एक्झिट पोल्स

विकास's picture
विकास in काथ्याकूट
13 May 2009 - 10:51 pm
गाभा: 

संपल्या एकदाच्या निवडणुका! आता लगेच एक्झीट पोल्स येऊ लागलीत... ह्या दुव्यामधे या पोल्सवरून चर्चा तसेच नवीन (की जुनेच?) आशास्थान काय असू शकेल यावर तमाम इच्छूकांनी मते मांडावीत अशी विनंती. शिवाय एकदा का (अक्षरशः) निकाल लागले की येथे येऊन कोण किती बरोबर आले, कोणाचे शाईनिंग झाले ते पण समजून घेऊ शकतो.

तर आत्ताच हाती आलेल्या ताज्या बातमीनुसार काँग्रेस आणि त्यांचे साथीदारपक्ष यांना १८५ ते २०५ तर भाजपा आणि त्यांचे साथीदार पक्ष यांना १६५ ते १८५ जागा मिळतील.

दुवा: सीएनएन/आयबीएन

THE BIG PROJECTION

  1. Cong+: 185 to 205 seats
  2. BJP+: likely to get 165 to 185 seats
  3. Third Front: 110 to 130 seats
  4. Fourth Front: 25 to 35 seats
  5. Others: 20 to 30 seats

बाकी बरीच तारेवरची कसरत त्यांच्या पानावर वाचता येईल. मग लक्षातही येईल की काही झाले तरी ते बरोबर ठरणार आहेत ;)

प्रतिक्रिया

क्लिंटन's picture

13 May 2009 - 11:55 pm | क्लिंटन

गेल्या दोन महिन्यांमध्ये वेगवेगळ्या ओपिनियन पोल आणि आजचे मतदानोत्तर चाचण्यांचे निकाल यात थोडा फरक आहे. हा फरक पडायची ढोबळ मानाने खालील कारणे असतील असे मला वाटते.

१. मायावती पूर्वी वाटत होत्या तितक्या बलवान नाहीत असे दिसत आहे.उत्तर प्रदेशातील उच्चवर्णीय काही प्रमाणात भाजप आणि काँग्रेसकडे परत आले आहेत असे वाटते.या राज्यात ब्राम्हणांची संख्या सुमारे १२% आहेत आणि चौकोनी लढतीत थोडी मते इकडची तिकडे होण्यानेही मोठा फरक पडू शकतो. तसेच कल्याण सिंहांबरोबरच्या युतीमुळे मुलायम सिंहांना काही लोध मतांचा फायदा झाला असेल पण मुस्लिम मते त्याहून जास्त प्रमाणाव गमावावी लागली आहेत असेही दिसत आहे.ही मते मोठ्या प्रमाणात काँग्रेस आणि काही प्रमाणावर मायावतींच्या बसपकडे वळली आहेत असे या चाचण्यांमधून वाटत आहे.

त्यामुळे काँग्रेसला आणि भाजपला पूर्वी अपेक्षित नव्हता इतका लाभ होणार असे चाचण्यांचे म्हणणे आहे.

२. तामिळनाडूमध्ये पूर्वीपासून जनता द्रमुक आणि अण्णा द्रमुक यांच्या पारड्यात भरभरून मते टाकते.गेल्या काही निवडणुका बघितल्या तर दोनपैकी एक पक्ष आलटून पालटून मोठ्या प्रमाणावर निवडून आला आहे.पण यावेळी द्रमुकाविरोधी मते सगळी अण्णा द्रमुकच्या पारड्यात गेलेली नाहीत असे चाचण्यांचे म्हणणे आहे.यावेळी विजयकांत यांचा डी.एम.डी.के हा तिसरा पर्याय जनतेपुढे आहे. NDTV वर राज्यात द्रमुकची मते १५% ने कमी झाली आहेत पण अण्णा द्रमुकची मते केवळ ५% ने वाढली आहेत तर उरलेली १०% मते विजयकांतच्या पारड्यात गेली आहेत असे दाखविले आहे. पूर्वीच्या परिस्थितीत सगळी १५% मते अण्णा द्रमुकच्या पारड्यात जाऊन द्रमुकचा धुव्वा उडाला असता.पण यावेळी विजयकांत बरीच मते खात आहे आणि ही मते लोकसभेच्या जागा मिळवायला पुरेशी नसतील पण द्रमुकचा धुव्वा उडू नये याची काळजी घेतील असे प्रणय रॉय यांच्या टिमचे म्हणणे आहे.त्यांच्या मते द्रमुक आघाडीला २० तर अण्णा द्रमुक आघाडीला १८ आणि इतरांना १ जागा मिळेल. पूर्वी द्रमुक आघाडीला (युपीए ला) दोन आकड्यात कोणी जागा दिल्या नसतील आणि अण्णा द्रमुकला ३० पर्यंत जागा दिल्या असतील.पण या घडामोडीमुळे मोठा फरक पडू शकतो आणि युपीए ला पूर्वीच्या अंदाजांपेक्षा कमितकमी १० जागांचा फायदा होऊ शकतो.

