सप्तपदी- भाग ३ (समारोप)

युयुत्सु's picture
युयुत्सु in काथ्याकूट
4 Aug 2009 - 4:16 pm
गाभा: 

लोकहो,

गेले काही दिवस 'मिसळपाव'वर मी सप्तपदी विषयी जी चर्चा सुरू केली होती, तीचा मी आता समारोप करू इच्छितो.

मी ज्योतिषी असल्याने मला पत्रिका जुळविण्याचे प्रसंग अनेक वेळा येतात. अशा वेळेला माझ्या पाहण्यात आलेल्या गोष्टी अशा की एकतर आधुनिक मुक्त विवाहेच्छु स्त्री लग्ना अगोदर आपल्याला लग्नातून काय हवंय हे व्यवस्थित सांगू शकत नाही किंवा जाणूनबूजून सांगत नाही. लग्नानंतर काय कौटुंबिक जबाबदार्‍या तिला पेलाव्या लागतील हे समजून घेण्यात आणि प्रत्यक्ष निभावण्यात ती कमी पडते.

यातून धूसफुस आणि चिडचिडीला सुरुवात होते. आपण लग्न करून फसलो ही तिची भावना होते, आपल्या जबाबदार्‍या ती हळूहळू झटकू लागते. त्यातून सूडाचे विचार मनात येतात आणि ४९८-अ सारख्या कायद्याचा वापर करून आपल्या अटीवर नवर्‍याला आणि त्याच्या नातेवाईकांना वाकविण्याचे प्रकार होतात. मग नवर्‍याचा एखादा नातेवाईक मृत्युशय्येवर असला तरीही त्याला पोलिसठाण्यात बोलवले जाते.

यात वकील उतरले की प्रकरण आणखी चिघळते, कारण वकीलांना केस जिंकण्यात स्वारस्य असते. प्रकरण कोर्टात गेले की कोणत्या कायद्याखाली लग्न झाले आहे हा मुद्दा उपस्थित होतो. आपण ज्या कायद्या खाली लग्न केले आहे त्याचा अर्थ वकील प्रथम समजावून सांगतो तेव्हा लोकांना कायद्याचे गांभिर्य समजते. तोपर्यंत लग्नातील विधींना 'हौसमौज' एवढेच महत्त्व असते.

४९८-अ या कायद्याला काहीही उतारा नाही. ४९८-अ हरलेली मुलगी उजळ माथ्याने समाजात वावरते कारण तिला जरा देखिल ओरखडे पडत नाहीत, आर्थिक तर नाहीतच.

यात गमावतो फक्त पुरुष...नोकरी, पैसा आणि तब्येतीचे नुकसान. कारण तो केस जिंकला तरी त्याला कसलीही नुकसान भरपाई मिळत नाही. जास्तीत जास्त त्याला घटस्फोट मिळतो ते देखिल जज्ज convince झाला तर... असो.

तेव्हा भावी विवाहेच्छु तरूणांना या कटु वास्तवाचे भान करून देणे हा माझा या चर्चेमागे उद्देश होता. तो आता साध्य झाला आहे असॆ मला वाटते.

नांदा सौख्य भरे । शोभोत कुल तव सत्कुमरे ॥

प्रतिक्रिया

विनायक प्रभू's picture

4 Aug 2009 - 4:20 pm | विनायक प्रभू

म्हट्ल्याप्रमाणे असुरक्षिततेच्या भावनेने ग्रासलेल्या पुरुषाकरता मस्त धाग्यांची मालीका.

वेताळ's picture

4 Aug 2009 - 4:23 pm | वेताळ

लग्न न करता रहावे काय? एकादी स्त्री अशी नवर्‍याचा किस काढणारी असेल हे कसे काय समजु शकेल? तसे कोणते ग्रह त्या मुलीच्या कुंडलीत असतात? ह्यावर जरा प्रकाश टाकावा.निदान अविवाहित मिपाकर संभाव्य धोक्यापासुन सुरक्षित तरी राहतील.

वेताळ

विनायक प्रभू's picture

4 Aug 2009 - 4:26 pm | विनायक प्रभू

वेताळ भौ,
किस न निघालेला महात्मा शोधुन दाखवा.
मग कितिही पत्रिका बघोत.

JAGOMOHANPYARE's picture

4 Aug 2009 - 4:28 pm | JAGOMOHANPYARE

मी ज्योतिषी असल्याने मला पत्रिका जुळविण्याचे प्रसंग अनेक वेळा येतात. अशा वेळेला माझ्या पाहण्यात आलेल्या गोष्टी अशा की एकतर आधुनिक मुक्त विवाहेच्छु स्त्री लग्ना अगोदर आपल्याला लग्नातून काय हवंय हे व्यवस्थित सांगू शकत नाही किंवा जाणूनबूजून सांगत नाही. लग्नानंतर काय कौटुंबिक जबाबदार्‍या तिला पेलाव्या लागतील हे समजून घेण्यात आणि प्रत्यक्ष निभावण्यात ती कमी पडते.

याचे तीनच सम्भाव्य निष्कर्ष निघतात...

१. नवरे कायदे समजून घ्यायला चुकतात...
२. बायका जबाबदार्‍या घ्यायला चुकतात...

किंवा...

३. आपण पत्रिका जुळवायला चुकता आहात..

:)

विनायक प्रभू's picture

4 Aug 2009 - 4:32 pm | विनायक प्रभू

माझी पत्रिका प्रकांड पंडीताने जुळवली होती.
म्हणून काय माझा पडायचा किस थांबला नाही.

वेदश्री's picture

4 Aug 2009 - 4:35 pm | वेदश्री

कोणता 'किस' हो, विप्र? याबद्दल पण माहिती मिळते का ज्योतिषांकडे? माहिती नव्हते बा मला..

टारझन's picture

4 Aug 2009 - 11:00 pm | टारझन

बहुदा विप्र "पडणारा 'किस' " बद्दल बोलत असावेत , आणि मराठीत किस चा एकंच अर्थ असावा/आहे ,
बराबर ना हो मास्तर ? आजुन काय अ‍ॅड करायचंय का ? व्यनी करा

- मलईकोफ्ता
अधिक 'किस' पाडण्यासाठी आम्हालाच भेटा

सूहास's picture

4 Aug 2009 - 4:34 pm | सूहास (not verified)

लोकहो,

गेले काही दिवस 'मिसळपाव'वर मी सप्तपदी विषयी जी चर्चा सुरू केली होती, तीचा मी आता समारोप करू इच्छितो.
===त्याबद्दल धन्यवाद्स...

