लाल झेंडा अमर रहे !!

विंजिनेर's picture
विंजिनेर in काथ्याकूट
16 May 2009 - 8:33 pm
गाभा: 

आमचे आशास्थान:

कॉ. बंधू आणि भगिनींनो,
आपल्या पूजनीय आणि "आदर्श" लाल झेंड्याचा लोकसभा निवडणूकांत सपाटून पराभव झालेला आहे.
स्थिती इतकी वाईट आहे की देशाचे आशास्थान सोडाच पण ह्या निवडणूकांत झालेल्या या पानिपतातली लक्तरे कुठल्या वेशीवर टांगायची हा प्रश्न "साध्या राहणीच्या" प्रकाशजी करत यांना पडला आहे.
प. बंगालसारख्या अभेद्य समजल्या जाणार्‍या बालेकिल्ल्यात सुद्धा स्थिती इतकी दयनीय आहे की कम्युनिस्ट पक्षाला "राष्ट्रीय पक्ष" म्हणून दर्जा गमवावा लागेल असे दिसतेय.
असा सर्व कडे आनंदी आनंद असताना मिपाकर कम्युनिस्ट झोपी गेले आहेत की आदर्श (कम्युनिस्ट)भारतातली सत्तेतील दिवा स्वप्ने पाहण्यात गुंग आहेत? ;)
असो. पण तरीही ह्यांच्या अनुपस्थितीत इतर आपण मिपाकर ह्या निमित्ताने लाल झेंडा "अमर रहे" चा घोष करूयात!!
आपलं काय म्हणणं आहे यावर?

प्रतिक्रिया

इनोबा म्हणे's picture

16 May 2009 - 8:40 pm | इनोबा म्हणे

"सुंभ जळाला तरी पीळ सुटत नाही" किंवा "गिरे तो भी ** उपर" म्हणतात ना, तसेच आहे या लाल्यांचे. त्यामुळे आपण यांना "तुमचीच लाल" म्हणायचे आणि गप बसायचे. हे लोक काही पराभव मान्य करणार नाहीत.

ब्रिटिश टिंग्या's picture

16 May 2009 - 8:52 pm | ब्रिटिश टिंग्या

अरे हे लोकं तर सरकार स्थापनेची स्वप्न बघत होते ना?
क्या हुआ?

प्रमोद देव's picture

16 May 2009 - 8:58 pm | प्रमोद देव

स्वप्नं पाहण्याची प्रत्येकालाच सवय असते त्यात 'डावे-उजवे' करून कसे चालेल. स्वप्नं पाहण्या व्यतिरिक्त ते करू तरी काय शकतात म्हणा?
आता ते पुढच्या निवडणुकीच्या स्वप्नरंजनात दंग झाले असतील. ;)
राहू द्या त्यांना त्यांच्याच कोषात.

हाती नाही येणे,हाती नाही जाणे,हसत जगावे,हसत मरावे, हे तर माझे गाणे!

क्लिंटन's picture

16 May 2009 - 9:46 pm | क्लिंटन

थोड्या वेळापूर्वी NDTV वर पराभवाची कबुली आणि कारणे देताना सीताराम येचुरींचा चेहरा रडवेला झाल्यासारखा वाटला.अर्थात डाव्या पक्षांचा ३२ वर्षात झालेल्या सर्वात मोठ्या पराभवामुळे मला अत्यंत आनंद झाला आहे आणि येचुरींविषयी जराही सहानुभूती मला नाही.असेच तडाखे २०११ च्या पश्चिम बंगाल आणि केरळ विधानसभा निवडणुकीत त्यांना बसावेत आणि त्यांच्या अशा पराभवांची मालिका त्यापुढील ३-४ निवडणुका चालू राहावी. डायनासोर केवळ पुस्तकात दिसतात तसेच हे लालभाई फक्त पुस्तकात दिसावेत ही सदिच्छा.

स्वामी विवेकानंद आणि राजा राममोहन रॉय यांच्या बंगालने शेवटी या ढोंगी लोकांना गाडण्यास सुरवात केली असे दिसते आणि त्याबद्दल त्यांचे हार्दिक अभिनंदन.

