बकलावा

दिपाली पाटिल's picture
दिपाली पाटिल in पाककृती
29 Jun 2009 - 1:41 am

बकलावा हे एक अफगाणी गोड पदार्थ आहे. मी एका अफगाणी हॉटेलात खाल्ला होता, तसा फार गोड असतो पण मला आवडला होता.

साहीत्यः

१ पाकिट फायलो डो (phylo Dough) , या अगदी पातळ मैद्याच्या पोळी सारखं असतं, घरी बनवायला खुप कठीण आहे त्यामुळे विकत च आणावे.
फायलो डो चे पाकीट एक दिवस आधी फ्रीजर मधुन फ्रीज मध्य ठेवावे म्हणजे तुटणार नाही.
१ कप कापलेले किंवा जाडसर कुटलेले आक्रोड + बदाम + पिस्ता चे मिश्रण
२ टे. स्पू. + ३/४ कप साखर
३/४ कप पाणी
१ तुकडा दालचिनी
१/२ टी. स्पू. दालचिनी पूड
२-३ लवंगा
१ बारिक चकती किंवा लिंबू फोड
१/४ कप वितळवलेले बटर (सॉल्टेड असलेलं जास्त बरं )
१ टी. स्पू. दालचिनी पावडर

कृती:
१) ३/४ कप साखर + ३/४ कप पाणी + लवंगा + दालचिनी + लिंबू एकत्र करुन मध्यम आंचेवर ३० मिनिटे ठेवावं. मधुन मधुन हलवावे.
थंड झालं की लवंगा , दालचिनी , लिंबू काढुन घ्यावे.
२) जाडसर कुटलेले आक्रोड + बदाम + पिस्ता च्या मिश्रणा त २ टे. स्पू. साखर + दालचिनी पूड टाकून एकत्र करुन घ्यावे.
या दोन्ही गोष्टी एक दिवस आधी करुन घ्याव्यात.
३) आता एक बेकींग ट्रे ला बटर लावुन घ्यावे.
४) फायलो शीट्स हलक्या हाताने वेगळ्या करुन घ्याव्यात.
५) एका फायलो शीट ला ब्रश ने किंवा हलक्या हाताने बटर लावावे आणि ट्रे मध्ये ठेवावी.
६) वरिल कृती ७-८ शीट्स ची लेयर बने पर्यंत करावी.
७) आता या फायलो शीट्स च्या गादी वर अर्धी सुका मेवा पुड पसरवुन घ्यावी.
८) परत कृती ५) करावी पण या वेळी २-३ फायलो शीट्स च वापराव्यात.
९) परत उरलेली सुका मेवा पुड पसरवुन घ्यावी.
१०) पुन्हा ७-८ बटर लावलेल्या फायलो शीट्स ची लेयर करावी.
११)३२५ फॅ. वर ओव्हन प्रीहीट करुन घ्यावे.
१२) हव्या त्या आकारात कापुन घ्यावे. बेक करायच्या आधी च कापावे नंतर नीट कापले जात नाही.
१३) ३२५ फॅ. वर ३३-३५ मिनिटे बेक करुन घ्यावे.
१४) बेक झाल्यावर २-३ मिनिटे सेट होऊ द्यावे, नंतर आदल्या दिवशी केलेला पाक हळुहळु ओतावा. जास्त टाकु नये व पाक उरल्यास या धाग्याचा उपयोग करावा. :D
15) १-२ तास सेट व्हायला ठेवा. वरुन पिस्ता काप टाकुन सजवा आणि खा.

टिपा:
हे वरुन पाक ओतल्यामुळे जास्त गोड लागतं .
फायलो शीट्स वर बटर लावायला कंजुषी केली की लेयर्स नीट बनण्यात ही कंजुषी होते. (विनोद करायचा केविलवाणा प्रयत्न :D )
मी पाक थंड झाल्यावर थोडं (3 tbs)मध टाकलं होतं.

प्रतिक्रिया

लवंगी's picture

29 Jun 2009 - 1:55 am | लवंगी

छान दिसतोय.. इथे डियर्बोनमध्ये छान मिळतो..

छान दिसतोय.. इथे डियर्बोनमध्ये छान मिळतो..
पाठवून द्या लवकरात लवकर.
शीर्षकावरुन समजुतीचा घोटाळा झाला, शरदिनी यांची नवी कविता समजून धागा उघडला अन गोड धक्का बसला!!

