झटपट बॅचलर पिझ्झा

अनामिक's picture
अनामिक in पाककृती
23 Jun 2009 - 4:16 am

छोट्या डॉनने पिझ्झा हटमधे घालवलेल्या संध्याकाळवर टाकलेला लेख वाचला आणि माझी पिझ्झा खायची इच्छा जागृत झाली. वाढत्या वजनामुळे लई दिवसांपासून पिझ्झा खाणे बंद केलेले आहे. विकतच्या पिझ्झ्यात एकतर भरपूर कॅलरीज असतात, शिवाय मैद्याचा बेस म्हणजे भरीत भर! तरी अधे-मधे कधी लहर आलीच तर विकतच्या पिझ्झ्याला पर्याय म्हणून एका बॅचलर पिझ्झ्याला बर्‍याच दिवसांपुर्वी जन्म दिलेला होता... तोच आज करायचा ठरवला. याची चव ही विकतच्या पिझ्झ्याच्या जवळचीच, कॅलरीज् पण कमी... आणि अगदी लवकर व कमी कष्टात होणारा आहे हा पिझ्झा!

पिझ्झ्यासाठी काय लागतं? जास्त काही नाही... पिटा ब्रेड (मी व्हीट पिटा ब्रेड वापरतो), पास्ता सॉस, पिझ्झा टॉपिंग्ज् साठी कांदा, ढोबळी मिरची (किंवा तुम्हाला जे आवडेल ते!), आणि श्रेडेड चीज.... झालं! साधारण पोळीच्या आकाराच्या पिटा ब्रेडवर पहिले दोन ते अडीच चमचे पास्ता सॉस लावा. ढोबळी मिरची आणि कांदा कापायला घेताना ओवन ३५० डिग्रीवर प्रिहिट करायला ठेवा. कांदा आणि ढोबळी मिरची कापून झाली कि पास्ता सॉस लावलेल्या पिटाब्रेडवर हव्या त्या प्रमाणात पसरवा. त्यावर पाहिजे तेवढं चीज घालून ओवन मधे १२ ते १५ मिनिटे (किंवा अंदाजाप्रमाणे) ठेवा. १५ मिनीटात झटपट बॅचलर पिझ्झा तयार!

बघताय काय...आता मारा ताव!
लहान मुलांना नक्कीच आवडण्यासारखा आहे हा पिझ्झा!

-अनामिक

प्रतिक्रिया

दिपाली पाटिल's picture

23 Jun 2009 - 4:18 am | दिपाली पाटिल

काय मस्त दिसतोय पिझ्झा...

दिपाली :)

स्वप्निल..'s picture

23 Jun 2009 - 4:31 am | स्वप्निल..

झटपट बॅचलर पिझ्झा मस्तच..

पण मी यापेक्षा जास्त आळशी आहे..आणि कष्ट करायची तयारी तर नाहीच.. ;)

स्वप्निल

समिधा's picture

23 Jun 2009 - 4:35 am | समिधा

खरचं खुपच सही दिसतोय हा पिझ्झा.
करुन बघायला पाहीजे.

समिधा
(चांगल्या मैत्री सारखे सुंदर दुसरे काही नाही.)

रेवती's picture

23 Jun 2009 - 5:48 am | रेवती

बरं झालं एक झटपट पाकृ कळली.:)
माझ्या मुलाला एकदम कधीतरी लहर येते पिझ्झा खायची.
आता पिटा ब्रेड आणते.......आणि जरा आणखी काही भाज्या घालता येतात का तेही पाहते.;)
पिझ्झ्याचा फोटू बाकी मस्त!

रेवती

छोटा डॉन's picture

23 Jun 2009 - 6:59 am | छोटा डॉन

आयला अनामिकसायबा, तु तर लै जबरा कुकिंग एक्सपर्ट निघालास बे.
फोटु छान दिसतो आहे एकदम ...

करणे अंमळ कठिण आहे, कोणी आयता खाऊ घालत असेल तर जमु शकेल.
तशीही आमची थालपिठापासुन सुरु झालेली स्वयंपाकाची ख्याती ऐकल्यापासुन आम्ही जिथे जाऊ तिथे लोक त्यंच्या स्वयंपाकघरांना लॉक लाऊन पळुन जातात.
रुममेट्स आता साथ देणे अशक्य, त्यापेक्षा ते सोमालियात जाऊन युनोच्या कामात स्वतःला गुंतवुन घेणे पसंत करतील ...

पाकॄ मस्तच ..!!!

------
छोटा डॉन
एखादा "प्रण अथवा रिझॉल्युशन" म्हणजे काय ? जास्त काही नाही, मस्त गाजावाजा करुन ८ दिवसातच पहिली पाने पंचावन्न करणे.
आता आमचा "लेखन न करण्याच्या" प्रतिज्ञेचेच पहा ना ... ;)

मुक्तसुनीत's picture

23 Jun 2009 - 7:06 am | मुक्तसुनीत

या वीकेंडला बनवणार ! नक्की ! धन्यवाद अनामिक.

