तुम्ही कुणाला मत दिले/देणार ? का ?

मुक्तसुनीत's picture
मुक्तसुनीत in काथ्याकूट
29 Apr 2009 - 1:37 am
गाभा: 

धागा सोपा आहे. त्याचा विषय वर लिहिल्याप्रमाणे , तुमचे मत आजमावण्याचा आहे. मला स्वतःला लोकसभेच्या निवडणुकीमधे मतदान करता आलेले नाही. पण इतर लोकांची मते काय , कशी याबद्दल उत्सुकता आहे.

तुमच्या मतदानाच्या गुप्ततेबद्दल तुम्हाला काळजी असेल तर येथे नाही लिहिलेत तरी चालेलच. मत द्यायला तुम्ही पात्र नसाल/ गैरहजर असाल तरीसुद्धा आपले राजकीय मत तुम्हाला मांडता येईल. इतरांना काय म्हणायचे आहे ते ऐकावेसे वाटले म्हणून हा प्रपंच.

तर मंडळी , या निवडणुकीत तुम्ही कुणाला मत दिले/देणार ? का ? ते पक्ष पाहून दिले का व्यक्ती पाहून ?

प्रतिक्रिया

बेसनलाडू's picture

29 Apr 2009 - 1:45 am | बेसनलाडू

व्यक्ती व तिचे काम पाहून दिले असते.
(मतदार)बेसनलाडू

पिवळा डांबिस's picture

29 Apr 2009 - 4:18 am | पिवळा डांबिस

सहमत आहे!!

श्रावण मोडक's picture

29 Apr 2009 - 2:19 am | श्रावण मोडक

प्रश्न अवघड आहे. माझे मत उघड करणार नाही. कारण, ते आहे नकारात्मक मताचा पुरस्कार करणारे. सध्याच्या त्या तथाकथित ४९-ओ सारखे नाही. 'मी कुणालाही निवडलेले नाही' याही माझ्या मताचे एक मूल्य आहे आणि ते मान्य करणारी व्यवस्था हवी असे मानणारे माझे मत आहे.
पुणे :
मुख्य उमेदवार: सुरेश कलमाडी (कॉंग्रेस), अनील शिरोळे (भाजप), डीएसके (बसप), रणजित शिरोळे (मनसे), अरूण भाटीया (स्वतंत्र किंवा अपक्ष), विक्रम बोके (स्वतंत्र). कोणाला निवडावे?
(यातील शेवटच्या दोघांना मी मुख्य मानतो याचा अर्थ ते रेसमध्ये खऱ्या अर्थाने आहेत असा नाहीच. उमेदवार एवढेच क्वालिफिकेशन).
कलमाडी - रिसोर्सफुल, म्हटले तर दिशा देऊ शकणारा राजकारणी. पण पारंपरिक राजकारणात लटकलेला. त्याच्या सोबतचे पाहिले तर कलमाडींना राजकारणी का म्हणावे असा प्रश्न यावा. पक्ष कॉंग्रेस, म्हटले तर ही ताकद. पण याच कॉंग्रेसचे तेच कलमाडी आणि त्यांचे तेच ते राजकारण. निवडणूक लोकसभेची आणि यांची बहुतांश भाषणे पुणे शहराचे काय करणार याविषयी. गेली कित्येक वर्षे सत्ता भोगल्यानंतरची. माझे मत यांना जाऊ शकत नाही. सिंम्पली नॉट फिट टू बी माय रिप्रेझेंटेटिव्ह.
अनील - वैयक्तिक अत्यंत सुस्वभावी. तोच वीकनेस. पक्ष भाजप. माझे मत यांना जाऊ शकत नाही. हा गृहस्थ स्वतंत्र उभा असता तर मी यांना खचितच मत दिले असते.
डीएसके - उद्योजक वगैरे ठीक. त्यापलीकडे जाणिवा चांगल्या. म्हणजे प्रचारादरम्यान झोपडीत गेल्यावर तिथल्या समस्या उमगल्या, निवडून येईन, न येईन, त्यांच्यासाठी काम करेन म्हणण्याची हिंमत त्यांच्यात आहे. पण राजकारणी आहे पक्का हा गृहस्थ. प्रचाराच्या अखेरच्या दिवशीच मी सावरकरवादी आहे हे हा गृहस्थ सांगतो (विषय सावरकरवादाचा नाही, उमेदवार अखेरच्या क्षणी कोणती गोष्ट चलनी नाणे म्हणून वापरू पाहतो हा आहे. सावरकरवाद हा चलनी नाणे खचितच मानता येणार नाही. तो वाद कोणाला मान्य असो वा नसो. कारण तसे मानले तर प्रतिवाद करण्याचे कारण रहात नाही. प्रतिवाद करण्याकरीता तरी तो एक 'वाद' आहे हे मानावे लागेल). पुढे काय करेल? स्वतंत्र असता तर माझे मत या पारड्यात पडले असते. कारण त्या स्थितीत यांना शेवटच्या दिवशी मी सावरकरवादी हा साक्षात्कार होण्याची गरज नसती पडली.
रणजित शिरोळे - युवक, वेगळा विचार करू शकणारा. भाऊसाहेबांचा वारसा न सांगताच निवडणुकीत उतरलेला. आणि तो वीकनेसही. ठीक. पक्ष? मनसे!!! राज ठाकरे जे बोलतात तसे वागतील? शंका आहे. जिथे या पक्षाला सत्तास्थाने मिळाली आहेत तेथे काय घडते आहे हे, हा एरवी प्रत्येक प्रचार सभेत कागदपत्रे घेऊन (जणू ठोस पुरावे आहेत अशा थाटात) बोलणारा performer नेता बोलत नाही याचा अर्थ काय? यांना माझे मत जाऊ शकत नाही.
भाटिया - चांगला नोकर(शहा). कंस महत्त्वाचा. दिशा आहे का? आहे. मार्ग आहेत का? नाहीत. कारण स्वभाव एककल्ली. पण एक आहे, इतरांच्या तुलनेत माझा कल यांच्याकडे अधिक असता.
विक्रम बोके - अगदी काही काळापूर्वीपर्यंत हे गृहस्थ मनसेत होते. तेथून का बाहेर पडले हेच कळले नसल्याने हा उमेदवार माझ्या लेखी गारद.

