दहावीचा निकाल आणि भरमसाठ गुण

मिहिर's picture
मिहिर in काथ्याकूट
27 Jun 2009 - 10:53 pm
गाभा: 

परवाच दहावीचा निकाल लागला. यावेळचा सर्वसाधारण निकाल कमी असला तरी मुलांना मिळालेल्या गुणांमध्ये मोठ्याप्रमाणात वाढ झाली आहे. पहिला नंबर ९८.६%चा. मराठीत यावेळी ९८ व इंग्रजीत ९८ गुण सर्वाधिक आहेत. कोल्हापुरातील उषाराजे हायस्कूल मधील ३७ मुलींना मराठीत ९० ते ९७ मध्ये गुण मिळाले आहेत. बघावे तिकडे गुणच गुणच दिसत आहेत.
ह्या गुण मिळवलेल्या विद्यार्थ्यांनी कष्ट केले नव्हते असे मला अजिबात म्हणायचे नाही. मात्र ज्याप्रमाणात गुण वाटले गेले तेवढी मुलांची तयारी होती का? मराठीसारख्या विषयात इतके भरमसाठ गुण देणे चुकीचे नाही का?
काही जण म्हणतील की, दिले इतके गुण तर काय बिघडले? मात्र या अतिरिक्त गुणांमुळे मुलांचेच नुकसान होते. या भरमसाठ गुणांमुळे आपण नक्की कुठे आहोत याचा अंदाजच लावता येत नाही. पालकांच्या मुलांकडून अपेक्षा वाढतात. मात्र मुले पुढील स्पर्धांमध्ये मागे पडू शकतात.
मी मागच्या वर्षी दहावी पास झालो. आमच्या वेळीही गुण वाटले गेले होते. पण यावर्षी तर अतीच झाले असे वाटत नाही का?

प्रतिक्रिया

अविनाशकुलकर्णी's picture

27 Jun 2009 - 11:15 pm | अविनाशकुलकर्णी

त्या साठी आता परीक्षाच रद्द करणार आहेत...

अमोल खरे's picture

28 Jun 2009 - 11:16 am | अमोल खरे

गेल्या काही वर्षांपासुन चालु आहे...........मी दहावी-बारावीत असताना मलाही चांगले मार्क मिळाले होते. :) मार्क हल्ली जरा जास्तच देतात बहुदा.

शितल's picture

28 Jun 2009 - 1:57 pm | शितल

>>मार्क हल्ली जरा जास्तच देतात बहुदा.
मला ही असेच वाटते.

मागच्या वर्षी तुला कमी गुण दिले म्हणुन. ;)
बाकी आजकाल १० ला गुण खरोखरच खिरापती प्रमाणे वाटत आहेत.

वेताळ

मिहिर's picture

28 Jun 2009 - 3:31 pm | मिहिर

मलाही मागच्या वर्षी भरपूर गुण मिळाले होते. त्यावेळीही माझी थोड्या प्रमाणात अशी भावना झाली होती. ९० ते ९२% ची अपेक्षा असताना ९४% पडले.

टारझन's picture

28 Jun 2009 - 5:37 pm | टारझन

मग मात्र बरोबर आहे, मार्क्स खरोखर खिरापतीप्रमाणे वाटत आहेत !!

स्वगत : हा "भयानक पाठलाग"चा मित्र तर नाही ना ? :?

सुनील's picture

28 Jun 2009 - 5:29 pm | सुनील

गेल्या वर्षी पर्सेन्टाइलच्या मुद्द्यावर सरकारला हायकोर्टात हार खावी लागली होती, तेव्हा मार्क जरा सढळपणे द्यावेत अशा (गुप्त) सुचना तर दिल्या गेल्या नव्हत्या ना? :|

Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.

मिहिर's picture

28 Jun 2009 - 6:33 pm | मिहिर

सुनील म्हणतात ते कारण असू शकेल. पण दूरदृष्टीने बघितले तर यात विद्यार्थ्यांचा तोटा आहे.
मी आणि विनायक पाचलग एकाच वर्गात आहोत. कधीतरी नोटिस बघण्यासाठी किंवा प्रॅक्टीकलसाठी आला तर कॉलेजमध्ये भेटतो.

टारझन's picture

28 Jun 2009 - 7:08 pm | टारझन

मी आणि विनायक पाचलग एकाच वर्गात आहोत.

ह्म्म्म .. ते आम्हाला आपल्या ह्या ओळींवरून कळाले :-
मलाही मागच्या वर्षी भरपूर गुण मिळाले होते. त्यावेळीही माझी थोड्या प्रमाणात अशी भावना झाली होती. ९० ते ९२% ची अपेक्षा असताना ९४%

कहर आहे.

त्या मुलीच्या यशाबद्द्ल मला काही म्हणायचे नाही. ते कौतुकास्पदच आहे. पण मराठीमध्ये शुध्दलेखन, रसग्रहण, निबंध हे ही तंतोतंत बरोबर ? म्हणजे अपेक्षेप्रमाणेच लिहिलेले / मांडलेले असू शकतात ? . . . हे मनाला पटंत नाही.

कदाचित, मराठी भाषेचा अभ्यासक्रम तोकडा असावा, किंवा उत्तरांची अपेक्षा तोकडी ठेवलेली असावी. हे सुध्दा भाषेच्या एकूण व्याप्तीची नंतरची वाढ खुंटवण्यासारखे आहे, असे मला वाटते.