पुणे - शिवथरघळ - पुणे

सातारकर's picture
सातारकर in कलादालन
22 Jul 2009 - 10:26 am

रविवार रिकामाच होता म्हणून शिवथरघळीला जाउन यायच ठरवल. आमच्या रीतीप्रमाणे ऐनवेळेला लढाईच्या आधीच दोन मावळे गारद. शेवटी पाचाच्या तिथ तिघच निघालो आणि स्वर्गात जाउन आलो. पाउस फार नव्हता पण तरीही जे काही समोर आल त्यांन डोळ्याच पारण फेडल. कोणती छायाचित्र टाकायची आणि कोणती नाही याचा काही निर्णय करता येत नव्हता पण शेवटी काही निवडून टाकली.

मौजमजास्थिरचित्र

प्रतिक्रिया

महेश हतोळकर's picture

22 Jul 2009 - 11:44 am | महेश हतोळकर

आजून थोडे मोठे फोटो चालले असते. जोडीला वर्णनही येऊद्या की!

ता.क.: फोटो मोठे केल्या बद्दल धन्यवाद. तेवढं वर्णनाचं पण मनावर घ्याच.
-----------------------------------------------------------------
तुम्ही जिंकलात का हारलात याला काहिच महत्व नाही. मी जिंकलो का हरलो हे महत्वाचे.
-----------------------------------------------------------------

सहज's picture

22 Jul 2009 - 11:37 am | सहज

पावसाळ्यात उमलणार्‍या भरमसाठ काव्यांकुरांपेक्षा हे पावसाळ्यातले नुस्ते फोटो बघायला किती मस्त वाटतात.

सुंदर!!!!!!!!!!!!!!!!

पक्या's picture

22 Jul 2009 - 11:42 am | पक्या

छान फोटोज.
पण घळीचे कुठायेत ? प्रवासाचे वर्णन असते तर अजून मजा आली असती.

सातारकर's picture

31 Jul 2009 - 9:40 am | सातारकर

घळीचे फोटो काढले नाहीत. तिथ फोटो काढण बरोबर वाटल नाही. वर्णन म्हणाल तर गाडी काढली गेलो, दर्शन केल आणि आलो.( आता अस वर्णन लिहिल तर तुमच्यासकट सगळ्यांनी जोड्यानी मारल नसत का ?)
-----------------------------------------------------------------------------------------
I have seen GOD. He bats at no. 4 for India
Matthew Hayden