बिनडोक भाषांतरे

सुनील's picture
सुनील in काथ्याकूट
28 Jun 2009 - 7:16 am
गाभा: 

"मायकल जॅक्सनच्या गाण्याच्या ६५ दशलक्ष सीडीज विकल्या गेल्या" - एक बातमी.
आता इथे ६५ दशलक्ष म्हणजे नक्की किती ह्याचा अंदाज (मनातल्यामनात का होईना) पण किंचित आकडेमोड केल्याशिवाय किती लोकांना येतो? विशेषतः ज्यांचे शिक्षण भारतात झाले आहे (माध्यम कोणतेही असो) त्यांना मिलियन-बिलियन पेक्षादेखिल लाख-कोटी ह्या संज्ञा अधिक परिचयाच्या वाटतील. मग, मिलियनचे दशलक्ष असे बिनडोक भाषांतर करण्यामागे काय हेतू असावा?

***

"दक्षिण पूर्व अशियाई देशांत....." - दुसरी एक बातमी.
सुदैवाने भारतीय भाषा ह्या दिशाविषयक शब्दांबाबत अधिक समृद्ध आहेत. दक्षिण-पूर्व ह्याला आग्नेय असा विवक्षित शब्द आपल्याकडे आहे. नैऋत्य मोसमी वारे असा शब्दप्रयोग भूगोलाच्या पुस्तकात असे तसेच वायव्य सरहद्द गांधी, ईशान्येकडील राज्ये, असे शब्द प्रयोगदेखिल वापरात आहेत. तरीही, दक्षिण-पूर्व असा शब्द वापरणे हे बिनडोक भाषांतराचेच उदाहरण नव्हे काय?

***

"बंगालच्या खाडीत....." - टिव्हीवरील निवेदिका.
मुंबईच्या आसपासच किती खाड्या आहेत मग संपूर्ण बंगालात किती खाड्या असतील, असा विचार मनात येतो. त्यातील नक्की कोणत्या खाडीबद्दल बोलणे चालले आहे याचा अंदाज घ्यायला गेलो, तेवढ्यात समजते की बातमी बंगालच्या उपसागराबद्दल आहे!

भाषा-भाषांत तेढ नको, श्रेष्ठ-कनिष्ठ वाद तर त्याहूनही नकोत. तरीही एखादी भाषा ज्या भौगोलिक परिसरात जन्मते-वाढते त्याचा त्या भाषेच्या शब्दसंपत्तीवर पुष्कळ परिणाम होतो, हे मान्य होण्यास हरकत नसावी.

महाराष्ट्राला ७२० कि.मी. चा समुद्रकिनारा लाभला आहे तर, हिंदी भाषा जेथे रुजली-जन्मली तिथे आसपास कुठेही समुद्रकिनारा नाही! तेव्हा निदान समुद्रविषयक शब्दतरी मराठीने हिंदीतून उसने घ्यावे, असे काही नाही! तेव्हा हादेखिल बिनडोक भाषांतराच एक प्रकार!

प्रतिक्रिया

यशोधरा's picture

28 Jun 2009 - 7:59 am | यशोधरा

तुम्ही म्हटल्याप्रमाणे हिंदीचे धेडगुजरी भाषांतर केल्याने असे होत असावे.

विंजिनेर's picture

28 Jun 2009 - 8:38 am | विंजिनेर

मला वाटते, ही उदाहरणे म्हणजे वेळे/पैशा अभावी केलेली झटपट यांत्रिक भाषांतरे असावीत.

एकुणच नैसर्गिक भाषांतर हा संगणकाच्या कोष्टकात बसवायला अतिशय अवघड प्रकार आहे. सर्व भाषांमधे आपापल्या खुब्या असतात. भाषेवर आणि विवक्षित शब्द प्रयोगावर प्रादेशिक संस्कृतीचा मोठा पगडा असतो. शिवाय, शब्द असलेल्या वाक्याच्या संदर्भाचा मुद्दा वेगळाच. त्यामुळे केवळ संगणक प्रणाल्यांच्या सहाय्याने केलेल्या कुठल्याही भाषांतराचा दर्जा सुमारच असतो. म्हणून मानवी भाषांतराला तोड नाही. पण हा खर्चिक आणि वेळखाऊ पर्याय असतो.
मग डेडलाईन गाठायच्या पत्रकारितेच्या धंद्यात सुमार भाषांतरामुळे खालावणार्‍या दर्जाकडे दुर्लक्ष झाले तर नवल नाही.