३. बिहारमध्ये चांगल्या कामगिरीच्या जोरावर नितीशकुमार यांचा जनता दल (संयुक्त) आणि भाजपला बरीच मते जास्त मिळतील असे NDTV म्हणतो.दोन महिन्यांपूर्वी काँग्रेस आणि लालू-पासवान एकत्र लढणार अशी हवा होती.तेव्हा त्यावेळी जनता दल (संयुक्त) आणि भाजपला २५ च्या वर जागा कोणी दिल्या नसतील पण आज विरोधी मतांमध्ये झालेल्या फुटीमुळे आज ही युती ४० पैकी ३३ जागा जिंकेल असे NDTV म्हणतो. याचाच अर्थ एन.डी.ए ला कमितकमी ८ ते १० जागांचा फायदा पूर्वीच्या अंदाजांपेक्षा होणार आहे.

४. राजदिप सरदेसाईंच्या मते महाराष्ट्रात काँग्रेस आणि राष्ट्रवादीला मोठे यश मिळणार आहे.त्यांनी नक्की जागांचे अंदाज मांडले नाहीत पण त्यावेळी झालेल्या चर्चेचा मतितार्थ हा की राज ठाकरे यांच्या मनसेने मुंबई-ठाण्यातील १० जागांमध्ये शिवसेना-भाजपची मते मोठ्या प्रमाणावर खाल्ली आहेत त्यामुळे हा फरक होत आहे.तेव्हा युपीए ला महाराष्ट्रातून पूर्वी संदाज व्यक्त केले होते त्यापेक्षा थोड्या जागांचा फायदा होणार आहे. अर्थात हे मत कुमार केतकरांना मान्य नाही.ते म्हणतात की शिवसेना-भाजपला २६, काँग्रेस-राष्ट्रवादीला २० आणि इतरांना २ जागा राज्यात मिळतील.

अर्थात हे सगळे अंदाजांचे खेळ. राजदिप सरदेसाई-प्रणव रॉय यांच्यासारखे professional पातळीवर ते विदा गोळा करून करतात तर माझ्यासारखे amateur पातळीवर केवळ वर्तमानपत्रातील बातम्या वाचून ’गेस्टीमेट’ करतात. ते कितपत बरोबर येतात हे बघायला १६ तारखेची वाट बघावी लागेल.

**************************************************************
विल्यम जेफरसन क्लिंटन

माझी मराठी अनुदिनी
माझी इंग्रजी अनुदिनी

**************************************************************

विकास's picture

14 May 2009 - 12:52 am | विकास

चांगला आढावा घेतला आहे. बर्‍याचदा एक्झीट पोल्स संदर्भात एस्टिमेशन पेक्षा गेस्टीमेशन बरोबर ठरू शकते. विशेषत: जर ते अलीप्तपणे केले असले तर! कारण एस्टिमेशन हे चॅनलवाले राजकीय दृष्टिने पण हल्ली करू लागले आहेत. (प्रणव रॉय, विनोद दुवा वगैरे ८५ मधे वेगळे होते आणि आता वेगळे आहेत असे वाटते) त्यामुळे तुमचे गेस्टीमेशन बरोबर ठरले तर आश्चर्य वाटायला नको.

काँग्रेसच्या दृष्टीने अजून एक आशादायी चित्र हे आंध्रमधे आहे. जर आंध्र आणि तामिळनाडूत त्यांचे भले झाले तर "आमच्या कारकिर्दीस आणि त्यातील निर्णयांना जनतेने मत दिले" असे म्हणायला ते मोकळे होतील असे वाटते.

क्लिंटन's picture

14 May 2009 - 11:51 am | क्लिंटन

’द हिंदू’ वर्तमानपत्राचे ग्रामीण संपादक पी.साईनाथ यांच्यामते आंध्र प्रदेशात राजशेखर रेड्डी सरकारने काही निर्णय घेतले आहेत आणि त्याचा खरा परिणाम ग्रामीण भागात जाणवायला अजून ३-४ वर्षे जावी लागतील.उदाहरणार्थ ९१ एस.ई.झेड निर्माण करायचा याच सरकारचा निर्णय आहे आणि त्यातून लोकांचे मोठ्या प्रमाणावर स्थलांतर होणार आहे.पण त्याचा फटका काँग्रेसला अजून बसलेला नाही. बहुदा पुढील निवडणुकीत त्याचा फटका बसेलच.देशातील दुर्लक्षित अशा ग्रामीण भागातील समाजकारण आणि अर्थकारण याचा साईनाथ यांचा खूपच अभ्यास आहे आणि वर्षातील ३०० दिवस ते विविध राज्यांमधील गावांमध्ये भेटीवर असतात असे त्यांच्याविषयी ऐकले आहे.

तसेच राज ठाकरेंची मनसे लोकसभा निवडणुकीत सुध्दा शिवसेना-भाजपची मते मोठ्या प्रमाणावर खाईल हे मान्य करायला अजूनही जड जाते.त्यांच्या सभांना मोठ्या प्रमाणावर गर्दी होते हे सत्यच आहे पण महानगरपालिका आणि विधानसभा निवडणुकीत त्यांचा प्रभाव अधिक जाणवेल लोकसभा निवडणुकीत नाही असे मला स्वत:ला वाटत होते.पण राजदिप सरदेसाईंचे अंदाज बरोबर असतील तर मनसेने शिवसेना-भाजपला जोरदार फटका दिला आहे असे वाटते.