सहज's picture

29 Apr 2009 - 7:23 am | सहज

मत दिले भाटीया यांना. ते निवडून येतील याबद्दल खूपच शंका आहे पण जे दोन पक्ष देशाच्या राजकारणात प्रमुख भूमीका करु शकतात, (काँग्रेस व भाजप )त्या दोन्ही पक्षांनी त्यांना (बिन्धास्त) मत द्यावे असे काही केले नाही.

त्यामुळे व मतदान करायचेच म्हणून (बरे असतील, निदान अगदी वाईट राजकारण करणार नाही म्हणून) भाटीया यांना मत दिले.

डीएसके निवडून येउ शकतात का? समजा भाजप व काँग्रेस यांची ताकद कमी होउन (व तसेच मायावती यांना कमी जागा मिळाल्या) तिसरी आघाडी आली तर पवारांना पंतप्रधानपद मिळेल का?

एकदम अवांतर - भाजप व काँग्रेस पोस्ट इलेक्शन युती झाली तर? :-)

मुक्तसुनीत's picture

29 Apr 2009 - 7:17 am | मुक्तसुनीत

लोकसभा निवडणुकांकरता भाजप/शिवसेनेची राज्यभर युती आहे का ?

छोटा डॉन's picture

29 Apr 2009 - 7:36 am | छोटा डॉन

>>लोकसभा निवडणुकांकरता भाजप/शिवसेनेची राज्यभर युती आहे का ?
हो म्हणायला हरकत नसावी, मात्र छातीठोकपणे "हो" म्हणु शकत नाही.
ऑन पेपर आणि मिडीयाला दाखवायला मात्र ह्या दोघांची अतुट आणि पक्की युती आहे, ह्यांचे प्रमुख नेते ह्याची नेहमीच खात्री देत असतात ...

मात्र,
१. बर्‍याच ठिकाणी (३-४ जागा ) कोणती जागा कोण लढवणार ह्यावरुन वाजले असल्याने तिथे युतीतला दुसरा पक्ष काम करेलच असे नाही. नेते सभांना जरुर हजरी लावतील मात्र ग्रास रुटवरचे कार्यकर्ते कुणामागे होते हे सांगणे निकालानंतर शक्य होईल.
२.खुद्द भाजपामध्येच गडकरी वि. मुंढे कसा कलगीतुरा चांगलाच रंगला असल्याने ह्यांचे निष्ठावंत कुणासाठी काम करतात हे सांअग्णे अवघड असेल. २-३ ठिकाणी मुंढे समर्थकांची तिकीटे कापली गेल्याने कार्यकर्ते हे पक्षाचा आदेश पाळणार की मुंढेंचा हे उघडपणे सांगणे अवघड आहे ...
३. युतीची घोषणा व्हायच्या आधीच दुसर्‍या फळीतल्या अपरिपक्व नेत्यांनी बरीच उलटसुलट विधाने करुन "कटुता" वाढवली असल्याने एकदिलाने प्रचार झाला असेल ह्यावर माझा विश्वास नाही ...
अर्थात पारंपारिक मतदारसंघात ही समस्या ठरणार नाही ...
४. शिवसेनेचे काही खासदार निवडुन आणण्यासाठी त्यांनी राष्ट्रवादीशी छुपे संधान बांधल्याची चिन्हे आहेत ( उदा : सिंधुदुर्ग , निलेश राणे वि. सुरेश प्रभु ). अर्थात ह्याची परतफेड त्यांना काही मतदारसंघात छुपेपणाने भाजपा विरुद्ध काम करुन राष्ट्रवादीला फायदा देण्यासाठी करावी लागेल..
५. दोन्ही पक्षांचे बडे नेते एकाच व्यासपिठावर यायचे टाळतात ...
ज्यावेळी आडवाणींची मुंबईत सभा होती तेव्हा ती टाळुन उद्धव हे दुसरीकडे प्रचारासाठी निघुन गेले ...
६. सामनामधुन आधी "जेव्हा मराठी माणसाचा उत्कर्षासाठी काही वेगळे निर्णय घ्यावे लागतील तेव्हा आमचे हात आशिर्वादासाठी नेहमीच तयार असतील. तसेही मुंढेंना मातोश्रीवर येऊन बरेच दिवस झाले ... वगैरे" भाषा वापरलेले "अग्रलेख" झळकले होते.

असो.
तरीही तुर्तास "शिवसेना-भाजपा" युती आहे ...

