गाभा:
नुकताच नविन जागेत रहायला आलोय. २० जणांची सोसायटी आहे. जरा कोठे स्थिर होतोय तोच बिल्डरने मोबाइलचा टॉवर इमारतीवर लावायला सुरवात केली.
आता प्रोब्लेम असा आहे की अजुन सोसायटी फॉर्म झाली नाही, त्यामुळे जरी टॉवरला सगळ्या सभासदांचा विरोध असला तरी सोसायटीच्या जागेची मालकी कुणाची हा प्रश्न आहे. इमारतीच्या भोवतालची जागा आणि गच्ची यांचा आधिकार या काळात कुणाकडे असतो? विकासक अशा प्रकारे त्याचा फायदा घेवु शकतो का?
मिपावरील जाणकारांनी कृपया मत द्यावे.
प्रतिक्रिया
14 May 2009 - 5:54 pm | नितिन थत्ते
सोसायटी फॉर्म झाल्यावरही कन्व्हेयन्स डीड होत नाही तोपर्यंत जागेची मालकी आणि वापराचे सर्वाधिकार बिल्डरकडेच असतात.
तसे सामान्यपणे बिल्डरने मूळ मालकाशी केलेल्या करारात तसेच बिल्डरने ग्राहकाशी केलेल्या करारात स्पष्ट नमूद केलेले असते.
सारांश. सध्या तरी रहिवासी काहीच करू शकत नाहीत.
खराटा
(रंग माझा वेगळा)
14 May 2009 - 6:07 pm | शैलेन्द्र
तसे असेल तर कन्वेयन्स डीड लवकर होनार नाही याची काळजी बिल्डर घेइल. कंप्लीशन सर्टफीकेट देण्याबाबत काही समयसीमा असते का? असेल तर किती दिवस?
14 May 2009 - 6:20 pm | नितिन थत्ते
>>तसे असेल तर कन्वेयन्स डीड लवकर होनार नाही याची काळजी बिल्डर घेइल
ती तर बिल्डर घेतोच.
कंप्लीशन सर्टिफिकेट नगरपालिका देते. त्यावेळी कदाचित नगरपालिकेकडे तक्रार करता येऊ शकेल. पण आपण रहिवासी रहायला आलेले आहेत असे म्हणता म्हणजे ही कंप्लीशनची प्रक्रिया पूर्ण झालेली असणार्. तरीही नगरपालिकेकडे तक्रार करता येईल कदाचित... मूळ प्लॅनमध्ये नाही वगैरे.
खराटा
(रंग माझा वेगळा)
14 May 2009 - 6:35 pm | शैलेन्द्र
बर्याचदा बिल्डर सी सी न घेताच ताबा देतो, येथेही तसेच आहे. पण सी सी घेणे या गोष्टीस काही टाइम लाइन आहे का?
14 May 2009 - 5:55 pm | सागर
तुम्हाला टॉवरची अडचण आहे असे तेथील सगळ्या रहिवाश्यांनी लेखी निवेदन पोलिस चौकीत दिले तर कार्रवाई होऊ शकते असे वाटते
कायद्याशी तितकीशी माहिती नाही. पण ऑब्जेक्शन घेऊ शकता हे मात्र नक्की माहिती आहे.
14 May 2009 - 5:57 pm | दशानन
कोर्ट केस होऊ शकते.
आम्ही मागील महिन्यामध्येच एअरटेलचा टॉवर गावातून काढण्यासाठी केस केली होती व एअरटेलला टॉवर काढावा लागला.
थोडेसं नवीन !
14 May 2009 - 6:31 pm | सँडी
ग्राहक मंचाशी संपर्क करा. अथवा एखादा ओळखीतला चांगल्या वकिलाशी चर्चा करा. मार्ग नक्कि मिळेल.
अवांतर : पुढे सोसायटी फॉर्म झाल्यावर होणार्या परीणामाची जाणीव असावी का बिल्डरला?
-संदीप.
काय'द्याच बोला.
16 May 2009 - 1:03 am | भडकमकर मास्तर
त्यानिमित्ताने एक रिलेव्हंट प्रश्न : हे टॉवर किती हानिकारक असतात?
एका टॉवरवर काम करणार्या इन्जिनियरने असे एकदा सांगितल्याचे आठवते की मुम्बईत कमी शक्तीचे टॉवर असल्याने ( कारण एका विशिष्ट भागात छोट्या गावाच्या तुलनेने सन्ख्या खूप जास्त असते ) ते तितके धोकादायक नाहीत परंतु छोट्या गावातले टॉवर शक्तिशाली असल्याने त्यच्या आसपास सतत राहणे जास्त धोकादायक असते...
मिपावरील जाणकारांनी प्रकाश टाकावा...
____________________________
आवाज खालच्या सप्तकात बोलायला हवा असेल तर खर्जाचा रियाज करा.... ;)
16 May 2009 - 4:25 am | मयुरा गुप्ते
हा मुळ लेख ८ मे रोजी लोकप्रभे मध्ये आलेला. 'मोबाईल रेडीऍशनचा बाऊ नको' ह्या सदराखाली.
http://www.loksatta.com/lokprabha/20090508/tantradhnyan.htm
आजच्या लोकसत्ता मध्ये 'लोकप्रभा ' मध्ये आलेला लेख अनेकांनी वाचलाच असेल.
http://www.loksatta.com/lokprabha/20090522/pratikriya.htm
कारण काही महीन्यांपुर्वी आमच्याही सोसायटी मध्ये(म्हणजे माझ्या माहेरी ठाणे पूर्व ला) हा वाद चांगलाच रंगला होता. त्यात माझ्या बाबांनी खुप विरोध केल्या मुळे बाबा विरोधी पक्षनेते झाले होते.
-मयुरा गुप्ते
16 May 2009 - 6:16 pm | लिखाळ
लोकसत्तातले दुवे द्यावेत याच विचाराने लेख उघडला.. आपण ते दुवे दिले आहेतच.
लोकप्रभेतल्या दुव्यामध्ये मोबाईल टॉवरच्या घातक परिणामांबाबत माहिती आहे.
-- लिखाळ.
या प्रतिसादासाठी एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत !!! - लिखाळ जोशी :)
16 May 2009 - 5:01 pm | नितिन थत्ते
रेडिएशनचा विचार करण्यापेक्षा त्याच्या वजनाने काय हानी होईल ते पाहणे जास्त महत्त्वाचे आहे.
खराटा
(रंग माझा वेगळा)
16 May 2009 - 5:22 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती
दिव्याखाली अंधार हे मोबाईल टॉवरलादेखील लागू असावे.
16 May 2009 - 8:58 pm | मयुरा गुप्ते
अगदी बरोबर. आधीच काही ईमारती ३० वर्ष जुन्या, त्यात पुन्हा त्या ठाणे पूर्व किंवा मुलुंड पुर्व सारख्या खारजमिनीं वर बांधल्या असल्यास पायाच्या मजबुती विषयी साशंकता जास्ती. आणि वरुन मोबाईल टॉवर. रेडिऍशन आधी वजनाने हानी लवकर द्रुश्य स्वरुपात दिसेल.