्तान म्हणजे हिंदू रहतात ती जागा..

मला नाही वाट्त हिंदुस्तान म्हटल्याने भारता बद्द्लचा आदर कमी होत असेल..
तात्याराव सावरकर नेहमी हिदुस्तान असाच उल्लेख करीत असत..

छोटा डॉन's picture

4 Aug 2009 - 8:45 pm | छोटा डॉन

मला वाटते योग्य शब्द "हिंदुस्थान" असा आहे, " हिंदुस्तान" नव्हे ...

"स्थान" ह्य शब्दाचा सर्वमान्य अर्थ "वस्ती करण्याची जागा, निवासाची जागा , अनेक लोक रहात असलेली जागा " असा आहे ...

ह्या परिस्थीतीत उपरोक्त भागात बहुसंख्य हिंदु रहात असल्याने त्याला "हिंदुस्थान" असे म्हणले जाते.
----------------------------------------
आता दुसरी थेअरी :

पुराणकाळी "सिंधु नदीच्या काठावर" बहुसंख्य "आर्य लोकांची" वसती होती, इथेच आर्यांची संस्कॄती विकसीत झाली व त्यांची एक स्वतंत्र ओळख निर्माण झाली.
ह्या प्रदेशाला "सिंधुस्थान" असे म्हणत.

ह्या प्रदेशात राहणार्‍या लोकांचा संबंध जेव्हा अरबी लोकांशी आला तेव्हा अरबी लोकांनी ह्या प्रदेशाला "हिंदुस्थान" असे संबोधायला सुरवात केली कारण अरबीमध्ये "स" चा उच्चार काही ठिकाणी "ह" असा करतात ...
सो, सिंधुस्थानचे झाले हिंदुस्थान ...
ओघानेच ह्या प्रदेशात रहाणारे लोक झाले ... हिंदु ...

चुभुदेघे ..!!!

------
छोटा डॉन

विशाल कुलकर्णी's picture

5 Aug 2009 - 11:57 am | विशाल कुलकर्णी

डानरावांशी पुर्णपणे सहमत !

(कट्टर हिंदुस्थानी)विशाल
*************************************************************
मज पिसे लागलेले सुखांचे
गे हलकेच धुके ओसरते आहे...

आशिष सुर्वे's picture

4 Aug 2009 - 8:34 pm | आशिष सुर्वे

http://en.wikipedia.org/wiki/Hindustan
-
कोकणी फणस

''आयुष्य ही देवाच्या हातची मिसळच जणू.. सुख-दु:खाची!''

विकास's picture

4 Aug 2009 - 9:41 pm | विकास

स्थान हा शब्द माझ्या माहीतीप्रमाणे संस्कृतोद्भव आहे. त्याचा अर्थ आपल्याला माहीत असेल अशी आशा करतो. अनेक संस्कृतोद्भव शब्द हे इतर भाषांमधे मुळ असल्यामुळे इतर अनेक वाद-विवाद आणि चर्चा घडतात (आर्य-अनार्य, इंडो-युरिपिअन्स वगैरे). त्या तुर्तास टाळून इतकेच म्हणू इच्छितो की हा शब्द फार्सी नाही. किंबहूना फार्सीमधे स्थान अथवा स्तान असलेले शब्द दिसणार नाहीत जितके भारतीय भाषांमधे आहेत.

भारत माझा देश आहे. हिन्दुस्तान का म्हणायचे?

याच बरोबर "इंडीया" पण का म्हणायचे असे म्हणाला असता तर बरे झाले असते. :-)

त्या आधी हल्लीचा भूभाग (नेमका हाच भूभाग) असलेल्या देशाचे नाव भारत नव्हते.

त्यापूर्वी मराठी वर्तमानपत्रांत "हिंद/हिंददेश" असा उल्लेख पुष्कळदा दिसे. "जयहिंद" या नार्‍यामध्ये हे नाव अजून प्रचलित आहे.

घटनेने निर्देश केलेल्या देशाचे नाव द्यायचे असेल तर "भारत" किंवा "इंडिया" असे म्हणणे योग्य आहे. काही वैशिष्ट्यपूर्ण ऐतिहासिक संदर्भांत "हिंदुस्थान/हिंदोस्तान" वगैरे नमोनिर्देश ठीकच आहे.