ह्या उलट जीव ओतून केलेली नितांत सुंदर मराठी-इंग्रजी भाषांतरे सुद्धा अनेक आढळतील.
शांताबाईंचा "द लिटील् वुमेन" चा "चौघीजणी" हा अनुवाद, ऑरवेलच्या १९८४ चा मराठी अनुवाद ही काही उल्लेखनिय!

----
कळप-मनोवृत्तीचा सूक्ष्म अभ्यास करण्यात आम्ही गढलेलो असल्यामुळे कंपूबाजी करायला आमच्याकडे वेळ नाही

विसोबा खेचर's picture

28 Jun 2009 - 8:26 am | विसोबा खेचर

जाऊ द्या हो सुनीलशेठ,

तुम्ही का इतकं मनावर घेताय? कुठलीही भाषा फुलवावी तशी फुलते. तिला ठराविक शब्दांच्या बंधनात अडकवू नये..

असो..

तात्या.

नीधप's picture

28 Jun 2009 - 8:58 am | नीधप

मराठीमधे आता 'माझी मदत करणे' सारखे भाषांतरीत वाकप्रचार लोक सर्रास वापरतात जे चुकीचे आहे तर मग अश्या बातम्या येणार यात नवल काय?
असो बातम्यांचं सोडून द्या काही भाषांतरीत पुस्तके पण महान असतात. 'माय फ्युडल लॉर्ड' या पुस्तकाचं भाषांतर असं विनोदी आहे.
त्यातली दोन उदाहरणे
१. विवाह आंबट होणे - याचं मूळ सांगता येईल? इंग्रजीमधे Marriage turned sour असा जो वाकप्रचार आहे त्याचं शब्दशः भाषांतर.
२. 'रात्रीचे अनोळखी' हे भुत्तोचे आवडते गाणे होते - खूप वेळ विचार केल्यावर लक्षात आलं की काय म्हणायचंय त्यांना ते. 'Strangers in the night' या गाण्याच्या या ओळींचा शब्दशः अनुवाद करायची गरज होती का?
- नी
http://saaneedhapa.googlepages.com/home

स्वाती दिनेश's picture

28 Jun 2009 - 11:14 am | स्वाती दिनेश

'माझी मदत करणे' ... असलेच आणखी एक..
तुमचे धन्यवाद ,सर्वांचे धन्यवाद..
सुनीलराव, अशी भाषांतरे वाचून वाचून आपणही असेच बोलायला लागू की काय? अशी भीती वाटायला लागली आहे,
स्वाती

केळ्या's picture

28 Jun 2009 - 8:44 pm | केळ्या

:))
सॉलिडच आहे!

धमाल मुलगा's picture

29 Jun 2009 - 2:30 pm | धमाल मुलगा

१. विवाह आंबट होणे
२. 'रात्रीचे अनोळखी'

=)) =)) ह्या लोकांची टाळकी इतकी अशक्य कोटीत कशीकाय चालू शकतात? आणि म्हणे भाषांतरं ...चुकलो चुकलो "अनुवाद" करणारे ढुढ्ढाचार्य हे लोक!

----------------------------------------------------------------------------------------
::::हल्ली चालु असलेल्या मराठी-आंतरजालीय-टोळीयुध्दाचा आपण एक भाग नाही आहात? काय सांगता? स्वतःला कर्कवृत्ती मराठी माणुस कसे काय म्हणवता?::::

नीधप's picture

29 Jun 2009 - 2:48 pm | नीधप

ते भाषांतर वाचा.. अजून उदाहरणे मिळतील.