------
( बंडखोर ) छोटा डॉन
एखादा "प्रण अथवा रिझॉल्युशन" म्हणजे काय ? जास्त काही नाही, मस्त गाजावाजा करुन ८ दिवसातच पहिली पाने पंचावन्न करणे.
आता आमचा "लेखन न करण्याच्या" प्रतिज्ञेचेच पहा ना ... ;)

llपुण्याचे पेशवेll's picture

29 Apr 2009 - 10:45 am | llपुण्याचे पेशवेll

शिवसेनेचे काही खासदार निवडुन आणण्यासाठी त्यांनी राष्ट्रवादीशी छुपे संधान बांधल्याची चिन्हे आहेत ( उदा : सिंधुदुर्ग , निलेश राणे वि. सुरेश प्रभु ). अर्थात ह्याची परतफेड त्यांना काही मतदारसंघात छुपेपणाने भाजपा विरुद्ध काम करुन राष्ट्रवादीला फायदा देण्यासाठी करावी लागेल..


हेच चित्र बहुतेक सर्व मित्रपक्षांत आहे. जसे पुण्यात कलमाडीला पाडायचे म्हणून अजितदादांचे लोक पुण्यात कलमाडीचा प्रचार करत नव्हते. अनिल भोसले, काकडे असे अजितदादांच्या गटातील लोकानी काँग्रेसचा प्रचार केल्याचे दिसत नाही. तसेच आझमभाई पानसरे यांच्याही प्रचारात अजितदादांचे लोक दिसले नाहीत अशी खबर आहे.
मनसेने देखील मुंबईत जेथे शिवसेनेचे उमेदवार उभे आहेत तेथे तेथे त्यांचे एकदम मजबूत उमेदवार उभे केले आहेत पण जेथे भाजपा आहे तेथे मात्र तितके प्रबळ उमेदवार उभे केलेले नाहीत.
हल्ली राजकारण म्हणजे फक्त स्वार्थकारण म्हणून शिल्लक आहे. बाकी काही नाही.

पुण्याचे पेशवे
एरवी सगळे कागद सारखेच. फक्त कागदाला अहंकार चिकटला की त्याचे सर्टीफिकेट होते.
Since 1984

रम्या's picture

29 Apr 2009 - 11:21 am | रम्या

एक (कदाचित फ्रेंच) म्हण मटा मध्ये वाचली होती. निवडणूक म्हणजे खूप वाईट आणि कमी वाईट यांच्यातील निवड!
सगळ्यांच्या दोषांचं समालोचन करत बसलो तर नुसतेच बसून राहू.
शेवटी हे राजकारण! संधी साधू पणा, बेरकी पणा, प्रसंगी पलटवार हे सगळं आलच. ज्याला गांधींसारख्या तथाकथित परिपूर्ण उमेदवाराला मत द्यायचं आहे त्याला राजकारणातलं काही कळत नाही असं खुशाल समजावं!
आम्ही येथे पडीक असतो!

विद्याधर३१'s picture

29 Apr 2009 - 7:13 am | विद्याधर३१

मनसे ला करण्याची खूप इच्छा होती. :( :(
पण बारामती मतदारसंघात त्यानी उमेदवारच ऊभा केला नव्हता.
पण शेजारच्या पुण्यात असतो तर नक्कि मनसे.

एक चान्स द्यायला काय हरकत आहे.
विद्याधर

मनीषा's picture

29 Apr 2009 - 7:41 am | मनीषा

देता आले नाही ..
पण भारतात असते तर नक्कीच दिले असते ..
काही लोक म्हणतात मत देउन उपयोग काय ? नेहमीचेच लोक निवडून येणार आणि पुढील ५ वर्ष सगळं काही तसच चालणार ..
पण मला वाटते मत नक्की द्यावे .. आपण मत दिलेला उमेदवार निवडून जरी आला नाही तरी मतांच्या संख्येवरुन त्याला कळू शकत कि आपल्याला किती लोकांचा पाठिंबा आहे .. आणि कदाचित त्याचा काम करण्याचा हुरुप वाढेल . आणि निवडून आलेल्या उमेदवाराला सुद्धा जणिव राहील, कि त्याच्या विरोधात किती जण आहेत?

१ ) मी उमेदवाराचा पक्ष कोणता आहे हे सर्व प्रथम विचारात घेईन कारण ही राष्ट्रीय निवडणूक आहे .. माझ्या विचारांशी सुसंगत असलेला पक्षच मी निवडीन
२) त्या नंतर उमेदवाराचे काम ( इतर उमेदवारांच्या केलेल्या कामाच्या तुलनेत) आणि काम करण्याची पद्धत विचारात घेईन .
३) नंतर उमेदवाराचे चारित्र आणि त्याची राजकीय कारकीर्द .

अर्थात या सगळ्याच गोष्टी एका उमेदवारात सापडणे मुष्कील आहे . या तीन निकषांच्या कसोटीवर जास्तीत जास्त जो खरा ठरेल त्यालाच मी मत देईन.

प्रदीप's picture

29 Apr 2009 - 10:49 am | प्रदीप

म्हणतो.

१ ) मी उमेदवाराचा पक्ष कोणता आहे हे सर्व प्रथम विचारात घेईन कारण ही राष्ट्रीय निवडणूक आहे .. माझ्या विचारांशी सुसंगत असलेला पक्षच मी निवडीन

लोकसभेच्या निवडणूकांच्या संदर्भात हा विचार अगदी महत्वाचा आहे. वर काही जणांनी 'व्यक्ति आणि तिचे काम पाहून मत दिले असते' (बेसनलाडू व पिवळा डांबिस) असे लिहीले आहे. त्यांना माझा प्रश्न आहे, ते जिथे रहातात त्या अमेरिकेतल्या निवडणूकातही ते हाच निकष वापरतात का? (दुसर्‍या तर्‍हेने हेच विचारयचे झाल्यासः भारतातील एकंदरित राजकिय पक्षांची अनागोंदी पाहून, निराशेपोटी त्यांनी मत देण्याचा हा निकष ठरवला आहे का?)