**************************************************************
विल्यम जेफरसन क्लिंटन

माझी मराठी अनुदिनी
माझी इंग्रजी अनुदिनी

**************************************************************

इनोबा म्हणे's picture

16 May 2009 - 9:56 pm | इनोबा म्हणे

आमेन

नितिन थत्ते's picture

16 May 2009 - 10:03 pm | नितिन थत्ते

१९८४ भाजप - २ जागा
१९८९ भाजप - ८५ जागा
हे लक्षात ठेवून डाव्यांच्या पराभवामुळे हरखून जायचे कारण नाही.

दुसरे म्हणजे डाव्यांचा पराभव करून ममता बॅनर्जी निवडून आल्या आहेत.
त्यांचे उद्योगविषयक धोरण काय हे तर आपण सारेच जाणतो.
हे फक्त बंगाल विषयी
केरळमध्ये नेहमी दर निवडणुकीत आलटून पालटून काँग्रेस आघाडी आणि डावी आघाडी निवडून येतात. त्यामुळे तिथल्या डाव्यांच्या पराभवाचे विशेष काही नाही.

एक चांगली गोष्ट म्हणजे ३०-४० खासदारांच्या जोरावर पंतप्रधान बनण्याची स्वप्ने बनणार्‍या सर्वांची (पवार, मुलायम, लालू, मायावती) बोलती बंद झाली.

खराटा
(रंग माझा वेगळा)

क्लिंटन's picture

16 May 2009 - 10:35 pm | क्लिंटन

हे लक्षात ठेवून डाव्यांच्या पराभवामुळे हरखून जायचे कारण नाही.

हो ही ऐतिहासिक संधी मिळाली आहे.ती अति आत्मविश्वासात जाऊन वाया घालवणे योग्य नाही.ममता बॅनर्जी आणि काँग्रेसने यापुढे पावले काळजीपूर्वक उचलून २०११ मध्ये कम्युनिस्टांना हद्दपार केले तर चांगलेच होईल.नाहीतर ही संधी व्यर्थ दवडली तर अशी संधी परत मिळणार नाही.

त्यांचे उद्योगविषयक धोरण काय हे तर आपण सारेच जाणतो.

अनेकदा विरोधी पक्षात असताना एक धोरण आणि सत्तेत आल्यावर वेगळे असे चित्र दिसते.एनरॉनला अरबी समुद्रात बुडवायला गेलेल्यांनीच नंतर काय केले हा इतिहास फार जुना नाही.ममता बॅनर्जीपण आपले धोरण सत्तेत आल्यावर बदलतील आणि राज्याचे इतकी वर्षे रखडलेले औद्योगिकीकरण घडवून आणतील अशी आशा करू या.

केरळमध्ये नेहमी दर निवडणुकीत आलटून पालटून काँग्रेस आघाडी आणि डावी आघाडी निवडून येतात. त्यामुळे तिथल्या डाव्यांच्या पराभवाचे विशेष काही नाही.

हे मात्र बाकी खरेच.

**************************************************************
विल्यम जेफरसन क्लिंटन

माझी मराठी अनुदिनी
माझी इंग्रजी अनुदिनी

**************************************************************

विकि's picture

17 May 2009 - 12:48 am | विकि

काहीही लिहू नका.तुमच्या बोलण्याने कम्युनिस्ट संपणार नाहीत ती एक विचारधारा आहे.
ज्या ममता चे तुम्ही गुणगाण गात आहेत केवळ तिच्याचमुळे नॅनो बंगालमधून अन्यत्र गेली हे लक्षात घ्या .सिंगूर प्रकरण मुळात या ममता बाईनींच घडवले.

विकास's picture

17 May 2009 - 1:29 am | विकास

....कम्युनिस्ट संपणार नाहीत ती एक विचारधारा आहे...ज्या ममता चे तुम्ही गुणगाण गात आहेत केवळ तिच्याचमुळे नॅनो बंगालमधून अन्यत्र गेली हे लक्षात घ्या .सिंगूर प्रकरण मुळात या ममता बाईनींच घडवले...