**************************************************************
विल्यम जेफरसन क्लिंटन

माझी मराठी अनुदिनी
माझी इंग्रजी अनुदिनी

**************************************************************

विसोबा खेचर's picture

14 May 2009 - 1:35 am | विसोबा खेचर

आपला तर बॉ या बाबतीत चमत्कारावर विश्वास आहे. आपण कल्पनाही करू शकत नाही असे चमत्कार लोकसभेच्या निवडणुकीत किंवा इतर कुठल्याही निवडणुकीत घडतात! शेवटी पब्लिक ज्याची जागा त्याला दाखवून देतं असंही मी म्हणेन..

परंतु यावेळच्या निवडणुकांत मात्र नक्की काय घडेल, कोण येईल, कोण पडेल, कोण कुणाशी गटबंधन करेल याबाबत परमेश्वराला जरी विचारलंत तरी तो हसून "क्षमा करा, मला माहिती नाही!' असं म्हणेल! :)

मी मात्र येत्या शनिवारी दिसभर दूरदर्शन समोर बसून विविध वृत्तवहिन्यांवर येणारा निकाल आणि त्यानंतर पुन्हा एकवार मॅजिक फिगरची गणितं, विविध पक्षांच्या मंडळींच्या चर्चा, त्यात त्यांनी चालवलेले आरोप-प्रत्यारोप आणि एकंदरीतच सत्तेसाठीचा नंगानाच पाहात माझं मन रमवणार आहे! :)

विकासभावजी, येता का येत्या शनिवारी माझ्या घरी? मस्तशी खादाडी करत दिवसभर टाईमपास करू! :)

तात्या.

विकास's picture

14 May 2009 - 8:20 am | विकास

विकासभावजी, येता का येत्या शनिवारी माझ्या घरी? मस्तशी खादाडी करत दिवसभर टाईमपास करू!

अहो नक्कीच आवडेल. इतके सोपे नाही ना पण! नाहीतर मतदानाला नसतो का आलो? ;) तरी बोलेन मात्र नक्कीच!

आपला तर बॉ या बाबतीत चमत्कारावर विश्वास आहे.
चमत्कार म्हणले की मला दोघे जणं आठवतात (त्यांचा एकमेकांशी काडीचाही संबंध नाही! असे वाटते..) एक म्हणजे आपले प्रकाशराव, ते तुम्हाला चमत्कार म्हणजे अंधश्रद्धा कशी काय ते सांगतील. दुसरे आता काँग्रेसमधे असलेले पण आधी शिवसेनेत असलेले ज्यांनी सारखे, "आता चमत्कार होणार" अशी सतत हाकाटी पिटली होती. मात्र, दरवेळेस चमत्काराच्या ऐवजी चमत्कारीकच होत राहीले. असो. :-)

सँडी's picture

14 May 2009 - 6:50 am | सँडी

यावेळच्या निवडणुकांत मात्र नक्की काय घडेल, कोण येईल, कोण पडेल, कोण कुणाशी गटबंधन करेल याबाबत परमेश्वराला जरी विचारलंत तरी तो हसून "क्षमा करा, मला माहिती नाही!' असं म्हणेल!
=)) खरं आहे! मतदारांची इनिंग संपली आता वेळ आहे मतमोजणीनंतर राजकारण्यांच्या डावपेचांची.

ऋषिकेश's picture

14 May 2009 - 9:08 am | ऋषिकेश

माझा आधीचा अंदाज बदललेला नाहि
अजुनहि तेच चित्र दिसेल. फक्त माझा ताजा अंदाज आकड्यात मांडतो
भाजप + निवडणूकपूर्व मित्रपक्ष (~२००-२१०)
बसपा (~२५-३०)
ए.आय्.डीएम्.के (~१५-२०)
बिजद (~१०-१५)
नॅशनल कॉन्फरन्स (~४-५)
आयत्यावेळी तृणमूल (~१५)
इतर घोडेबाजारातून जसे प्रजाराज्यम, टीडीपी

ऋषिकेश
------------------
प्रेमात पडण्यासाठी गुरुत्वाकर्षणाची काय आवश्यकता? ;)

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

14 May 2009 - 12:58 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

lokmat

आम्ही दैनिक लोकमतच्या अंदाजाबरोबर आहोत !

मनीषा's picture

14 May 2009 - 2:34 pm | मनीषा

मला वाटते कमीत कमी १० ते ११० पक्षांचे मिळून सरकार बनणार ... :B

छोटा डॉन's picture

14 May 2009 - 2:41 pm | छोटा डॉन

खरे तर बहुतांशी क्लिंटन ह्यांच्याशी "सहमत आहे" असे म्हणुन भागण्यासारखे आहे ...
पण अजुन थोडे वेगळे मुद्दे आणि अंदाज मांडायचे असल्याने हा वेगळा प्रतिसाद ...

