साबुदाणा आणि बटाटा

अमृतांजन's picture
अमृतांजन in काथ्याकूट
3 Jul 2009 - 8:01 am
गाभा: 

आधुनिक जगात उपवास साबुदाणा आणि बटाटा ह्यांच्याशिवाय पुर्ण होऊ शकत नाही. हे दोन "मुळ"पदार्थ उपवासाच्या मान्यताप्राप्त यादीत कसे आले ते जाणकारांकडून ऐकण्याची खूप उत्सुकता आहे.

साबुदाणा असा बनवतात: http://www.sabuindia.com/sago2.htm
साबुदाण्याविषयी अधिक माहीती: http://en.wikipedia.org/wiki/Sago
बटाटा: http://en.wikipedia.org/wiki/Potato

[श्रावणाच्या निमित्ताने ह्या धाग्याचे पुनरुज्जीवन. आज दि. ७ ऑगस्ट ला दै. सकाळच्या फामिली डॉक्टर ह्या पुरवणीतील श्री. बालाजी तांबे ह्यांचा "श्रावणभक्ति" हा लेख नक्की वाचा]

प्रतिक्रिया

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

3 Jul 2009 - 8:34 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

आपल्या प्रश्नाला जोडून मला विचारायचे आहे की, उपवासाला खाण्यासाठी काय-काय चालते, त्याची अधिकृत यादी कुठे वाचायला मिळेल. उपवास धरल्याने, किंवा उपवासाचे ठरलेले पदार्थ खाल्ल्याने कोणते पुण्य मिळते. मागे कोणीतरी एकादशीला चिकन खाल्ले होते, तेव्हा नॉनव्हेज वगैरे उपवासाला चालते का ? नसेल तर का चालत नाही, त्यामागचे धार्मिक कारण काय ?

जाणकारांकडून माहिती समजून घेण्यास उत्सूक...

-दिलीप बिरुटे

अमृतांजन's picture

3 Jul 2009 - 8:53 am | अमृतांजन

दैनिक सकाळच्या आरोग्य पुरवणीत श्री. बालाजी तांबे ह्यांचा लेख आहे त्यात उपवासाच्या पदार्थांची यादी आहे.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

3 Jul 2009 - 9:05 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

बालाजी तांबे यांचा 'आत्मवास' आणि 'उपवासातून आरोग्य' हे सकाळमधील लेख वाचले, शिर्षकातच ते म्हणतात उपवास ही केवळ धार्मिक बाब नाही. तो आहे, एक आयुर्वेदीय उपचार. आणि उपवास हा लंघनाचा एक प्रकार असतो.

''आरोग्य उत्तम राहण्यासाठी, अध्यात्मिक उन्नती व्हावी यासाठी व माणसाला हवी असलेली चिरंतन शांती मिळावी यासाठी उपवासाचे नियोजन केलेले दिसते'' असे ते म्हणतात. (त्यासाठी मग उपवासच कशाला लागतो)

'पचायला सोपा असा एकच कुठला तरी पदार्थ खाणे' अशा प्रकारे उपवास केल्या जाऊ शकतो असे ते म्हणतात. आपले मिपाकर काय म्हणतात त्याची उत्सूकता आहे. :)

-दिलीप बिरुटे

मदनबाण's picture

3 Jul 2009 - 8:41 am | मदनबाण

मागे कोणीतरी एकादशीला चिकन खाल्ले होते,
चला सुटला बिचारा कुक्कुट या कलियुगातुन !!! :D

(टवाळ)
मदनबाण.....

Success is never permanent, and failure is never final.
Mike Ditka

दिपाली पाटिल's picture

3 Jul 2009 - 9:02 am | दिपाली पाटिल

कोणी ठरवलं असेल की साबुदाणा उपासाला चालतो??

भगर(वरि)- आमटी चं ठीक आहे की ते धान्यासारखं उगवतं पण लोकं म्हणतात भगर(वरि) चा भात खातो तर साधा भात खायला काय प्रॉब्लेम आहे?
टॅपिओका ला मराठी त "भातकंद" म्हणतात.ते भातकंद उपासाला चालतात खरं..
साबुदाण्या चा शोध तर चीन मधे लागला होता बहुतेक, चीनी आणि अमेरिकन लोक वापरतात तो अगदी बारिक साबुदाणा असतो त्याला "टॅपीओका पर्ल " म्हणतात त्याचं पुडिंग पण असतं इकडे बर्‍याच बुफे जेवणात. आपल्या साबुदाण्याच्या खिरि प्रमाणे असतं फक्त त्यात वॅनिला अर्क + हेवी क्रिम घालतात.
बटाटा, रताळी म्हणे जमिनी खाली उगवतात, त्यामुळे खातात... पण सगळे चोचले आहेत जिभेचे असं माझं प्रामाणिक मत आहे. :D
उपासाला आई एक बोरां ची आंबट-गोड 'बोरावणी' करायची काय लागते म्हणुन सांगु...