- नी
http://saaneedhapa.googlepages.com/home

नितिन थत्ते's picture

28 Jun 2009 - 9:49 am | नितिन थत्ते

>>मिलियन-बिलियन पेक्षादेखिल लाख-कोटी ह्या संज्ञा अधिक परिचयाच्या वाटतील
सहमत.
याच्या उलटचा एक किस्सा मी पाहिला आहे. एका मीटिंग मध्ये काही ब्रिटिश आणि काही भारतीय होते. काही यंत्रांच्या खर्चाविषयी बोलणे चालू होते. तेव्हा एक भारतीय टू अ‍ॅण्ड हाफ लॅख असे सांगत होता. ब्रिटिशांना ते काही केल्या कळत नव्हते. ते का कळत नाही हे भारतीयांना कळत नव्हते. मग एकाने फळ्यावर आकडा लिहून दाखवला. तेव्हा ते ब्रिटिश उद्गारले "ओ, यू मीन टू हण्ड्रेड फिफ्टी थाउजंड..."

खराटा
(रंग माझा वेगळा)

सहज's picture

28 Jun 2009 - 9:59 am | सहज

सुनील यांचे म्हणणे पटते पण बहुदा परिस्थीती सुधारण्याच्या पलीकडे गेली आहे असेच दिसते आहे.

त्यातल्या त्यात अर्थाचा अनर्थ करु नये इतकीच मराठी माध्यमांकडून अपेक्षा. पण मग लगेच आठवते नॉट फेल्युअर बट लो एम इज क्राईम :-(

अवलिया's picture

28 Jun 2009 - 10:50 am | अवलिया

त्यातल्या त्यात अर्थाचा अनर्थ करु नये इतकीच मराठी माध्यमांकडून अपेक्षा.

सहजरावांचे 'इंग्रजी' माध्यमांबद्दलचे मत समजुन घ्यायला आवडेल :)

--अवलिया

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

28 Jun 2009 - 11:16 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

>>सहजरावांचे 'इंग्रजी' माध्यमांबद्दलचे मत समजुन घ्यायला आवडेल

मलाही सहजरावांचे इंग्रजी माध्यमांबद्दलचे मत समजून घ्यायची उत्सुकता लागली आहे. !

टीप: कृपया आपले मत खरड टाकून, निरोप टाकून व्यक्त करु नये, ही नम्र विनंती ! ;)

-दिलीप बिरुटे

अवलिया's picture

28 Jun 2009 - 11:18 am | अवलिया

हा हा हा
बुरुटे तुम्ही गुगली टाकलाय... ;)

--अवलिया

सहज's picture

28 Jun 2009 - 11:29 am | सहज

वेगात दौडले वीर मराठी दोन!

तूर्तास इतकेच बाकी फाट्यावर...

अवलिया's picture

28 Jun 2009 - 11:34 am | अवलिया

वा! मस्त !!
शोभता खरे विचारवंत.... :)
कुठलीच भुमिका घ्यायची नाही आणि रट्टे घ्यायची वेळ आली की पळुन जायचे... असो.
आम्हाला वाटले होते माणुस चार गाव फिरला, दोन चार देश पाहीले की समजुतदार होतो, दोन युक्तीच्या गोष्टी सांगतो.. पण कसचे काय? छ्या!
सहजराव, भ्रमनिरास केला तुम्ही आमचा.
असो, पळपुटेपणाबद्दल "वाढदिवसाच्या शुभेच्छा !"

--अवलिया

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

28 Jun 2009 - 11:53 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

>>आम्हाला वाटले होते माणुस चार गाव फिरला, दोन चार देश पाहीले की समजुतदार होतो, दोन युक्तीच्या गोष्टी सांगतो.. पण कसचे काय? छ्या!
सहजराव, भ्रमनिरास केला तुम्ही आमचा.

नै तर काय ! वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !!! :)

-दिलीप बिरुटे
(सहजरावच्या मागे आज लागायचेच, असे ठरवलेला)

अवलिया's picture

28 Jun 2009 - 12:01 pm | अवलिया

(सहजरावच्या मागे आज लागायचेच, असे ठरवलेला)

घ्या ! तुम्हाला पण कळले का त्यांनी कालच नविन चपला आणल्यात ते ?

