आम्हाला सगळे कळते

अमृतांजन's picture
अमृतांजन in जनातलं, मनातलं
24 Jul 2009 - 9:35 pm

अकरावी प्रवेशासंबंधी प्रश्न मी पुर्वी विचारल्याचे मिपाकरांना आठवत असेलच. सध्या प्रवेश चालू आहेत. मला एका प्रसिद्ध ज्यु.कॉ. ला खालीलप्रमाणे अनुभव आला.

काल दुपारी २ वा आंतरजालावर गुणवत्ता यादी लागली व लगेच ज्यु.कॉला भेट दिली. तेथे फळ्यावर ही सुचना लावली होती, "अकरावी प्रवेश: यादी ५ वा. लावण्यात येईल." खाली एक आणखी उपसुचना होती, "वेळ नंतर कळवण्यात येईल". कसली वेळ नंतर कळवण्यात येईल काहीच कळत नव्हते.

संध्याकाळी ५ वा. पुन्हा ज्यु.कॉला हजर. तोबा गर्दी. नवे काय कळाले?- काहीच नाही तीच आंतरजालावरील माहीती तेथे होती. बाकी काहीही माहीती कळली नाही. दुसऱ्या दिवशी ११ ला ऍडमिशन फॉर्म मिळतील एवढेच कळले.

सकाळी १० ला पाल्याला ज्यु.कॉला पिटाळले. एकमेकाशी मोबाईलवर संपर्क ठेवला होता. कळले की, कोणालाच काहीही माहीती नाही की, फॉर्म कुठे मिळणार आहेत. तेथे ज्या खिडक्या होत्या त्यावर वाणिज्य असे लिहिले होते. सायन्स कुठेही नाही.

मी ही ज्यु.कॉला जायचा निर्णय घेतला. १०.४५ ला ज्यु.कॉ गाठलं. लोकांनी एव्हाना अंदाजाने दोन लायनी केल्या होत्या. त्यात त्यांनी आपालल्या पाल्याला उभे करुन स्वतः दुसऱ्या लायनीत उभे केले. जी सायन्सची लाईन असेल तिथे पाल्याला नंबर द्यायचा असा धुर्त डाव पालकांनी आखला. बऱ्याच जणांना त्याचा फायदा झाला.

११ वा खिडक्यात खडबड ऐकू आली. दारं उघडली आणि अनाउन्समेंट झाली- हीच ती सायन्सची खिडकी. लोकांची पळापळ झाली. ज्यांनी धूर्त खेळी केली होती त्यांनी विजयीमुद्रेत जल्लोश केला.

तेव्हढ्यात सायन्सचे फॉर्म ह्या नाही शेजारच्या खिडकीतून मिळतील असे सांगितले. लाईन आळीप्रमाणे इकडची तिकडे हलली. ह्यात कोणाचे पुढेचे नंबर गेले.

लोक संयम बाळगुन होते. काहीजण आणखी काय-काय अपेक्षा करायची अशा भावाने सगळाप्रकार सहन करत होते.

११.००: "हं चला घ्या फॉर्म!" असे सांगण्यात आले. आणि, "हे काय?, तुम्हाला तुमच्या पाल्याचा आम्ही लावलेल्या यादीत किती क्रमांक आहे हे माहीत नाही? जा तो घेऊन या, मग मी फॉर्म देईन" पुढच्या क्रमांकाच्या माणसाला हतबुद्ध होणे म्हणजे काय ते कळले. तो चर्फडत लाईन सोडून गेला. पुढे हे प्रकार सतत घडत होते.

११.०३ ला मग एक प्युन आला. त्याने त्या खिडकीच्या फळकुटांवर लिहीले- "१ ते १३०- ११ ते २.००, १३१ ते २६०- २.३० ते ६. ऍडमिशन देण्यात येईल." जे लोक ह्या क्रमांकात नव्हते ते रडायचे बाकी होते. त्यांची फेरी आणि वेळ फुकट गेला. नंतर एक आणखी सुधारणा करण्यात आली. "आज फक्त ओपन", आणखी काही लोक रडायला लागले.

एकजण मेडीकल ग्राउंडवर मेरीटवर आला होता. त्याची आई आणि तो दिसेल त्याला विचारत होते, मेडीकल वाल्यांची ऍडमिशन कधी होईल?- आज, उद्या? काहीच कळत नव्हते.

ज्यांनी फॉर्म घेतले होते त्यांचा पुढचा प्रश्न होता, "आता पुढे प्रोसेस कशी असेल?" त्यांना एका हॉलमध्ये बोलावण्यात आले जेथे ऍडमिशन होणार होत्या. नंतर्ची प्रोसेस बरीच सुरळीत होती व चांगली होती. फक्त सकाळीच फार-फार वैताग आला.

दर्वर्षी असेच घडत असेल का? तुम्ही-आम्ही कंपन्यात नोकऱ्या करतांना असे लॅप्स दरवर्शी खपवून घेतील का? कस्टमरतर हाकलून देईन.

शिक्षणप्रतिक्रिया