लोचट संपादकीय

नील_गंधार's picture
नील_गंधार in काथ्याकूट
18 May 2009 - 2:48 pm
गाभा: 

मंडळी,
आजच्या लोकसत्तेतले संपादकीय वाचले.
संपादक महोदयांनी तोडलेले अकलेचे तारे फारच महान आहेत.
हे एखाद्या व्रूत्तपत्राचे संपादकीय आहे कि प़क्षाचे हेच कळत नाहि.

http://www.loksatta.com/daily/20090518/edt.htm

प्रतिक्रिया

चिरोटा's picture

18 May 2009 - 2:54 pm | चिरोटा

लोकसत्ताचे अग्रलेख म्हणावे तेवढे अपक्षपाती नसतात हे खरे पण वरील संपादकियात लोचट/अकलेचे तारे तोडले आहेत असे काही दिसत नाही.
भेन्डि
क्ष्^न + य्^न = झ्^न

प्रशु's picture

18 May 2009 - 2:56 pm | प्रशु

सुपारी संपादक असणार. दुसरा काय?

हेच लोक कारणीभूत आहेत कॉग्रेस परत येण्याला.....

भडकमकर मास्तर's picture

18 May 2009 - 2:58 pm | भडकमकर मास्तर

आधीचे सगळे नेहमीचेच आहे हो...
पण...
अहो शेवटी महाराष्ट्राची कॉम्ग्रेसने दहा वर्षे वाट लावली असे काहीसे लिहिले आहे .... :$
मी आश्चर्यचकित झालो...

_____________________________
आवाज खालच्या सप्तकात बोलायला हवा असेल तर खर्जाचा रियाज करा.... ;)

नीलराव, हे तर काहीच नाही. कालच्या अग्रलेखातली ही वाक्ये पहा -
अर्जुनसिंगांपासून ते मोतीलाल व्होरांपर्यंत पक्षात आणि लालू, पवार, पास्वान यासारख्यांकडून यूपीएत सोनियांना जो 'घेराओ' पडला होता, त्यामुळे त्यांचे हात-पाय बरेच आक्रसले होते. सरकार, पक्ष आणि आघाडी या तिन्ही पातळ्यांवरती संघर्ष करताना त्यांची होणारी कुचंबणा गेली काही वर्षे त्यांच्या चेहऱ्यावरही दिसू लागली होती. आज कित्येक महिन्यानंतर पत्रकार परिषदेत त्या दिलखुलास हसताना दिसल्या.

यापूर्वी एका अग्रलेखात, काँग्रेसच्या राज्यसभा उमेदवारांची यादी राष्ट्रवादीच्या खूप नंतर जाहीर का झाली याची कारणे देताना - राष्ट्रवादी काँग्रेस हा प्रादेशिक पक्ष आहे. एकच भाषा सर्वांना समजते, पण काँग्रेसच्या मराठी खासदारांचं भ्रष्ट हिंदी सोनियाजींना समजायला कठीण जातं आणि त्यामुळे त्यांना निर्णय घ्यायला वेळ लागतो, असे तारे तोडले होते. क्रिकेटविषयक एका अग्रलेखातही क्रिकेट संघटना - पवार - काँग्रेस - सोनियाजी अशी कसरत त्यांनी करून दाखवली होती.

असो, लवकरच महाराष्ट्रातून राज्यसभेच्या काही रिकाम्या जागा काँग्रेसला भराव्या लागतील. त्यासाठी 'राजापेक्षाही राजनिष्ठ' असल्याचे दाखवण्याची ही धडपड म्हणावी काय?

नंदनमराठी साहित्यविषयक अनुदिनी

प्रमोद देव's picture

18 May 2009 - 7:02 pm | प्रमोद देव

असो, लवकरच महाराष्ट्रातून राज्यसभेच्या काही रिकाम्या जागा काँग्रेसला भराव्या लागतील. त्यासाठी 'राजापेक्षाही राजनिष्ठ' असल्याचे दाखवण्याची ही धडपड म्हणावी काय?

