गाभा:
गणेशपूजा केल्याने सलमानविरुद्ध फतवा
इ-सकाळ बातमी
नवी दिल्ली, ता. २० - प्रसिद्ध अभिनेता सलमान खान याने गणेशोत्सवात भाग घेतल्याने "दारूल-इफ्ता-मंजर-ए-इस्लाम' या संघटनेने त्याच्याविरुद्ध फतवा बजावला आहे. .......सलमान सर्व कलमा पुन्हा वाचत नाही, तोपर्यंत त्याला मुस्लिम मानता येणार नाही, असे या संघटनेचे म्हणणे आहे.
सलमानच्या घरी दीड दिवसांच्या गणेशाची प्रतिष्ठापना करण्यात आली होती. सलमानने त्याच्या विसर्जन मिरवणुकीत भाग घेतला होता. त्याची सावत्र आई आणि अभिनेत्री हेलनही मिरवणुकीत सहभागी झाली होती. गणेशाचे समुद्रात विसर्जन होईपर्यंत सलमान मिरवणुकीत सामील होता. इस्लाममध्ये कोणत्याही प्रकारच्या मूर्तिपूजेला मनाई असल्याने "दारूल-इफ्ता'ने सलमानविरुद्ध फतवा बजावला आहे.
प्रतिक्रिया
21 Sep 2007 - 9:15 am | गुंडोपंत
म्हणजे आता "सौ चुहे खाके सलमान चला हज को" असे काही म्हणता यायचे नाही! :)))
आपला
गुंडोपंत
21 Sep 2007 - 4:32 pm | विकास
>>>म्हणजे आता "सौ चुहे खाके सलमान चला हज को" असे काही म्हणता यायचे नाही! :)))
एकदम सही!
21 Sep 2007 - 9:15 am | सहज
काय लिहायचे बर?
२१वे शतकात आहोत, लोकशाही, स्वातंत्र अनुभवत आहोत. तरी काही लोक तुम्ही असे म्हणजे असेच वागले पाहीजे असा हट्ट धरत आहेत. म्हणून मला वाटते की देशाची व जगाची एक कॉमन घटना हाच एक ग्रंथ आधारभूत ठेवून विचार केला गेला पाहीजे.
हे त्या नाव माहीत नसलेल्या संस्थेचे सलमानचे नाव वापरून प्रसीध्दी मिळवायचा डाव आहे.
१) थोडीफार आचारसंहीता (नशा, दंगा, पाद्त्राणे, असभ्य पोषाख इ. न करता) बाळगून सर्वांना सर्व धर्मीयांच्या प्रार्थनास्थळात मुक्त प्रवेश हवाच.
२) सर्व सार्वजनीक प्रार्थना स्थळ चालकांना, वेगवेगळ्या धर्माच्या लोकांना आपापल्या धर्माची ओळख करून द्यायचा उपक्रम दर आठवड्यातून एकदा ठेवणे अपरीहार्य.
३) सर्व शाळेतून, कॉलेजातून सर्वधर्मसमभाव शिकवला गेला पाहीजे किंबहूना सर्व विद्यार्थांची अश्या ठीकाणी शालेय अभ्यासक्रमा अंर्तगत सहल, शिक्षण व प्रबोधन केलेच पाहीजे. जेणे करून सर्व लहान मुलांना वेगवेगळ्या धर्माची ओळख , चांगली माहीती होइल.
21 Sep 2007 - 10:25 am | टीकाकार-१
"तरी काही लोक तुम्ही असे म्हणजे असेच वागले पाहीजे असा हट्ट धरत आहेत."
यात तुम्हि पण आहात साहेब!
21 Sep 2007 - 4:38 pm | विकास
सहजराव,
आपले विचार पटले पण एक(च) प्रतिक्रीया
>>>थोडीफार आचारसंहीता (नशा, दंगा, पाद्त्राणे, असभ्य पोषाख इ. न करता) बाळगून सर्वांना सर्व धर्मीयांच्या प्रार्थनास्थळात मुक्त प्रवेश हवाच.