मला एक कळत नाही, ह्या विचारधारेस (ज्यात खाजगी उद्योग मान्य नसतात) त्या विचारधारा मानणार्‍या पक्षाला शेतकर्‍यांची जमीन घेऊन एका भांडवलशहाला कशी द्याविशी वाटली? :-) बरं दिली ती दिली, आपण म्हणूया स्वार्थी सत्ताधार्‍यांनी दिली... तर मग तुमच्या सारख्या हाडाच्या साम्यवाद्याने वास्तवीक ममता बॅनर्जीचे आभारच मानले पाहीजेत की त्यांच्यामुळे प. बंगालमधून एक भांडवलशहा / खाजगी उद्योग सीमेवरून परत गेला".

llपुण्याचे पेशवेll's picture

17 May 2009 - 3:01 am | llपुण्याचे पेशवेll

विकीशेठ, सिंगूर आणि इतर ठीकाणी शेतकर्‍यांवर लाठीमार, गोळीबार काही ममताबाइंनी घडवला नाही. तो कमुनिष्ठ सरकारनेच घडवला. नॅनो प्रकल्पासाठी जबरदस्तीने भूसंपादन केले गेले असेल तर त्याला हिंसक प्रतिक्रिया येणारच. त्यावर ममताबाईनी आपली पोळी भाजली इतकेच. ज्या ज्या ठीकाणी असे सक्तीचे भूसंपादन होईल तिथे तिथे तसे घडेलच (जसे सिंगूरमधे घडले तसे). उदा. नवी मुंबई जवळचा सेझ. त्यामुळे कमुनिष्ठांचा पराभव ही त्यांचीच करणी आहे.

>>काहीही लिहू नका.तुमच्या बोलण्याने कम्युनिस्ट संपणार नाहीत ती एक विचारधारा आहे.
असे म्हणता म्हणताच रशियाचं बिभाजन झाले.

पुण्याचे पेशवे
एरवी सगळे कागद सारखेच. फक्त कागदाला अहंकार चिकटला की त्याचे सर्टीफिकेट होते.
Since 1984

विंजिनेर's picture

17 May 2009 - 7:13 am | विंजिनेर

काहीही लिहू नका.तुमच्या बोलण्याने कम्युनिस्ट संपणार नाहीत ती एक विचारधारा आहे.

अरे वा! काही दिवसापूर्वी "देशाचे आशास्थान" असे सत्तालोलूप दावा ह्याच मिपा व्यासपीठावरून करणारे कम्युनिस्ट आता केवळ "विचारधारा" म्हणून जगू इच्छितात हे हास्यास्पद आहे :)
मात्र क्लिंटन ह्यांनी सांगितल्याप्रमाणे गाफिल राहून चालणार नाही. जोपर्यंत हा पक्ष निवडणूकीतून पुस्तकात जाऊन बसत नाही तोपर्यंत इतरांना स्वस्थ बसून चालणार नाही...

----
कळप-मनोवृत्तीचा सूक्ष्म अभ्यास करण्यात आम्ही गढलेलो असल्यामुळे कंपूबाजी करायला आमच्याकडे वेळ नाही

विकि's picture

17 May 2009 - 7:58 pm | विकि

सिंगूर-नंदीग्राम येथे नक्षलवादी आणि तृणमुल कॉंग्रेस यांच्या कार्यकर्त्यांनी हिंसा घडवली. त्यांचे काम फक्त कम्युनिस्टांना बदनाम करणे एवढेच होते. नंतरच्या अनेक वृतपत्रात याबाबत खुलासा केला गेला आहे.

विकास's picture

17 May 2009 - 10:29 pm | विकास

>>>सिंगूर-नंदीग्राम येथे नक्षलवादी आणि तृणमुल कॉंग्रेस यांच्या कार्यकर्त्यांनी हिंसा घडवली. त्यांचे काम फक्त कम्युनिस्टांना बदनाम करणे एवढेच होते. नंतरच्या अनेक वृतपत्रात याबाबत खुलासा केला गेला आहे.<<<

नक्षलवादी म्हणजे कोण रे भाऊ? माझे अल्पज्ञान सांगते ते कम्युनिस्टांनीच तयार केलेले कम्युनिस्टबंधूच आहेत म्हणून. आमच्या पुराणात एक भस्मासुराची गोष्ट आहे, त्याचीच आठवण झाली :-) बाकी या अधुनिक भस्मासुराचे कौतुक अनेक कम्युनिस्ट आजही करतात. उ.दा. तुम्हाला डॉ. कॉ. संदीप पांडे माहीत आहे का? ते तर एकीकडे समाजसेवा करत दुसरीकडे नक्षलवाद्यांच्या स्मारकाच्या उद्घाटनास मानाने हजर होते. असो, whatever goes around...