("हिंदुस्थान" शब्द प्राचीन संस्कृत वाङ्मयात सापडत नाही. तो बहुधा आधुनिक १००-२०० वर्षांच्या इतिहासाचा शब्द असावा. हिंदोस्तां शब्द त्या मानाने थोडा जुना असावा. त्या-त्या ऐतिहासिक संदर्भात हे शब्द वापरणे ठीकच आहे. त्या नावाच्या देशांच्या सीमा वगैरे वेगळ्या होत्या. काटेकोर उल्लेख करायचा नसेल तरी ही नावे वापरलेली दिसतात.)

शाहरुख's picture

5 Aug 2009 - 9:15 am | शाहरुख

>>घटनेने निर्देश केलेल्या देशाचे नाव द्यायचे असेल तर "भारत" किंवा "इंडिया" असे म्हणणे योग्य आहे

यातील अधिकृत नाव कोणते ??
खूप जुने कुतूहल आहे :-)

सुनील's picture

5 Aug 2009 - 9:47 am | सुनील

भारताचे अधिकृत नाव आहे - Republic of India अर्थात भारतीय गणराज्य.

घटनेतील उल्लेख असा आहे - India, that is Bharat.

Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.

अश्विनीका's picture

5 Aug 2009 - 1:12 pm | अश्विनीका

>>घटनेतील उल्लेख असा आहे - India, that is Bharat.
पण मग जागतिक स्तरावर इंडिया ह्या इंग्लिश नावापेक्षा
भारत हे नाव का नाही प्रचलित केले गेले?
- अश्विनी

चिरोटा's picture

5 Aug 2009 - 1:51 pm | चिरोटा

ईतिहासकारांनी ग्रंथांमध्ये India असा उल्लेख केला असावा.India हा शब्द हिंदुस्थान वरुनच आला असण्याची शक्यता आहे. जसे मुंबईचे Bombay/वाराणसीचे बनारस केले.
भेन्डि
क्ष्^न + य्^न = झ्^न

धनंजय's picture

5 Aug 2009 - 7:48 pm | धनंजय

शब्दांची जोडी इंडिया/हिंद अशी आहे.

(हिंदुस्तानवरून "इंडोस्टान" हा शब्द काही काळासाठी इंग्रजीत गेला होता, क्वचित एखाद्या इंग्रजी कवितेत वाचायला मिळतो. पण "हिंद/इंद/इंदिया/इंडिया" शब्द पूर्वीपासून दिसतात.)

लिखाळ's picture

5 Aug 2009 - 7:52 pm | लिखाळ

पूर्वीपासून म्हणजे साधारण कधी पासून? तसेच इंडिया हे नाव भारतभूमीवरील लोकांनी स्वतःला घेतले आहे की इतरांनी दिले आहे? भारत हेच एक नाव बहुधा स्थानिकांनी दिलेले असावे असे वरील मते वाचून वाटले. कृपया प्रकाश टाकावा.
-- लिखाळ.

पण या भूमीवरच्या लोकांनीच दिले की नाही हा प्रश्न मात्र फारच गुंतागुंतीचा.

नदीचे हे सिंधु/हिंद नाव वैदिक आणि अवेस्त्याच्या काळातले आहे. (हा काळ कुठला? आजपूर्वी ३-५ हजार वर्षांपूर्वीचा. "आदमासे" हे सांगायची गरज नाही. पण "आदमासे" म्हणजे १०००-५०० वर्षांपूर्वीइतकाही सैलपणा नाही.) त्या काळात आर्यभूमी ही आजच्या पंजाबात (पुर्व/पश्चिम दोन्ही) आणि आजच्या अफगानिस्तान/ईरान अशी विस्तरलेली होती. वेगवेगळ्या नद्यांची नावे, त्यांचे उच्चार ते त्या काळी या भागातले.