--अवलिया

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

28 Jun 2009 - 11:49 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

दैनिकातील बदलती मराठी भाषा(संशोधनाचा विषय ठरेल ) नकळत आपण स्वीकारायला लागलो आहोत, असे मला वाटते. त्यात प्रमाणभाषेवाले, भाषेतील तज्ञ अशा काही कै च्या कै बदलाला स्वीकारायला कदाचित तयार होणार नाही. असे भाषेचे रुप कदाचित आपल्याला आवडणारही नाही, पण अशीही भाषा आपल्या अंगवळणी पडून जाईल, असेही वाटते. तेव्हा बदलाचे स्वागत करुन (करावे का ? )योग्य सुधारणा ही जवाबदारी आपलीच. तेव्हा भाषांतरे,रुपांतरे, कशी असली पाहिजेत त्यावर साधक बाधक चर्चाही झाली पाहिजे.

तेव्हा, इंग्रजीत भाषेत काय बदल होतात, त्यांच्या भाषेचे रुप, स्वरुप कसे आहे, कसे बदलते, ते लोक इंग्रजी भाषेत असे काही शब्द वापरतात का, आणि असे बदल ते वाचक स्वीकारतात का ते आपल्याकडून जाणून घ्यावे असे वाटले होते.
(आमचं इंग्रजी कच्चं आहे, नैतर आम्हीच वरील प्रश्नांची उत्तरे लिहिली असती)

-दिलीप बिरुटे

अवलिया's picture

28 Jun 2009 - 11:58 am | अवलिया

सहमत आहे.

(आमचं इंग्रजी कच्चं आहे, नैतर आम्हीच वरील प्रश्नांची उत्तरे लिहिली असती)
अहो असे प्रश्नच पडले नसते आणि स्वतःला विचारवंत म्हणवुन घेतले असते. इंग्रजी चांगले येत असते तर चारदोन देश फिरलो असतो, आणि देशाटनाने येणारे शहाणपण (जे १० पैकी ९जणांना येते असे म्हणतात) आले असते. साला, मराठी एके मराठीच्या पात्रात डुंबत नसतो बसलो. असो.

दिलीपशेट, बदल हा होतच असतो. बदलाला तुम्ही सामोरे गेले नाहीत तर बदल तुम्हाला बदलुन टाकतो.

परिवर्तन हाच प्रकृतीचा नियम आहे असे आमचा कान्हा ब-याच काळापुर्वी म्हणुन गेला. त्याचे आंग्ल भाषेत काय वाक्य होईल हे काही मला सांगता येणार नाही, कारण तसा प्रयत्न केला तर अवलियाचे बिनडोक इंग्लिश असा धागा निघायचा ;)

बाकी, सहजरावांना पुन्हा वाढदिवसाच्या शुभेच्छा !

--अवलिया

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

28 Jun 2009 - 12:05 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

>>इंग्रजी चांगले येत असते तर चारदोन देश फिरलो असतो, आणि देशाटनाने येणारे शहाणपण (जे १० पैकी ९जणांना येते असे म्हणतात) आले असते. साला, मराठी एके मराठीच्या पात्रात डुंबत नसतो बसलो. असो.

क्या बात कही नाना ! लै भारी.

>>बदलाला तुम्ही सामोरे गेले नाहीत तर बदल तुम्हाला बदलुन टाकतो.

ओहो, क्या बात है ! सही बोल्लात नाना !

बाकी, सहजरावांना पुन्हा वाढदिवसाच्या शुभेच्छा !

-दिलीप बिरुटे

सहज's picture

28 Jun 2009 - 12:21 pm | सहज

अर्थाचा अनर्थ करु नये इतके तारतम्य मराठीत कुठली (भाषांतरीत) बातमी देताना असावे असे मत दिले होते. याचा एक अर्थ हा होतो की गेली काही वर्षे वर उल्लेख केलेल्या चुका नियमित स्वरुपात होताना दिसत आहेत व अश्या प्रकारे बातम्या देण्याचे प्रमाण कमी झाल्याचे दिसत नाही. (शंभर वर्षापुर्वी देखील वाचकांची पत्रे मधे असा उल्लेख आढळला तरी आश्चर्य वाटणार नाही.)म्हणजे आता मराठी भाषेने खाली खराटा म्हणतात तसे स्वरुप स्वीकारले आहे अशी शंका येते. भाषा प्रवाही असली पाहीजे हे नक्की. नवे शब्द, रचना अंगवळणी पडत आहेत.

