गाभा:
वट सावित्रीचे व्रत करणा~या भगीनि वडाचि पुजा झाल्यावर वडाला नैवेद्य म्हणुन आंबे वहातात...व पुजा करणा~या गुरुजिंना हि आंब्याचे दान करतात..पण हे आंबे आकाराने नेहमी लहान असतात..हापुस किंवा पायरी अश्या प्रकारचा नैवेद्य कधिच दाखवला जात नाहि..मला आठवते लहानपणी वट सावित्रीचे आंबे असे लहान आम्बे विकायला यायचे..वडाला लहान आंबे वहाण्या मागचे धार्मीक कारण काय असावे?
प्रतिक्रिया
5 Jun 2009 - 10:44 pm | अनामिक
मला तर असा प्रश्न पडलाय की अविनाश कुलकर्णींचे नेहमी एक किंवा दोन ओळीचे काथ्याकूट काढण्यामागे कारण काय असावे?
~X( :/ ~X(
-अनामिक
5 Jun 2009 - 11:12 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
वडाच्या झाडाखाली सावित्री, सत्यवान व यम यांची चित्रे काढून त्याची पूजा करायची, सौभाग्यवतींनी एकमेकींना ऋतूप्रमाने असतील ते फळे द्यावीत. पतीच्या आयुष्याची दोरी पक्की राहावी म्हणून यमाची पूजा केली जात असावी असे वाटते.
बाकी , बारके आंबे स्वस्तात भरपूर येत असल्यामुळे एकमेकींना आंब्याबरोबर गहू, खोबर्याचे तुकडे, एकमेकींची ओटी भरतांना स्त्रीयांना आणि गुरुजींना देणे परवडते, त्यामागे धार्मिक कारण काही नसावे असे वाटते.
अविनाशराव नुसते प्रश्न विचारणारे धागे काढायचे कधी बंद करणार आहात ? (ह. घ्या ) :)
अवांतर : स्त्रीया अशा कार्यक्रमाला सजून का जातात असा एक धागा काढावा वाटतोय ! ;)
-दिलीप बिरुटे
5 Jun 2009 - 11:37 pm | टारझन
"बोरकर" कंपुचे पाइक असणारे गजनि पोटाचि पुजा झाल्यावर माकडहाडाला व्यायाम म्हणुन काथ्याकुट काढतात...व संस्थळावर वाचन करणा~या मिपाकरांना हि काथ्याकुटांचे पारायन करवतात..पण हे काथ्याकुटी धागे आकाराने नेहमी लहान असतात.. "जनातलं मनातलं" किंवा ललितलेख अश्या प्रकारचा धागा कधिच काढला जात नाहि..मला आठवते पडिक असताना अविनाशकुलकर्णीचे धागे असे लहान धागे वाचायला मिळायचे..माकडहाडाचा व्यायाम म्हणून लहान धागे काढण्या मागचे धार्मीक कारण काय असावे?
कृ. हलके घेउ नये
-टारूनाशगजकर्णी
(एक धागा काढता काढता .. हात आवरता घेतला.. आणि प्रतिसाद टंकला)
6 Jun 2009 - 12:33 am | घाटावरचे भट
=))
6 Jun 2009 - 1:08 am | लिखाळ
मी पण ठार झालो :)
-- लिखाळ.
या प्रतिसादासाठी एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत !!! - लिखाळ जोशी :)
7 Jun 2009 - 10:37 am | मैत्र
टारूनाशगजकर्णी !
6 Jun 2009 - 2:08 am | चतुरंग
__||__अरे टार्या तुला सुचतात कशा रे ह्या कल्पना?
सह्यांचे तू करतोस ते विडंबन अफलातून असते! :D :D
(संपलेला)चतुरंग
6 Jun 2009 - 6:40 am | अवलिया
=))
--अवलिया
6 Jun 2009 - 6:43 am | अवलिया
अरेच्या ! जास्तीचे प्रतिसाद कसे काय आले?
ह्याचे काय धार्मिक कारण असावे ? :?
असो.
संपादक मंडळ, जरा बघता का?
--अवलिया
जास्तीचे प्रतिसाद काढून टाकले आहेत- संपादक
6 Jun 2009 - 11:59 am | विनायक प्रभू
काय नाय हॉ.
आमच्याकडे ३६५ दिवस हापुस आंब्याला तोटा नसतो.
6 Jun 2009 - 12:53 pm | परिकथेतील राजकुमार
तुमच सगळच 'वेगळ' आहे गुर्जी. ;)
©º°¨¨°º© परा ©º°¨¨°º©
फिटावीत जरा तरी जगण्याची देणी, एक तरी ओळ अशी लिहावी शहाणी...
आमचे राज्य
6 Jun 2009 - 9:11 pm | तिमा
त्यापेक्षा हल्लीच्या युगात, सवाष्णींनी वडाला 'वडापाव' अर्पण करावा व वडा पाव रे बाबा असे म्हणावे.
हर शख्सको अपना बनाके देख लिया
मिलेंगे ना किसीसे ये दिलमें ठानी है|
7 Jun 2009 - 1:38 pm | नितिन थत्ते
=))
वडा पाव हे लय भारी.
खराटा
(रंग माझा वेगळा)
6 Jun 2009 - 11:46 pm | सँडी
लहान आंबे
ज्याची त्याची आवड!
9 Jun 2009 - 1:40 am | हरकाम्या
गुरुजींना लहान आंबे मिळतात म्हणुन या अव्याच्या पोटात दुखतय
का ? का गुरुजींना मिळणारी लहान आंब्याची रास याला याला
पहावत नाही. चला मिपावाल्यांनी एक ठराव पास करुयात की
पुढच्य्या वर्शी मोठे आंबे वाहु, आणी ते आंबे अव्याला मिळतील
अशी व्यवस्था करु ,क्रुपया माझ्याकडे नांवे नोंदवा.