विकि's picture

16 May 2009 - 11:02 pm | विकि

असे लिहायची मिपावर गरज नव्हती.आणि जय-पराजय निवडणुकीत होतच असतात,याचा अर्थ डावे संपले असा होत नाही हे लिहीणार्‍याने समजावे.
डाव्या पक्षाची विचारधारा लोकांपर्यंत पोहोचविण्यात किती कष्ट पडतात ते पक्षाचे काम करणारेच जाणोत इथे मिपावर लिहुन वा डाव्यांना डिवचून लिहिणे फार सोपे आहे त्यासाठी प्रत्यक्ष काम करावे लागते मगच त्या विचारसरणीचे महत्व कळते.
मुळात माकप(भारताचा) पक्षाचे काम अन्य पक्षांप्रमाणे चालत नाही हे ही समजून घ्या.

>>मुळात माकप(भारताचा) पक्षाचे काम अन्य पक्षांप्रमाणे चालत नाही हे ही समजून घ्या.>>

माकपच्या इतर देशात शाखा आहेत का? माकप चिनकडून हुकूम घेतो हे खरे आहे का? (>>पक्षाचे काम अन्य पक्षांप्रमाणे चालत नाही>> यावरून आणि एकलेल्या गोष्टी॑वरून विचारते आहे.)

अनिता. ( नोकरी करून भा॑डवल जमवणारी सामान्य भा॑डवलदार :) )

एरवी सगळे कामगार सारखेच. फक्त कामगाराला अहंकार चिकटला की तो क्म्युनिस्ट होतो. (..पुपे कडून उधार)

विंजिनेर's picture

17 May 2009 - 7:38 am | विंजिनेर

आणि जय-पराजय निवडणुकीत होतच असतात,याचा अर्थ डावे संपले असा होत नाही हे लिहीणार्‍याने समजावे.

एकदम क्रिकेटस्टाईल खिलाडू वृत्ती कुठून आली बुवा...

डाव्या पक्षाची विचारधारा लोकांपर्यंत पोहोचविण्यात किती कष्ट पडतात ते पक्षाचे काम करणारेच जाणोत इथे मिपावर लिहुन वा डाव्यांना डिवचून लिहिणे फार सोपे आहे त्यासाठी प्रत्यक्ष काम करावे लागते मगच त्या विचारसरणीचे महत्व कळते.

छ्या!! मला वाटत होते की आत्तापर्यंत लोकांमधे माकपचे विचार आणि काम पोहोचले असेल(लोकांनी तुम्हाला मत द्यावे असे वाटत असेल तर त्यांच्यापर्यंत तुमच्या कामा/विचारधारेची माहिती थोडीतरी पोहोचवणे आवश्यक असावे)! पण तसे काही दिसत नाही!

----
कळप-मनोवृत्तीचा सूक्ष्म अभ्यास करण्यात आम्ही गढलेलो असल्यामुळे कंपूबाजी करायला आमच्याकडे वेळ नाही

विकि's picture

17 May 2009 - 8:13 pm | विकि

छ्या!! मला वाटत होते की आत्तापर्यंत लोकांमधे माकपचे विचार आणि काम पोहोचले असेल
तुला वाटले होते म्हणजे याचाच अर्थ तुला माकप बद्दल काहीही माहीत नाही हे स्पष्ट होत आहे. तुझा हेतू फक्त कम्युनिस्टांची खिल्ली उडविणे हा होता आधी पक्षाच्या कामकाजाबद्दल माहीती करून घे मग बोल हा!

अनंता's picture

17 May 2009 - 9:25 am | अनंता

रायगड जिल्ह्यात (एकेकाळच्या कम्युनिस्ट विचारसरणीच्या) शेतकरी कामगार पक्षाने बदलत्या काळाची पावले ओळखून वेळीच शिवसेनेला पाठींबा दिला; इतकेच नव्हे तर दोन्ही जागा (रायगड व मावळ)निवडून आणण्यात मोलाची भूमिका बजावली. विकि, तुम्हाला पटो न पटो, कम्युनिस्ट विचारसरणी अस्तंगत होत आहे हे नक्की. कोंबडं कितीही झाकून ठेवलं तरी सूर्य उगवायचा काही राहत नाही. :)

वजन कमी करायचा सल्ला हवाय? - चालते व्हा!!