दिपाली :)

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

3 Jul 2009 - 9:07 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

>>>पण सगळे चोचले आहेत जिभेचे असं माझं प्रामाणिक मत आहे.
:) हे मला पटले बॉ !

-दिलीप बिरुटे

स्मिता श्रीपाद's picture

3 Jul 2009 - 10:44 am | स्मिता श्रीपाद

पण सगळे चोचले आहेत जिभेचे असं माझं प्रामाणिक मत आहे. :D
सहमत सहमत सहमत..

आम्ही उपवासाचे पदार्थ खाण्यासाठीच एकादशा,संकष्ट्या,महशिवरात्री..ई ई..करतो... :-)

ताजे खोबरे-कोथिंबीर पेरलेली गरमागरम साबुदाणा खिचडी...
वरीचे तांदुळ - दाण्याची आमटी
तुपाच्या फोडणीची बटाटा भाजी..
राजगीरा लाडु,
ताजं गोड ताक
साबुदाणा वडे,(किंवा बॅचलर थालीपिठे ;-) )
वेफर्स
उपासाची मिसळं
मसाला दुधं

हे सगळं खाताना जे काही सुख मिळतं ते उपाशी राहुन मिळणारे का ;)

नितिन थत्ते's picture

3 Jul 2009 - 11:10 am | नितिन थत्ते

>>ताजे खोबरे-कोथिंबीर पेरलेली गरमागरम साबुदाणा खिचडी...

आम्ही एकदा आमच्या कुकला साबुदाण्याची खिचडी बनव सांगितले. त्याने मुगाच्या खिचडीसारखी साबुदाण्याची खिचडी बनवली (कुकरमध्ये शिट्ट्या वगैरे काढून). ~X( (३० लोकांसाठी) =))

ते रबर खाणे कोणालाच शक्य नव्हते.

पुढच्या वेळी शेजारी उभे राहून खिचडी करून घेतली. आता तो तुम्ही लिहिल्याप्रमाणे नाही तरी खाण्यायोग्य खिचडी बनवतो.

नितिन थत्ते (खराटा)
(रंग माझा वेगळा)

सुनील's picture

3 Jul 2009 - 11:02 am | सुनील

उपासाचं सोडा पण आषाढीला बार बंद का असतात? खरं तर आज चांगला शुक्रवार त्यातून सकाळपासूनच मस्त पाऊस पडून राहिलाय आणि..... :(

Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.

अमृतांजन's picture

3 Jul 2009 - 1:04 pm | अमृतांजन

उपवासाचा सोडा कुठे मिळतो?

विसोबा खेचर's picture

5 Jul 2009 - 9:09 am | विसोबा खेचर

उपासाचं सोडा पण आषाढीला बार बंद का असतात? खरं तर आज चांगला शुक्रवार त्यातून सकाळपासूनच मस्त पाऊस पडून राहिलाय आणि.....

सहमत आहे..!

मी या ड्राय डे बद्दल तीव्र नाराजी व्यक्त करतो...!

बाय द वे सुनील, हायवे चेकनाक्यापाशी सेवा रस्त्यावर शाम के टाईम एक पोरगा अंधारात उभा असतो. त्याला पैशे दिले की तोचुपचाप आणून देतो! ;)

कधी लागली तर मला सांग. व्यवस्था होईल! :)

तात्या.

चिरोटा's picture

3 Jul 2009 - 11:08 am | चिरोटा

उपवासातले बटाट्याचे प्रस्थ अलिकडचेच असावे. कारण बटाटा भारतात आलाच मुळी १७व्या शतकाच्या आसपास.स्पॅनिश लोकानी तो आणला.बटाटा हा शब्द स्पॅनिश आहे असे वाचले होते.
भेन्डि
क्ष्^न + य्^न = झ्^न

स्पॅनिश लोकानी तो आणला
भारतात स्पॅनिश कधी आले? भारतात बटाटा पोर्तुगिझांनी आणला १७ व्या शतकात, हे मात्र खरे.

Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.

अमृतांजन's picture

3 Jul 2009 - 1:01 pm | अमृतांजन

मग उपवासाला त्याआधी भारतात काय वापरत होते? की, ते लोक उपवासच करत नव्हते?

परिकथेतील राजकुमार's picture

3 Jul 2009 - 12:45 pm | परिकथेतील राजकुमार

च्यायला मी ऐकले होते की अमृतांजनामुळे डोकेदुखी जाते म्हणुन.

काय एक एक खोटारडे लोक असतात.

º°¨¨°º© परा ©º°¨¨°º©
फिटावीत जरा तरी जगण्याची देणी, एक तरी ओळ अशी लिहावी शहाणी...
आमचे राज्य

नितिन थत्ते's picture

3 Jul 2009 - 1:02 pm | नितिन थत्ते

अमृतांजनने डोळ्यातून पाणी येते.
जिथे लागेल तिथे आग आग होते.
(अमृतांजन यांनी ह घेणे)

नितिन थत्ते (खराटा)
(रंग माझा वेगळा)

अमृतांजन's picture

3 Jul 2009 - 2:36 pm | अमृतांजन

अमृतांजन = अमृत + अंजन

बिसलेरी सारखे ब्रान्डींग झाले आहे अमृतांजनचे.

अमृतांजन's picture

3 Jul 2009 - 1:51 pm | अमृतांजन

राजे हे तुम्हाला उद्देशून नाही बरका. तुमचा वकुब मी ओळखून आहे.

अमृतांजनला दोन इनपुट लागतात- डोके आणि दुखी....मगच ती जाते.

दशानन's picture

5 Jul 2009 - 2:02 pm | दशानन

>>>>राजे हे तुम्हाला उद्देशून नाही बरका. तुमचा वकुब मी ओळखून आहे.

=))

हाणतीच्या मायला... आम्ही काय ओ तुमचे घोडे मारले :?

बाकी तुमच्या वरील प्रतिसादात एक ओळच आमच्या साठी लागू होते...
अमृतांजनला दोन इनपुट लागतात- डोके आणि दुखी....मगच ती जाते. बरोबर आहे.. आमच्या कडे ना डोके ना दुखी.. त्यामुळे तुम्हीच बसा चोळत ;)

थोडेसं नवीन !

अमृतांजन's picture

3 Jul 2009 - 12:59 pm | अमृतांजन

साबुदाण्याचा खप त्यांनी उत्तम मार्केटींग पॉलिसी वापरुन वाढवला आहे. त्यांचे गिर्हाईक आहे- सुशिक्षीत अंधश्रद्धाळू.

आशिष सुर्वे's picture

4 Jul 2009 - 12:23 am | आशिष सुर्वे

'बटाटयाची भ़जी' हा पदार्थ कोणी बरे शोधून काडला असेल ब्वा?

मी त्या व्यक्तिचा कायम ॠणी राहिन!

... उद्याच बेत करायचा विचार आहे.

टारझन's picture

5 Jul 2009 - 1:11 pm | टारझन

बाकी चर्चेत काय बी इंटरेस्ट नाही !!
आम्ही उपवासाच्या दिवशी घरी होणारे फराळ जाम दाबून हाणतो .. आणि रात्री एखाद्या कोंबडीला (बाहेर जाऊन) मुक्ती देऊन येतो !!!
सगळे उपास-तापास थोतांड फाट्यावर !!

- टारझन

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

5 Jul 2009 - 1:40 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

>>आणि रात्री एखाद्या कोंबडीला (बाहेर जाऊन) मुक्ती देऊन येतो !!!
सगळे उपास-तापास थोतांड फाट्यावर !!

अरेरे ! काय होणार आपल्या परंपरा आणि संस्कृतीचे !

-दिलीप बिरुटे

टारझन's picture

5 Jul 2009 - 4:34 pm | टारझन

अरेरे ! काय होणार आपल्या परंपरा आणि संस्कृतीचे !

अर्रे वा !! माझ्या एकट्यावर आपली परंपरा संकृती अवलंबुन आहे हे "कळून" अंमळ गुदगुल्या झाल्या !!

चला अजुन संस्कृतीचा र्‍हास करूया .. आजंच चिकन मारून येतो !!
संकृती डुबवणारा फोटू खालील प्रमाणे :-