१. उत्तर प्रदेश :
इथे निवडणुकीच्या काळात आणि त्याच्या थोड्या अजुन आधी २ महत्वपुर्ण घटना घडल्या की ज्याचा परिणाम डायरेक्ट मदतानावर होऊ शकत होता.
अ. "वरुण गांधी" यांचे पिलभीत नाट्य : इथ कारण नसताना वरुण गांधी ह्यांना अवास्तव प्रसिद्धी मिळाली, मायावतींकडुन त्यांच्यावर "रासुका" लावला गेल्याने तर वरुणला अजुन सहानुभुती मिळाली ह्यात शंका नाही. म्हणजे जिथे तो काही जास्त न करता स्वतःचई "पिलभीतची" जागा राखु शकत होत आता तिथेच तो पिलभीत दणदणतील मतांनी जिंकेल शिवाय अजुन आसपाअच्या मतदानावरसुद्धा "वरुण गांधी इफेक्ट" जाणवेल व भाजपाला थोडासा का होईना फायदा होईल अशी चिन्हे आहेत ...
ह्याचा फटका सरळसरळ "बसपा" ला बसणार हे नक्की कारण जरी काँग्रेसने हे प्रकरण उचलले असले तर रासुका लावण्यासारखी कॄती करुन बसपाने नाराजी पदरी पाडुन घेतली ....
ऍडवान्टेज भाजपा ...!!!

ब. कल्याणसिंग आणि मुलायमसिंगांचे सख्य :
अगदीच अनपेक्षीतरितीने पलटी मारत कल्याणसिंगानी मुलायमसिंघाशी हात मिळवुन "बाबरीचे भुत" पुन्हा उकरुन काढले.
जरी ह्यांचा हेतु मुस्लिम मते खेचण्याचा असेल तरी "कल्याणसिंग"च्या मागे मुस्लिम उभे राहतील अशी शक्यता वाटत नाही, उलट ह्यातले बरेच जण आता "सपा" चा पर्याय सोडुन "काँग्रेसकडे" वळतील असा अंदाज आहे ...
शिवाय ह्या रोजच्या मुलायमांच्या सुंदोपसुंदील कंटाळुन बरेच जण ( हिंदु आणि मुस्लिम ) काँग्रेस, भाजपा, बसपा सारखा पर्याय पहात राहिले तर आश्चर्य नाही.
शिवाय सध्या सपामध्ये " अमरसिंगांची नाराजी" हा फॅक्टर महत्वाचा ठरेल अशी चिन्हे आहेत ...

तर बॉटमलाईन अशी की उप्र. मधेय भाजपा आणि काँग्रेसला अनपेक्षीत यश मिळण्याची चिन्हे आहेत ....
दरवेळी सपा क्रमांक १किंवा २ असते ते घसरुन ह्यावेळी ३ किंवा ४ क्रम. फेकले जाईल, ह्याचा फायदा अर्थात काँग्रेस अथवा भाजपाला होईल, भाजपाची शक्यता जास्तच ....
माझा अंदाज :
बसपा : ३५-४० , भाजपा : १४-१८ , काँग्रेस : १०-१४, भाजपा सहकारी : २-३ , सपा : १२-१६

२. गुजराथ आणि कर्नाटक :
भाजपा क्लीन स्विप घेईल असा अंदाज आहे, इथे परिस्थीती भाजपविरोधी अजिबात नाही ...
* गुजराथ :
भाजपा : १९-२२ , काँग्रेस : ४-६
कर्नाटका :
सध्या जरी युती नसली तर देवेगौडा काँग्रेसबरोबर जाणार हे सत्य आहे, इथे सध्या "कुमारस्वामींचे" कॅबिनेट फिक्स झाले असा बोलाबाला आहे, त्यामुळे "जदयु" हा कोणाच्याही बाजुला झुकु शकतो, अर्थात ताकद जास्त नसली तर बुडत्याला काडीचा आधार म्हणुन ह्यांची २-४ जागा मह्त्वाच्या ठरतील, म्हनुनच ही "कॅबिनेटची" सौदेबाजी चालु आहे.
कर्नाटकात जरी काँग्रेसचे बाहुबली नेते असले तरी ह्यावेळी त्यांच्यासाठी सामना अवघड होता, अपेक्षेपेक्षा मतदानही कमी झाले बर्‍यापैकी ...
भाजपा : १८-२१ , काँग्रेस : ५-७ , जदयु : २-३

३. महाराष्ट्र :
ह्यावेळी "मनसे" बर्‍यापैकी अनेकांच्या धोतराखाली फटाके फोडण्यास यशस्वी झाला असे समजण्यास हरकत नसावी. परंतु काँग्रेस्-राकॉ ह्यांचा पुर्वंपार पश्चिम महाराष्ट्र, कोकण, मुंबई, काही अंशी विदर्भ इथे वरचष्मा राहिल. युतीला आपले मराठवाडा, विदर्भ, कोकणातील भाग, खानदेश, मुंबई इथले गड संभाळायला बरीच पळापळ करावी लागली.
तरीही जास्त फरक नसणार, अंतर्गत वादांमुळे काँ-रा.काँ आघाडीला थोडा फटका बसु शकतो.
"मनसे" मुंबईमध्ये युतीला नक्की झटका देणार , एखादी जागा जिंकल्यास आश्चर्य नको...
मुंबईतल्या मतदानाने अनेकांचे डोळे पांढरे झाले होते हे सत्य आहे, जे लोक बाहेर पडले तो नेहमीचा मतदार नव्हता तर "बदल हवा" असे म्हणणारा वर्ग होता, ऍडव्हान्टेज "मनसे" ...
भाजपा : १२-१६, शिवसेना : ९-१२, कॉंग्रेस : ८-१२ , रा.काँ : १३-१५, मनसे : १-२

