पावसाळ्यातली नरसोबाची वाडी

श्रीमंत दामोदर पंत's picture
श्रीमंत दामोदर पंत in कलादालन
22 Jul 2009 - 4:13 pm

नमस्कार मिपाकरांनो....
माझा मिपावर काहीतरी लिहिण्याचा हा पहिलाच प्रयत्न आहे त्यामुळे चुकभुल दे.घे. :)

नरसोबाची वाडी !!!! सांगलीपासुन साधारणतः ३० किमी अंतरावर वसलेलं एक छोटसं गाव... गावापेक्षाही नावाप्रमाणेच वाडी आहे... पण अतिशय प्रसिद्धीला आलं ते दत्त महाराजांच्या तिथल्या वास्तव्यामुळं....
तसा मी नेहमी वाडीला जाणारा... पण पावसाळ्याच्या सुरुवातीला तिथे जाण्यात जी मजा आहे ती कशातच नाही ( अर्थात हे माझं वैयक्तिक मत आहे. ) इतरवेळी संथ वाहणारी कृष्णामाई पावसाळ्यात मात्र रुद्र रुप धारण करुन वाहते. वाडीचं मंदिर अगदी नदीकाठी असल्यानी दरवर्षीच्या पुरात पाण्याखाली जातं. यंदाच्याही पावसाळ्याच्या सुरुवातीला वाडीला जाण्याचा योग आला. त्यावेळी काढलेले हे कृष्णामाईचे फोटो. मंदिरामधे फोटो काढायची परवानेगी नसल्यानी महाराजांचा फोटो गुगलवरुन घेतलेला आहे हे आधीच नमुद करु इच्छितो. :) त्याचप्रमाणे यात काही मागीलवर्षीच्या पावसाळ्यात काढलेले पण फोटो आहेत.

खालच्या फोटोत मंदिराच्या अगदी समोर असलेला चौथरा :-

वाडीला कृष्णा आणि पंचगंगा नद्यांचा संगम आहे. त्या संगमाचा हा फोटो -

महराजांचा फोटो -

धन्यवाद. :)

छायाचित्रण

प्रतिक्रिया

अमोल केळकर's picture

22 Jul 2009 - 4:22 pm | अमोल केळकर

श्री. गुरुदेव दत्त !!

मस्त फोटो. संगमावरचे काही फोटो काढले नाहीत का ?
--------------------------------------------------
भविष्याच्या अंतरंगात डोकावण्यासाठी इथे टिचकी मारा

दशानन's picture

22 Jul 2009 - 4:29 pm | दशानन

मस्त फोटो यार.... !
एकदम जुन्या आठवणी जाग्या केल्या :)

धन्यु !

+++++++++++++++++++++++++++++

अवलिया's picture

22 Jul 2009 - 6:13 pm | अवलिया

हेच बोलतो... मस्त फोटो.
खुप जुन्या आठवणी जागृत झाल्या ! धन्यवाद :)

--अवलिया

विकास's picture

22 Jul 2009 - 6:35 pm | विकास

अगदी लहान असताना नरसोबाच्या वाडीस गेल्याचे आठवते... (भिलवडी पण तिथून जवळ आहे ना?)

मदनबाण's picture

22 Jul 2009 - 6:37 pm | मदनबाण

आहाहा...दामोदरपंत धन्यवाद या फोटोंबद्धल. :)
वर्षातुन एकदा तरी मी इथे जातोच जातो...आणि माझे तिर्थरुप बर्‍याच वेळा जाऊन येतात.
वरील फोटो पाहता हे लक्षात आले की मंदीर अजुन पाण्याखाली गेलेले नाही.
मी इथं आलो की नदीत मनसोक्त पोहुन घेतो. :)

श्रीं ची उत्सव मूर्ती :--

विमुक्त's picture

22 Jul 2009 - 6:36 pm | विमुक्त

सुर मारायला काय मजा येईल यार.... मस्त....