जुन्या वायव्य आर्यभाषेत "ह" उच्चार आणि पूर्व दिशेचा "स" उच्चार एकमेकांना समांतर.
अफगानिस्तानातील हेलमंद (जुनी) हरह्वती<-> संस्कृतात सरस्वती
अवेस्त्यातील अहुर <-> संस्कृतातील असुर
(दर्या) हिंद<->सिंधु (नद)

(१९४७-नव्या भारताच्या हद्दीत प्राचीन काळी वापरत असलेल्या) प्राकृतातही स->ह झालेला दिसतो. (हा प्राकृत काळ आजपूर्वी २५००-१५०० वर्षांपूर्वी.)
(संस्कृतातले) अस्मे -> (प्राकृतातील) अम्हे -> (मराठीतील) आम्ही

त्यामुळे स<->ह सामांतर्य हे केवळ हल्लीच्या भारताच्या हद्दीबाहेरचे नाही. त्यामुळे सिंधुचे "हिंद" करणारे लोक "या भूमीतले" होते की नाही हा प्रश्न मोठा गुंतागुंतीचा आहे. "या भूमीतले" याचा अर्थ तुमचा तुम्ही ठरवा, आणि उत्तरही त्या निर्णयावर अवलंबून राहील.

पण या सिंधु/हिंद नदीच्या बाजूच्या प्रदेशाचे नाव "हिंद" असे मात्र संस्कृत वाङ्मयात दिसत नाही. फारसी वाङ्मयात दिसते.

युरोपाला (वास्को दा गामा पूर्वी) या "हिंद" देशाची ओळख होती ती रेशमाच्या रस्त्यामार्फत, म्हणजे पर्शियामार्फतच. (फार पूर्वीचा सिकंदरही पर्शिया जिंकूनच मग येथे आला.) त्यांनी "हिंद" नावच स्वीकारले.

युरोपियन लॅटिनोद्भव भाषांत "ह"चा लोप होतो. जसे
हेलियोगबालस->इलागबालस
हेड्रियन -> एड्रियन
तसेच
हिंद -> इंद

युरोपातील कित्येक भाषांमध्ये देशांच्या नावांना स्त्रीलिंग आणि तसे प्रत्यय लागतात. म्हणून ज्या भाषांमध्ये -आ स्त्रीलिंगी प्रत्यय असतो, त्या भाषांत इंद-> इंदिया (. फ्रेंच मध्ये स्त्रीलिंगी शब्द "इंद->अ‍ॅंद" असाच आहे, असाच वापरला जातो.) इंग्रजीत युरोपखंडातल्या भाषांमधली -इया अंत्य प्रत्यय असलेली देशांची नावे स्वीकारली गेली (आर्मेनिया, रशिया, वगैरे. फ्रेंचमध्ये आर्मेनीऽ(अ), रूस वगैरे.)

इंग्रजीत दंत्य "द" नाहीच, दंततालव्य उच्चारतात. तो इंग्रजी उच्चार मराठी-देवनागरीत लिहिता येत नाही. भारतात इंग्रजी d "ड" असा उच्चारतात (मूर्धन्य). त्यामुळे इंग्रजी India शब्दाचा जो "इंडिया" उच्चार आहे, तो सध्याच्या भारतभूमीत राहाणार्‍या लोकांनीच केलेला आहे.
- - -
असो. तुमच्या प्रश्नाचे उत्तर देण्यासाठी "येथील लोक" म्हणजे कुठल्या काळातले, आणि "येथे" म्हणजे कुठली भूमी, हे ठरवणे महत्त्वाचे. वरील पसार्‍यात तुम्हाला हवे ते उत्तर सापडले का?

विजुभाऊ's picture

7 Aug 2009 - 12:52 pm | विजुभाऊ

धनन्जयशी सहमत. इतर समाजाच्या लोकाना चालिरीतीना नावे ठेवण्यासाठी त्यांच्या देवतांवर टीका टिप्पणी करणे हा तर इथला समभाव आहे म्हणून तर झेंद अवेस्था मधला अहूरमझ्दा हा असूर बनून इथे आला.
"बुद्ध" हा शब्द सुद्धा हिन्दीत बुत ( पुतळा) तसेच बुद्धु असा होऊन आला.
साधारण पाम्डवकालात भरतवर्ष नावाचा प्रदेश काश्मिर् हिमाचल या दरम्यान होता( त्या प्रदेशाचे तसे नाव होते) आणि स्वर्ग तिबेटात होता.
उदा: पांडव त्रिविष्ठपास (स्वर्गात)गेले असे उल्लेख आहेत.
भरतवर्ष या शब्दापासून भारत हा शब्द प्रचलीत झाला

पास हा शब्द जर इंग्रजी असेल तर नापास हा शब्द कोणत्या भाषेतला आहे

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

7 Aug 2009 - 12:59 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती

>> झेंद अवेस्था मधला अहूरमझ्दा
वरच्या चार शब्दांतले तीन शब्द माहित नाहीत. विजुभाऊंना विनंती की त्यांनी याबद्दल सविस्तर लिहावं.