विकि's picture

17 May 2009 - 8:02 pm | विकि

तुला माहीत नसेल की शेकाप चे उद्दीष्ट अंतुले संपवणे हे होते त्याबदल्यात त्यांना शिवसेनेने विधानसभा निवडणुकीत मदत करावी हा हेतूही होता. याच शेकाप शरद पवारांना माढ्यात पाठींबा दिला होता.शेकाप डावी विचारसरणि विसरला आहे.

llपुण्याचे पेशवेll's picture

18 May 2009 - 4:09 am | llपुण्याचे पेशवेll

>>शेकाप डावी विचारसरणि विसरला आहे.
म्हणूनच कदाचित शेकाप न्याय्य भूमिका घेण्यास सक्षम झाला आहे....
पुण्याचे पेशवे
एरवी सगळे कागद सारखेच. फक्त कागदाला अहंकार चिकटला की त्याचे सर्टीफिकेट होते.
Since 1984

वेताळ's picture

17 May 2009 - 10:19 am | वेताळ

डावी विचारधारा व पहिल्याधारेची दोन्ही ही माल कडकच आहे. एकदा घेतला की तुम्ही सगळे विसरुनच जाता. आता तरी शुध्दीत या राव.सोमनाथ सारखा कट्टर कम्युनिस्ट तुमच्या मुर्खाच्या नंदनवनात परत यायला तयार नाही त्यावरुन तरी लक्षात घ्या.जगातील कम्युनिस्ट हे फक्त स्वप्ने बघतात व दुसर्‍यांना दाखवतात. वास्तवात मात्र त्याना काहीच यश मिळत नाही.जगात सर्वत्र फोल ठरलेली ही एक विचारसरणी आहे.आज कम्युनिस्ट जो काही प्रभाव टिकवुन आहेत तो फक्त बंदुकीच्या जोरावर. लोकांच्या मनात तुमच्या बद्दल जरादेखिल प्रेम नाही आहे. बंगाल मध्ये आता तुम्ही भुईसपाट होणार हे नक्की.
चीन देखिल रशियाच्या वाटेवर येत्या ५-६ वर्षात जाणार हे नक्की आहे.
खविस,हडळ,मुंजा,गोस्ट,डेव्हिल,वेताळ

स्वामि's picture

16 May 2009 - 11:08 pm | स्वामि

आपल्या पराभवचे समर्थन करताना सुद्धा 'अत्यंत उजव्या' भा.ज.प.च्या आकडेवारीचा आधार तुम्हाला घ्यावा लागला यातच सारं काही आलं.

नितिन थत्ते's picture

16 May 2009 - 11:44 pm | नितिन थत्ते

पहिले म्हणजे मी कम्युनिस्ट नाही. गांधीवादी काँग्रेससमर्थक आहे. पण कम्युनिस्टांच्या पराभवाचा आनंद मला होत नाही. (त्यांचे उत्पादनसाधनांच्या मालकीविषयीचे मत मला काहीसे मान्य आहे. आणि युरोपीय भांडवलशाहीला सकारात्मक वळण लावण्याचे काम मार्क्सच्या तत्त्वज्ञानाने-कम्युनिझमच्या भीतीने का होईना- झाले आहे असे मला वाटते).

पण भाजप नको असेल तर दुसरी आकडेवारी देतो.

१९८४ - ४००+
१९८९ - १९०+
१९९१ - २२० (सुमारे)
१९९६ - १४० (सुमारे)
१९९८ - तेवढेच
२००४ -१४५
२००९ - २०२

१९९६ मध्ये अनेकांनी काँग्रेसचा मृत्युलेख लिहिला होता.

खराटा
(रंग माझा वेगळा)

टारझन's picture

17 May 2009 - 10:03 am | टारझन

गांधीवादी काँग्रेससमर्थक आहे.

जगदंब जगदंब ,.... कलंत्री साहेब .. तुम्हाला सपोर्टर आला हो ... आता तुम्हाला क्रिज वर एकटंच पळायला लागणार नाही =))

-( मिड लेग ) टारू र्‍होड्स

अनामिका's picture

16 May 2009 - 11:51 pm | अनामिका

ख्रराटा
यांचा मुद्दा मान्य केला आणि त्यांनी दिलेली आकडेवारीचा अभ्यास करता लालबावटा पुन्हा एकदा फिनिक्स पक्षाप्रमाणे राखेतुन भरारी घेत आपले अस्तित्व सिद्ध करणार तर?"
देव करो आणि तो दिवस कधीही न उजाडो
"अनामिका"
जो करी कर्म अहेतु,वेद तयास कळो न कळो रे।
ओळख पटली ज्यास स्वतःची,देव तयास मिळो न मिळो रे।

विसोबा खेचर's picture

16 May 2009 - 11:58 pm | विसोबा खेचर

तूर्तास तरी हारलात ना लेको? मग शांत र्‍हावा की..