अर्थात ह्यावरुन लगेच माझे इंग्रजी माध्यमाचे मत लगेच कशाला हवे आहे ते कळले नाही बॉ. जोवर उगाच वादात गाठायचा तुमचा हेतु आहे/ नाही हे स्पष्ट होत नाही तोवर त्यावर आधीक प्रतिसाद नाही तरी प्रा.डॉ. व नाना ह्या "मित्रांकरता"(???)..

>तेव्हा, इंग्रजीत भाषेत काय बदल होतात, त्यांच्या भाषेचे रुप, स्वरुप कसे आहे, कसे बदलते, ते लोक इंग्रजी भाषेत असे काही शब्द वापरतात का, आणि असे बदल ते वाचक स्वीकारतात का ते आपल्याकडून जाणून घ्यावे असे वाटले होते.

इतकेच म्हणतो की इंग्रजी भाषेतही परिस्थीती फारशी वेगळी नाही. पुर्णता चुकीचे भाषांतर जरी माध्यमात (कोणत्याही भाषेतील) आले तरी अर्थात याचा अर्थ भाषा बिघडली असा न होता, प्रमाणभाषेच्या नियमात न बसणारी वाक्यरचना होते आहे इतकाच अर्थ निघतो.

मधे इंग्रजी भाषेत एक नविन शब्दप्रयोग कळला होता - "बँगलोर्ड" (bangalored) - याचा अर्थ परदेशातील नोकरी/पद भारतातील शहरात (बंगलोर) हलणे. परदेशातील पद आता भारत किंवा इतर विकसनशील देशात जाणे. खरे तर हा तसा एकदम नवा शब्द आहे व बोलीभाषेत (slang) जास्त वापर पण इंग्रजी माध्यमात आता वापरला जात आहे.
http://dictionary.reference.com/browse/bangalored.

व्याकरणदृष्ट्या अगदी बोलीभाषेत देखील चुकीचा प्रयोग वाटू नये इतपत काळजी कुठल्याही माध्यमाने घ्यावी इतकेच म्हणणे आहे.

बाकी अजुन माहीती करता कृपया नवा धागा काढावा.

तसेही हा विषय फारसा जिव्हाळ्याचा नसल्याने गरजेपुरते मत प्रदर्शन करुन गप्प रहाणे पसंत करतो.

अवलिया's picture

28 Jun 2009 - 12:31 pm | अवलिया

वा! मस्त !!

सहजराव मराठीबद्दल बोलतांना म्हणतात

अर्थाचा अनर्थ करु नये इतके तारतम्य मराठीत कुठली (भाषांतरीत) बातमी देताना असावे असे मत दिले होते.

त्याचबरोबर इंग्रजीबद्दल बोलतात

इंग्रजी भाषेतही परिस्थीती फारशी वेगळी नाही. पुर्णता चुकीचे भाषांतर जरी माध्यमात (कोणत्याही भाषेतील) आले तरी अर्थात याचा अर्थ भाषा बिघडली असा न होता, प्रमाणभाषेच्या नियमात न बसणारी वाक्यरचना होते आहे इतकाच अर्थ निघतो.

वा ! थोडा विचार करु शकणारा माणुस सहजरावांचा बदललेला टोन ओळखुन घेईल.

सहजराव माझे मित्र आहेत आणि त्यांचे मराठी वा इंग्रजी पत्रकारितेबद्दल असलेल्या मतांमुळे वा आमच्यात असलेल्या मतभिन्नतेमुळे आमच्या मैत्रीवर परिणाम होणार नाही. :)

माझ्या बाजुने त्यांना त्रास देणे (या धाग्यापुरते) थांबवत आहे. :)

--अवलिया

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

28 Jun 2009 - 12:34 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

प्रतिसाद राखून ठेवतो....

