प्लास्टीक खरंच उपयोगी की उपद्रवी ?

माझी दुनिया's picture
माझी दुनिया in काथ्याकूट
19 Feb 2008 - 5:52 pm
गाभा: 

काही महीन्यांपुर्वी लोकसत्तात शुभदा पटवर्धनांचा ’तरीही का करतोय आपण प्लास्टीकचा वापर’ हा लेख वाचला होता. मागच्याच महीन्यात राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळेचे उपसंचालक, डॉ. इथेराधाकृष्णन यांचा ’प्लास्टीक वापरा आणि पर्यावरण वाचवा’ हा लेख वाचला होता. आजच्या लोकसत्तेत त्यावर ब-याच प्रतिक्रिया वाचायला मिळाल्या. पण कोणी ’प्लास्टीक खरंच उपयोगी की उपद्रवी ?’ यावर प्रकाश टाकू शकेल का ?
[काही वर्षांपुर्वी एका अभियांत्रिकी विद्यालयातल्या मुलांनी प्लास्टीकच्या पातळ पिशव्यांचा वापर करून पक्के रस्ते बांधण्याचे प्रात्यक्षिक केले होते असे वाचण्यात आले होते. ज्यामुळे प्रदुषणही टळेल आणि वारंवार रस्त्याच्या दुरुस्त्या कराव्या लागणार नाहीत. परिणामी पैसा ही वाचू शकेल. असे रस्ते बंगलोर मध्ये बांधले जातात असेही वाचले होते. अर्थात मुंबईत असे कायम स्वरूपी रस्ते बांधले गेले तर संबधित लवकरात लवकर रस्त्यावर येण्याचा धोका संभवतोच :-)]

ता.क.: ज्यांना हे संकेत्स्थळावरचे दुवे वाचता येत नसतील त्यांनी इथे वाचावे.