लोकांना जो प्रॉब्लेम झालय तो स्वधर्मीय परधर्मीयाच्या प्रार्थनास्थळात (पुजा अर्चेत) गेल्याचा. नाहीतर प्रवेश मुक्त असतो. (काही अपवाद सोडल्यास)
>>हे त्या नाव माहीत नसलेल्या संस्थेचे सलमानचे नाव वापरून प्रसीध्दी मिळवायचा डाव आहे.
अगदी पटले.
बाकी "..देशाची व जगाची एक कॉमन घटना हाच एक ग्रंथ आधारभूत ठेवून विचार केला गेला पाहीजे" या आपल्या इच्छेप्रमाणे करायचे झाल्यास पहील्यांदा "ओन्ली" हा मुद्दा सोडून सर्वांनाच "ऑल्सो" मान्य करावे लागेल, आणि तेथेच तर सारी मेख आहे, होती आणि राहील. प्रत्येकाला आपणच कुठल्या न कुठल्या संदर्भात बरोबर आहोत असे वाटते - मग तो राजकीय असेल, धार्मि़क असेल अथवा सामाजीक असेल.
21 Sep 2007 - 9:34 am | जगन्नाथ
१) थोडीफार आचारसंहीता (नशा, दंगा, पाद्त्राणे, असभ्य पोषाख इ. न करता) बाळगून सर्वांना सर्व धर्मीयांच्या प्रार्थनास्थळात मुक्त प्रवेश हवाच.
२) सर्व सार्वजनीक प्रार्थना स्थळ चालकांना, वेगवेगळ्या धर्माच्या लोकांना आपापल्या धर्माची ओळख करून द्यायचा उपक्रम दर आठवड्यातून एकदा ठेवणे अपरीहार्य.
३) सर्व शाळेतून, कॉलेजातून सर्वधर्मसमभाव शिकवला गेला पाहीजे किंबहूना सर्व विद्यार्थांची अश्या ठीकाणी शालेय अभ्यासक्रमा अंर्तगत सहल, शिक्षण व प्रबोधन केलेच पाहीजे. जेणे करून सर्व लहान मुलांना वेगवेगळ्या धर्माची ओळख , चांगली माहीती होइल.
बरं हे पुढच्या दीड हजार वर्षांत नक्की कधी होणार?
30 Jul 2009 - 9:31 am | विशाल कुलकर्णी
<<बरं हे पुढच्या दीड हजार वर्षांत नक्की कधी होणार?>>
जोपर्यंत आपण एकत्र न येता असे एकमेकावर टिकास्त्रे सोडत राहू, काहीतरी कृती न करता शाब्दिक खेळ करत राहू तोपर्यंत दिड हजार काय दिड लाख वर्षातदेखील हे होणार नाही.
सस्नेह
विशाल
*************************************************************
मज पिसे लागलेले सुखांचे
गे हलकेच धुके ओसरते आहे...
21 Sep 2007 - 9:55 am | आजानुकर्ण
ह्या दुव्यावरील खालील बातमीदेखील वाचा.
आता ह्यांच्याहीविरुद्ध फतवा काढायचा का?
21 Sep 2007 - 10:49 am | नीलकांत
नक्की काढाच फतवा.. पेपरात नाव येईल. नाही निदान गेलाबाजार २४तास बातम्या देणार्या वाहीण्या तुम्हाला फुकट फुटेज देतील. सध्या तरी फतवा काढण्याची प्रेरणा आणि हेतू हाच दिसतोय.
बाकी मोदक खाऊन रोजा सोडणं सहीच. पुढचा श्रावण सोमवार शिरखुर्म्यावर सोडावा म्हणतो !:)
नीलकांत
30 Jul 2009 - 12:32 pm | श्रीयुत संतोष जोशी
पुढचा श्रावण सोमवार शिरखुर्म्यावर सोडावा म्हणतो
लै भारी.
हे राज्यं व्हावे ये तो श्रींची इच्छा.
30 Jul 2009 - 7:36 pm | हरकाम्या
नीलकांतराव, पुढचा श्रावण सोमवाराला शिर्खुर्माच का ??
21 Sep 2007 - 11:19 am | जुना अभिजित
काल गणपतीसमोर एक नाटिका पाहिली. त्यात एका न्यूज चॅनलच्या बातमीदाराच्या पात्राचे निवेदन असे आहे.