मस्त कलंदर's picture

28 Jun 2009 - 10:28 am | मस्त कलंदर

एकदा मी स्टार माझा वर दुधाळ जनावरे हा शब्द्प्रयोग ऐकला होता.. फळे रसाळ असू शकतात.. पण.. जनावरे..... आणि दुधाळ....???? :/

मस्त कलंदर..
नीट आवरलेलं घर ही घरचा संगणक बंद पडल्याची खूण आहे!!!!

विसोबा खेचर's picture

28 Jun 2009 - 10:47 am | विसोबा खेचर

पण.. जनावरे..... आणि दुधाळ....????

वा! 'दुधाळ जनावरे' हा शब्द बाकी क्लासच आहे! :)

गाय, म्हैस, शेळी यांना 'दुधाळ जनावरे' म्हणता येईल..

आपण 'दुभती गाय' असं म्हणतोच की! मग 'दुधाळ गाय' असं म्हटलं तर बिघडलं कुठे?! :)

आपला,
(दुधदुभत्यातला!) तात्या.

अवलिया's picture

28 Jun 2009 - 10:48 am | अवलिया

सहमत.
केस असलेला केसाळ तसाच दुध असलेला दुधाळ.

--अवलिया

घाटावरचे भट's picture

28 Jun 2009 - 11:55 am | घाटावरचे भट

मग लिखाळ यांचे काय?

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

28 Jun 2009 - 11:56 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

डोक्यात जास्त लिखा असलेला तो लिखाळ ;)

पर्नल नेने मराठे's picture

28 Jun 2009 - 2:03 pm | पर्नल नेने मराठे

=))
चुचु

मस्त कलंदर's picture

28 Jun 2009 - 2:06 pm | मस्त कलंदर

=)) =)) =))

मस्त कलंदर..
नीट आवरलेलं घर ही घरचा संगणक बंद पडल्याची खूण आहे!!!!

लिखाळ's picture

28 Jun 2009 - 8:04 pm | लिखाळ

डोक्यात जास्त लिखा असलेला तो लिखाळ

आ??!! यावर काहितरी चावरे उत्तर द्यावे असे वाटले पण डोके खाजवूनही सुचले नाही ;)

भटोबा,
माझ्या नावाच्या उगमाबद्दल येथे वाचा.

जाताजाता : यावरुन लायसिलची जाहिरात आठवली.:)
-- लिखाळ.
या प्रतिसादासाठी एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत !!! - लिखाळ जोशी :)

वेताळ's picture

28 Jun 2009 - 3:13 pm | वेताळ

=)) =)) :D

वेताळ

नितिन थत्ते's picture

28 Jun 2009 - 10:04 pm | नितिन थत्ते

वेताच्या छडीने मारणारा तो वेताळ म्हणावे काय?

खराटा
(रंग माझा वेगळा)

लवंगी's picture

28 Jun 2009 - 4:32 pm | लवंगी

=)) =)) =))

ब्रिटिश टिंग्या's picture

28 Jun 2009 - 7:10 pm | ब्रिटिश टिंग्या

१ लंबर!

केळ्या's picture

28 Jun 2009 - 8:51 pm | केळ्या

:)) :))
ही व्युत्पत्ती खुद्द लिखाळरावांनाही सुचली नसावी.

अवलिया's picture

28 Jun 2009 - 10:52 am | अवलिया

'अभारतीय' भाषांमधली बहुमोल माहिती अथवा साहित्य 'भारतीय' (विशेषतः मराठी) मधे अनुवादित करतांना होणा-या गफलतींची रोचक माहिती लेख आणि प्रतिसादातुन मिळाली. :)

अशा गफलती उलट प्रवासात होत नसाव्यात अशी खात्री आहे. :)

--अवलिया

अनंत छंदी's picture

28 Jun 2009 - 11:05 am | अनंत छंदी

सुनीलजी
तुम्ही अगदी महत्वाच्या विषयाला तोंड फोडले आहे. सध्या भाषांतर करताना मराठीचा अगदी मुडदा पाडला जात आहे.