४. बिहार :
नितीशकुमार आणि सुशीलकुमार मोदींचे "गव्हर्नन्स" व्यवस्थित मते खेचुन आणेल ह्यात शंका नाही. जर "काँग्रेस्-लालु-पासवान" एकत्र लढले असते तर थोडे चित्र बदलले असते. शिवाय काँग्रेस आणि लालुंचे प्रचारादरम्यान बरेच वाजल्याने ह्याचा इफेक्ट मतदानावर झाला असेल.
एकुण मतदान कमी झाल्याने अंदाज व्यक्त करणे अवघड आहे तरीही "नितीशकुमारांचा जादु चल गया" असे मी मानतो ...
जद ( नितीश गट ) १३-१६ , भाजपा : ९-१३ , काँग्रेस : २-३ , लालु-पासवान : ९-१२
वरकर्णी पासवान सध्या काँग्रेसबरोबर असले तरी ते "रालोआ" मध्ये मंत्रीपद घेऊन बसले आहेत हे विसरु नये ...

५. तामिळनाडु :
ह्यावेळी नेहमीसारखा "स्पष्ट कौल" नाही हे नक्की, नियमाप्रमाणे ह्यावेळी द्रमुक पुर्ण झोपुन जयललितांना फायदा व्हायला हवा होता.
पण करुणानिधींचे काम व खास करुन "तामिळ प्रेम" त्यांना नक्की आधार देईल ....
"पी एम के" चे द्रमुक सोडुन अद्रमुक कडे जाणे तसेच विजयकांताचा नविन पक्ष ह्यामुळे ह्यावेळी "स्पष्ट कौल" नाही ...
सरशी अर्थातच "जयललिता आणि टीमची" आहे हे नक्की पण द्रमुक संपुर्ण झोपणार नाही ...
भाजपाला इथे काहीच संधी नाही परंतु "गठजोडच्या राजकारणात" पुढे जयललिता आणि विजयकांत जर "रालोआ"च्या छावणेत आले तर आश्चर्य नाही ...
काँग्रेससाथी "द्रमुक किंवा अद्रमुक" हा एकच ऑप्शन आहे ...
काँग्रेस :१-२ , द्रमुक : ७-१० , अद्रमुक : १८-२२ , विजयकांत :२-३ , वायको : १-२, भाजपा : ०

६. मध्यप्रदेश :
शिवराज चौहान ह्यांच्या नेतॄत्वाचा परिणाम आणि संघाची पकड म्हणुन इथे भाजपाला जास्त अडचण येणार नाही, पारंपारिक मतदारसंघात काँग्रेसच विजय नक्की, थोडक्यात इथे ५०-५० असा मुकाबला आहे ...
भाजपा+ = १८-२२ , काँग्रेस+ = ८-११, इतर = ०-१-२

७. राजस्थान :
भाजपाचा परंपरागत मतदार आणि गेहलोतांचे काम हे दोघांनाही मते मिळवुन देईल, जास्त फरक असनार नाही.
खरे तर माझा इकडचा जास्त अभ्यास नाही ...
आकड्यात अंदाज सांगु शकत नाही

८. पश्चिम बंगाल :
ह्यावेळी पहिल्यांदा डाव्यांच्या साम्राज्याला तडा जाऊ शकतो अशी चिन्हे आहेत.
डाव्यांची विकासविरोधी भुमिका, सोमनाथदादांचे निलंबन, सोनिया-ममतांची हातमिळवणी ह्या सर्व "डाव्यांच्या विरोधातील" बाजु आहेत. प्रथमच "डावे-विरोधी" एकवटल्याने कम्युनिस्ट नक्की झटका खाणार ...
फारसा जोरदार नसला तरी जाणवेल इतका नक्की ...
डावे : २१-२६ , काँग्रेस : ६-९ , ममता : ८- ११

९. आंध्र प्रदेश :
पुन्हा एकदा इथे ५०-५० सामना आहे.
मागच्या वेळी झालेली धुळधाण चंद्राबाबु ह्यावेळी भरुन काढतील अशी चिन्हे आहेत, राजशेखर रेड्डींच्य विरोधात असलेले अंतर्गत मतभेद ह्यावेळी बाकीच्या पक्षांना मदत करतील ...
चिरंजीवीच्या "प्रजाराज्यम" मुळे बर्‍याच ठिकाणी तिरंगी लढतीत भरपुर अनपेक्षीत निकाल हेच प्रमुख आकर्षण ठरावे ...
तिकीतवाटपातील गोंधळामुळे बंडखोरीचे प्रमाण इथे जास्त आहे ...
आकडे सांगणे अवघड आहे ...
काँग्रेस : १६-१९ , तेलगु देसम : १६-१९ , प्रजाराज्यम :२-३ , इतर : ३-५

बाकी लहान सहान राज्याचा अंदाज व्यक्त करणे अवघड नसले तरी किचकट आहे, शिवाय वरचे प्रमुख ९ राज्ये महत्वाची असल्याने मी त्याबद्दल लिहले ...