<<<मी ज्योतिषी असल्याने मला पत्रिका जुळविण्याचे प्रसंग अनेक वेळा येतात. >>>
====ठी क आहे...
<<<एकतर आधुनिक मुक्त विवाहेच्छु स्त्री लग्ना अगोदर आपल्याला लग्नातून काय हवंय हे व्यवस्थित सांगू शकत नाही किंवा जाणूनबूजून सांगत नाही. लग्नानंतर काय कौटुंबिक जबाबदार्‍या तिला पेलाव्या लागतील हे समजून घेण्यात आणि प्रत्यक्ष निभावण्यात ती कमी पडते. >>>
====हाच अनुभव ऊलटासुध्दा होउ शकतो...लव्ह मॅरेज झालेल्या माझ्या एका मैत्रीणीचा अनुभव एकदम ऊलटा आहे...

<<<यातून धूसफुस आणि चिडचिडीला सुरुवात होते. आपण लग्न करून फसलो ही तिची भावना होते, आपल्या जबाबदार्‍या ती हळूहळू झटकू लागते. त्यातून सूडाचे विचार मनात येतात आणि ४९८-अ सारख्या कायद्याचा वापर करून आपल्या अटीवर नवर्‍याला आणि त्याच्या नातेवाईकांना वाकविण्याचे प्रकार होतात. मग नवर्‍याचा एखादा नातेवाईक मृत्युशय्येवर असला तरीही त्याला पोलिसठाण्यात बोलवले जाते. >>>
माननीय श्री युयुत्स्यु...आपण असले किती प्रकार पाहिलेत कोण जाणे...बायकोला दिवस-रात्र मारहाण करुन दिवसभर कुचाळक्या करणारे कित्येक जण मी पाहिले आहेत.. ते तर जाऊ द्या पण काही सुशिक्षीत सुध्दा दिवस-रात्र शाब्दिक मानहानी करताना पाहिलेत. त्या साठी हजार कायदे आहेत्..म्हणुन काय सगळ्याच बायका घटस्फोट मागतात काय?

<<<<यात वकील उतरले की प्रकरण आणखी चिघळते, कारण वकीलांना केस जिंकण्यात स्वारस्य असते. प्रकरण कोर्टात गेले की कोणत्या कायद्याखाली लग्न झाले आहे हा मुद्दा उपस्थित होतो. आपण ज्या कायद्या खाली लग्न केले आहे त्याचा अर्थ वकील प्रथम समजावून सांगतो तेव्हा लोकांना कायद्याचे गांभिर्य समजते. तोपर्यंत लग्नातील विधींना 'हौसमौज' एवढेच महत्त्व असते. >>>

आता ह्यात वकीलाची चुक आहे का कायद्याची की त्या माणसाची ज्यानी सप्तपदी घेतली...

<<<<४९८-अ या कायद्याला काहीही उतारा नाही. ४९८-अ हरलेली मुलगी उजळ माथ्याने समाजात वावरते कारण तिला जरा देखिल ओरखडे पडत नाहीत, आर्थिक तर नाहीतच.>>>>

नेमके काय म्हणायचे समजले नाही.
<<<यात गमावतो फक्त पुरुष...नोकरी, पैसा आणि तब्येतीचे नुकसान. कारण तो केस जिंकला तरी त्याला कसलीही नुकसान भरपाई मिळत नाही. जास्तीत जास्त त्याला घटस्फोट मिळतो ते देखिल जज्ज convince झाला तर... असो.>>>
हम्म कठीण आहे..

<<<तेव्हा भावी विवाहेच्छु तरूणांना या कटु वास्तवाचे भान करून देणे हा माझा या चर्चेमागे उद्देश होता. तो आता साध्य झाला आहे असॆ मला वाटते.>>>
आपण जे ऊदाहरण दिले आहे त्याचे प्रमाण फार कमी आहे .असे मला वाटते..घटस्फोट आणी त्या मागे होणारी पुरुषाची घुसपट्...मला हा विषयच पटला नाही ..ईथे लग्न झालेले पुरुष कधी एकदा "ही" माहेरी जाते ह्याची वाट पहात असतात.

एखादं-दुसरं अस प्रकरण झाल्यामुळे आपण थेट " सप्तपदी" ला दोष देणे कितपत बरोबर आहे ह्याचा जरुर विचार करावा...

सू हा स...

युयुत्सु's picture

4 Aug 2009 - 5:30 pm | युयुत्सु

याच प्रमाण किती आहे ते जवळून बघत असल्यामुळेच हा विषय मी घेतला.

विजुभाऊ's picture

4 Aug 2009 - 10:13 pm | विजुभाऊ

४९८-अ या कायद्याला काहीही उतारा नाही. ४९८-अ हरलेली मुलगी उजळ माथ्याने समाजात वावरते कारण तिला जरा देखिल ओरखडे पडत नाहीत, आर्थिक तर नाहीतच.
यात गमावतो फक्त पुरुष...नोकरी, पैसा आणि तब्येतीचे नुकसान. कारण तो केस जिंकला तरी त्याला कसलीही नुकसान भरपाई मिळत नाही.

असहमत . ४९८ अ कलमात स्पाउस असा उल्लेख आहे. माझ्या एका वकील मित्राने स्पाऊस या शब्दाचा आधार घेऊन एका नवरोबाला पोटगी मिळवून दिली होती.त्याने बायकोमुळे त्याला नोकरी सोडून घरी बसावे लागले असे कारणही दिले होते. बायको मिळवती होती.
अवांतरः गुजराती भाषेत " नवरा" या शब्दाचा अर्थ रीकामटेकडा " असा होतो.

पास हा शब्द जर इंग्रजी असेल तर नापास हा शब्द कोणत्या भाषेतला आहे

युयुत्सु's picture

5 Aug 2009 - 8:13 am | युयुत्सु

ही घटना अपवाद आहे. प्रत्येक बळीचा बकरा एवढा नशीब्वान असेलच असे नाही.