नितिन थत्ते's picture

28 Jun 2009 - 11:25 am | नितिन थत्ते

१०-१५ वर्षांपूर्वीपर्यंत मराठी माणसे एकमेकाला भेटल्यावर 'काय म्हणता/म्हणतोस?' असे विचारीत. आता 'कसा आहेस्/कसे आहात?' म्हणून विचारतात. कैसे हो? How are you? च्या धर्तीवर.
अवांतर: How do you do? सारखे 'कसे करीत आहात?' असे विचारत नाहीत हे नशीब.

खराटा
(रंग माझा वेगळा)

विनायक प्रभू's picture

28 Jun 2009 - 12:05 pm | विनायक प्रभू

असेच विचारतो बॉ

अरुण वडुलेकर's picture

28 Jun 2009 - 12:55 pm | अरुण वडुलेकर

या सर्व प्रकाराला मराठीतून लिहिणार्‍यांची अनास्था कारणीभूत आहे असें मला वाटते. मराठीचा आम्हाला जाज्वल्ल्य अभिमान आहे अशा वल्गना करणारे देखील मराठी भाषेच्या अध्ययनाबाबतीत कमालीची अनास्था बाळगतात. सामान्य शुद्धाशुद्धतेकडेहीं लक्ष देत नाहीत. प्रीति, कीर्ति, दीप्ति, आशीर्वाद अशासारखे शब्द नेमके चुकीचे लिहिले जातात. यावर महाविद्यालयांत मराठी शिकविणारे पण तरीही ," जाऊ द्या हो! भाषा ही संप्रेषणासाठीं असते. सांगणार्‍याला काय सांगायचे आहे तें तुमच्या पर्यंत पोहोचतें आहे ना? मग झालं तर.." अशी मल्लिनाथी करणारे प्राध्यापक दुर्दैवाने माझ्या माहितीत आहेत. दूरदर्शनवरील मराठीचा तर आनंदी आनंदच आहे. " हे असें तूं करायला नको पाहिजे होते" याला काय म्हणणार ?

केळ्या's picture

28 Jun 2009 - 8:53 pm | केळ्या

मी पूर्णपणे सहमत!

लिखाळ's picture

28 Jun 2009 - 2:26 pm | लिखाळ

सुनीलराव,
सहमत आहे. असली भाषा ऐकायचा-वाचायचा अगदी वैताग येतो.

इ-सकाळमधील अशी काही विचित्र भाषा पाहून पाठवलेले दोन प्रतिसाद त्यांनी संकेतस्थळावर छापले नाहीत पण निदान संपादकाने ते वाचले असतील असे वाटते.

असा चर्चाप्रस्ताव मांडल्याबद्दल ''आपले धन्यवाद'' ;)

-- लिखाळ.
या प्रतिसादासाठी एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत !!! - लिखाळ जोशी :)

ऋषिकेश's picture

28 Jun 2009 - 7:49 pm | ऋषिकेश

असे होते हे खरे .. मात्र हा प्रकार फक्त मराठीच्याच बाबतीत होतो असे नाही ..
मी कित्येकदा नकळत "मुझे थंड बज रही है" म्हणतो... आणि मग माझे आसिंध-सिंधुपासून पसरलेले हिंदी बांधव आरे थंड "बजती" नही रे लगती है असं ऐकवतात.(तरी मला थंड बजायची ती बजतेच ;) )

"वाजणार्‍या" थंडि सारखंच "वो ट्युब बंद पड गया है" असं आपल्यापैकी ५०% तरी लोक म्हणत असतील याची खात्री आहे.

अश्या गमतीतून इंग्रजीही सुटलेली नाहि. हे बघ ढकलपत्रातून आलेले सुट्टीच्या अर्जाचे नमुने:

मी गावची जमिन विकायला माझ्या बायकोबरोबर जात असल्याने सुट्टी द्यावी:
Since I have to go to my village to sell my land along with my wife , please sanction me one-week leave

माझ्या सासुबाईंचा मृत्यु झाला आहे आणि फक्त मीच जबाबदार व्यक्ती असल्याने मला दहा दिवसांची रजा द्यावी
As my mother-in-law has expired and I am only one responsible for it , please grant me 10 days leave

मला ताप आला आहे, एक दिवसाची सुट्टी द्यावी
I am suffering from fever , please grant one-day holiday.