एखादी गोष्ट गुप्त ठेवायची असेल तर सर्वप्रथम आपल्या पत्नीला सांगा ;)

धमाल मुलगा's picture

30 Jun 2009 - 9:05 pm | धमाल मुलगा

बा अनंता,
सादर _/\_ !काय बोलु ह्यापुढे????

----------------------------------------------------------------------------------------
::::हल्ली चालु असलेल्या मराठी-आंतरजालीय-टोळीयुध्दाचा आपण एक भाग नाही आहात? काय सांगता? स्वतःला कर्कवृत्ती मराठी माणुस कसे काय म्हणवता?::::

रेवती's picture

29 Jun 2009 - 5:36 am | रेवती

हा पदार्थ एकदा खायला सुरुवात केली की थांबणे अवघड!
तू सगळे गोड पदार्थ करण्यात वाकबगार आहेस. छान दिसतोय पदार्थ!
मी घरी कधी करून नाही बघितला........ट्रेडर जोज् मध्ये मिळतो तो आणत होते.

रेवती

अगदी बरोबर बोललीस!

रेसिपी छानच!

चकली
http://chakali.blogspot.com

मितालि's picture

29 Jun 2009 - 5:50 am | मितालि

कालच असा एक पदार्थ खाल्ला.. रोल बनवलेला होता.. खाताना गोड मसाला पानाची आठवण झाली..

स्वातीदेव's picture

29 Jun 2009 - 6:17 am | स्वातीदेव

धन्यवाद पाककृतीबद्द्ल. मी शोधतच होते.

सहज's picture

29 Jun 2009 - 7:00 am | सहज

दिपालीताईंची पाकृ म्हणले की गोड पदार्थच असणार असे समीकरण होतेय बर का. एखादा तिखट पदार्थ येउ दे आता :-)

लेबनीज मिठाईच्या दुकानातुन बखलावा मिळतो तो बरेचदा छान असतो. अर्थात तुमच्या पाकृच्या प्रयत्नांची दाद देतो. :-)

पर्नल नेने मराठे's picture

29 Jun 2009 - 10:56 am | पर्नल नेने मराठे

लेबनीज मिठाईच्या दुकानातुन बखलावा मिळतो तो बरेचदा छान असतो
+१

चुचु

विसोबा खेचर's picture

29 Jun 2009 - 7:52 am | विसोबा खेचर

पाकृ अंमळ मस्तच दिसते आहे..

दिपाली, जियो..!

तात्या.

स्वाती दिनेश's picture

29 Jun 2009 - 11:09 am | स्वाती दिनेश

बकलावा इथल्या लेबनीज आणि तुर्की दुकानातून आणते पण घरी कधीच करुन पहायचं धाडस नव्हतं झालं, तुझ्या रेसिपीनुसार एकदा करुन पहायला हवा,:) मस्तच दिसतोय.
स्वाती

पाषाणभेद's picture

29 Jun 2009 - 3:13 pm | पाषाणभेद

छान. पाणि सुटले तोंडाला.
मला तर हे एका पक्षाचे नाव वाटते.
मुल आणि कविता होईपर्यंत खाजगी असते आणि एकदा "झाल्यानंतर" ते सार्वजनीक होते.
- मराठी आणि बेळगाव, कारवार, अहवा, डांग, बर्‍हाणपूर, गोव्यासह संयुक्त महाराष्ट्र प्रेमी - पाषाणभेद उर्फ दगडफोड्या ( -राजेंनी बहाल केलेले नाव)

चतुरंग's picture

29 Jun 2009 - 4:53 pm | चतुरंग

बासच! कसला दिसतोय बकलावा!! खल्लास!! :)

(अफगाणी)चतुरंग

विशेष सूचना - दीपालीताई, सॅनहोजे भागात आलो की तुमच्याकडे येणार (तुम्ही पत्ता दिला नाहीत तरी नाटक्याला तुमचं घर माहिती आहे त्यामुळे नो प्रॉब्लेम! ;) ) आणि मनसोक्त बकलावा खाणार! जाताय कुठे!! :D

आमचे खुप हाल होतात हो असे पदार्थ बघुन.
इकडे भारतात मिळतो काहो बकलावा?
एकदम खतराच आहे.

वेताळ

मदनबाण's picture

29 Jun 2009 - 8:40 pm | मदनबाण

वल्ला क्या फोटो मस्त दिखती...आक्रोड + बदाम + पिस्ता का मिश्रण तो भारी लगती !!! :)

मदनबाण.....