विशाल कुलकर्णी's picture

5 Aug 2009 - 1:21 pm | विशाल कुलकर्णी

<<<यातून धूसफुस आणि चिडचिडीला सुरुवात होते. आपण लग्न करून फसलो ही तिची भावना होते, आपल्या जबाबदार्‍या ती हळूहळू झटकू लागते. त्यातून सूडाचे विचार मनात येतात आणि ४९८-अ सारख्या कायद्याचा वापर करून आपल्या अटीवर नवर्‍याला आणि त्याच्या नातेवाईकांना वाकविण्याचे प्रकार होतात. मग नवर्‍याचा एखादा नातेवाईक मृत्युशय्येवर असला तरीही त्याला पोलिसठाण्यात बोलवले जाते. >>>

हे मला नाही पटत. उलट हे वागणे मुलाकडुनच घडलेले बहुतांशी केसेस मध्ये दिसुन येते. मी माझ्या एका अतिशय जवळच्या मित्राच्या केसमध्ये याचा अगदी उलट अनुभव घेतला आहे. त्याचे एका सुशिक्षित, कमावत्या मुलीशी लग्न झाले आहे. तो स्वतःदेखील सॉफ्टवेअर इंजीनीअर आहे, चांगल्या नोकरीत आहे. लग्नानंतर सहा वर्षे मुल बाळ काही झाले नाही. अगदी घरच्यांनी त्या बिचारीला घालुन पाडुन बोलुन, टोमने मारुन जगणे कठिण केले होते. शेवटी कंटाळुन त्याने घर सोडले. परवा सहा वर्षानंतर त्याने आय्.व्ही.एफ. पद्धती वापरुन त्याला मुलगा झाला. त्यानंतर त्याने उघड केले की मुळात त्याचाच स्पर्म काउंट खुप कमी असल्याने मुल होत नव्हते. आणि दोष मात्र त्याच्या निष्पाप बायकोला दिला गेला. त्या अवस्थेतही स्वतःचा काही दोष नसताना ती ठामपणे स्वतः त्रास पत्करुन त्याच्या पाठीमागे खंबीरपणे उभी राहीली. (त्याचे स्वतःचे मात्र गेल्या सहा वर्षात खरी गोष्ट सांगायचे धाडस झाले नाही :-( )

सस्नेह
विशाल
*************************************************************
मज पिसे लागलेले सुखांचे
गे हलकेच धुके ओसरते आहे...

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

4 Aug 2009 - 4:39 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती

माझ्या पाहण्यात आलेल्या गोष्टी अशा की एकतर आधुनिक मुक्त विवाहेच्छु स्त्री लग्ना अगोदर आपल्याला लग्नातून काय हवंय हे व्यवस्थित सांगू शकत नाही किंवा जाणूनबूजून सांगत नाही.

१. कदाचित तुमच्यापाशी स्पष्ट बोलावं एवढा तुमच्याबद्दलचा विश्वास या आधुनिक मुक्त विवाहेच्छु स्त्रियांना वाटत नाही. (त्याची कारणं लाख असू शकतील; ज्यांच्याशी मला काहीही घेणं देणं नाही.)
२. त्या अगदी व्यवस्थित सांगत असतील पण त्यांना काय म्हणायचं आहे हे तुम्हालाच समजतच नसेल.
३. त्या सांगत असतील आणि तुम्हाला समजतही असेल, पण असेच प्रश्न दुसर्‍या पार्टीला (पक्षी: मुलाला) तुम्ही विचारत नसाल आणि विजोड जोडा जमवत असाल.
४ ... .अशा काही प्रकारचा विचार केला आहेत का? तुमच्या एकूण सांगण्यावरून अगदीच एकांगी विचार दिसत आहेत म्हणून विचारलं!
एकदा झालं, दोनदा झालं ठीक आहे, पण पुनःपुन्हा तुम्ही पत्रिका "जुळवून" पहात असतानाही तुम्हाला अशी उदाहरणं दिसत असतील तर कदाचित या मुली व्यवस्थित आहेत आणि तुम्ही काही गफलत करत आहात अशी शंका तुम्हाला चुकूनतरी आली का? (ज्योतिषाला शास्त्र म्हणून नये हे माझं व्यक्तीगत मत झालं पण) शास्त्रीय पद्धत पडताळली असता गफलत कुठूनही होऊ शकते याचा विचार तुम्ही केला आहेत का?

यात गमावतो फक्त पुरुष...नोकरी, पैसा आणि तब्येतीचे नुकसान.

अरे वा! भांडणात एकाच हाताने टाळी वाजत नाही पण आवाज मात्र एकाच हाताचा येतो वाटतो?

एकच उलट उदाहरण दिलेलं पुरावं नाही तुमचा सिद्धांत कोसळवायला? माझ्या माहितीत एक जोडपं होतं. सप्तपदी करून केलेल्या लग्नानंतरही 'सुख' मिळालं नाही म्हणून तिने घटस्फोटाची केस टाकली आहे. 'सुख' मिळत नाही हे न्यायालयात अगदी सहज सिद्ध होईल. काय आनंद होईल नाही त्या कजाग कैदाशीणीला जेव्हा वकील ना ना तर्‍हेचे प्रश्न विचारतील तिला न्यायालयात! किती आनंद होईल ना तिला पुढे लग्नाचा विचार करताना! पण हा बाब्या अजूनही स्वतः मान्य करत नाही की त्याला मुलींमधे रस नाही. आज एक घटस्फोट होईल आणि पुन्हा आई, बहिणी मागे लागतील म्हणून आणखी एका मुलीशी लग्न करेल, पुन्हा तिच्या खोट्या चहाड्या मित्रांमधे सांगायला मोकळा होईल.

४९८-अ या कायद्याला काहीही उतारा नाही.

याचा सप्तपदीशी काय संबंध? कळलं नाही म्हणून विचारत आहे.

डार्विनच्या जन्माच्या दीडशेव्या वर्षात मला 'सर्व्हायव्हल ऑफ द फिटेस्ट'वर फारच विश्वास बसला आहे. ज्या पुरूषांना या मुक्त, आधुनिक स्त्रियांबरोबर जुळवून घेता येत नाही त्यांनी लग्नच करू नये. उगाच कुठे भलत्या, न झेपणार्‍या भानगडीत पडावं ना!!

असो. आता माझी सात्विक आहाराची वेळ झाली आहे.