------
( राजकारण प्रेमी ) छोटा डॉन
एखादा "प्रण अथवा रिझॉल्युशन" म्हणजे काय ? जास्त काही नाही, मस्त गाजावाजा करुन ८ दिवसातच पहिली पाने पंचावन्न करणे.
आता आमचा "लेखन न करण्याच्या" प्रतिज्ञेचेच पहा ना ... ;)

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

14 May 2009 - 2:57 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

महाराष्ट्रात रा.कॊ. १३ च्या वर जाणार नाही असे वाटते. आणि मनसे बिनबाद शून्य असेही वाटते.
बाकी गेस मस्तच !

अवांतर : रॊ. कॊ. जर पंधराच्या पुढे गेले तर पवार साहेब पंतप्रधान नक्की ?

-दिलीप बिरुटे
(मा. शरदपवार साहेबांचा चाहता)

चिरोटा's picture

14 May 2009 - 3:06 pm | चिरोटा

शक्यता नाकारता येत नाही.!! पण राष्ट्रपती आणि पंतप्रधान एकाच राज्याचे ह्या मुद्द्यावर ईतर पक्ष् काड्या करू शकतील.
अवांतर्-साहेबानी बंद गळ्याचा कोट शिवायला टाकला आहे अशी आतील गोटातुन बातमी कळली.
भेन्डि
क्ष्^न + य्^न = झ्^न

विकास's picture

14 May 2009 - 4:37 pm | विकास

>>>पण राष्ट्रपती आणि पंतप्रधान एकाच राज्याचे ह्या मुद्द्यावर ईतर पक्ष् काड्या करू शकतील.

हा पटणारा मुद्दा आहे. तरी देखील पंतप्रधानपदासाठी पवार साहेब "नेव्हर से डाय" (मनातल्या मनात) म्हणणारे आहेत. आता त्यांनी तिसरी आणि चौथी आघाडी एकत्र करण्याचा प्रयत्न सुरू केला आहे.

बाकी कधी काळी कुणाच्या तरी नावाने (मला वाटते नेहमी प्रमाणे चर्चिलच्या :) ) ऐकलेले एक वाक्य आठवले: politics is worse than war, because in war you die only once.

छोटा डॉन's picture

14 May 2009 - 3:12 pm | छोटा डॉन

ह्यावेळी बाळा नांदगावकर आणि शिशीर शिंदे ह्यांची हवा आहे म्हणतात.
त्यामुळे मनसे बिनबाद शुन्य होणार की "बाईज" ची एखादी धाव मिळणार हेच पहायचे आहे, आम्हाला वाटते की गोलंदाजांकडुन चुक होऊन एखादी "बाईज" अथ्वा " वाईड" ची धाव मिळेल ...
शनिवारी कळेलच ..!!!

>>अवांतर : रॊ. कॊ. जर पंधराच्या पुढे गेले तर पवार साहेब पंतप्रधान नक्की ?
छे हो, शक्यच नाही ...
पाठिंबा कोण देणार १५ (!) खासदारांच्या पवारसाहेबांना ?
प्रत्येकी १५०-१६० वाले काँग्रेस / भाजपा ?
१५-२० खासदारवाले करुणानिधी/नितीश/जलललिता/मुलायम/चंद्राबाबु नायडु/लालु-पासवान ?
४० खासदारवाले डावे की मायावती ?

अवघड आहे गणित ....
शिवाय पवार इथे प्रत्येक्षपणे "नाही" म्हणत आहेत व बाकीच्यांची उघड महत्वाकांक्षा आहे ...
शिवाय "मराठी" फॅक्टरमुळे शिवसेना आली तर त्याच फॅक्टरमुळे बहुसंख्य युपी-बिहार लॉबी दुर जाते, हे ही महत्वाचेच नाही का?

मग कसा आहे सामना ?

------
( पिटातला प्रेक्षक ) छोटा डॉन
एखादा "प्रण अथवा रिझॉल्युशन" म्हणजे काय ? जास्त काही नाही, मस्त गाजावाजा करुन ८ दिवसातच पहिली पाने पंचावन्न करणे.
आता आमचा "लेखन न करण्याच्या" प्रतिज्ञेचेच पहा ना ... ;)

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

14 May 2009 - 4:20 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

>>अवांतर : रॊ. कॊ. जर पंधराच्या पुढे गेले तर पवार साहेब पंतप्रधान नक्की ?
>>छे हो, शक्यच नाही ...

कोणत्याच अंगाने शक्य नाही हे खरं आहे, पण राजकारणात काहीही घडू शकतं यावर आमचा विश्वास आहे. :)

-दिलीप बिरुटे

विकास's picture

14 May 2009 - 4:41 pm | विकास

डॉन साहेब,

आपले गेस्टीमेशन पटण्यासारखे आहे. माहीतीपूर्ण आहे! (मनसे बद्दल बघूया काय होते ते - स्वतः जिंकतात की इतरांना पाडतात). फक्त राजस्थानाच्या बाबतीत मात्र वसुंधरा राजे, शेखावत, जसवंत सिंग यांच्यातील अंतर्गत लाथाळ्यांनी भाजपाला मार पडू शकतो असे कुठेतरी वाटते.