तेव्हा माझ्या मते ह्या भाषांतरातील गमती होतच रहाणार.. मर्यादेबाहेर जातंय असं वाटतं कधी कधी मात्र इतर भाषिकांशी यावर बोललं की कळतं आपणही इतरांची काहि कमी वाट लावत नाहि ;)

ऋषिकेश
------------------
बुद्धीसाठी लोह वाढवणारी औषध घ्यायला लागल्यापासून "डोकं गंजलं तर!" ही भिती वाढली आहे

चिरोटा's picture

29 Jun 2009 - 12:34 pm | चिरोटा

बेंगळुरुत नेहमी विचारला जाणारा प्रश्न.
Where are you put up?(आपण सध्या कुठे राहता?).पहिल्यांदा हा प्रश्न मला एकाने विचारल्यावर काहीच बोध होईना.मला वाटले 'आपण ह्या क्षणी कुठे आहात?" असे असावे. मी रेल्वे स्थानकातच त्यावेळी असल्याने मी तसे सांगितले.त्यावर तो हसु लागला.
भेन्डि
क्ष्^न + य्^न = झ्^न

केळ्या's picture

28 Jun 2009 - 8:59 pm | केळ्या

प्रत्येक भिन्न भाषिक माणूस, फोटो काढणे यासाठी वेगवेगळे वाक्यप्रयोग करतो.उदा.फोटो काढणे,फोटा पाडणे,फोटो खेंचणे इ.इ.
माणूस आपल्या मूळ भाषेनुसार त्याचे भाषांतर करतो.

विजुभाऊ's picture

29 Jun 2009 - 12:22 pm | विजुभाऊ

योगदान : हा तद्दन हिन्दी शब्द. त्याला रोजच्या वापरातला मराठी शब्द "सहभाग" असा आहे.
सर्वात मोठा विनोद म्हणजे " सर्व देश त्यांच्या मृत्यूचा शोक साजरा करत आहे" हिन्दी " समूचा देश उनकी मौत का सोग मना रहा है"
शोक साजरा करत नाहीत तर पाळतात.
उनकी बरसी मनानी है. याचे शब्दश: लोक त्यांच्या स्मृती दिन साजरा करतात.
"साजरे करणे" हे केवळ आनन्द संबोधक क्रियापद आहे
ते सोडा या हिन्दीवाल्यानी तर इंग्रीजीचीही बरीच वाट लावली आहे
"आपका शुभनाम?" ह्याचे शब्दशः ते लोक " What is your good name असे करतात. बहुतेक लोकाना bad name असते असे त्याना वाटत असावे.
Please introduce your self" याच्या उत्तरादाखल लोक Myself xyz अशी ओळख करुन देतात. यात काय चूक आहे तेच लोकाना समजत नाही.
बरेच लोक are you coming na? असे विचारतात.
अवांतरः पास PASS हा इंग्रजी शब्द असेल तर नापास हा कोणत्या भाषेतला शब्द आहे?

शाहरुख's picture

30 Jun 2009 - 3:45 am | शाहरुख

>>मग, मिलियनचे दशलक्ष असे बिनडोक भाषांतर करण्यामागे काय हेतू असावा?

या विषयात आम्हास काडीचा इंटरेष्ट नाही पण आमच्या बिनडोकपणाचे उदाहरण देण्यात आल्याने एक शंका..

दशलक्ष हा शब्द मराठी नाही म्हणुन हे उदाहरण दिले आहे की ती संज्ञा लाख-कोटी इतकी परिचयातील नाही म्हणुन ??

-शिकाऊ शाहरूख
आम्हास चौथीत बालगणित शिकवणार्‍या मास्तरने 'दशलक्ष' ही संज्ञा शिकवली असल्याने आम्ही त्याचा सर्रास वापर करतो...चौथीत आम्हास "ए बी शी डी" देखील येत नव्हते आणि आमचा मास्तर विलायतेत शिकला असण्याची सुतराम शक्यता नाही.