अदिती
(लग्नाळू मुलांना स्वयंपाक करणे आणि भांडी घासणे या दोन गोष्टी शिकणे कायद्याने बंधनकारक केलंच पाहिजे.)

निखिल देशपांडे's picture

4 Aug 2009 - 4:54 pm | निखिल देशपांडे

(लग्नाळू मुलांना स्वयंपाक करणे आणि भांडी घासणे या दोन गोष्टी शिकणे कायद्याने बंधनकारक केलंच पाहिजे.)

अरे बापरे... असे पण कायद्यात बंधनकारक झाले तर अवघड आहे.. ;)
नवरा भांडे घासत नसल्या मुळे बायकोने हुंडाबळीची केस केली हे लवकरच दिसणार आहे असे वाटते.

आपले हे तिनही धागे वाचले.... त्यातुन काहीही निष्कर्श काढु शकलो नाही.

यात गमावतो फक्त पुरुष...नोकरी, पैसा आणि तब्येतीचे नुकसान.

असे असेल तर मग पुरुषांनी अविवाहीतच राहावे काय??? लिव ईन रिलेशन्शिप ला मागे सरकारी संमती मिळाल्याचे वाचले होते. आता तिन धागे काढुन "पुरुषांना लिव ईन रिलेशन्शिप मधले धोके" ह्यावरही थोडा प्रकाश टाकावा अशी विनंती करतो.
निखिल
================================

आनंदयात्री's picture

4 Aug 2009 - 9:02 pm | आनंदयात्री

>> नवरा भांडे घासत नसल्या मुळे बायकोने हुंडाबळीची केस केली हे लवकरच दिसणार आहे असे वाटते.

=)) =)) =)) =)) =)) =))

-
(लग्नाळु)

आंद्या

वेताळ's picture

4 Aug 2009 - 4:38 pm | वेताळ

३६ गुण जुळणार्‍याचे घटस्फोट होतात व १० गुण जुळणारे आनंदाने वैवाहिक जीवन जगत असतात. नवरा बायको जर एकमेकांशी भांडत नसतील तर त्यात पाणी मुरते आहे असे समजावे.
आता जर लग्नानंतर चे संभाव्य धोकेच टाळायचे असतील तर लग्न न करणे उत्तम.मग ह्यातुन अनैतिक संबध वाढीस लागतील.परत आपल्याला एक नवा विषय मॅरेथॉन धागे काढण्यासाठी मिळेल.

वेताळ

JAGOMOHANPYARE's picture

4 Aug 2009 - 4:42 pm | JAGOMOHANPYARE

आपल्या लेखमालेत आपण खालील गोष्टी चुकीच्या असल्याचे सांगितलेले आहे..........

१. सप्तपदी व नातिचरामि
२. समस्त पुरुष्वर्ग
३. विवाहाबाबतचे कायदे
४. अरेन्ज मॅरेजची पद्धत
५. बायकांची समजून घेण्याची ताकद
६. कायदे पण्डितांची निरपेक्शपणाने केस लढण्याची क्षमता
७. जज यांची सत्य समजून घ्यायची क्षमता

...आयला, ही तर एक नवीन सप्तपदी झाली की !

JAGOMOHANPYARE's picture

4 Aug 2009 - 4:43 pm | JAGOMOHANPYARE

(लग्नाळू मुलांना स्वयंपाक करणे आणि भांडी घासणे या दोन गोष्टी शिकणे कायद्याने बंधनकारक केलंच पाहिजे.)>>>>>>>>>

सहमत आहे....

स्वयंपाक करणे आणि भांडी घासणे तर मला शिकवण्यात आलेच होते पण मला तर मोदक पण करता येतात. ते पण उकडीचे!

हा हा हा!

स्वयंपाक करणे आणि भांडी घासणे तर मला शिकवण्यात आलेच होते पण मला तर मोदक पण करता येतात. ते पण उकडीचे!

हा हा हा!

सूहास's picture

4 Aug 2009 - 4:52 pm | सूहास (not verified)

<<<स्वयंपाक करणे आणि भांडी घासणे तर मला शिकवण्यात आलेच होते पण मला तर मोदक पण करता येतात. ते पण उकडीचे! >>>
शिकवण्यात आले ??? काय सा॑गता...
बाकी तुम्ही प्रतिसाद एकच वेळा प्रकाशीत करायला कधी शिकणार..

सू हा स...

प्रसन्न केसकर's picture

4 Aug 2009 - 4:52 pm | प्रसन्न केसकर

यात काय संबंध ते नाही कळले बुवा. असो!

>> ४९८-अ हरलेली मुलगी उजळ माथ्याने समाजात वावरते कारण तिला जरा देखिल ओरखडे पडत नाहीत, आर्थिक तर नाहीतच.

हो का? काही दिवसापुर्वी लेख वाचला होता छळणार्‍या नवर्‍याविरुद्ध केस करुन जिंकणार्‍या बायकांना पोटगी कशी मिळत नाही, त्यांना समाजातुन विरोध कसा होतो वगैरे वगैरे. आता लक्षात येतेय की ते सगळे खोटेच होते. असो!

अवांतरः माझी समजुत की हिंदु मॅरेज अ‍ॅक्टनुसार सप्तपदी हा महत्वाचा विधी असला तरी सप्तपदी न झालेली लग्नेही या कायद्यानुसार वैध ठरतात. तसे त्या कायद्याच्या विवाह विधी याविषयक कलमातच स्पष्ट म्हणले आहे. तो कायदा बदलला आहे हे मात्र मला माहिती नव्हते. अहो कोणतेही नाते म्हणले की जबाबदारीने वागणे उभयतांवर आले, मग त्यात विधींचा प्रश्न कोठे येतो? ही आपली माझी समजुत बरं का. एकुण चालु द्यात दळण.

---

स्वतःवर पुरोगामी/ प्रतिगामी असे कुठलेही शिक्के मारुन न घेणारा

पुनेरी.