असामिया भाषेतही आपल्या स चा ह होतो. पुलंनी 'गणगोत'मधे याचा उल्लेख केला आहे का?

-- हंहिता

अवलिया's picture

7 Aug 2009 - 3:21 pm | अवलिया

इतर समाजाच्या लोकाना चालिरीतीना नावे ठेवण्यासाठी त्यांच्या देवतांवर टीका टिप्पणी करणे हा तर इथला समभाव आहे म्हणून तर झेंद अवेस्था मधला अहूरमझ्दा हा असूर बनून इथे आला.

असुर इथे आला की ऋग्वेदातुन तिथे गेला ?तसे असेल तर पुरातन ग्रंथ म्हणुन गाथांना मान्यता द्यावी लागेल.. ॠग्वेदाने उगाचच ती जागा अडवली आहे.. विजुभाउंकडुन अभ्यासपुर्ण प्रतिसाद अपेक्षित आहे.

लिखाळ's picture

7 Aug 2009 - 4:55 pm | लिखाळ

धनंजय,
विस्तृत आणि माहितीपूर्ण प्रतिसादाबद्दल आभारी आहे.
तेथील लोक म्हणजे भारतीय उपखंडावर राहणारे लोक असे म्हणायचे होते. तुमचे उत्तर वाचून समजाऊन घेत आहे.
-- लिखाळ.

विशाल कुलकर्णी's picture

6 Aug 2009 - 9:39 am | विशाल कुलकर्णी

मला वाटते सिंधु नदीला इंग्रजीमध्ये इंडस असे नाव आहे, इंडसच्या काठी असलेला देश म्हणुन तर इंडिया केले नसेल. :-)
चुभुदेघे

(Confused) विशाल
*************************************************************
मज पिसे लागलेले सुखांचे
गे हलकेच धुके ओसरते आहे...

वडापाव's picture

6 Aug 2009 - 5:20 pm | वडापाव

इंडस नदी (म्हणजे सिंधू नदी) वरून इंडिया हे नाव मिळाले. इंडस नदीजवळ राहणारे ते इंडियन्स असे म्हणायची सुरुवात युरोपीयांनी केली. आज ही सिंधू नदी बहुतांशी पाकिस्तानातूनच वाहते. मग इंडिया नावाचा उदो उदो कशाला?
युरोपीयांनी भारताला इंडिया म्हटले, म्हणू देत, त्यांच्या जबानीवर आपले नियंत्रण नाही. आपल्याला भारत, हिंदुस्तान किंवा सर्वांत जुन्या आर्यावर्ताचा उच्चार नीट करता येत नाही असे आहे का?
हिंदीत अमेरिका चा उच्चार अमरिका आणि कॅनडाचा उच्चार कनैडा असा करतात. पण म्हणून अमेरिकन्स आणि कॅनेडियन्स नी हिंदीप्रमाणे आपल्या देशांची नावे बदलली नाहीत.
काहीजण वाद घालतील, की इंग्रजी ही आंतरराष्ट्रीय भाषा आहे म्हणून त्याप्रमाणे आपण इंडिया या नावाचा स्वीकार केला पाहिजे! डोंबल !! जवळजवळ दोनशे देशांत त्यांच्याच स्थानिक भाषांमध्ये सर्व कारभार चालतो.
चीनची साक्षरता एक्याण्णव टक्के आहे, पण त्यातल्या दहा टक्के माणसांना तरी धड इंग्रजी येतं का ते विचारा!
विमानसेवेतील कोणत्यातरी पदासाठी (नेमके पद आठवत नाही)इतर देशांतील उमेदवारांना बोलावल्यास त्यांना इंग्रजी भाषा येण्याची सक्ती अमेरिका व इंग्लंड येथेही नाही, पण भारतात आहे. त्यामुळे आपण सहाशे परदेशीयांकडून कर मिळवण्याची संधी गमावली.

