कांद्याच्या पातीचा भात

शाल्मली's picture
शाल्मली in पाककृती
21 May 2009 - 8:09 pm

परवा एकदा आंतरजालावर भटकत असताना स्प्रिंग ओनियन राईस अश्या नावाची पाककृती दिसली. उत्सुकता म्हणून ती कृती वाचली आणि करुनही बघावीशी वाटली. त्या कृतीच्या आधारे त्यात काही बदल करुन मी तो भात केला, त्याची चव आवडल्याने तुम्हा सर्वांसाठी मी त्याची कृती देत आहे.

कांद्याच्या पातीचा भात

साहित्य:-
१ वाटी बासमती तांदूळ
२ वाट्या पाणी
१ जुडी कांद्याची पात स्वच्छ धुवून, बारीक चिरुन
१ मोठा चमचा हरभर्‍याची डाळ
१ मोठा चमचा उडदाची डाळ
१ छोटा चमचा धने
१ छोटा चमचा जिरे
२ मोठे चमचे कोरडं खोबरं
७-८ काजू पाकळ्या
३-४ सुक्या लाल मिरच्या
५-६ कडिपत्त्याची पाने
चवीनुसार मीठ
फोडणीचे साहित्यः- तेल, मोहरी, हिंग.

कृती:-
१ वाटी तांदूळाचा २ वाट्या पाणी घालून भात फडफडीत शिजवून घ्यावा. भात झाल्यावर एका ताटात मोकळा करून ठेवावा.
एका कढल्यात अगदी थोडेसे तेल घालून त्यात हरभर्‍याची डाळ, उडदाची डाळ, धने, जिरे, कोरडं खोबरं, लाल मिरच्या आणि कडिपत्त्याची पाने असे वेगवेगळे खमंग भाजून घ्यावे. गार झाल्यावर हे जिन्नस एकत्र करून मिक्सरमधून त्याची पूड करुन घ्यावी.

एका भांड्यात फोडणीसाठी तेल गरम करुन घ्यावे. तेल तापले की त्यात मोहरी, हिंग घालावे. त्यात काजूच्या पाकळ्या घालून त्या लाल होईपर्यंत परताव्यात. त्यात चिरलेली कांद्याची पात घालून २-३ मिनिटे परतून घ्यावी. आता त्यात मिक्सरमधून वाटलेली पूड आणि मीठ घालावे. चांगले परतून घ्यावे. आता या मिश्रणात शिजवून मोकळा केलेला भात घालावा. हलक्या हाताने, शिते मोडणार नाहीत याची काळजी घेऊन ढवळावा. बारीक गॅसवर २-३ मिनिटे परतून घ्यावा.

हा झाला कांद्याच्या पातीचा भात तयार! गरमागरम भाताचा आस्वाद घ्यावा. खाताना आवडत असल्यास वरुन २-३ थेंब लिंबू पिळून घ्यावे. ती चवही छान लागते. :)

--शाल्मली.

प्रतिक्रिया

माधुरी दिक्षित's picture

21 May 2009 - 8:20 pm | माधुरी दिक्षित

मस्त दिसतो आहे !!!
वेगळाच प्रकार आहे , करुन बघायला पाहीजे लगेच :)

दवबिन्दु's picture

21 May 2009 - 8:24 pm | दवबिन्दु

काजू मस्त दिस्तोय. आईला कराय्ला सन्गित्ला पाहीजे.
___________________________

देखो तो ख़ुदाई भी छोटी सी चीज़ है।
सोचो तो साँस लेना भी हैरत की बात है॥

चिरोटा's picture

21 May 2009 - 8:26 pm | चिरोटा

दिसते आहे पाक्रु.पण कांद्याच्या पातिची चव जाणवते का खाताना?म्हणजे काही पुलावात पण कांद्याची पात घालतात पण तेवढी चव जाणवत नाही.
भेन्डि
क्ष्^न + य्^न = झ्^न

बिपिन कार्यकर्ते's picture

21 May 2009 - 8:36 pm | बिपिन कार्यकर्ते

अऽऽऽऽऽऽऽऽऽऽऽऽऽऽऽब्ब!!!! नुसत्या दशनानेच भरलं ब्वॉ पोट!!! छानच होता. :D

बिपिन कार्यकर्ते

प्राजु's picture

21 May 2009 - 8:38 pm | प्राजु

झक्क्क्क्काऽऽऽस!!!!!!!!
सॉल्लिड आहे रेसिपी!! :)
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/

मदनबाण's picture

21 May 2009 - 8:59 pm | मदनबाण

कांद्याच्या पातीची पीठ पेरुन केलेली भाजी मस्तच लागते,पण तिचा बरोबर भात पण करता येतो हे माहित नव्हते !!!
एक वेगळीच पाकृ... :)

(खादाड)
मदनबाण.....

I Was Born Intelligent,But Education Ruined Me.
Mark Twain.

शाल्मली's picture

21 May 2009 - 10:01 pm | शाल्मली

प्रतिसादाबद्दल आभारी आहे.
कांद्याच्या पातीची पीठ पेरुन भाजी तर छानच लागते. तसंच मागे मी इथेच कांद्याच्या पातीची कोशिंबीर सुद्धा दिली होती.
ती पण एकदम झकास लागते. :)

--शाल्मली.