अरूण भाटिया इ. जी तडफदार मंडळी आहेत त्यांच्याबद्दल मला वाटणारी भीति मोडकांनी अचूक व्यक्त केली आहे. असली सगळी माणसे निस्पृह इ. असली तरी अगदी हेडस्ट्राँग असतात. त्यांना कुठल्याही पक्षशिस्तीत रहाता येणे कठीण. तेव्हा ते जर कुठल्या पक्षाचे असलेच तरीही उद्या ते काय करतील, कुठली भूमिका घेतील ह्याबद्दल नेम नाही. अपक्ष असल्याने तर पक्षशिस्तीचाही प्रश्न उद्भवत नाही.

मराठी_माणूस's picture

29 Apr 2009 - 10:55 am | मराठी_माणूस

ते जिथे रहातात त्या अमेरिकेतल्या निवडणूकातही ते हाच निकष वापरतात का?

निकष वगैरे दुरची गोष्ट आहे, मतदानाचा अधिकार तरी आपल्यातल्या कितिजणाना तिथे असतो

प्रदीप's picture

29 Apr 2009 - 11:08 am | प्रदीप

माझ्या प्रश्नामुळे गैरसमज होण्याची शक्यता होती म्हणून मी खुलासा कंसात लिहीलेला होता, तरीही अशी प्रतिक्रिया आल्याने अजून खुलासेवार लिहीत आहे:

मतदानाचा अधिकार आहे असे गृहित धरुया. (मी स्वतः परदेशात रहातो व मला येथे मतदानाचा अधिकार आहे). तो मुद्दा नाही.

माझ्या प्रश्नाचा रोख ही अशी भूमिका केवळ निराशेपोटी आली आहे का, हा आहे. माझ्यापुरते सांगायचे तर मी अमेरिकेतील, युरोपातील, ब्रिटनमधील लोकशाही प्रगल्भ समजतो. तिथे मोजकेच दोन/ तीन पक्ष असतात, त्यांच्या स्पेसिफिक भूमिका असतात. त्यामुळे तुम्ही तुमचे मत त्यातील एकाशी सहज अलाईन करू शकता.भारतात ही परिस्थिती नाही. प्रमुख राजकिय पक्षच जवळजवळ सर्वच महत्वांच्या प्रश्नांबाबत अगदी शॉर्ट साईटेड स्वार्थी भूमिका घेतात, त्या वारा वाहील त्यानुसार बदलत रहातात. त्यातून प्रादेशिक पक्षांचे तर विचारयलाच नको. त्यातून ह्या जवळजवळ सर्वच पक्षांच्या म्हातार्‍या पूढार्‍यांची एकमेकांवर मात करण्याची शर्यत. ह्या सगळ्या पाश्वभूमिवर अनेक सुशिक्षीत लोकही ह्या मताप्रमाणे मत व्यक्त करतांना आढळतात. तेव्हा ज्यांना अमेरिकेतील लोकशाहीचा जवळून परिचय आहे, ते तिथेही अशीच भूमिका घेतील का (वैयक्तिक मतच तसे असावे) ?