भारतातील कॉम्युटर इंजिनीअर का असंच कोणीतरी जपानला गेले. नवे फाँट्स आणि लिपी वगैरे च्या संदर्भात काहीतरी करार होणार होता. जपान्यांनी जपानी भाषेला महत्त्व देऊन तिचा प्रामुख्याने समावेश करण्याचा आग्रह धरला. तर भारतीयांनी त्यांना समज देण्याचा प्रयत्न केला. आपण जपानी लिपी ऐवजी इंग्रजी भाषेला महत्त्व देउया. कारण ती आंतरराष्ट्रीय भाषा आहे, वगैरे वगैरे...
जपान्यांनी शांतपणे सगळं ऐकून घेतलं, आणि मग रागारागात उत्तर दिलं, "कोणती आंतरराष्ट्रीय भाषा? इंग्रजी ही आंतरराष्ट्रीय भाषा आहे असं आम्ही मानत नाही. आणि ती असेलच, तर आम्ही या जगातले नाही." याचा परिणाम असा झाला, की जे भारतीय जपानला जाताना विमानात इंग्रजीत गप्पा मारत होते, ते भारतात परतताना मराठीतून गप्पा मारत बसले.

आता आपलीच भाषा घ्यायची तर संस्कृत घ्या. राष्ट्रीय भाषा निवड समितीतील अकरा सदस्यांपैकी आठ जणांनी संस्कृत भाषेला राष्ट्रीय भाषेच्या योग्यतेचे मत दिले. या आठ जणांत डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचाही समावेश होता. तर दोन मते हिंदी व एक इंग्रजीला मिळाले. त्यावेळी ही समिती बरखास्त करण्यात आली आणि नवी समिती तयार करून हिंदीला राष्ट्रभाषेची मान्यता दिली गेली.

कोणी सांगितलं जास्तीत जास्त लोकसंख्या हिंदी भाषा वापरायची म्हणून? संस्कृत भाषा राष्ट्रभाषा असती तर एव्हाना अवघ्या भारतात संस्कृत भाषा खुलेआम बोलता आली असती. स्वत: जर्मनी मधील विद्यापीठांत संस्कृत ही सक्तीची भाषा आहे. जाऊ दे ! लिहावं तितकं थोडंच आहे.

आपला नम्र,
वडापाव

भारतीय लोकशाहीतील असामान्य नागरिक

त्यावेळी ही समिती बरखास्त करण्यात आली आणि नवी समिती तयार करून हिंदीला राष्ट्रभाषेची मान्यता दिली गेली.
कृपया याविषयी अधिक माहिती मिळेल? कारण, माझ्या अल्पमतीनुसार हिंदी ही देशाची एकमेव राष्ट्रभाषा मुळीच नाही. तेव्हा तशी ती कुठल्या समितीने कधी ठरवली हे जाणून घेण्यास उत्सुक आहे.

संस्कृत भाषा राष्ट्रभाषा असती तर एव्हाना अवघ्या भारतात संस्कृत भाषा खुलेआम बोलता आली असती
आज जी काही तोडकी मोडकी हिंदी देशभर समजली-बोलली जाते त्याचे एक प्रमुख कारण हिंदी सिनेजगत हे आहे, असे माझे मत आहे.

स्वत: जर्मनी मधील विद्यापीठांत संस्कृत ही सक्तीची भाषा आहे

जर्मनीतील सर्व विद्यापीठात, सर्व शाखांसाठी संस्कृत सक्तीची आहे, ही माहिती नव्यानेच कळली.

Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.

मिसळभोक्ता's picture

7 Aug 2009 - 1:24 am | मिसळभोक्ता

विमानसेवेतील कोणत्यातरी पदासाठी (नेमके पद आठवत नाही)इतर देशांतील उमेदवारांना बोलावल्यास त्यांना इंग्रजी भाषा येण्याची सक्ती अमेरिका व इंग्लंड येथेही नाही, पण भारतात आहे. त्यामुळे आपण सहाशे परदेशीयांकडून कर मिळवण्याची संधी गमावली.