काल संजूबाबाला तुरुंगात नेलं
काल त्याची माय त्याला भाकर घेउन आली होती.
जेवणानंतर संजूबाबा झोपी गेला
मग त्याच्या डाव्या गालावर एक ढास बसला.
.
.
मिसळीवरची तर्री चापण्यासाठी आलेला अभिजित
30 Jul 2009 - 7:00 am | पाषाणभेद
देवपूजा कोणीपण करू शकतो. त्याने केली तर काय आभाळ फाटत नाही.
वा वा. छान छान. असेच लिहीत रहा.
- पाषाणभेद
30 Jul 2009 - 9:00 am | शाहरुख
फतवा म्हणजे नक्की काय ?
आणि हरियाणाच्या माजी उप-मुख्यमंत्र्यांचा चंदर मोहन -> चांद मोहम्मद -> चंदर मोहन प्रवास वाचला असेलच :-)
30 Jul 2009 - 10:01 am | चिरोटा
इस्लामला दारु निशिध्ध आहे. पण ह्या 'दारूल-इफ्ता-मंजर-ए-इस्लाम' मध्ये दारु आहेच. तेव्हा ह्यांच्यावर पण बंदी पाहिजे मला.!
:)
भेन्डि
क्ष्^न + य्^न = झ्^न
30 Jul 2009 - 2:15 pm | JAGOMOHANPYARE
दारूल-इफ्ता-मंजर-ए-इस्लाम' चे जाहीर अभिनन्दन.... त्यामुळेच १२०० वर्शे होऊनही इस्लाम ची उपासना पद्धती अबाधित आहे...
न्हाय तर तिच्या आयला आम्ही !... पूर्वी यज्ञ करत होते.तेन्हा मुर्ती पुजा नव्हती. देवळे नव्हती... नन्तर मुर्त्ती पुजा आली... आधी पौराणिक देवान्च्या प्रतिमा आल्या... मग त्यांचे अवतार आले.... आता अवतारांचे अवतारही आले..... साधू, महाराज यांचेही पुतळे, मुर्त्या आणि देवळे... वेद म्हणणारे गेले.... महाराजांची काकड आरती ते शेज आरती ... पोथ्याही महाराजांच्या आणि फोटोही त्यांचेच.. तेही ३० वर्शे ... नन्तर त्यांची गादी कुणी तरी घेतो.. मग कॅलेन्डर वर पण तोच....
दहा हजार वर्शे वेद म्हणणारे अमुर्त देवांचेच भक्त राहिले... पुढच्या पिढीने कधीही मागच्या पिढीतल्या रुशींची मुर्ती करून त्यांची आरती म्हटली नाही. देवांच्या मुर्ती तर नव्हत्याच.. .. आणि आपण २००० हजार वर्शात काय करून ठेवले... कारण काय... तर कसला धरबन्द नाही... सगळ्यानी एकत्र येवुन रोजच्या रोज यज्ञमय उपासना करणे हाच आपलाही एकेकाळी धर्म होता... आज 'ते' करताहेत , सुदैव बिचार्यांचे, दुसरे काय... ! आपण काय कधी तरी अकरा दिवस एकत्र येऊन गणपतीला एखादी आरती म्हणू...
सदर संघटनेचे अभिनन्दन.
30 Jul 2009 - 3:20 pm | कानडाऊ योगेशु
सलीम खान (सलमानचे अब्बुजान ) मध्यंतरी एक सदर म.टा मध्ये(बहुतेक) लिहित होते.तिथे त्यांनी ह्या फतव्याचा उल्लेख केला होता.त्यात त्यांनी असे सांगितले होते कि गेल्या वर्षीही सलीम खान कुटुंबियांविरूध्द असाच फतवा सदर संघटनेने काढुन त्यांना मुस्लिम धर्मातुन हद्दपार केले होते.त्यावर सलीम खानांनी असे म्हटले होते की ही संघटना आम्हाला किती वेळा धर्मातुन बाहेर काढणार आणि परत घेण्याआधी पुन्हा असे फतवे काढणार...!!!!
अवांतर : सलमानची आई हि महाराष्ट्रियन हिंदु आहे.