निवडणूकांच्या आधी आणि नंतर वर्तवलेले काही प्रमुख अंदाज खालील प्रमाणे (संदर्भः विकीपिडीया)

Pre Poll surveys

  1. CNN-IBN-CSDS UPA 215–235, NDA 165–185, Others 125–155
  2. Star–Nielsen (5 Mar to 17 Mar 2009) UPA 257 (Congress 144), NDA 184 (BJP 137), Others 96
  3. Star–Nielsen (26 Mar – 3 Apr 2009) UPA 203 (Congress 155), NDA 191 (BJP 147), Third Front 104, Fourth Front 39
  4. Outlook India–The Week UPA 234 (Congress 144), NDA 186 (BJP 140), Third Front 112
  5. Times of India UPA 201 (Congress 146), NDA 195 (BJP 138), Others 147

Exit Polls

  1. CNN-IBN-Dainik Bhaskar UPA 185-205, NDA 165-185, Third Front 110-130, Fourth Front 25-35
  2. Star-Nielsen UPA 199, NDA 196, Third Front 100, Fourth Front 36
  3. India TV-CVOTER UPA 189-201, NDA 183-195, Third Front 105-121
विकास's picture

16 May 2009 - 6:36 am | विकास

आजचे एक्झीट पोल (मे १५, २००९)

CNN/IBNLIVE

कंसातील प्रोजेक्षन हे दोन दिवसांपुर्वीचे आहे:

National Projection (+Allies)
- Cong+ likely to get 210 to 225 (185 to 205)
- BJP+ likely to get 180 to 195 (165 to 185)
- Third Front likely to get 95-110 (110 to 130)
- Fourth front likely to get 25-35 (25 to 35)
- Others would get between 15-20 (20 to 30)

National Projection (Party wise)
- Congress likely to get 158-173
- BJP likely to get 132-147
- Left likely to get 30-40
- BSP's tally likely to be between 24-32
- Others 17-25 seats

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

16 May 2009 - 9:59 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

काँग्रेस १५३ च्या पुढे, (चमत्कारच आहे) सहकारी मित्रांसहीत १९८ दाखवते आहे. आणि तिसरी आघाडीचे स्वप्न हवेत विरले !!!

विकास's picture

16 May 2009 - 10:06 am | विकास

>>>आणि तिसरी आघाडीचे स्वप्न हवेत विरले !!!

मग आता आशास्थान कुठले? ;)

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

16 May 2009 - 10:24 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

>>मग आता आशास्थान कुठले?

आम्ही काँग्रेसच सोबत आहोत, होतो. सरकारच्या सोबत विकासाची कामे करुन जनतेचा विश्वास सार्थ करु ! :)

-दिलीप पवार

नितिन थत्ते's picture

16 May 2009 - 6:37 pm | नितिन थत्ते

सर्वात गंमतीची गोष्ट म्हणजे डाव्यांना ढकलून पुढे कोण येतंय? तर (टाटांना बंगालमधून घालवून लावणार्‍या) ममता बॅनर्जी.
म्हणजे त्या म्हणत होत्या ते खरं होतं असं समजावं का? निदान बंगालमधील मतदारांनी तरी तसंच म्हटलेलं दिसतंय!!!

खराटा
(रंग माझा वेगळा)

क्लिंटन's picture

16 May 2009 - 10:09 am | क्लिंटन

देशात परत मनमोहन सिंह यांच्या नेतृत्वाखाली युपीए सरकार येणार असे दिसते.स्थिर सरकार येणे गरजेचे आहे आणि तसे होत आसे असे दिसत आहे. कम्युनिस्ट पक्षांचा केरळात धुव्वा उडत आहे आणि पश्चिम बंगालमध्ये जोरदार पीछेहाट होत आहे याचा मला स्वत:ला मनस्वी आनंद होत आहे.राजकारणात असे म्हणतात,"You can fool some people all the time,all the people some time but you cannot fool all the people all the time". डाव्या आघाडीच्या बाबतीत होत आहे असे दिसत आहे.

**************************************************************
विल्यम जेफरसन क्लिंटन

माझी मराठी अनुदिनी
माझी इंग्रजी अनुदिनी

**************************************************************

विकास's picture

16 May 2009 - 3:04 pm | विकास

स्थिर सरकार येणे महत्वाचे होते आणि ते येत आहे याचा आनंद झाला. त्याही पेक्षा कम्युनिस्टांचा धुव्वा उडालेला पाहून अजूनच आनंद झाला. स्वतः (सरकारात येऊन) जबाबदारी न घेता स्वतःला हवे ते ब्लॅकमेल करत मिळवायचे असला उद्योग गेले ५ वर्षे चालू होता, त्यावर आता जरब बसली.

बिपिन कार्यकर्ते's picture

16 May 2009 - 3:19 pm | बिपिन कार्यकर्ते

सहमत. अंगाला काहीही न लावून घेता ब्लॅकमेल हेच फक्त केले डाव्यांनी मागच्या वेळी. त्यांची बर्‍यापैकी पिछेहाट झाली आहे हे चांगलेच झाले. जनतेनेच धडा शिकवला. स्थिर सरकार हवेच होते ते मिळाले.

कोणत्याही निकषांवर काँग्रेस आणि भाजप यांच्यात फारसा फरक नाहीच तसाही.