पिवळा डांबिस's picture

29 Apr 2009 - 9:02 pm | पिवळा डांबिस

श्री प्रदीप,
तुम्ही हा सुंदर मुद्दा उपस्थित केला आहे.
मी माझे मत वर लिहिल्याप्रमाणे योग्य व्यक्ती बघून देतो/ दिले असते. भारतात असतांनाही तेच करत होतो आणि आता परदेशात असतांनाही तेच करतो. माझी ही भूमिका निराशेपोटी आलेली नाही. मी पक्षीय पातळीवर स्वतःला बांधून घेतलेलं नाही. याचं कारण असं की पक्षाचा जाहीरनामा काहीही असो शेवटी सत्तासाधन हेच ध्येय आणि राजकारण हेच साधन असतं! मग तो देश कोणताही असो. अशावेळी जर चांगली माणसं निवडून दिली गेली तर किमान देशहित म्हणजे काय याचं त्यांना आकलन होऊ शकतं आणि मग इतर मतभेद कितीही असले तरी काही कोअर बाबींवर त्यांच्यात एकवाक्यता असू शकते ही माझी धारणा! कदाचित बालिश असेल पण तशी आहे खरी...
मी रहातो त्या देशात लोकशाहीची पद्धत आपल्यापेक्षा जरा वेगळी आहे. इथे राष्ट्रप्रमुख हा डायरेक्ट जनतेतून निवडला जातो (इलेक्टरेल कॉलेज जरा बाजूला ठेवूया) एकदा निवडून आल्यावर त्याला कोणालाहि आपल्या मंत्रिमंडळात घ्यायची मुभा असते. त्यासाठी त्याला निवडून आलेल्या सदस्यांवरच अवलंबून रहावं लागत नाही. त्याच्या हातात आपल्या पंतप्रधानापेक्षा खूप जास्त पॉवर असते. त्यामुळे पक्षीय मतदानापेक्षा व्यक्ती बघून मतदान करणं हे जास्त महत्वाचं ठरतं. इथे आता बरेच लोक आपलं पारंपारिक रिपब्लिकन/ डेमोक्रॅट अलायनेशन बदलून "इंडिपेडंट" हे अलायनेशन स्वीकारत आहेत. त्यामुळे एकाच भागातून वेगवेगळ्या पक्षाचे लोक निवडून दिले जाऊ शकतात पण ते जर सुजाण असतील तर त्यामुळे फारसं काही बिघडत नाही. उदा. मी रहात असलेल्या कॅलिफोर्निया राज्यातून डेमोक्रॅट ओबामांना स्पष्ट बहुमत मिळालं. त्याच राज्याचा गव्हर्नर मात्र रिपब्लिकन आहे. राज्यसभेवर (सेनेट) निवडून गेलेले दोन्ही सदस्य डेमोक्रॅट्स आहेत. आणि पुन्हा आमच्या मतदारसंघातून लोकसभेवर (हाऊस) गेलेला माणूस रिपब्लिकन आहे. पण असे असूनही काही फारशा समस्या उद्भवलेल्या नाहीत.
प्रत्येक पक्षाचे दोन प्रकारचे अजेंडा (अग्रक्रम?) असतात. आर्थिक आणि सामाजिक. एका पक्षाचे दोन्ही अजेंडा तुम्हाला जवळचे वाटत असतील तर उत्तमच, पण प्रत्येक वेळी ती परिस्थीती असेलच असं नाही. अशावेळी तुम्हाला जास्त जिव्हाळ्याची भूमिका घेणारा माणूस प्रतिपक्षातील असू शकतो. मग त्याला मत देण्यात काहीच गैर नाही....
भारतातील लोकशाही ही तशी नवी आहे. त्यातच बराचसा काळ राष्ट्रीय पक्षांकडे सत्ता असल्याने त्यांनी हे जनमानसात बिंबवलं आहे की जर त्यांना मत नाही दिलं तर सरकारं कोसळून अस्थैर्य येईल. काही प्रमाणात ते खरं आहे, पण स्थिर सरकारंही कॉम्प्लेसंट होऊन अकार्यक्षम होऊ शकतात हे आपण आपल्या इतिहासात पाहिलं आहेच. मला विचाराल तर मला सुजाण लोकांनी बनवलेलं, काम करणारं ,अस्थिर सरकार हे काम न करणार्‍या, पण बहुमताच्या आधारे स्थिर, सरकारापेक्षा जास्त पसंत आहे.
हे झालं आपलं माझं मत! :)
तुम्हाला काय वाटतं ते जाणून घेण्यास उत्सुक आहे...
आपला,
पिवळा डांबिस

विकास's picture

30 Apr 2009 - 6:59 am | विकास

पिडांच्या मताशी मी बर्‍याच अंशी सहमत आहे. मात्र, अमेरिकन आणि भारतीय पद्धती या "ऑरेंज/ऍपल" इतक्या भिन्न आहेत. त्यामुळे अमेरिकेत मत देण्याची वेळ आल्यास जे काही होईल तेच भारतात होईल, तर त्याचे उत्तर कदाचीत नाही असे होईल.

आता भारताच्या बाबतीत मला काय वाटते? - ज्या ज्या लोकांना मी काही करा पण मतदान करा असा आग्रह करत होतो, तेंव्हा कुठल्याही एका पक्षाच्या वतीने ते करत नव्हतो, पण उदासीन झालेल्या जनतेने नागरी कर्तव्य पार पाडावे. त्यावर कायम एक उत्तर मिळते सर्व राजकारणी चोर आहेत काही उपाय नाही वगैरे वगैरे... म्हणून त्या अर्थी मला वाटते की दर पाच वर्षांनी सत्तांतर होणे हे दूरदृष्टीने विचार केल्यास महत्वाचे आहे. कारण त्यातून एका पक्षाला/युतीला माज न येता जनतेसाठी काम करायची कालांतराने सवय लागायची शक्यता आहे. नाहीतर जनता "फायर" करू शकते हे समजेल. आणि ते एखाद्याला नाही कारण तसे कायमच घडते तर संपूर्ण पक्षाला समजणे महत्वाचे आहे. जे केंद्रात, तेच राज्यात आणि स्थानीक पातळीवर.

वर पिडांनी म्हणल्याप्रमाणे, कधी काळी मुंबई-ठाण्यापुरते बोलायचे तर झाले होते : केंद्रात राजीवच्या इंकॉला, राज्यात पुलोदला तर स्थानीक पातळीवर शिवसेनेस (भाजपला तेंव्हा स्थान नव्हते), जनतेने निवडून दिल्याचे आठवते (अर्थात पुलोदला काही मतांनी राज्य मिळाले नव्हते ही देखील त्यात वस्तुस्थिती होती).

थोडक्यात मी जरी मत दिले नसले तरी अनेकांना सांगताना इतकेच सांगितले की: आधी मत द्यायला जा. त्यात जमल्यास आत्ताच्या विरोधात राष्ट्रीय युतीस मत द्या. मात्र त्यातील उमेदवार हा जर आधीचा लोकप्रतिनिधी असेल अथवा नक्की चांगला नसेल तर त्याला विरोधात कुणालाही द्या...

बाकी पुण्याच्या बाबतीत मला भाटीया काही पटले नाहीत: जे संकेतस्थळावर साधे स्थानीक भाषेत लिहू शकत नाहीत ते स्थानीक लोकांची काय किंमत करणार. आणि शिवाय उगाच ऑनेस्टीचे नगारे पिटणारे हे सात्विक असला तरी अहंकारापोटी जनतेचे काही भले करतील असे वाटत नाही. मग त्या संदर्भात जर काँग्रेस अथवा भाजपा आवडत नसेल तर "हाथी नही गणेश है!" म्हणा असे सांगावेसे वाटले.

