भारतीय शिक्षणव्यवस्था जागतिक बातमीत...

बहुगुणी's picture
बहुगुणी in काथ्याकूट
9 Jul 2009 - 12:53 am
गाभा: 

...yet again for the wrong reasons!!

नेचर मेडिसीन या विख्यात नियतकालिकात वेशीवर टांगलेली ही लक्तरं:

मूळ वृत्त स्त्रोतः

पण हे फक्त या दोनच मेडिकल कॉलेजेस पुरतं किंवा एका विद्यापीठापुरतं नक्कीच मर्यादित नाही, इतर ठिकाणच्या भ्रष्टाचाराचं काय? शिक्षण मंत्रालयाने इतरही ठिकाणी पाठपुरावा करायला सुरूवात केली आहे असं या वृत्तात म्हंटलं आहे, ते खरंच होईल तो सुदिन!

प्रतिक्रिया

हरकाम्या's picture

9 Jul 2009 - 1:40 am | हरकाम्या

यात नवल वाटण्यासारखे काहिहि नाही. गेले वर्षानुवर्षे आपण या गोष्टी
ऐकत आहोत. आणि या प्रकाराला आपणलोकही काही प्रमाणात जबाब्दार आहोत. आज भारतिय समाजात डॉक्टर, इंजिनियर यापेशांपेक्षा मानाचा कुठलाच पेशा नाही. आणि समाजातला प्रत्येक घटक हा मानसन्मानासाठि हपापलेला आहे हे एक विदारक पण वास्तव
असलेले सत्य आहे.आज कुठला माणूस अभिमानाने सांगतो की माझा मुलगा एक यशस्वी हमाल होइल ? जोपर्यंत आपण आपली मानसिकता
बदलत नाही तोपर्यंत हा भ्रष्टाचारुपी अजगर सर्वांना गिळणारच.
आपण जोपर्यंत इतर व्यवसायांना प्रतिष्ठा देत नाहि, तोपर्यंत हे असेच
चालणार.
दुसरे असे की परदेशी नियतकालिके व व्रुतपत्रे यावर विश्वास किति
ठेवावा. कारण या मंडळींना भारतातले फक्त दोषच दिसतात. किंबहुना
ही फक्त दोषच शोधत असतात्.एवढे असुनही परदेशि मंडळी वैद्यकिय
उपचाराठि येथे का तडफडतात?

आपल्या दुसर्‍या मुद्याबद्दल: टाईम्स मधील ही मूळची बातमी वाचा. म्हणजे व्यवस्थेतील ही भ्रष्ट कीड भारतीय वृत्तपत्रानेही दाखवलीय. (मला हे नेचर मेडिसीन मधील वृत्तातूनच समजलं.)

तसंच नेचर मेडिसीन मधील वरील बातमी एका भारतीय शास्त्र-वार्ताहरानेच दिली आहे (तळ-टीप/byline वाचा: किलिगुडी जयरामन, बँगलोर).

शिवाय आपल्या देशातल्या चुकीच्या गोष्टी/दोष कुणी दाखवून दिले हे महत्वाचं नसून ते खरे असले तर मान्य करून सुधारले गेले पाहिजेत याचा आग्रह महत्वाचा आहे असं वाटतं. यात आपला पहिला मुद्दा अर्थातच महत्वाचा, लोकांची वैद्यकीय प्रवेशाची मानसिकता/आसक्ती कमी झाली तर त्याचं स्वागतच व्हावं. (मी वैद्यकीय 'शिक्षणा'विषयीची मानसिकता कमी व्हावी असं म्हणत नाही आहे, आपल्या खंडप्राय देशात वैद्यकीय शिक्षण महत्वाचंच आहे, डॉक्टर कमी करून प्रश्न सुटणार नाही.)

मेडिकल टुरिझमचा मुद्दा या सद्याच्या चर्चेपेक्षा वेगळा आहे; परदेशी लोक सद्या तरी भारतात येतात ते परदेशात मिळतात तेच उपचार तुलनेने स्वस्त आहेत म्हणून, आणि ते (परदेशातल्यासारखे अपॉइंटमेंटसाठी थांबायला न लागता) वेळेत मिळतात म्हणून. (इंशुअरन्स कंपन्याही आता पैसे वाचवण्यासाठी हा मार्ग स्वतः सुचवतात.) भारतातले उपचार up-to-date आहेत, आधिक प्रगत नाहीत. आणि त्यातही उणीवा आहेतच, नाहीतर रॉबिन कूक सारख्यांनी 'फॉरीन बॉडी' सारखं पुस्तक लिहून ते तडाखेबंद विकलं नसतं.

बेभान's picture

9 Jul 2009 - 5:42 pm | बेभान

आत्ताचे वेल established डॉक्टर्स ते कॉलेजात असताना मेहनत घेवुन, आभ्यास करुन डॉक्टर्स झालेले आहेत. त्यांच्या वेळेस एवढा भ्रष्टाचार भ्रष्ट झालेला नव्हता (कमीत कमी शिक्षणव्यवस्थेततरी). म्हणुनच परदेशी लोक भारतीय डॉक्टरांकडॆ उपचार करणे पसंत करतात. पण आजकाल परिस्थिती अतिशय गंभीर आहे. HSC (50%) आणि CET (10) एवढे कमी गुण असतानासुद्धा माझ्याएका मित्राने सन २००२ मध्ये गलेलठ्ठ डोनेशन देवून (काही मंडळीतर म्हणत होती की कोण्या एका कॆबिनेटमंत्र्याने त्या शिक्षणसंस्थेला फोन लावुन त्याचे Admission केले.) गेल्या वर्षी तो डॉक्टर झाला आणि एका नामवंत हॉस्पीटलमध्ये तो डॉक्टर आहे ..

विकास's picture

10 Jul 2009 - 12:30 am | विकास

>>गेल्या वर्षी तो डॉक्टर झाला आणि एका नामवंत हॉस्पीटलमध्ये तो डॉक्टर आहे ..<<

अशा ठिकाणी तेथील राजकारण्यांना (दिल्लीश्वर असले तर अत्युत्तम!) तेथे उपचाराला पाठवा.

वास्तवीक जसे (मला वाटते एनडीएच्या काळात) नैसर्गिक आपत्तीला आमचे आम्ही तोंड देऊ बाहेरून मदत घेणार नाही असे धोरण आमलात आणले आणि बर्‍यापैकी नंतर कायमच यशस्वी केले तसेच आता नवीन धोरण करावे. कुठलाही राजकारणी जनतेच्या पैशाने परदेशी उपचाराला जाणार नाही अथवा परदेशी डॉक्टरांस उपचार करायला येथे आणणार नाही.

बाकी बहुगुणींनी म्हणल्याप्रमाणे दोष दाखवले म्हणून काही बिघडत नाही. जर ते सत्य असले तर बदलणे महत्वाचेच आहे. नाहीतर जे जे हत्याकांडासारखे अनेक प्रकार सतत होत रहातातच. जे डॉक्टर्सच्या बाबतीत तेच इंजियर्स आणि इतर क्षेत्रातही कमीअधिक प्रमाणात लागू आहे.