भारतकुमार राऊत शिवसेनेतर्फे गेले राज्यसभेवर...तर मी का नको?(भला मेरी कमीजसे इसकी कमीज सफेद कैसी...च्या चालीवर)
म्हणून गेली काही वर्षे हे सोनिया गुणगान सुरु आहे.

हाती नाही येणे,हाती नाही जाणे,हसत जगावे,हसत मरावे, हे तर माझे गाणे!

बिपिन कार्यकर्ते's picture

18 May 2009 - 3:24 pm | बिपिन कार्यकर्ते

सहमत.

बिपिन कार्यकर्ते

ऋषिकेश's picture

18 May 2009 - 3:26 pm | ऋषिकेश

केतकरांचे अग्रलेख गमतीशीर, हास्यास्पद, करमणूकप्रधान, क्वचितप्रसंगी लाळघोटे असतात हे जगजाहिरच आहे

मात्र आजचा अग्रलेख तसा वाटला नाहि.

ऋषिकेश
------------------
प्रेमात पडण्यासाठी गुरुत्वाकर्षणाची काय आवश्यकता? ;)

मैत्र's picture

18 May 2009 - 3:45 pm | मैत्र

काँग्रेसचा इतिहास, मूल्ये, स्वातंत्र्यचळवळीच्या परंपरा, सोनिया गांधींचा त्याग, राहुलची धडपड आणि डॉ. मनमोहनसिंग यांचे चारित्र्य व अर्थज्ञान यापैकी कशाचीही या काँग्रेसमधील बहुतेक स्वयंभू दिग्गजांना चाड नाही.

राहुल गांधी यांचे काँग्रेसला पुन्हा लोकजीवनात रुजविण्याचे कार्य या गोष्टींच्या बाजूने मतदान केले आहे.

विसोबा खेचर's picture

18 May 2009 - 4:20 pm | विसोबा खेचर

आमचा कुमार सोनियावर पहिल्यापासूनच लट्टू आहे! :)

तात्या.

अविनाशकुलकर्णी's picture

18 May 2009 - 7:43 pm | अविनाशकुलकर्णी

अतिशय योग्य असे लिहिले आहे अग्र लेखात..निट विचार केल्यावर पटेल..जात/मंडल आयोग/राममंदिर..ह्या सा~यानि वाट लागली भारताचि

सत्य तेच कथन केले आहे. बाकी सोनियाने पंप्र पद का नाकारले हे एक गुपीतच राहणार आहे.
खविस,हडळ,मुंजा,गोस्ट,डेव्हिल,वेताळ

विकास's picture

18 May 2009 - 9:55 pm | विकास

काँग्रेसमधील ढुढ्ढाचार्याना नावे ठेवण्याआधी म्हणून आधी भरपूर नावे समाजवाद्यांपासून हिंदूत्ववाद्यांपर्यंत ठेवली आहेत आणि मधे सोनीयाजींचे कौतुक केले आहे, असे जरासे सायकोऍनॅलीसिस करावेसे वाटले :-) (उद्या मॅडमना वाटले पाहिजे की स्वतंत्र बाण्याचे पत्रकार आहेत, राज्यसभेसाठी एकदम योग्य! ;) )