JAGOMOHANPYARE's picture

4 Aug 2009 - 4:53 pm | JAGOMOHANPYARE

१. पण मुळात पत्रिका जुळवणार्‍याचा आणि मुलीच्या - मुलाच्या काय अपेक्शा आहेत हे जाणण्याचा काय सम्बन्ध ? पत्रिका जुळवणारेही हल्ली प्रि पत्रिका काउन्सेलिन्ग, पोस्ट मॅरेज फोलो अप असे काही करत आहेत का ?
२. भविष्य सांगणारा चांगला ज्योतिशी असणे हे देखील त्याच्या पत्रिकेत असायला हवे.... भविस्श्य सांगणार्‍याची पत्रिका दुसर्‍याला दाखवून त्याची खात्री करता येते का?
३. कुन्डली वाल्याने ओके रेपोर्ट दिला म्हणून लग्न केले आणि लग्न फसले, तर कुन्डली वाल्यावर कन्झुमर प्रोटेक्शन अ‍ॅक्ट लावता येतो का ? २५० रु ची आपण पावती देता का ? व्यवसाय कराच्या पावतीवर व्यवसायाचे नाव व पत्ता काय आहे ?

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

4 Aug 2009 - 4:57 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती

कुन्डली वाल्याने ओके रेपोर्ट दिला म्हणून लग्न केले आणि लग्न फसले, तर कुन्डली वाल्यावर कन्झुमर प्रोटेक्शन अ‍ॅक्ट लावता येतो का ? २५० रु ची आपण पावती देता का ? व्यवसाय कराच्या पावतीवर व्यवसायाचे नाव व पत्ता काय आहे ?

=)) =)) =))

अहो युयुत्सुमहाराज, तुम्हाला उकडीचे मोदक करता येतात तर माझ्या पत्त्यावर थोडे पोस्ट करा. चांगले का वाईट हे आम्ही "आम जनता" ठरवू! आणि हो, हे ट्रेनिंग त्या लग्नाळलेल्या पोरांनाही द्या. माझ्या काही मैत्रिणी होतकरू मुलांच्या शोधात आहेत. ;-)

अदिती
(भविष्य सांगण्याचा 'धंदा'सुद्धा कन्झुमर प्रोटेक्शन अ‍ॅक्टखाली आलाच पाहीजे यासाठी मी तीन मिनीट चौदा सेकंदांचं मौन पाळणार आहे.)

मन's picture

4 Aug 2009 - 8:08 pm | मन

कुन्डली वाल्याने ओके रेपोर्ट दिला म्हणून लग्न केले आणि लग्न फसले, तर कुन्डली वाल्यावर कन्झुमर प्रोटेक्शन अ‍ॅक्ट लावता येतो का ? २५० रु ची आपण पावती देता का ? व्यवसाय कराच्या पावतीवर व्यवसायाचे नाव व पत्ता काय आहे ?

ट्ठो.................

आपलाच,
मनोबा

वेताळ's picture

4 Aug 2009 - 4:56 pm | वेताळ

स्वयंपाक करणे आणि भांडी घासणे तर मला शिकवण्यात आलेच होते पण मला तर मोदक पण करता येतात. ते पण उकडीचे!

अहाहा किती छान, निदान तुमच्या गुणांची कदर करण्यासाठी एकाद्या मिपा कट्ट्याचे आयोजन करा.मस्त स्वयंपाक बनवा,मग तिथे आपण ह्यावर व्यवस्थित चर्चा करु.

वेताळ

JAGOMOHANPYARE's picture

4 Aug 2009 - 4:56 pm | JAGOMOHANPYARE

डोंगर पोखरून काहीही नाही>>>>>>>>>>>>>

असे कसे म्हणता ? इथे उन्दीर पोखरून तीन डोन्गर निघालेत ! :)

मी आता समारोप करू इच्छितो - हे वाचुन मन कसं भरुन आलं म्हणून सांगू...

एका बिंदू वरुन पूर्णरेषेचा अंदाज.... भयानक.. प्राइसलेस

CWOT

युयुत्सु's picture

4 Aug 2009 - 5:37 pm | युयुत्सु

भारतात जागृती ही complete waste of time च असते.

विनायक प्रभू's picture

4 Aug 2009 - 5:26 pm | विनायक प्रभू

भांडी घासायचे शिक्षण वयाच्या १९ वर्षी घेतले. त्यामुळे काहीही प्रॉब्लेम नाही.
स्वयंपाक घरात घुसायला सौ. परवानगी देत नाही त्यामुळे प्रश्नच येत नाही.
भांडायला अगदी चोख.

बंड्याचा दादा :- अरे बंड्या, ते एक प्रकारचे स्वभाव विशेषण अस्ते.
बंड्या :- म्हणजे आपले ते "हे" का रे भाभाउ?

आपलाच,
मनोबा

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

4 Aug 2009 - 5:42 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती

अरे बंड्या (का मनोबा), तुझं लग्नं नाही ना झालं अजून? मग ही जागृती अशी फुकट नको घालवूस! न्यायालयाचे सगळे निवाडे शोध आणि जास्तीत जास्त किती काळ (लग्नाशिवाय) एकाच स्त्रीबरोबर राहिलं तरीही लग्नाप्रमाणे कायदे लागू होतात हे शोध! त्याप्रमाणे पळवाटा शोध आणि सुखी रहा!

अदिती (मनोबाची मैत्रिण)

युयुत्सु's picture

5 Aug 2009 - 7:39 am | युयुत्सु

मिझोऍन्ड्री म्हणजे काय रे भाऊ?

एका अमेरीकन विदूषीने तर यावर पुसत्क लिहिले आहे.

स्वाती२'s picture

4 Aug 2009 - 6:47 pm | स्वाती२

भारतातील घटस्फोट या बद्दल लेख खालील संकेतस्थळावर
http://www.english.emory.edu/Bahri/Divorce.html
काही भाग पुढे चिकटवतेय.
There is great disparity between the economic ramifications of divorce between men and women. Men remain relatively unaffected while women, especially those with children, have difficulty "providing food, clothing and shelter for themselves and their children.
While India feels that one should have the right to divorce, it is still a highly stigmatizing action. Women are looked upon more harshly than men in this regard.


But as has been rightly contended by the petitioner many instances have come to light where the complaints are not bonafide and have filed with obligue motive.In such cases acquittal of the accused does not in all cases wipe out the ignomy suffered during and prior to trial.
[...]
Merely because the provision is constitutional and intra vires, does not give a licence tounscrupulous persons to wreck personal vendetta or unleash harassment. It may, therefore, become necessary for the legislature to find out ways howthe makers of frivolous complaints or allegations can be appropriately dealt with. Till then the Courts have to take care of the situation withinthe existing frame work. As noted the object is to strike at the roots of dowry menace. But by misuse of the provision a new legal terrorism can beunleashed. The provision is intended to be used a shield and not assassins'weapon. If cry of "wolf" is made too often as a prank assistance andprotection may not be available when the actual "wolf" appears.