Success is never permanent, and failure is never final.
Mike Ditka

लिखाळ's picture

29 Jun 2009 - 10:29 pm | लिखाळ

वेगळाच पदार्थ. कधी ऐकला-चाखला नाही.
आता आसपास शोध घ्यायला हवा. कुठे मिळत असेल तर बरे :)

-- लिखाळ.
या प्रतिसादासाठी एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत !!! - लिखाळ जोशी :)

प्राजु's picture

30 Jun 2009 - 9:04 pm | प्राजु

आईऽऽऽगं!!!!!!!!
अफाट दिसतो आहे बखलावा. मस्तच.
:)
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/

दिपाली पाटिल's picture

1 Jul 2009 - 12:03 am | दिपाली पाटिल

धन्यवाद...बखलावा अफगाणी दुकाना त मिळतो पण म्हटलं घरि बनवता येतो की नाही ते बघावं, नेमका चांगला जमला. :D . भारतात फायलो शिट्स (phylo dough sheets) मिळ्तील की नाही यात शंका आहे पण बाकी सगळीकडे मिळतील.
पुन्हा एकदा धन्यवाद.
दिपाली :)

भाग्यश्री's picture

1 Jul 2009 - 1:05 am | भाग्यश्री

अगं तू बकलावा काय घरी करतेस!! भारीच्चेस! :O
(आता बे एरिआत आले की नक्की फोन करेन! )
मला वाटतं तुला एकदा गावजेवणच घालावे लागणारे!

http://www.bhagyashree.co.cc/

दिपाली पाटिल's picture

1 Jul 2009 - 4:21 am | दिपाली पाटिल

सगळे मिपाकर एकदाच येणार आहेत की काय?? :O

दिपाली :)

देवदत्त's picture

1 Jul 2009 - 7:57 am | देवदत्त

अरे वा,
मी खाल्ला इ़कडे आल्यावर हा पदार्थ. कार्यालयात आणला होता. मस्त असते चव. :)
तुम्ही घरी बनवता हे छानच.

मसक्कली's picture

6 Jul 2009 - 12:43 pm | मसक्कली

जास्त गोड नहि खात मि पन टेस्ट करयला आवडेल मला....!!;)

तर्री's picture

6 Jul 2009 - 8:08 pm | तर्री

दीपाली ताई,
झक्कास , मिट्टास पदार्थ.
पहिल्यांदा एकदा, केंव्हा खातोय झाले आहे !
मग खातच रहाणार ,खात्री आहे !
तर्री.

दिपाली पाटिल's picture

7 Jul 2009 - 1:30 am | दिपाली पाटिल

नक्की टेस्ट करुन बघा. मस्त लागतो कदाचित तुम्हाला आवडेल ही...:)

दिपाली :)

प्रभाकर पेठकर's picture

13 Jul 2009 - 10:57 pm | प्रभाकर पेठकर

'बकलावा' इथे अरबस्थानात बेकरीत सर्रास मिळतो. अतिशय गोड आणि पौष्टीक. तसाच एक गोड पदार्थ 'कुनाफा'. बकलाव्याचाच भाऊबंद. फायलो शीट्स ऐवजी अगदी बारीक शेवया वापरतात. दुर्दैवाने पाकृ माहित नाही.
डॉक्टरांनी बंदी घातल्यापासून 'गोड' गोष्टींकडे पाहातही नाही.

मॉर्निंग वॉकला उठायचा कंटाळा येत असेल तर ..... झोपेत चालायला शिका.

टारझन's picture

13 Jul 2009 - 11:14 pm | टारझन

स्साला .. इतका वेळ मी हा धागा जाणून बुजून उघडत नव्हतो .. हैराण .. हैराण झालोय मी .. ही अतिशयोक्ति नाही ... चित्र काळजाला भिडले आहे ..
भस्म्या झाल्यासारखं वाट्टंय !!

- (खवय्या) टारझन

सुबक ठेंगणी's picture

14 Jul 2009 - 6:46 am | सुबक ठेंगणी

सही चित्र आणि त्याहून सही पाककृती!
चौकोनी चिरोट्यासारखा वाटतोय! बकलावा हे नाव वाचून त्या शब्दाचं मी 'कळलावा' वगैरे चक्क मनातल्या मनात मराठीकरण करून टाकलं होतं! बकाबका खायला लावतो तो बकलावा! हाय काय नाय काय! :D
लवकरच घरी जात्येय तेव्हा आईला नक्की करायला सांगेन! :P

मुक्त विहारि's picture

16 Dec 2014 - 12:00 pm | मुक्त विहारि

गूगल बाबाची मदत घेतली...

http://chefinyou.com/2009/11/baklava-recipe/