गणा मास्तर's picture

23 Jun 2009 - 7:24 am | गणा मास्तर

लै भारी . मी नेहेमी करत असतो असा पिझ्झा.
- गणा मास्तर
भोकरवाडी (बुद्रुक)

सहज's picture

23 Jun 2009 - 7:27 am | सहज

काय फोटो, काय पिझ्झा!!

लै भारी.

क्रान्ति's picture

23 Jun 2009 - 8:11 am | क्रान्ति

लेकीचा आवडता पदार्थ. तिला जेवायचा कंटाळा आला, की हा पिझ्झा करते.

क्रान्ति
ध्यानम् मूलम् गुरुमूर्ति, पूजामूलम् गुरु पदम्
मंत्र मूलम् गुरुवाक्यम्, मोक्षमूलम् गुरुकृपा
अग्निसखा

टारझन's picture

23 Jun 2009 - 8:33 am | टारझन

वा वा वा !!! आता तर पिझ्झा खायलाच हवा !!! अनामिक दादा ...
अजुन वेगळे वेगळे पिझ्झे वगैरे येउन द्या :)

स्वाती दिनेश's picture

23 Jun 2009 - 11:28 am | स्वाती दिनेश

पिझ्झा आवडला,
स्वाती

जागु's picture

23 Jun 2009 - 11:50 am | जागु

सोप्पी आणि मुलांना आवडणारी पाककृती

मसक्कली's picture

23 Jun 2009 - 11:57 am | मसक्कली

यम्मि............... =P~

आय ला ..........आपल्याला लइ आवदतो बुआ पिझ्झा..... ;)

आनि हो क्यालरिज म्हनल तर त्या तर चिज मधे पण आसतत ना :(

पण आपल्याला जम हाउस हाय खान्या चि वेगळे पदार्थ.... :)

खातना विचार नाय करत बुआ मी.......बिन्दास्त खनेका तेन्स्तिओन नहि लेने का मामु....... ;) समझा ना.......... B)

क्यालेरिज को गोलि मरो यार :))

वेताळ's picture

23 Jun 2009 - 12:27 pm | वेताळ

पन पिता ब्रेद म्हनजे काय दादा.तो इकदे मिलतो का?
क्यालरिज को मारी गोलि..........अब तेन्स्तिओन नहि लेते मामु...
वेताळ

वेताळ's picture

23 Jun 2009 - 12:34 pm | वेताळ

पन पिता ब्रेद म्हनजे काय दादा.तो इकदे मिलतो का?
क्यालरिज को मारी गोलि..........अब तेन्स्तिओन नहि लेते मामु...
वेताळ

पक्या's picture

23 Jun 2009 - 12:58 pm | पक्या

अनामिक राव , एकदम सही दिसतोय पिझ्झा. पिटा ब्रेड ची आयडिया मस्त. आता आज/ उद्याच करून बघणार. धन्यवाद.

वेताळ बुवा भारतात पिटा ब्रेड मिळतो का ते माहित नाही पण बेकरी मध्ये पोळीच्या साईज चा पिझ्झा बेस मिळतो तो वापरु शकता. ओवन नसेल तर पिझ्झा बेस तव्यावर जरासा भा़जून घ्यायचा. चिरलेल्या भाज्या किंचित तेलावर परतून घ्यायच्या. पिझ्झा सॉस (हा पण घरी करता येतो)/ पास्ता सॉस ह्या बेस वर पसरवून वर भाज्यांचा थर घालून त्यावर भरपूर किसलेले चीझ घालून परत तव्यावर जरा गरम करायचे म्हणजे चीझ वितळू लागेल.

शितल's picture

23 Jun 2009 - 1:21 pm | शितल

झक्कास रे :)
तुझ्या हातचा पिझ्झा खायला मिळो. :)

प्राजु's picture

23 Jun 2009 - 7:21 pm | प्राजु

तुफ्फ्फाऽऽऽन!!!
एकदम सुटसुटीत. पिटा ब्रेड ची आयडीया आवडली.
आता नक्कीच होणार हा पिझ्झा घरी. :)
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/

धनंजय's picture

23 Jun 2009 - 9:25 pm | धनंजय

सोपी आणि मस्त पाककृती

विसोबा खेचर's picture

24 Jun 2009 - 6:35 am | विसोबा खेचर

चित्र भारी, परंतु आम्हाला पिझ्झा हा प्रकारच आवडत नाही! :(

तात्या.

मुक्तसुनीत's picture

25 Jun 2009 - 6:18 am | मुक्तसुनीत

बार्बेक्यु म्हणजेच शेगडीवर केलेला पिझ्झा ! ;-) धन्यवाद अनामिक.