सहाशे परदेशियांपेक्शा सहाशे देशियांकडून कर मिळाला, त्याचे काय ?

हे विवक्षित विमानसेवेतील पद कोणते ?

संगणक इंजिनियर्सने जपानबरोबर कोणता करार केला ? त्यांना तो अधिकार आहे का ?

इंग्रजी ही आंतरराष्ट्रीय भाषा आहे हे जपानी मानत नाहीत, तर मग भारतीय इंजिनियर बरोबर त्यांचा संवाद कोणत्या भाषेत झाला ?

जे भारतीय मराठीतून गप्पा मारत परत आले, ते सर्व जर मराठी नसते, तर कोणत्या भाषेत गप्पा मारत आले असते ?

राष्ट्रीय भाषा आणि राष्ट्र भाषा ह्यात फरक आहे. भारताला राष्ट्र भाषा नाही. १४ राष्ट्रीय भाषा आहेत. (ह्या चौदा भाषांमध्ये इंग्रजी नाही.) केंद्र सरकारी व्यवहाराची भाषा हिंदी (देवनागरी लिपीत लिहिल्या जाणारी) आहे. इंग्रजीचा ही वापर सरकारी व्यवहारासाठी संमत आहे.

प्रत्येक राज्याला त्यांच्या सरकारी व्यवहाराची भाषा ठरवण्याची परवानगी आहे.

(सर्व माहिती भारत सरकारच्या अधिकृत स्थळावरून साभार.)

-- मिसळभोक्ता

ऋषिकेश's picture

8 Aug 2009 - 3:45 pm | ऋषिकेश

१.

नवी समिती तयार करून हिंदीला राष्ट्रभाषेची मान्यता दिली गेली.

भारत गणराज्यातील कोणताही कायदा अथवा भारतीय घटना कोणत्याही भाषेला "राष्ट्रभाषा" म्हणत नाही. भारत केंद्र सरकारची कामकाजाची प्रथम भाषा हिंदी व द्वितीय भाषा इंग्रजी आहे. (शिवाय नंतर हिंदी व्यतीरीक्त इतर भाषांनाही वाजपेयी सरकार कामकाजाच्या अधिकृत भाषेचा दर्जा दिला)

२.
भारतात राष्ट्रीय कॉग्रेसने कामकाजात इंग्रजीचा वाढता वापर करून १९१७ पर्यंत इंग्रजीला जवळजवळ कामकाजाची भाषा करून टाकले होते. लोकमान्य टिळक तुरुंगातून सुटून आल्यावर (१९१४?) त्यांनी पुन्हा लोकजागृती भारतीय स्थानिक भाषांमधून करण्यास सुरवात केली. पुढे होमरूल चळवळीद्वारे ते व सौ.डॉ.अ‍ॅनी बेझंट यांनी भारतीय भाषा व संस्कृतीनी देश बांधण्यास बळ मिळते हे दाखवून दिले.

दरम्यान १९१७ ची काँग्रेसची अंतर्गत कमिटीची निवडणूक "मोहनदास करमचंद गांधी" नावाचा उमेदवार हरला होता. टिळकांनी हस्तक्षेप करून त्यांना कमिटीमधे घ्यायला लावले. पुढे त्याच गांधींनी इंग्रजीला आपली राष्ट्रभाषा होऊ दिले नाही. त्यांना हिंदी ही सर्वात लायक भाषा वाटत होती. त्याची (बरीचशी योग्य) अशी ५ कारणे त्यांनी दिली होती.. मात्र पुढे तिढा न सुटल्याने हिंदी केवळ कामकाजाची प्रथम भाषा झाली आणि घटनेमधे कोणत्याही भाषेला राष्ट्रभाषा म्हटले गेले नाही.

बाकी प्रतिक्रीया रोचक आहेत.. काही नवी माहीती मिळत आहे.

अवांतर: भारतीय भाषांवर काही चांगली माहीती इथे मिळेल

ऋषिकेश
------------------
दूपारचे ३ वाजून ४३ मिनीटे झालेली आहेत. चला आता ऐकूया एक सुमधूर गीत "इंग्रेजी मे कहते है की आय लव्ह यु....."