पण याहून महत्वाचे असे की एक मतदान केले की पुढची पाच वर्षे निवडून गेलेले लोकप्रतिनिधी आणि जनता हे तंगड्या वर करून निवांत बसायला मोकळी झाली का? त्याला लोकशाही म्हणायचे का?

बाकी या निवडणूकीच्या काळात माझे दोन लेख (ब्लॉग) आयबीएनवर येण्याचा योग आला होता. वेळ घालवण्यासाठी काहीच नसेल तर अवश्य वाचा :-)

आज अचानक चर्चीलचे (किंवा त्याच्या नावावर खपवलेले) एक वाक्य वाचायला मिळाले:

"The best argument against democracy is a five-minute conversation with the average voter." - Winston Churchill

प्रदीप's picture

2 May 2009 - 8:44 am | प्रदीप

सर्वप्रथम आपण व विकास ह्यांनी सविस्तर उत्तरे लिहील्याबद्दल आभार. आपण माझे मत विचारले आहे, ते इथे नोंदवतो.

.... अशावेळी जर चांगली माणसं निवडून दिली गेली तर किमान देशहित म्हणजे काय याचं त्यांना आकलन होऊ शकतं आणि मग इतर मतभेद कितीही असले तरी काही कोअर बाबींवर त्यांच्यात एकवाक्यता असू शकते ही माझी धारणा! कदाचित बालिश असेल पण तशी आहे खरी...

आपली धारणा बालिश नक्कीच नाही आणि आपण अमेरिकेत ह्याचा प्रत्यक्ष अनुभव घेत आहात. पण मला वाटते, भारताच्या संदर्भात ह्याला मुरड घालणे आवश्यक आहे. कारण अमेरिका, ब्रिटन व इतर युरोपिय देशांप्रमाणे आपली लोकशाही प्रगल्भ नाही. तसेच आपल्या व प्रगत देशांतील लोकांच्या कार्यपद्धतित, अनेक वर्षे त्यांच्याबरोबर अगदी खाजगी का होईना, संस्थापनेत काम केल्यावर मला जे जाणवले ते हे की त्यांना टीमवर्क आपल्यापेक्षा खूपच चांगले जमते. आपल्यात ह्याचा बर्‍यापैकी अभाव आहे. त्यामुळे आता आपल्या येथे भाटियांसारखे तडफदार, स्वतंत्र वगैरे बाण्याचे जे नेते येत आहेत, ते व्यक्तिश: (इंडिपेंडंट) म्हणून सरकारात एकत्र आले तर संघटित कार्य कितपत करू शकतील ह्याबद्दद्ल मी तरी साशंक आहे. जुन्या पिढीच्या भारतीय नेत्यांप्रमाणे ते अगदीच निव्वळ फालतू व्यक्तिगत राजकारण करणार नाहीत, हे निश्चीत, पण कुठल्याही महत्वाच्या विषयावर त्यांच्यात कितपत एकवाक्यता होऊ शकेल, हे पहाणे जरूरीचे आहे. तेव्हा माझ्या मते भारतात सर्वच पातळीवर राजकीय पक्षांचा विचार करून मते देणे हे रास्त ठरेल.

बेसनलाडू's picture

29 Apr 2009 - 11:08 am | बेसनलाडू

१. अमेरिकेत मतदानाचा अधिकार नसल्याने प्रश्नच उद्भवत नाही. मत दिले नाही/देता येत नाही.
पण तसा अधिकार असता तर -
२ अ. व्यक्ती पाहून आणि तिचे काम पाहून मत दिले असते.
२ ब. नोंदणीकृत रिपब्लिकन् अथवा नोंदणीकृत डेमोक्रॅट् असतो, तर त्यानुसार मतदान केले असते.
(ठाम)बेसनलाडू

प्रदीप's picture

29 Apr 2009 - 11:17 am | प्रदीप

मला वाटते तुमचे उत्तर व माझा (अजून) खुलासा एकमेकांना क्रॉस झाले.

तुमचे मत समजले. तरीही

"२ अ. व्यक्ती पाहून आणि तिचे काम पाहूनच मत दिले असते.
२ ब. नोंदणीकृत रिपब्लिकन् अथवा नोंदणीकृत डेमोक्रॅट् असतो, तर त्यानुसार मतदान केले असते."

ह्यातील विरोधाभास कळला नाही. समजा तुमच्या येथे रिपब्लिकन व्यक्ति 'चांगली' आहे व तिचे <<कार्यही चांगले >> आहे. पण ती तिचे कार्य तिच्या पक्षाच्या चौकटीत राहूनच करणार ना? आणी समजा तुम्ही आहात डेमोक्रॅट, लिबरल वगैरे मतांचे. म्हणजे त्या व्यक्तिचे जे काही 'चांगले' कार्य आहे ते तुमच्या मान्य मतांच्या अगदी विरूद्ध असेल की! मग ह्या दोघांची सांगड तुम्ही कशी घालणार?