एकलव्य's picture

23 Jul 2009 - 5:16 am | एकलव्य

शाळेत असताना कृष्णेच्या याच पाण्यात देवळाच्या पायर्‍यांवरून सूर मारलेला आहे त्याची आठवण झाली. फोटो काढण्याची पद्धतच तेव्हा नव्हती पण चित्र कसे अगदी स्पष्टपणे मनात उभे आहे.

पुन्हा आठवण करून दिल्याबद्दल आणि बाकी चित्राबद्दलही आभार!

परिकथेतील राजकुमार's picture

22 Jul 2009 - 6:44 pm | परिकथेतील राजकुमार

मस्त हो पंत.

आजोळी सांगलीला गेलो की कायम जायचो वाडील, पण हे असले रुप पहिल्यांदा बघितले.

शेवटच्या फोटुमध्ये सुर मारणारे तुम्हीच आहात का ? ;)

©º°¨¨°º© परा ©º°¨¨°º©
'अनीवे' शिवाजी विद्यापिठातुन मिपा आणि मिपाकर 'यांछ्यावर' पी एच डी करण्याच्या विचारात असलेला.
आमचे राज्य

मस्त कलंदर's picture

22 Jul 2009 - 7:19 pm | मस्त कलंदर

शाळेच्या सहलीतून पहिल्यांदा नरसोबाच्या वाडीला गेले होते... नंतरही बर्‍याचदा जाणं झालंच... औदुंबर माझ्या गावाच्या अगदी जवळ असल्यानं तिथं अधिक वेळा जाणं होतं इतकंच.. पण वाडी असो वा औदुंबर.. प्रत्येकवेळी कवठाची बर्फी अगदी मस्ट!!!!!

मस्त कलंदर..
नीट आवरलेलं घर ही घरचा संगणक बंद पडल्याची खूण आहे!!!!

हवालदार's picture

23 Jul 2009 - 12:25 am | हवालदार

काय आठवण काढलीस? अजुनही ती चव जीभेवर रेन्गाळते आहे. :-) मला वाटत कि कवठाची बर्फी फक्त त्याच भागात मिळते का?

बासून्दी अनि पेढेही छान मिळतात तिकडे. :-)

चतुरंग's picture

22 Jul 2009 - 8:28 pm | चतुरंग

दिगंबरा दिगंबरा श्रीपादवल्लभ दिगंबरा!
जय कृष्णामाई!
मस्त आलेत हो फोटो. आवंढा आला. आत्ता जाऊन पाय धुवून यावे आणी देवळात दर्शन घेऊन यावे असे तीव्रतेने वाटले! पोहायचो ते आठवले. दगडी पायवाटेने जाऊन, करदंट, कवठाची बर्फी खात खात मंडपाच्या थंडगार सावलीत जाऊन बसायचो ते आठवले. वा एका सेकंदात केवढी मोठी सफर करवलीत! धन्यवाद! :)

(हरवलेला)चतुरंग

सुहास's picture

22 Jul 2009 - 11:58 pm | सुहास

फोटो छानच आहेत..

हे फोटो नक्की याच पावसाळ्यातले आहेत काय?

कारण एक महिन्यापूर्वी मी गावी गेलो होतो तेव्हा फोटो नं. ३ मध्ये जी संगमाच्या पलीकडे घाटावरची उंच इमारत दिसते तिला नव्याने रंग-रंगोटी केली होती जी ईथे अजिबात दिसत नाही.. म्हणून विचारतोय...!

अवांतरः फोटो नंबर २ मधील पैलतीर माझे आजोळ आहे.. आणि फोटो नंबर ३ मधील पैलतीर माझे गाव..!

भाग्यश्री's picture

23 Jul 2009 - 12:14 am | भाग्यश्री

वा.. नरसोबाच्या वाडीला बर्‍याचदा जाणे व्हायचे.. भिलवडी जवळ आहे तिथून.. सगळं आठवल! आणि शांत वाटले..
नरसोबाच्या वाडीची बासुंदी पण फेमस आहे ना?

http://www.bhagyashree.co.cc/

अमोल केळकर's picture

23 Jul 2009 - 10:31 am | अमोल केळकर

तुमच्या माहिती साठी
भिलवडी ( औदूंबर ) आणी वाडी सांगलीच्या दोन विरुध्द बाजुला अहेत.
--------------------------------------------------
भविष्याच्या अंतरंगात डोकावण्यासाठी इथे टिचकी मारा

नीलकांत's picture

23 Jul 2009 - 12:54 am | नीलकांत

पंत,

फोटो झकास आले आहेत. वाडीला आधी जाऊन आलेलो असल्यामुळे फोटो पाहून पुन्हा तेथे गेल्यासारखे झाले.