टारझन's picture

5 Aug 2009 - 1:42 pm | टारझन

जबरदस्त उहापोह चालू आहे !! चालू द्या !!

आपल्याला तर बाबा भारत , इंडिया , हिंदुस्थान .. काहीही म्हणा .. देशाविषयी अगदी सेम आदर आहे , उगा कोण काय म्हणत बसतो ह्याला महत्व नाही (आणि त्यावर माझा कंट्रोल नाही ) !!

(वांझोट्या चर्चांत जास्त इंट्रेस्ट नसलेला ) टारझन

संदीप चित्रे's picture

5 Aug 2009 - 9:21 pm | संदीप चित्रे

>> आपल्याला तर बाबा भारत , इंडिया , हिंदुस्थान .. काहीही म्हणा .. देशाविषयी अगदी सेम आदर आहे
पर्फेक्ट बोलतोयस रे टार्‍या.

बाकी ह्या निमित्ताने धनंजयचा माहितीचा खजिना वाचता येतोय.

नितिन थत्ते's picture

5 Aug 2009 - 8:06 pm | नितिन थत्ते

टार्‍याशी सहमत. भारत म्हटले काय, इंडिया म्हटले काय आणि हिंदुस्तान म्हटले काय; आदर सेमच. देश म्हणजे देशातील माणसे. ती काही बदलत नाहीत.

अवांतरः ज्वलंत हिंदुत्वाचा प्रसार करणार्‍या मुखपत्रानुसार 'हिंदुस्तान' हे नाव जास्त योग्य असावे.

नितिन थत्ते
(पूर्वीचा खराटा)

नितिन थत्ते's picture

5 Aug 2009 - 9:11 pm | नितिन थत्ते

भारत हे नावही बरेच अर्वाचीन असावे. मनुस्मृतीत सुद्धा आर्यावर्त, ब्रह्मावर्त अशी नावे वेगवेगळ्या प्रदेशांना दिली आहेत. परंतु सारे मिळून एक राज्य/देश अशी कल्पना बहुधा डोक्यात नसावी.

नितिन थत्ते
(पूर्वीचा खराटा)

विकास's picture

5 Aug 2009 - 9:25 pm | विकास

परंतु सारे मिळून एक राज्य/देश अशी कल्पना बहुधा डोक्यात नसावी.

सांस्कृतिक दृष्ट्या एक राष्ट्र होतो राज्ये कुणाचीही असली तरी. सांकृतिक दृष्ट्या पण धार्मिक दृष्ट्या नाही. अपवाद अशोकाचा कालखंड - जेंव्हा एकच राष्ट्र होते आणि राष्ट्राचा म्हणून धर्म (religion) होता. कदाचीत राजे कोणी का असेना, कृण्वंतु विश्वम आर्यम झाले तर बाकी समाज एका अर्थी एक होईल असे वाटत असावे. (अधुनिक शब्द प्रयोगः global village).

दशानन's picture

6 Aug 2009 - 9:24 am | दशानन

माझ्या देशाचे नाव भारत आहे.

काय सांगता.... माझ्या देशाचे पण नाव भारत आहे ;)

***

घटनेतील उल्लेख असा आहे - India, that is Bharat.

ह्याला सहमत.

आपले टिप्पाड नेते त्यावेळी झोपा काढत होते अथवा इंग्रजांनी दिलेले हे स्वातंत्र्य दान मध्ये मिळाले आहे असे समजत होते कि काय कळायला मार्ग नाही... एका पण भाषाप्रेमी व्यक्तीने इंग्रजीला विरोध केला नाही... :( अरे भारतात काय भाषांची कमी होती काय रे... त्या इंग्रजीला पण ह्यात घुसवले... !
कायदे, नियम व घटना तिन्ही पण ब्रिटिश राज्याप्रमाणेच आहे...
त्यामुळेच तर ना अजून सरळ आपले कायदे आहेत ना सरळ नियम !