बेसनलाडू's picture

29 Apr 2009 - 11:36 am | बेसनलाडू

२अ. व २ब. म्युच्युअली एक्स्क्लुजिव् प्रकारचे आहेत; पण व्यक्ती व तिचे काम (माझ्यासाठी) महत्त्वाचे असल्याने २अ. प्राधान्यक्रमाने २ब च्या आधी लिहिले इतकेच.
(प्राधान्यक्रमी)बेसनलाडू
अर्थात व्यक्ती व तिचे काम हे स्थानिक पातळीवर (महानगरपालिका/नगर परिषद/ग्रामपंचायत इ.) जास्त महत्त्वाचे तर राष्ट्रीय पातळीवर राष्ट्रीय पक्षांची धोरणे व काम महत्त्वाचे ठरते, असे वाटते (अमेरिकेसारख्या देशाच्या बाबतीत याचा विशेष करून प्रत्यय येतो. कारण त्यांच्या सत्ताधारी पक्षाच्या धोरणांचे, निर्णयांचे दूरगामी परिणाम जगावर होतात) त्यामुळे लोकसभा निवडणुकीत व्यक्तीविचाराबरोबर पक्षविचार करणे गरजेचे आहे, असे वाटते. मात्र व्यक्तिशः मला राष्ट्रीय धोरणांचा विचार करता शिक्षण, रस्ते, आरोग्य, रोजगार इ. बाबी महत्त्वाच्या वाटतात; ज्या स्थानिक पातळीवर (बॉटम् अप् प्रकारे) अधिक चांगल्या प्रकारे हाताळून मग राष्ट्रीय पातळीवर संघटित व विस्तारीत करता येतात.
व्यक्ती व तिचे काम यावरून मत याला स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत तरी पर्याय नसावा, असे (मला) वाटते.
(स्थानिक)बेसनलाडू

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

29 Apr 2009 - 8:32 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

आमच्याकडे गेले दोन पंचवार्षिकला शिवसेना निवडून येते, आणि याहीवेळेस तेच निवडून येतील असे वाटते. मुस्लीमांवर वचक राहावा म्हणून गेले काही वर्ष इथे सेनेचे प्राबल्य वाढले आहे, असे असले तरिही ग्रामीण भागातील मतदारांनी शांतीगिरी महाराजांना (अपक्ष उमेदवार ) मतदान केले आहे. शांतीगिरी महाराजांना संसार नाही, त्यामुळे ते निवडून आले तर, भ्रष्टाचार होणार नाही. विकास झाला तर झाला ,नाही तर किमान गावा-गावात सप्ते तरी घालतील ही सामान्य भोळ्या माणसाची अपेक्षा. मात्र या दोघांच्या लढतीत काँग्रेसचा उमेदवारही बाजी मारु शकतो. बदल आवश्यकच असतात तेव्हा बदल झाला पाहिजे असे वाटते. आमच्या घरात पहिल्यांदा मतांची विभागणी झाली, चार काँग्रेस तीन अपक्ष ! :)

एका बूथवर मतदान केंद्राध्यक्ष असल्यामुळे कागदपत्राची पूर्तता करणे जमले नाही, त्यामुळे मतदानापासून वंचीत राहिलो.

-दिलीप बिरुटे

निखिल देशपांडे's picture

29 Apr 2009 - 10:07 am | निखिल देशपांडे

आमची पण हिच गत... ह्याच मतदारसंघात मतदान करण्यासाठी धडपडत मुंबईहुन औरंगाबादला गेलो. मत कोणाला द्यायचे ते शेवट पर्यंत ठरत नव्हते. शिवसेनेचे उमेदवार मागच्या दोन वेळापासुन खासदार असल्या मुळे त्यांना मतदान करायची इच्छा नव्हती. दुसरे उमेदवार काँग्रेस चे,त्यांना मतदान का करावे हे पण कळले नाही. तिसरे अपक्ष शांतिगिरी महाराज, कुठल्याही महाराजांनी राजकारणात उतरी नये असे माझे मत त्यामुळे ते पण बाद झाले. उरले मनसे पुरस्कृत उमेदवार सुभाष पाटील ह्यांना तर ह्यांचा फॉर्म सुद्धा नीट भरता आला नाही, आणी त्यांना अपक्ष म्हणुन लढवावे लागले. आता रीपाई एकतावादी गटाला मत द्यायचे होते पण नाही देवु शकलो. हातच नाही गेला त्या बटना कडे
तर आमच्या घरातली मतदारांची विभागणी एक कॉग्रेस, एक शिवसेना, एक मनसे.

शांतीगिरी महाराजांना संसार नाही, त्यामुळे ते निवडून आले तर, भ्रष्टाचार होणार नाही.
भ्रष्टाचार फक्त पोराबाळांसाठी होतो असे तुम्हाला म्हणायचे आहे का??? मला तर वाटते खासदार म्हणुन खैरे (शिवसेना खासदार) ह्यांनी केलेल्या मदतीकडे डोळा ठेवुन हे उभे राहीले आहेत. आणी आता सौंसार नाही तरी त्यांचे भक्त आहेच, भक्तांसाठी भ्रष्टाचार होईल.

एकुन आमच्या कडे ह्यावेळेस शिवसेना पडेल असेच वाटते
==निखिल
आमचा सध्याचा संशोधनाचा विषय :- मुंबईतिल रिक्षांचे मिटर

प्रकाश घाटपांडे's picture

29 Apr 2009 - 9:17 am | प्रकाश घाटपांडे

मी भाटियांना मत दिले. कारण
१) ते निवडुन येणार नाहीत याची खात्री
२) एका मैत्रिणिने एसेमस केला भाटियाला मत दे
३) ४९ ओ वापरता येत नाही म्हणुन
४) पुण्यातील जनसंसद कार्यक्रमाला मी उपस्थित होतो
५)मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करु शकेल इतपत क्षमता नक्की आहे

प्रकाश घाटपांडे
आमच्या अनुदिनीत जरुर डोकवा.

