केसरी महोत्सव

चित्रादेव's picture
चित्रादेव in पाककृती
11 Jun 2009 - 1:18 am

आंब्याचे दिवस सरत आलेत. उसगावात मुष्कीलीने मिळणारे हापूस अगदी जपून खाताना चारच उरले होते. म्हटले कायतरी झकास बनवूयाच. त्यात संकष्टी चतुर्थीचे निमित्त होतच्(म्हणजे निमित्त केले हो..) म्हटले का नाही एखादा फक्कड बेत बनवूया. नमनालाच घडीभर तेल ओतून तुमची जिज्ञासा ताणून झाली आहेच तर हे घ्या खास मिपांकरांसाठी केसरी बेत.

केसरी मोदक, गवसणी आणि आमरस
आता गवसणी हा प्रकार खूपच कमी लोकांना माहीती आहे हे आलेय लक्षात इथे ह्या ओळीपर्यन्त आल्यावर.
गवसणीची गोष्टः गवसणी हा उकड कणकेत घालून बनवायचा प्रकार. कोकणात खूप आवडीने आमरसा बरोबर खल्ला जातो.
सामानः
गवसणी करता सामानः
१ वाटी सुवासीक तांदूळाची पिठी(ही मोदकासाठी लागते तीच घ्या),केसर, चिमूटभर भाजलेली बडीशेपची पूड आणि काळमीरीची पूड्,वेलची पूड, १ चमचा तूप आणि जराशी चिमटीभर साखर.
२ वाटी कणीक,तेल्,मिठ्,पाणी.
पांरपारीक गवसणीची उकड अशी करत नाहीत पण मी चवीसाठी केलेला फेरफार खूप वेगळी चव देवून गेला.(पारंपारीक उकड मध्ये बडीशेप अथवा काळमीरी घालत नाहीत).

आमरस सामानः
१ चमचा शुद्ध तूप्,चार पिकलेले हापूस आंबे(हापूस खेरीज दुसर्‍या आंब्याकडे ढूंकून पहात नाही आम्ही) :),केसर काड्या,वेलची पूड, किसलेले आले पाव चमचा.

ऊकडीचे मोदक सामानः
२ वाट्या सुवासीक तांदूळ पिठी, १/२ वाटी हापूस रस्,केसर काड्या, १ चमचा शुद्ध तूप,१/२ वाटी दूध, १ वाटी पाणी, चिमटीभर साखर अन मिठ जरासेच.
खोबर्‍याच गूळ टाकून चव्(ह्याची कृती माहीती आहेच सर्वांना)
कृती:

गवसणीची तयारी:
रोजच्यासारखी कणीक चपातीला मळतो तशीच मळावी पण जरा हलकी,मऊ मळावी व झाकून ठेवावी.
आता तांदूळाची उकडः
१ वाटी पाणी खदखदा उकळले की १ चमचा तूप्,केसर काड्या, वेलची पूड्,मिठ्,साखर्,बडीशेप पूड्,काळमीरी पूड टाकावी. मग तांदूळ पिठ टाकून त्यात चार खड्डे चमच्याने पाडून गॅस बंद करून झाकून ठेवावी. मग बेताची गरम असताना मस्त शुद्ध तूपाचा हात लावून मळून झाकून ठेवावी १५-२० मिनीटे.
कणीकेचा उंडा घ्यावा आता एक वरील उकडीचा मावेल इतपत गोळा घेवून पूरणपोळीसारखे नाजूक हाताने लाटत जावे. हात अलगद ठेवावा. मस्त पातळ लाटली इतकी आतली उकड बर्‍यापैकी दिसेल पण फाटून बाहेर नाही येइल अशी लाटली की गरम तव्यावर पूपो सारखी भाजावी. आतील उकडीच्या केसराचा घमघमाट सुटतो. खाली काढून घडी करून हातानेच दाबून ठेवून मग तूपाची धार सोडावी. अतीशय मऊ, पापूद्रे सुटलेली अशी गवसणी तयार.