स्वाती२'s picture

7 Aug 2009 - 4:13 pm | स्वाती२

>>आपले टिप्पाड नेते त्यावेळी झोपा काढत होते
अस कसं म्हणता राजे. त्या वेळच्या परिस्थीतीचा विचार करा. ब्रिटीश आले तेव्हा हा देश छोट्या मोठ्या संस्थानात विभागला गेलेला. ब्रिटीश जाताना तो पटेलांनी एक केला. जुनागढ, हैदराबाद एवढ्यात विसरलात. आपले सर्व नेते कायद्याचे शिक्षण परदेशात घेतलेले. त्यांनी त्यांच्या परीने लोकशाही उभी केली. कमी पडलो ते आपण.

दशानन's picture

7 Aug 2009 - 4:16 pm | दशानन

दम है आप की बात मैं !

***
मी फिनिक्स आहे.काही काळासाठी मातीमोल होतो.. नाही असे नाही पण पुन्हा भरारी घेण्याची माझ्यात ताकत आहे...वेट फॉर मी , आय विल बी बॅक सुन ;)

वडापाव's picture

6 Aug 2009 - 5:23 pm | वडापाव

राजेंशी सहमत !!

आपला नम्र,
वडापाव

भारतीय लोकशाहीतील असामान्य नागरिक

सुधीर काळे's picture

7 Aug 2009 - 2:10 pm | सुधीर काळे

(१) माझ्या वाचनात असे आलेले आहे कीं सिंधु नदीला आंग्ल भाषिक लोक Indus म्हणत असत, त्यावरून India हा शब्द आला.
(२) "स्तान/स्थान" या शब्दाची व्युत्पत्तीही संस्कृत भाषेषेमधूनच झालेली असावी. ज्यांना 'स्थ' म्हणायला त्रास होतो ते 'स्त' म्हणायला लागले असावेत असा माझा होरा आहे.
सुधीर काळे

------------------------
छत्रपती शिवाजी आंतरराष्ट्रीय विमानतळावर मराठी भाषेतील फलक लागलेच पाहिजेत.

त्यांनी नक्कीच 100 मार्कांच्या संस्कृत ऐवजी 50 चे संस्कृत आणि 50 ची प्राकृत / अरबी ई ई घेतली असली पाहिजे.

-उस (-us) हा पुल्लिंगी प्रथमांत प्रत्यय आहे. नदीची नावे ही लॅटिनात पुंल्लिंगी असतात (येथे एक यादी). शिवाय लॅटिनात सुरुवातीच्या "ह"चा लोप होतो.

हिंद -> (नदी म्हणून पुंल्लिंगी) लॅटिनमध्ये "इंदुस", ग्रीकमध्ये "इंदोस".

इंग्रजीचे उपटसुंभ जागतिक महात्म्य गेल्या ५०० वर्षांतले. हिंद/इंदुस्/इंदोस् नदी आणि तिच्या बाजूचा इंद/इंदिया देश हा युरोपात २०००-२५०० वर्षांपूर्वी सिकंदराला माहीत होताच. कदाचित आधीही माहीत असेल. त्या शब्दांची व्युत्पत्ती मूल आंग्ल नाही खास.

विकास's picture

8 Aug 2009 - 1:56 am | विकास

ग्रीक-लॅटीन भाषांमधे हा शब्द होता. इंडिस हा शब्द पण वापरला जायचा. म्हणूनच तर वेस्ट इंडीस(ज) झाले जे कोणी इंग्रजी माणसाने केले नव्हते...

खरं सांगायचं तर "आंग्ल" हा शब्द मी "गोर्‍या"ना उद्देशून (पण चुकीचा) वापरला होता!
------------------------
छत्रपती शिवाजी आंतरराष्ट्रीय विमानतळावर मराठी भाषेतील फलक लागलेच पाहिजेत.

JAGOMOHANPYARE's picture

8 Aug 2009 - 11:33 am | JAGOMOHANPYARE

रुग्वेदा मध्ये भारत हा शब्द अग्नी या अर्थाने आलेला आहे.. भा+रत ... तेजा मध्ये रत असणारा..

रुग्वेदा मध्ये आप्री देवता म्हणून एक समूह सान्गितलेला आहे... त्यात इळा, सरस्वती आणि भारती या देवीना वन्दन केले आहे...

http://www.mountainman.com.au/rghmf_02.htm

द्वितीय मन्डल, तिसरे सूक्त