सुवर्ण

तिमा's picture
तिमा in काथ्याकूट
15 May 2009 - 6:33 pm
गाभा: 

मोठ्या मुष्किलीने 'सुवर्ण सहकारी' चालू होणार होती तर पहिल्यांदा, निवडणुकीच्या आचारसंहितेने ती तारीख पुढे ढकलावी लागली. आता असे कानावर आले आहे की ,काही मूठभर असंतुष्ट कर्मचार्‍यांनी एका स्थानिक पक्षाकडे धांव घेतली असून त्यांनी त्या राष्ट्रीयकृत बँकेच्या व्यवस्थापनाला धमकावणे सुरु केले आहे. परिणामी ,त्या बँकेने माघार घेतल्यास दोन लाख ठेवीदारांच्या आशेवर बोळा फिरवला जाणार आहे.
एकूण आपल्या महाराष्ट्रात 'विघ्नकर्ते' फारच सक्रीय आहेत हे सिध्द होते.
जय महाराष्ट्र!!!

प्रतिक्रिया

यन्ना _रास्कला's picture

17 May 2009 - 6:14 pm | यन्ना _रास्कला

परमान १००-१२५ बारके सारके पक्श जावुन २-४ राश्ट्रिय पक्श उरले त चांगल तस सर्व्या मरतुकड्या बारक्या सारक्या बँन्का जावुन ७०-८० सरकारी नायतर येचडीयेफसी सारक्या खाजगी बँन्का र्‍हायल्या त बर.

*/*\*/*\/*\*/*\*/*\*/*\*/*\*/*\*/*\*/*\*/*\*/*
आनि डोळ्याइतक्याच जड आवाजात त्यान पहिला पोलीसी सवाल केला, डायवर कोन हाय !

तिमा's picture

17 May 2009 - 9:23 pm | तिमा

अहो, तुम्हाला असं बोलायला काय जातं, ज्याचं जळतं त्यालाच कळतं.
माझ्या या चर्चाप्रस्तावावर आधी प्रतिक्रिया आल्या नाहीत तेंव्हा मी हा निष्कर्ष काढला की,
कोणाही मिपाकराचे पैसे त्यात अडकले नसावेत.
समस्त मिपाकर एकतर त्या राजकीय पक्षाला भीत असावेत किंवा त्याचे सहानुभूतिदार असावेत.
ज्यांची आयुष्याची कमाई त्यात ठेवली आहे ते तर चातकासारखी वाट पहात आहेत.

हर शख्सको अपना बनाके देख लिया
मिलेंगे ना किसीसे ये दिलमें ठानी है|

यन्ना _रास्कला's picture

21 May 2009 - 10:25 am | यन्ना _रास्कला

ज्या परमान १००-१२५ बारके सारके पक्श जावुन २-४ राश्ट्रिय पक्श उरले त चांगल तस सर्व्या मरतुकड्या बारक्या सारक्या बँन्का जावुन ७०-८० सरकारी नायतर येचडीयेफसी सारक्या खाजगी बँन्का र्‍हायल्या त बर.

लास्टला त्येच झाल ना. सुवर्न आजपासुन चालु होनार, आनी त्ये पन इन्ड्यन ओवरसिज या सर्कारी बँन्केन ताब्यात घ्येतल्या नन्तर. या कुतर्‍याच्या छतरीवानी आसन्यार्‍या बारिक बारिक बँन्का जाउन मोठ्या बँन्का राह्यलेल्या बर्‍या नाय का.

किलींटन काका काय त्ये त्याव बोल्तीलच.

*/*\*/*\/*\*/*\*/*\*/*\*/*\*/*\*/*\*/*\*/*\*/*
हितन २ कोसाव औटपोस्ट नाहि?

"पोस्तात पोलीस काय करतोय"
मास्तर.....,

दुसर कोन इचारनार?

सँडी's picture

21 May 2009 - 7:38 am | सँडी

तिरशिंगराव, प्रथम आपले अभिनंदन.:)सुवर्ण सहकारी बॅंकेच्या सर्व शाखांमधून आज कामकाज पुन्हा सुरू झाले.

कोणाही मिपाकराचे पैसे त्यात अडकले नसावेत.
...एकतर त्या राजकीय पक्षाला भीत असावेत किंवा त्याचे सहानुभूतिदार असावेत.

बाकीच्या लोकांनाही कल्पना आहे, ज्यांचे पैसे तिथे अडकले होते त्यांच्या मनःस्थितीची.
'थांबा आणि पहा'चे धोरण कधीकधी उपयोगी पडतं.
व्यक्तिशः मला तरी तो राजकिय पक्ष माहीत नसल्याने काहिच भाष्य करता येणार नाही.
असो आजकाल असे कुणालाही भिण्याचे दिवस राहिलेले नाही.

सर्व ठेवीदारांचे आणि आपलेही पुन्हा एकदा अभिनंदन.