शेवटे जो जि वो सिकंदर हा न्याय महत्वाचा!

काय बोलता?

आपला,
तात्याराम येचुरी! :)

नितिन थत्ते's picture

17 May 2009 - 12:05 am | नितिन थत्ते

एकदम बरोबर बोललात तात्या.
पण लोक फारच श्रीखंड खायला लागले म्हणून थोडं वेखंड चाटवलं.

कॉ (प्रकाश) खराट

विकि's picture

17 May 2009 - 12:40 am | विकि

आम्ही शांत च आहोत पण आमच्या विरुध्दच जे मुद्दामहून बोलत आहेत त्यांचे काय?तुमच्या मते जे जिंकले आहेत त्यांच्या बद्दल बोलायला सांगा की मग.

अवलिया's picture

17 May 2009 - 6:28 am | अवलिया

ही चर्चा कशाबद्द्ल चालु आहे ? :?

--अवलिया

नितिन थत्ते's picture

17 May 2009 - 10:09 am | नितिन थत्ते

बंगालमधील जनतेने कम्युनिझम (भांडवलदारांना विरोध वगैरे...) झिडकारला आहे का?
नाही. बंगालमधील जनतेने कम्युनिस्ट असे नाव घेणार्‍या पण प्रत्यक्षात भांडवलशाही धोरणे राबवणार्‍या आणि जनतेला लुटून भांडवलशहांना पायघड्या घालणार्‍या पक्षाला झिडकारले आहे.
आणि कम्युनिझमची तत्त्वे अंमलात आणू पाहणार्‍या पक्षाला स्वीकारले आहे.

म्हणून लाल झेंड्याचा पराभव झाला आहे या भ्रमात राहू नका. (बंगालमधील जनतेने कम्युनिझमलाच स्वीकारले आहे).

>>नॅनो प्रकल्पासाठी जबरदस्तीने भूसंपादन केले गेले असेल तर त्याला हिंसक प्रतिक्रिया येणारच. त्यावर ममताबाईनी आपली पोळी भाजली इतकेच. ज्या ज्या ठीकाणी असे सक्तीचे भूसंपादन होईल तिथे तिथे तसे घडेलच (जसे सिंगूरमधे घडले तसे).
असे आत्ता ममताचे समर्थन करण्यासाठी आपण म्हणत असलो तरी जेव्हा टाटानी तो प्रकल्प बंगालमधून हलवला तेव्हा बंगालचे नुकसान झाले असल्याच्याच टीका सर्वांनी केल्या होत्या. ममताचा आडनुठेपणा वगैरेच त्यावेळी बोलले गेले होते.

खराटा
(रंग माझा वेगळा)

विंजिनेर's picture

17 May 2009 - 10:33 am | विंजिनेर

बंगालमधील जनतेने कम्युनिझम (भांडवलदारांना विरोध वगैरे...) झिडकारला आहे का?
नाही. बंगालमधील जनतेने कम्युनिस्ट असे नाव घेणार्‍या पण प्रत्यक्षात भांडवलशाही धोरणे राबवणार्‍या आणि जनतेला लुटून भांडवलशहांना पायघड्या घालणार्‍या पक्षाला झिडकारले आहे.
आणि कम्युनिझमची तत्त्वे अंमलात आणू पाहणार्‍या पक्षाला स्वीकारले आहे.

आजिबात नाही. मुळात डाव्यांचा पराभव का झाला आणि तो इतका सपाटून का झाला ह्यांची सबळ कारणे कुणाकडेही नाहीत हीच वस्तुस्थिती आहे.
सगळे लालभाई आता "अंदाजपंचे दाहोदरसे" ह्या न्यायाने काही ना काही कारण मीमांसा करतील...