CASE NO.:Writ Petition (civil) 141 of 2005 - Citation: JT 2005 (6) SC 266
PETITIONER:Sushil Kumar Sharma
RESPONDENT:Union of India and Ors.
DATE OF JUDGMENT: 19/07/2005
BENCH:Arijit Pasayat & H.K. Sema

मी वरील काही उदाहरणे वाचली. यात कुठेही ४९८ अ आणी सप्तपदी चा संबंध आढळला नाही. कलम ४९८ अ चा काही प्रमाणात दुरुपयोग होत आहे एवेढेच यातून सिद्ध होते. या सर्व व्यक्तींनी हिंदू विवाह कायद्यानुसार विवाह न करता (म्हणजेच सप्तपदी न चालता) इतर कुठल्या पद्धतीने विवाह केला असता तरीसुद्धा ते या कायद्याच्या कचाट्यात सापडले असते असे मला वाटते.
register marriage केल्याने वरील उदाहरणातले पुरूष यात अडकले नसते असे आपले मत असेल तर कृपया स्पष्ट करावे.

युयुत्सु's picture

5 Aug 2009 - 8:17 am | युयुत्सु

प्रकरण कोर्टात गेले की कोणत्या कायद्याखाली लग्न झाले आहे हा मुद्दा उपस्थित होतो. आपण ज्या कायद्या खाली लग्न केले आहे त्याचा अर्थ वकील प्रथम समजावून सांगतो तेव्हा लोकांना कायद्याचे गांभिर्य समजते. तोपर्यंत लग्नातील विधींना 'हौसमौज' एवढेच महत्त्व असते.

ज्यानी हिंदू विवाह कायद्यानुसार विवाह केले त्यापैकी सप्तपदीतील वचने या बायकांनी किती पाळली?

JAGOMOHANPYARE's picture

4 Aug 2009 - 8:05 pm | JAGOMOHANPYARE

... यातल्या किती जणांच्या कुन्डल्या तुम्ही जुळवल्या होत्या ?

युयुत्सु's picture

4 Aug 2009 - 8:10 pm | युयुत्सु

एक ही नाही.

JAGOMOHANPYARE's picture

4 Aug 2009 - 8:12 pm | JAGOMOHANPYARE

<<<<<<<<<< भारतात जागृती ही complete waste of time च असते.>>>>>>>>>>>>

ते तर दिसतेच आहे.... तुम्हाला जागृत करण्यासाठी एवढ्या सगळ्या मिपावाल्यानी मिळून तीन लाम्ब लचक धागे काढले .......... आणि तरीही तुमचे पालुपद काय आहे हे अजुन आम्हाला समजले नाही... परदेशी लेख्क, पुस्तक, सप्तपदी, पुरुश्मुक्ती, स्त्री मुक्ती, अरेन्ज मॅरेज, कायदा कानुन, भविश्य- पत्रिका.... सम्पादक सुद्धा डोक्याला हात लावून बसले असतील... एवढे दिवस मिपा वर धागेच होते... आता डायरेक्ट गोधड्याच यायला लागल्या !

JAGOMOHANPYARE's picture

4 Aug 2009 - 8:24 pm | JAGOMOHANPYARE

आणि माझ्या या प्रश्नांचे काय ?

१. पण मुळात पत्रिका जुळवणार्‍याचा आणि मुलीच्या - मुलाच्या काय अपेक्शा आहेत हे जाणण्याचा काय सम्बन्ध ? पत्रिका जुळवणारेही हल्ली प्रि पत्रिका काउन्सेलिन्ग, पोस्ट मॅरेज फोलो अप असे काही करत आहेत का ?
२. भविष्य सांगणारा चांगला ज्योतिशी असणे हे देखील त्याच्या पत्रिकेत असायला हवे.... भविस्श्य सांगणार्‍याची पत्रिका दुसर्‍याला दाखवून त्याची खात्री करता येते का? किमान पक्षी तुमच्याच सॉफ्ट वेअरमधून ते पाहून त्याची कॉपी तुम्ही सर्वाना का देत नाही ? काल्पनिक कुन्डली कशाला द्यायची ? आणि काल्पनिक कुन्डली काढलीच कशी ? तीच जर काल्पनिक आहे, तर मग सॉफ्ट वेअर खरे बोलत आहे, हे कसे सिद्ध करणार ?

३. कुन्डली वाल्याने ओके रेपोर्ट दिला म्हणून लग्न केले आणि लग्न फसले, तर कुन्डली वाल्यावर कन्झुमर प्रोटेक्शन अ‍ॅक्ट लावता येतो का ? अशा केसेस मध्ये नवरा बायको नी एकमेकावर केस करण्यापेक्शा दोघानी मिळून आपल्यावरच ( म्हणजे कुन्डली वाल्यावरच) केस करायला हवी.... २५० रु ची आपण पावती देता का ? व्यवसाय कराच्या पावतीवर व्यवसायाचे नाव व पत्ता काय आहे ?

युयुत्सु's picture

4 Aug 2009 - 8:34 pm | युयुत्सु

मी सुरु केलेल्या चर्चेशी विसंगत आहेत. मला समक्ष भेटलात तर फुकटात उत्तरे देईन.

स्वाती२'s picture

4 Aug 2009 - 8:54 pm | स्वाती२

४९८ अ चा सप्तपदीशी काय संबंध?
Passed by Indian Parliament in 1983, Indian Penal Code 498A, is a criminal law (not a civil law) which is defined as follows,

“Whoever, being the husband or the relative of the husband of a woman, subjects such woman to cruelty shall be punished with imprisonment for a term which may extend to three years and shall also be liable to fine. The offence is Cognizable, non-compoundable and non-bailable.
इथे तर सप्तपदीचा/ हिंदू लग्नाचा/ कुठल्याही धर्माचा उल्लेखही नाहीये. आता कायद्याचा गैरवापर होत असेल तर त्याला भ्रष्टाचार जबाबदार की सप्तपदी?