१. स्टॉक मार्केटच्या चढउतारांना मोदीला जबाबदार ठरवणे. कुठलाही पुरावा नसताना. मागे असेच किरीट सोमय्यावर खापर फोडले होते. नंतर दाती तृण धरून माफी मागावी लागली होती. केतकरांच्या मनाविरुद्ध शेअरबाजारात काही घडले की सरळ भाजपा वा मोदी वा सोमय्यावर शिवीगाळ. कुठलाही पुरावा नसताना असे तारे तोडणे हे प्रगल्भतेचे लक्षण आहे का? कॉंग्रेसचे समर्थक शेअरबाजारात उलाढाल करत नाहीत का?
२. मोदींवर दुगाण्या झाडताना हे सोयिस्करपणे विसरणे की तिथल्या जनतेने पुन्हा जोरदार मतांनी मोदी सरकारलाच पाठिंबा दिलेला आहे.
३. उठताबसता गुजराथ दंगलींचा उल्लेख करतात पण इंदिरा गांधीला मारल्यावर ज्या शिखांच्या कत्तली झाल्या आणि त्याचे काँग्रेसने समर्थन केले त्याविषयी एकदम चूप!
४. सोनियाचा त्याग, राहुलची धडपड वगैरे गुणगान करताना हे सोयिस्करपणे विसरतात ही मंडळी तलागाळातून वर आलेली नाहीत. गांधी घराण्याचे पॅराशूट वापरून थेट शिखरावर उतरलेली मंडळी आहेत.
५. मोदी आणि भाजपाला धर्मांध ठरवणारे हे शहाणे कॉग्रेसच्या हातून घडलेली शिखांची कत्तल, शीखांचा अतिरेकीपणा, कश्मिरचा प्रश्न जो काँग्रेसनेच निर्माण केला आणि चिघळवला, शाह्बानो प्रकरण ज्यामुळे धर्मांध मुस्लिमांचे लांगूलचालन झाले, अयोध्येचा देवळातले कुलूप काढून हिंदूंना प्रवेश देण्याचे राजीव गांधींचे कृत्य याविषयी सोयिस्कर मौन बाळगले आहे.

एखाद्या कुत्र्याप्रमाणे मालकाचे पाय चाटणे आणि मालकाला न आवडणार्‍या लोकांवर भुंकणे, गुरगुरणे, दात विचकणे असे कर्तव्य हा माणूस निष्ठेने करत आहे.

विकास's picture

18 May 2009 - 11:34 pm | विकास

सकाळचे संपादकीय - वास्तवीक ते भाजपच्या बाजूने नसूनही समतोल वाटले.

यन्ना _रास्कला's picture

19 May 2009 - 8:32 pm | यन्ना _रास्कला

घाबरत घाबरत क्लीक केल आनी वाटल मुद्रनसुलब आव्रुतीला पोचतो कि काय आपन :( कोन हाय इत मायीचा लाल जो आसल्या इशयावर बिन्दास्त लिवतो. :O पन इशय त वायलाच निंगाला. :)

(इनोद हाये. हाशा घ्यावा) :P

कुट राव ते भिकारड प्येपर घ्येता. वटमधी संद्यानंद घ्यावा. सकाली घ्यायचा वाचायचा इसरुन जायच, दुस्र्या दिवशीला त्योच पेपर उगवतीला लहान पोराच्या ढु***खाली सारायचा.

*/*\*/*\/*\*/*\*/*\*/*\*/*\*/*\*/*\*/*\*/*\*/*
आनि डोळ्याइतक्याच जड आवाजात त्यान पहिला पोलीसी सवाल केला, डायवर कोन हाय !

jaydip.kulkarni's picture

9 Feb 2011 - 8:39 pm | jaydip.kulkarni

सकाळ पण तितकासा भरवशाचा राहिलेला नाही ..... परवाचा पवार वि.पत्रकार सामना नीट प्रक्षेपित केला गेला नाही ..... असे जाणून बुजून केल्यासारखे वाटले .........

निनाद मुक्काम पोस्ट जर्मनी's picture

9 Feb 2011 - 9:45 pm | निनाद मुक्काम प...

सध्याच्या काळात लाखो करोडोचे घोटाळे उघडकीस येत आहे .अश्यावेळी
पेड न्यूज सरकारला वाचवू शकतात .
त्यामुळे सत्ताधारी त्यांना शक्य आहे ते उपाय करत आहेत .
बाकी हा लेख सध्याच्या केंद्रातील सरकारच्या स्थितीच्या पार्श्व भूमीवर एक उत्कृष्ट विडंबन ठरला आहे .
उगाच नाही .जर्मन शिकून झाले कि अजून एक युरोपियन भाषा शिकणार आहे मी .