रेवती's picture

21 May 2009 - 10:13 pm | रेवती

फारच वेगळ्या प्रकारचा भात आहे.
नक्की करून पाहीन. मागल्या वेळेस तू दिलेली कोशिंबीर तर आमच्याकडे अठवड्यातून एकदा केली जातेच.
यावेळेस जरा दहा एक दिवस झाले नाही केली तर लग्गेच फर्माईश आलीच. आज कोशिंबीर करतीये.
या विकांताला हा भात करणारच.
(असे कातिल फोटू देवून आम्हाला जळवू नये हे सांगावं का शाल्मलीला?)

रेवती

विसोबा खेचर's picture

21 May 2009 - 11:28 pm | विसोबा खेचर

सुरेख फोटू, सुरेख पाकृ..

शाल्मलीभाभींचा विजय असो.. :)

तात्या.

शितल's picture

21 May 2009 - 11:32 pm | शितल

शाल्मली ताई,
सुंदर पाककृती साठी धन्यवाद. नक्की करून बघेन. :)

समिधा's picture

21 May 2009 - 11:35 pm | समिधा

मी पण नक्की करुन बघेन. खुपच छान फोटो आला आहे.

समिधा
(चांगल्या मैत्री सारखे सुंदर दुसरे काही नाही.)

सहज's picture

22 May 2009 - 7:25 am | सहज

मस्तच दिसतोय, करुन पाहीलच पाहीजे!

मराठमोळा's picture

22 May 2009 - 9:26 am | मराठमोळा

हा भात मी चाखला आहे. गरम गरम तर खुप छान लागतो. काजु घालण्याची कल्पना तेवढी नविन आहे.
काही हॉटेल्समधे एग फ्राईड राईस मधे कांद्याची पात घालण्याची पद्धत आहे. तो सुद्धा एक मस्त प्रकार. :)

आपला मराठमोळा.
कोणत्याही गोष्टीचा ताप येईपर्यंत ठीक असते, पण तिचा कर्करोग होऊ देऊ नये!!

स्मिता श्रीपाद's picture

22 May 2009 - 11:43 am | स्मिता श्रीपाद

आज फारा दिवसांनी पाकॄ दिलिस....त्याबद्दल आधी निषेध... :P

आणि इतकी मस्त पाकॄ दिलिस त्याबद्दल धन्यु :-)

नक्की करुन बघेन :-)

-स्मिता

स्वाती दिनेश's picture

22 May 2009 - 12:16 pm | स्वाती दिनेश

मस्त दिसतो आहे भात,:)
स्वाती

वेताळ's picture

22 May 2009 - 12:33 pm | वेताळ

साधी सुटसुटीत पाकृ आहे. सदर पाकृ व्हेज फ्राईड राईस ची वाटते का?
खविस,हडळ,मुंजा,गोस्ट,डेव्हिल,वेताळ

शाल्मली's picture

22 May 2009 - 3:18 pm | शाल्मली

प्रतिसादाबद्दल आभार!

सदर पाकृ व्हेज फ्राईड राईस ची वाटते का?

नाही नाही.. दोन्ही प्रकारांमधे फरक आहे. या भातासाठी हरभरा डाळ, उडीद डाळ वापरली आहे. ती फ्राईड राईसमधे नाही आणि फ्राईड राईसमधे वापरत असलेल्या इतर भाज्या या भातात नाहीत.
तुमच्या माहितीसाठी फ्राईड राईसची पाकृ. स्वातीताईने इथे दिली होती. :)

--शाल्मली.

चन्द्रशेखर गोखले's picture

24 May 2009 - 10:59 am | चन्द्रशेखर गोखले

सर्व डाळी भिजवलेल्या कि कश्या ? बाकी रेसिपी मस्त ! सोपी आहे ..!

क्रान्ति's picture

22 May 2009 - 8:30 pm | क्रान्ति

<:P
रविवारी नवं काय हा प्रश्न सोडवला शाल्मलीनं! मस्त पाकृ आणि फोटोही खास!
अवांतर :- मला शाल्मली हा शब्द आणि नाव खूप खूप आवडतं. उन्हाळ्यात शाल्मलीचं फुलांनी आणि फक्त फुलांनीच लगडलेलं झाड किती सुरेख दिसतं! :)

क्रान्ति
***मन मृदु नवनीत | मन अभेद्य कातळ
मन भरली घागर | मन रिकामी ओंजळ***
अग्निसखा

सँडी's picture

23 May 2009 - 7:56 am | सँडी

फोटु जबरा!

लवंगी's picture

23 May 2009 - 10:15 pm | लवंगी

खूप छान झाला. मी फोडणिला हिरवी मिरची वापरली होती.

रेवती's picture

24 May 2009 - 6:22 am | रेवती

आज केला होता हा भात!
छानच झाला होता.
मला लिंबू पिळून जास्त आवडला.
धन्यवाद!

रेवती

सहज's picture

24 May 2009 - 6:38 am | सहज

करुन पाहीला. छान झाला होता.

शाल्मली's picture

25 May 2009 - 2:24 pm | शाल्मली

आपल्या सर्वांच्या प्रतिसादासाठी सर्व खवय्यांचे मनापासून आभार!
:)

--शाल्मली.

श्रीयुत संतोष जोशी's picture

26 May 2009 - 9:54 am | श्रीयुत संतोष जोशी

एकदम वेगळी आहे ही पाकृ.
फारच छान.

हे राज्यं व्हावे ये तो श्रींची इच्छा.