उकडीचे मोदक उकडः
१/२ वाटी हापूस रस घेवून त्यात १/२ वाटी दूध मिक्स करून १ वाटी पाणी मिक्स करायचे. गॅस वर खदाखदा उकळवून मग त्यात चिमटीभर साखर, १ चमचा शुद्ध तूप, मिठ व केसर टाकून मगच सुवासीक तांदूळ पिठी घालावी. चार खड्डे पाडून झाकण मारून गॅस बंद करावा. बेताचे गरम असताना मस्त मळून घ्यावी ताटात. मऊ मुलायम केसरी रंगाची अशी उकड झाली मोदकाला तयार. केसरी रंग खूप खूलून दिसतो.
रोजच्या सारखा नारळाच चव करा मग मोदक बनवून उकडा १० मिनीटे मोदक पात्रात.

आमरसाची तयारी:
हा एक खास रीतीने केला जातो. आमरस काढला की त्यात १ चमचा शुद्ध तूप्(चांगले असते तूप टाकणे उष्ण आंबा बाधत नाही). वरून वेलची पूड्,जायफळ पूड,केसर टाकून ढवळून थंड करून घ्यावा.

असा तिहेरी बेत गावची आठवण काढत खावा. :)

फोटो येत आहे................ जरा सबूरी ठेवा. :)

प्रतिक्रिया

दिपाली पाटिल's picture

11 Jun 2009 - 1:30 am | दिपाली पाटिल

तोंडाला पाणी सुटले , वरिल ताट बघून ...

दिपाली :)

प्राजु's picture

11 Jun 2009 - 2:32 am | प्राजु

सगळाच बेत आणि लेख... एकदम खुमासदार आणि केसराळ. :)
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/

कोलंबस's picture

11 Jun 2009 - 3:08 am | कोलंबस

उसगावात चांगलं केशर कुठुन आणावं ते सांगाल का?

Nile's picture

11 Jun 2009 - 5:10 am | Nile

काय राव? उसगाव शोधणारे तुम्ही अन केशर कुठुन आणायचं विचारताय? ;)

समिधा's picture

11 Jun 2009 - 3:45 am | समिधा

एकदम मस्त आहे फोटो..:)
समिधा
(चांगल्या मैत्री सारखे सुंदर दुसरे काही नाही.)

नुसत वाचुनच वजन वाढतय माझ..

रेवती's picture

11 Jun 2009 - 5:23 am | रेवती

असा फक्कड बेत व त्याचे फोटू देताना चित्रा देव यांना आमची दया कशी आली नाही? आता शिक्षा म्हणून त्यांनी सगळ्या मिपागावाला मेजवानीस बोलवावे.

रेवती

संदीप चित्रे's picture

12 Jun 2009 - 9:02 pm | संदीप चित्रे

आधी एकेका पदार्थाची रेसिपी यायची आता तर तिहेरी ...
अरे जरा दया माया दाखवा रे :)

चकली's picture

11 Jun 2009 - 7:16 am | चकली

बेत फारच मस्त. आणि गवसणी ची माहिती दिल्याबद्द्ल धन्यवाद. बडीशेप चे इम्प्रो आवडले.
चकली
http://chakali.blogspot.com

अनंता's picture

11 Jun 2009 - 6:43 pm | अनंता

मारून खायला बसावेसे वाटते.
:)

विवाहित पुरूषांसाठी मौनव्रतासारखे दुसरे व्रत नाही . ;)

सहज's picture

11 Jun 2009 - 7:31 am | सहज

बेत भारी आहे.

धन्यु.

पाकृ वाचुन आणि फोटू बघुन अंत झाला...

~फटकळ~

बिपिन कार्यकर्ते's picture

11 Jun 2009 - 3:28 pm | बिपिन कार्यकर्ते

आई ग्ग्ग्गं!!!!

बिपिन कार्यकर्ते

अनामिक's picture

11 Jun 2009 - 5:17 pm | अनामिक

केसरी महोत्सव छान आहे दिसायला.