तोवर आता ममता बॅनर्जीला "सुसर बाई तुझी पाठ मऊ" करून कवटाळण्याचा प्रयत्न कशाला करावा?
वर म्हटल्याप्रमाणे, कम्युनिस्ट विचारधारा ही कल्पनेतच चांगली आहे. चीन/क्युबा हे काही(च) अपवाद सोडले तर इतर ठिकाणी तिला घरघरच लागली आहे (रशियाच्या सीमेवर युक्रेनसाखे देश आजकाल लाल तार्‍याला भीकसुद्धा घालत नाहीत).
त्याचेच प्रतिबिंब भारतात आज निवडणूकांमधे उमटले आहे.
---
कळप-मनोवृत्तीचा सूक्ष्म अभ्यास करण्यात आम्ही गढलेलो असल्यामुळे कंपूबाजी करायला आमच्याकडे वेळ नाही

नितिन थत्ते's picture

17 May 2009 - 10:38 am | नितिन थत्ते

अगदी बरोबर.
मी फक्त डाव्या पक्षांचा पराभव आणि ममताचा विजय या दोन घटना एकाच निवडणुकीतून घडल्या असल्याने त्यामागील समान सूत्र काय असू शकेल हे शोधण्याचा प्रयत्न केला.

खराटा
(रंग माझा वेगळा)

आनंदयात्री's picture

17 May 2009 - 3:05 pm | आनंदयात्री

आम्ही तर निवडणुकांचे निकाल पाहुन अंमळ दुखावलो होतो, पण जश्या जश्या डाव्यांच्या दारुण पराभवाच्या बातम्या यायला लागल्या तसे तसे आम्ही रालोआ ला आलेल्या कमी सिटांचे दु:ख्ख विसरुन हर्षभरीत व्हायला लागलो. एक आमदार वाल्या आठवले गटाची बातमी आल्यावर तर आम्हाला स्वर्ग दोन बोटे उरला होता, महाराष्ट्रात तर मायावती हत्ती घेउन आली अन आख्खी आंबेडकरी चळवळ चिरडुन गेली असे म्हणणे वावगे ठरणार नाही.

असो, एकंदरीत स्थिर सरकारमुळे आम्हाला येणारी आर्थिक स्थिरता, परकिय गुंतवणुक आणी नवनविन डोमेन मधिल नवनविन कामे दिसत आहेत. जय हो !!!

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

17 May 2009 - 7:52 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती

आनंदयात्री यांचा प्रतिसाद बराचसा पटला. मला रालोआच्या पराभवाचं काहीही दु:ख झालं नाही, पुलोआ जिंकण्याचं सुखही झालं नाही.

आनंद वाटला तो दोनच गोष्टींचा:
१. चीनचे हे हस्तक केरळात अंतर्गत फुटीमुळेच (बहुदा!) नाकावर आपटले आणि काँग्रेसच्या लाटेत प.बंगालात लाल बावटा खाली आला. एकूणच सोमनाथदांच्या प्रकरणापासून डाव्यांचा राग फारच येत होता, त्यामुळे आनंद झाला ते लोकं तोंडघशी पडलेले पाहून!
एक बंगाली मित्र म्हणतो तसं मात्र नको व्हायला. त्याचं म्हणणं असं, "एकदा तृणमूल काँग्रेस जिंकून येऊ देत विधानसभेत, मग या बंगाल्यांना समजेल त्यांनी काय चूक केली आहे ते! मग पुन्हा एकदा तीस वर्ष कॉम्रेड्स येतील निवडून!"

२. स्थिर सरकार मिळेल. उजवे काय आणि धर्मनिरपेक्ष काय, पॅकिंगच्या आत माल तोच आहे. त्याचं फारसं सुख-दु:ख होत नाही. फक्त स्थिर सरकार मिळालं की अनेक चांगल्या गोष्टी होतील, आनंदयात्रींनी ते थोडक्यात लिहिलं आहेच.

विकि's picture

17 May 2009 - 8:15 pm | विकि

चिनवादी म्हणजे जरा स्पष्ट कर ना,

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

17 May 2009 - 8:45 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती

चिनवादी नव्हे मी कम्युनिस्टांना चीनचे हस्तक म्हटलं आहे. सविस्तर लिहिण्याची गरज वाटत नाही, कारण क्लिंटनने ते दुसर्‍या एका धाग्यात सविस्तर लिहिलं आहेच.
http://www.misalpav.com/node/7652#comment-116825

(या धाग्यावर पान उलटावं लागेल, पहिल्या पानावरचा क्लिंटनचा सध्याचा पहिलाच प्रतिसाद!)

हेरंब's picture

17 May 2009 - 9:32 pm | हेरंब

अहो, हे कम्युनिस्ट म्हणजे कोल्हे आहेत, हे जर कधीकाळी सत्तेवर आले तर सगळ्यांनाच उपासमारीचे भय आहे.
आधी गरीबी निर्माण करायची आणि मग ती सर्वांना सारखी वाटून द्यायची.