- नीलकांत

विसोबा खेचर's picture

23 Jul 2009 - 8:31 am | विसोबा खेचर

वा श्रीमंत, सुंदर फोटू काढले आहेत..

वाडीची बासुंदीही क्लास असते...

तात्या.

JAGOMOHANPYARE's picture

23 Jul 2009 - 9:02 am | JAGOMOHANPYARE

सुन्दर फोटो.... कुरुन्दवाडमध्ये ३२ वर्षे राहूनही हे असले फोटो काढणं कधी जमले नाही....

आशिष सुर्वे's picture

23 Jul 2009 - 9:44 am | आशिष सुर्वे

श्रीमंत!

पदार्पणातच शतक हाणलेत राव!!

!! श्री गुरुदेव दत्त !!

-
कोकणी फणस

JAGOMOHANPYARE's picture

23 Jul 2009 - 12:36 pm | JAGOMOHANPYARE

सुहास, तुमचे गाव कुरुन्दवाड ? आणि आजोळ औरवाड... ? ... मी पण कुरुन्दवाडचा आहे....

दोन ओन्डक्यान्ची झाली नदी मध्ये भेट !
एक लाट जोडी आता पुन्हापुन्हा गाठ !! :)

JAGOMOHANPYARE's picture

23 Jul 2009 - 2:39 pm | JAGOMOHANPYARE

घाटाचा फोटो जुना आहे का? बहुधा गेल्या वर्षीचा... कारण हल्ली तो घाट रन्गवलेला आहे... त्याचा फोटो जमल्यास उद्या टाकतो इथे...

श्रीमंत दामोदर पंत's picture

23 Jul 2009 - 2:52 pm | श्रीमंत दामोदर पंत

हो्ए सगळे फोटो मागच्यावर्षी काढलेले आहेत. काल घाईघाईत लिहिताना तसं स्पष्ट लिहायचं राहिलं माझ्याकडुन..... यावरर्षीवे फोटॉ पण आहेतच त्यात. म्हणजे मागच्यावर्षीचे आणी यावर्षीचे असे दोन्ही फोटो आहेत. :)

तुमच्याकडच्या फोटोंच्या प्रतिक्षेत आहे. :)

अमित.

फोटो कसा अप्लोड करायचा?

JAGOMOHANPYARE's picture

29 Jul 2009 - 10:59 am | JAGOMOHANPYARE

JAGOMOHANPYARE's picture

29 Jul 2009 - 11:00 am | JAGOMOHANPYARE

प्राची's picture

29 Jul 2009 - 11:34 am | प्राची

पंत,फोटो एकदम मस्त आले आहे.
वाडी आणि औदुंबरच्या आठवणी जाग्या झाल्या.पावसाळ्यात कधी जाणे झाले नाही.हे फोटो बघून आता ठरवल,पावसाळ्यात गेलच पाहिजे वाडीला.बघू गणपतीच्या सुट्टीत गावी गेल्यावर जमलं तर.:)

Anand 16775's picture

4 Feb 2010 - 4:02 pm | Anand 16775

Very Nice Photo.

Thanks

मेघवेडा's picture

4 Feb 2010 - 5:08 pm | मेघवेडा

मस्त आहेत सर्व फोटो पंत!

दुचाकीवर गेलेलो गोव्याहून! पावसातच! सफरीच्या आठवणी जाग्या झाल्या!!!

मस्त!!

-- मेघवेडा.

आम्हाला अजून कुणाच्या खरडवहीत किंवा खरडफळ्यावर खरडायची अनुमती नाही. आम्ही काय करावे बरे? :O