बिपिन कार्यकर्ते

श्रावण मोडक's picture

16 May 2009 - 3:27 pm | श्रावण मोडक

इतकेच नाही. ज्या-ज्या पक्षांनी कॉंग्रेसला त्रास दिला, त्या पक्षांचे नाक कापले गेले आहे. त्यात डावे आहेत. राष्ट्रवादी आहे, सपा, बसपा आहे. द्रमुक, प्रजाराज्यम, बिजद, तृणमूल यासारख्या कॉंग्रेसबाबत अगदी शेवटी का होईना सहानुभूती दाखवणाऱ्या पक्षांना मतदारांनी उचलले. कॉंग्रेसच! हा पक्ष पुन्हा रिकव्हरीच्या मार्गावर आहे हे निश्चित. गेल्या काही काळात जो राजकीय शहाणपणा दाखवला तो टिकला तर भवितव्य निश्चितच चांगले हे निश्चित. दोन अडीच वर्षांनी मनमोहन यांचा राजीनामा, राहूल पंतप्रधान आणि पुढे मनमोहन राष्ट्रपती असे झाले तर नवल नाही.

सहज's picture

16 May 2009 - 3:29 pm | सहज

>गेल्या काही काळात जो राजकीय शहाणपणा दाखवला तो टिकला तर भवितव्य निश्चितच चांगले हे निश्चित.

प्रतिसाद आवडला.

बिपिन कार्यकर्ते's picture

16 May 2009 - 3:33 pm | बिपिन कार्यकर्ते

कॉंग्रेसच! हा पक्ष पुन्हा रिकव्हरीच्या मार्गावर आहे हे निश्चित.

नक्कीच. असेच वाटते. काहीही असो, लवकरात लवकर आघाड्यांचं राजकारण संपुष्टात येवो हीच इच्छा.

दोन अडीच वर्षांनी मनमोहन यांचा राजीनामा, राहूल पंतप्रधान आणि पुढे मनमोहन राष्ट्रपती असे झाले तर नवल नाही.

खरंय. ज्या पद्धतीने राहुल गांधीला पुश करत आहेत / ग्रूम करत आहेत ते पाहून एखादं शेंबडं पोर पण सांगेल.

बिपिन कार्यकर्ते

श्रावण मोडक's picture

16 May 2009 - 3:38 pm | श्रावण मोडक

ग्रूम हा शब्द अधिक योग्य. पुशिंग तसं अद्याप दिसत नाहीये. ते आले, सरचिटणीस झाले वगैरे खरं. बट ही इन अ वे डिलिव्हर्ड. उत्तर प्रदेशचा कार्यभार त्यांच्याकडं होता. तिथं एकाकडी स्थानावरून कॉंग्रेस एकदम विसाच्या आसपास जाताना दिसतेय. कॉंग्रेस जिंकेल किंवा नाही, तो भाग वेगळा. पण तिथं सप, बसपला जवळपास सारख्याच ताकदीत कॉंग्रेस रोखून पाहतेय हे महत्त्वाचे.

भडकमकर मास्तर's picture

16 May 2009 - 1:27 pm | भडकमकर मास्तर

एक्झिट पोलवाल्या या सगळ्या इन्टेलेक्चुअल बडबडसम्राटांची यू पी ए ला मिळालेल्या ( किंवा सध्या आघाडीवर असलेल्या ) २५० च्या आसपास सीटा पाहून वाट लागली ते पाहून अत्यानंद झाला...

अन्दाज चुकला तरी फारतर ४० सीटांचा फरक पडेल म्हणाले होते प्रनॉय रॉय साहेब... हा तर ७० सीटांचा फरक... :) ( विकट हास्य स्माईली)

कोणाचे का होईना, ष्टेबल सरकार येणार असे दिसते...

लोकशाहीचा विजय असो....

_____________________________
आवाज खालच्या सप्तकात बोलायला हवा असेल तर खर्जाचा रियाज करा.... ;)

क्लिंटन's picture

16 May 2009 - 4:07 pm | क्लिंटन

चला मोठेमोठे एक्झिट पोलवाले चुकले तर काहीही विदा हाताशी नसताना केलेले माझे ’गेस्टिमेट’ चुकले यात कमीपणा वाटायला नको.माझे काही राज्यांतील अंदाज बहुतांश बरोबर आले आहेत, काही राज्यात ट्रेंड तरी बरोबर आहे आणि काही राज्यात माझे अंदाज पूर्ण झोपले आहेत.अधिकृत निकाल जाहिर झाल्यावर माझे अंदाज किती चुकीचे/बरोबर होते हे मिपावर प्रसिध्द करेनच.

**************************************************************
विल्यम जेफरसन क्लिंटन

माझी मराठी अनुदिनी
माझी इंग्रजी अनुदिनी

**************************************************************

नितिन थत्ते's picture

16 May 2009 - 3:38 pm | नितिन थत्ते

मनमोहनसिंग पुन्हा पंतप्रधान झाले तर कारकीर्द पूर्ण करून पुन्हा पंतप्रधान बनणारे नेहरूंनंतरचे पहिले पंतप्रधान होतील.

सरकारात असलेल्या पक्षाने पुन्हा सरकार स्थापन करणे हे ही खूप वर्षांनंतर घडत आहे.(१९७१ नंतर प्रथम?)

खराटा
(रंग माझा वेगळा)