युयुत्सु's picture

4 Aug 2009 - 9:07 pm | युयुत्सु

आपण लग्न करून फसलो ही तिची भावना होते, आपल्या जबाबदार्‍या ती हळूहळू झटकू लागते. त्यातून सूडाचे विचार मनात येतात आणि ४९८-अ सारख्या कायद्याचा वापर करून आपल्या अटीवर नवर्‍याला आणि त्याच्या नातेवाईकांना वाकविण्याचे प्रकार होतात. मग नवर्‍याचा एखादा नातेवाईक मृत्युशय्येवर असला तरीही त्याला पोलिसठाण्यात बोलवले जाते.

यात वकील उतरले की प्रकरण आणखी चिघळते, कारण वकीलांना केस जिंकण्यात स्वारस्य असते. प्रकरण कोर्टात गेले की कोणत्या कायद्याखाली लग्न झाले आहे हा मुद्दा उपस्थित होतो. आपण ज्या कायद्या खाली लग्न केले आहे त्याचा अर्थ वकील प्रथम समजावून सांगतो तेव्हा लोकांना कायद्याचे गांभिर्य समजते. तोपर्यंत लग्नातील विधींना 'हौसमौज' एवढेच महत्त्व असते.

हा धोका कमी करायचा असेल तर Saptapadi च्या फंदात पुरुषांनी पडू नये.
मी आणखी सविस्तर लिहऊ शकतो पण ते नतद्र्ष्ट स्त्रीयांनी वाचले तर त्यांना आयत्या कल्पना मिळतील याची मला भीति वाटते.

यशोधरा's picture

4 Aug 2009 - 9:51 pm | यशोधरा

>>मी आणखी सविस्तर लिहऊ शकतो पण ते नतद्र्ष्ट स्त्रीयांनी वाचले तर त्यांना आयत्या कल्पना मिळतील याची मला भीति वाटते.

=))

कालिन्दि मुधोळ्कर's picture

4 Aug 2009 - 10:14 pm | कालिन्दि मुधोळ्कर

+१
=)) :))

युयुत्सू साहेब, पण हा सप्तपदीचा कट्/मास्टरप्लान तुम्हाला कसा कळ्ला?

तुमच्या लेखमालेमुळे माझे ह्रुदयापरिवर्तन झाले आहे व मझ्या सदसत्विवेक बुदद्धीला स्मरून मी एक जाहीर खुलासा करत आहे.

लोकहो, हे आहे समस्त स्त्री जातीचं एक शिक्रेट/कट्/प्ल्यान, नीट ऐका, दचकू नका. रामसे चं म्युसिक वाजतयं अशी कल्पना करा.

तर, लग्न ठरल्यानंतर प्रत्येक स्त्रीला इतर बायकांकडून अनोपचारिक शिक्षण मिळते. पहिला धडा: " लग्न मोडावे कसे?" . सप्तपदी वगैरे सगळे या अभ्यासात असते. ह्या प्ल्यान बद्द्ल अत्यंत गुप्तता पाळ्ण्यात येते. एकदम चिडिचाप. पेपर मधे येणार्या हुंडाबळी च्या बात्म्या वगेरे पण या 'कटा'चाच एक भाग आहे. जेणेकरून लोकांचे लक्ष बातम्यांवर जावे आणि इकडे बायकांना मजेत लग्ने मोडता यावीत.

सप्तपदी तर फक्त एक धडा आहे, बच्चू!

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

5 Aug 2009 - 10:20 am | ३_१४ विक्षिप्त अदिती

=)) =)) =))

युयुत्सुमहाराज, तुमच्या पत्नी मिपाच्या सभासद आहेत का हो?

(नतद्रष्ट) अदिती

शिप्रा's picture

4 Aug 2009 - 10:17 pm | शिप्रा

>>नतद्र्ष्ट स्त्रीयांनी वाचले तर त्यांना आयत्या कल्पना मिळती>>..
=)) नतद्रष्ट पुरुषांनी वाचले तर ??

स्वाती२'s picture

5 Aug 2009 - 12:01 am | स्वाती२

४९८ अ चा फटका तुम्ही लग्न कुठल्याही पद्धतीने केले तरी बसू शकतो तेव्हा दोष सप्तपदीचा नाही. पोलीस विचारतही नाहीत लग्न कसे केले म्हणुन. ४९८ अ खाली स्त्री तिच्या सासरच्या कुणालाही अडकवू शकते हे मला माहीत आहे. पण मग जो विरोध करायचा तो ४९८ अ ला करा. तसेच ४९८ अ मुळात का करावा लागला हे ही विचारात घ्या.

युयुत्सु's picture

5 Aug 2009 - 7:30 am | युयुत्सु

पोलीस विचारतही नाहीत लग्न कसे केले म्हणुन.

ही एक गोड गैर समजूत आहे.

ऋषिकेश's picture

4 Aug 2009 - 9:44 pm | ऋषिकेश

प्रस्तुत लेखकाचा--- स्त्री जात ही नतद्रष्ट, पुरुषांना छळायला टपलेली, कांगावे करणारी, (उठसुट) पुरुषांना कोर्टात खेचणारी, कधी पुरुष चुक करतात नी कधी त्याला सप्तपदीच्या फेर्‍यांत अडकवून घटस्फोट घेते असे मांडे रचणारी आहे ----असा समज/अनुभव आहे असे मला वाटले.

तेव्हा जर लेखाचा अर्थ समजावून घ्यायचा असेल तर त्या दृष्टीकोनातून हा (हे) लेख वाचावा (वाचावे) ही नम्र विनंती

(एका कोनातून समंजस)ऋषिकेश
------------------
संध्याकाळचे ९ वाजून ४२ मिनीटे झालेली आहेत. काहिहि न कळल्याने सध्या रेडियो बिघडला आहे.

धनंजय's picture

4 Aug 2009 - 10:10 pm | धनंजय

त्या दृष्टिकोनातून वाचली तरच लेखमाला नीट समजेल, हे पटते आहे.

पण हा लेखमालेतून असे कळले की वरील दृष्टिकोन प्रामाणिकपणे असलेले लोक भारतात आहेत. हा दृष्टिकोन मला चुकीचा वाटला तरी तो दुर्लक्ष करण्यायोग्य नाही. कायद्याविषयी धुमसणारे लोक समाजात असले, तर ते दीर्घकाळात घातक होऊ शकते. परंतु या विषयी काय करावे ते कळत नाही. कारण हा दृष्टिकोन तथ्यचर्चेने बधणारा नसावा. :-(

युयुत्सु's picture

5 Aug 2009 - 7:35 am | युयुत्सु

"स्त्री जात" या शब्दांअगोदर "मुक्त" हे विशेषण लावायला विसरलात.