(मला मात्र आमचे गावराणी आंबेच जास्तं प्रिय! काय एकेकाची चव ती!! उगाच ते महाग किंवा कमी आहे म्हणून जपून खाणे नको... )

-अनामिक

परिकथेतील राजकुमार's picture

11 Jun 2009 - 6:38 pm | परिकथेतील राजकुमार

वाह ! तेरा और तेरी पाकृ का क्या केहना ;)

©º°¨¨°º© परा ©º°¨¨°º©
फिटावीत जरा तरी जगण्याची देणी, एक तरी ओळ अशी लिहावी शहाणी...
आमचे राज्य

एकलव्य's picture

12 Jun 2009 - 9:30 am | एकलव्य

वाह ! तेरा और तेरी पाकृ का क्या केहना

चित्रा's picture

11 Jun 2009 - 8:34 pm | चित्रा

आमरस आणि गवसणी छान दिसते आहे.

चित्रादेव's picture

11 Jun 2009 - 10:06 pm | चित्रादेव

धन्यवाद सर्वांना!

क्रान्ति's picture

11 Jun 2009 - 10:39 pm | क्रान्ति

दिपले, पुन्हा भूक लागली! काय एकेक सुगरण ताईंची कारागिरी! [आमची आयती खाबूगिरी!]

क्रान्ति
ध्यानम् मूलम् गुरुमूर्ति, पूजामूलम् गुरु पदम्
मंत्र मूलम् गुरुवाक्यम्, मोक्षमूलम् गुरुकृपा
अग्निसखा

मस्त कलंदर's picture

11 Jun 2009 - 11:22 pm | मस्त कलंदर

डोळे दिपले हे खरेच..
पण पोट हा छान छान खाऊ मागतेय त्याचं काय? 8>

मस्त कलंदर..
नीट आवरलेलं घर ही घरचा संगणक बंद पडल्याची खूण आहे!!!!

विसोबा खेचर's picture

12 Jun 2009 - 12:23 am | विसोबा खेचर

हारलो..!

माझ्याकडे तरी शब्द नाहीत! :)

चित्रादेवांचा विजय असो..! :)

त्यांनी यापुढेही मिपावर अश्याच उत्तमोत्तम व देखण्या पाकृ टाकाव्यात अशी त्यांना कळकळीची विनंती!

तात्या.

चित्रादेव's picture

12 Jun 2009 - 3:38 am | चित्रादेव

पुन्हा एकदा धन्यवाद सर्वांना.
तात्या,
अहो, नुसते चित्रा म्हटले तरी चालेल. देव माझे लास्ट नेम म्हणजेच आडनाव आहे. :)

अश्विनि३३७९'s picture

12 Jun 2009 - 3:32 pm | अश्विनि३३७९

आत्ताचं जेऊन आले तरी परत तोंडाला पाणी सुट्लं
गवसणी बरोबर आमरसच हवा का??
अश्विनि ....

स्वाती दिनेश's picture

12 Jun 2009 - 3:50 pm | स्वाती दिनेश

फारच छान दिसत आहेत फोटो, झकास बेत झालेला दिसतो आहे.
स्वाती

वेताळ's picture

12 Jun 2009 - 6:33 pm | वेताळ

खविस,हडळ,मुंजा,गोस्ट,डेव्हिल,वेताळ

चित्रादेव's picture

12 Jun 2009 - 7:52 pm | चित्रादेव

अश्वीनी३३७९,
तुम्ही कोकणात घावन घाटले खाल्ले आहेत का? त्यांची जशी जोडी असते तसेच गवसणी अन आमरस ही जोडी आहे. आता कोणाला गवसणी आणि मटण रस्सा खायचा असेल तर खावू शकतो ना... बंदी नाही आहे. :)
पण गवसणी आमरसाबरबरोच छान लागते. दुसरे ऑप्शन आहे मटण किंवा कोंबडी रस्सा जर हवेच असेल तर.... आधी आमरसाबरोबर खावून तर बघा. :)

चतुरंग's picture

12 Jun 2009 - 7:59 pm | चतुरंग

आमरसाला घातलेली गवसणी आवडली! :)

(चतुरंग)

श्रीयुत संतोष जोशी's picture

19 Jun 2009 - 6:36 pm | श्रीयुत संतोष जोशी

आमरसाला घातलेली गवसणी आवडली +१

हे राज्यं व्हावे ये तो श्रींची इच्छा.

श्रीयुत संतोष जोशी's picture

19 Jun 2009 - 6:37 pm | श्रीयुत संतोष जोशी

आमरसाला घातलेली गवसणी आवडली +१

हे राज्यं व्हावे ये तो श्रींची इच्छा.