पक्या's picture

4 Aug 2009 - 10:44 pm | पक्या

>>गेले काही दिवस 'मिसळपाव'वर मी सप्तपदी विषयी जी चर्चा सुरू केली होती, तीचा मी आता समारोप करू इच्छितो.

अत्यानंद झाला.

मला वाटतंय आपण कुठल्यातरी मानसिक आजाराने पछाडलेले आहात. त्यामुळे आपल्याला सर्व आधुनिक स्त्रिया नतद्र्ष्ट, कपटी, कजाग ....वाटत आहे. देव आपल्या बायकोचे (असल्यास)रक्षण (आपल्यापासून ) करो.

नीधप's picture

5 Aug 2009 - 12:45 am | नीधप

>>मला वाटतंय आपण कुठल्यातरी मानसिक आजाराने पछाडलेले आहात. त्यामुळे आपल्याला सर्व आधुनिक स्त्रिया नतद्र्ष्ट, कपटी, कजाग ....वाटत आहे. देव आपल्या बायकोचे (असल्यास)रक्षण (आपल्यापासून ) करो.<<
याबद्दल अनुमोदनाचे ताटभर मोदक.. (वरच्या मानसिक आजारी लेखकाने केलेलेच!)

३ लेखांचं दळण वाचून एवढंच कळलं की लेखकाच्या डोक्यात सडक्या गोष्टी नको इतक्या भरल्यात. आणि बायकांच्याबद्दल कमालीचा तिरस्कार..
होतं असं.. ज्याला आपण गुलाम समजत होतो तो आपल्या बरोबरीचा किंवा कुठे कुठे वरचढही आहे ह्याच्या जाणीवेने भले भले गारद होतात.. तुमच्या डोक्यावर परिणाम झाला असेल तर नवल काय?

- नी
http://saaneedhapa.googlepages.com/home

युयुत्सु's picture

5 Aug 2009 - 8:35 am | युयुत्सु

मला वाटतं की तुमच्या या न्यायाने मी वर उल्ले़ख केलेले सुप्रिम कोर्टाचे न्यायधीश सुद्धा मानसिक आजाराचे रूग्ण म्हणावे लागतील, कारण कारण मुक्त स्त्रीयांनी केलेलेया कायद्याच्या गैरवापराबद्द्ल त्यांनी ताशेरे ओढले आहेत.

नीधप's picture

5 Aug 2009 - 11:33 am | नीधप

त्यांनी मान खाली घालून पति परमेश्वर म्हणेल ती गोष्ट निमूट न स्वीकारणार्‍या सगळ्याच स्त्रियांबद्दल ताशेरे ओढले असतील तर त्यांनाही म्हणावं लागेल.
केवळ गैरवापर करणार्‍यांच्याबद्दल ओढले असतील तर त्यांचं काही चुकलं नाही.

तुम्हाला मात्र मानसिक समुपदेशनाची प्रचंड गरज आहे.
तिकडे जा.. आमचं डोकं खाउ नका.

- नी
http://saaneedhapa.googlepages.com/home

लिखाळ's picture

5 Aug 2009 - 1:23 am | लिखाळ

स्त्रीयांवर अनेक तर्‍हेने अन्याय होताना आपल्याला दिसतो. अनेक घरांमध्ये स्त्रीयांच्या विचित्र वागण्याने पुरूषालाही त्रास भोगायला लागत असतो. अश्या वेळी त्याला कायद्याचे संरक्षण/सहानुभूती नसते असे युयुत्सुंना म्हणायचे असावे असे मला सुरुवातीला वाटले होते. तसे त्यांना म्हणायचे असेलही कदाचीत.

पण तीन भाग आणि त्यातील मतमतांतरे, सप्तपदी आणि हिंदू विवाह कायद्याचे उल्लेख आणि त्यातून काहीच निष्पन्न निघणारा संवाद वाचून मला काहीच उमगले नाही. कायद्याची पुरेशी सहानुभूती नाही असे मत असेल तर त्यातून सावध कसे राहावे या बद्दल कुठेच चर्चा नाही. या चर्चेतून मला काही बोध झाला नाही.

-- लिखाळ.
आपण खूप बोलतो याचा अर्थ आपण बरोबर बोलतो असे नाही !

मराठीप्रेमी's picture

5 Aug 2009 - 1:25 am | मराठीप्रेमी

सहमत आहे

प्रकाश घाटपांडे's picture

5 Aug 2009 - 8:42 am | प्रकाश घाटपांडे

आमच्या मते लेखकाने त्याला हवे ते साध्य केले आहे अन्यथा ही चर्चा एवढी कुणी चघळली असती? कायद्याचा दृष्टीकोन असा कि शंभर अपराधी सुटले तरी चालतील पण एका निरपराध्यास शिक्षा होता कामा नये. याचा अर्थ शंभर निरपरांध्यांना न्याय मिळाला नाही तरी चालेल पण एका निरपराध्यावर अन्याय होता कामा नये असा घ्यावा काय?
अवांतर - कोण तिकडे कुजबुजतय रे दिली काडी लाउन! जाउ दे बहुतेक भासच तो. नाही तर काढा धागा नवीन
प्रकाश घाटपांडे
आमच्या अनुदिनीत जरुर डोकवा.

आजच्या सकाळ्च्या मुक्तपीठ पुरवणीतील पान क्र. चार वरील 'अजब न्याय' आणि 'सा़खरपुडा सावधान' हे दोन लेख मला counselling चा सल्ला देणारानी वाचावेत.

JAGOMOHANPYARE's picture

24 Aug 2009 - 11:04 am | JAGOMOHANPYARE

इथे लिन्क द्याल का ? मी तुमची वेब साऐट पाहिली... हिन्दु विवाह कायदा आणि स्पेशल मॅरेज अअ‍ॅक्ट हे दोन वेगळे आहेत, हे इथे कुणालाच माहीत नव्हते.... ते सान्गून जर हिन्दु मॅरेज कायद्यापेक्षा दुसरा कायदा कसा सुसह्य आहे , हे सान्गितले असते तर तीन धाग्यान्चे दळण एकाच लेखात सम्पले असते की !