विसोबा खेचर's picture

29 Apr 2009 - 9:20 am | विसोबा खेचर

बारमध्ये जाऊन निवांतपणे दोन पेग पिण्याच्या माझ्यासारख्या सर्वसामान्य माणसाच्या हक्कावर या निवडणुकांमुळे ड्रायडे लादला गेल्याने गदा आली आहे. याचा तीव्र निषेध म्हणून मी मतदान करणार नाही!

ज्या धंद्याच्या उलाढालीवर माझीही रोजीरोटी अवलंबून आहे असा धंदा ड्रायडेच्या नावाखाली बंद ठेवला जात आहे. दारूच्या धंद्यात रोजची साधारणत: १० कोटींची उलाढाल एकट्या मुंबईत होते. ड्राय डे च्या जाचामुळे ही दर दिवशीची दहा कोटींची उलाढाल तीन दिवस बंद राहिल्यामुळे या धंद्यावर अवलंबून असणार्‍या माझ्यासारख्या कित्येकांची रोजीरोटी बुडणार आहे. या सार्‍याचा तीव्र निषेध म्हणून मी आणि या धंद्याशी निगडीत असलेले माझे अनेक सहकारी/मित्र मतदानावर बहिष्कार टाकणार आहोत!

तात्या.

सुनील's picture

29 Apr 2009 - 9:26 am | सुनील

तात्या एक सांगतो. काल संध्याकाळी ५ वाजल्यापासून ठाण्यात ड्राय डे सुरू झाला परंतु, घोडबंदर रोडवरील एक दुकान रात्री १० वाजता (दिवे मालवून आणि अर्धा दरवाजा बंद करून) उघडे ठेवलेले मी स्वतः पाहिले.

आज पूर्ण दिवस ड्राय डे. तरीही, स्टीलच्या पेल्यातून दारू देणारे बार आहेतच की!

आणि खुद्द मतदानाच्या दिवशी संध्याकाळी ५ नंतर बार उघडतातच!

Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.

विसोबा खेचर's picture

29 Apr 2009 - 9:37 am | विसोबा खेचर

ड्रायडे च्या दिवशीदेखील कुठे दारू मिळते अथवा मिळत नाही हा मुद्दाच नाही. ड्रायडे लादल्यामुळे मूळ हक्कांवरच गदा आणली गेली आहे हा मुद्दा आहे. आमचा विरोध या जाचाला आहे!

तात्या.

विसोबा खेचर's picture

29 Apr 2009 - 9:43 am | विसोबा खेचर

तात्या एक सांगतो. काल संध्याकाळी ५ वाजल्यापासून ठाण्यात ड्राय डे सुरू झाला परंतु, घोडबंदर रोडवरील एक दुकान रात्री १० वाजता (दिवे मालवून आणि अर्धा दरवाजा बंद करून) उघडे ठेवलेले मी स्वतः पाहिले.
आज पूर्ण दिवस ड्राय डे. तरीही, स्टीलच्या पेल्यातून दारू देणारे बार आहेतच की!

हो, पण ही चोरी का? दारूवाल्यांवर उजळ माथ्याने धंदा न करता असा चोरीछुपे, तोंड लपवून धंदा करण्याची पाळी का यावी??

आणि खुद्द मतदानाच्या दिवशी संध्याकाळी ५ नंतर बार उघडतातच!

हे आम्ही सरकारचे उपकार मानायचे का??

तात्या.

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

29 Apr 2009 - 11:00 am | ३_१४ विक्षिप्त अदिती

सुनील आणि तात्या,

मूलभूत हक्कांवर गदा येते हा आक्षेप मला १००% मान्य आहे पण तरीही माझं 'ड्राय डे'ला समर्थन आहे. याचं कारण काय हे ही तुम्हाला चांगलंच माहित असणार, आपल्याकडे दारू पिण्यावर लोकांचा ताबा नसतो त्यामुळे राजकीय पक्ष/उमेदवार लोकांना दारू पाजून दारूच्या अंमलाखाली मतदान करायला लावू शकतात. पंचवीशी उलटलेले जबाबदार पदांवर नोकर्‍या करणारे किंवा जबाबदारीने व्यवसाय करणारे तरूण अगदी मधयमवयीन आणि म्हातारेही झिंगण्यासाठी दारू पितात, चवीसाठी नाही; आणि हेही अगदी नियमितपणे, क्वचित नाही.
असं असताना, जास्तीत जास्त लोकांनी शुद्धीत राहून, विचार करून मतदान करावं यासाठी या 'ड्राय डे'चं मी समर्थन करते.

नियम वा कायदे बनवताना विचारी, बुद्धीमान माणसाला समोर ठेवून नाही, समाजातल्या (विचार आणि बुद्धीच्या दृष्टीने) तळागाळातल्या लोकांचा विचार करून कायदे बनवले जातात.

तात्या, तुम्हाला एक विनंती, कृपया तुमचा निषेध मतपेटीतून नोंदवा. मला माहित आहे तुम्ही विचारणार, मत कोणाला द्यायचं? कोणी लायक माणूस आहे का??

या प्रश्नामुळे मी पण विचारातच पडले आहे. दिल्लीत घोडेबाजार होऊ नये, पाच वर्षे स्थिर सरकार मिळावं, प्रादेशिक किंवा काही प्रदेशातच ताकद असणार्‍या कागदोपत्री राष्ट्रीय असणार्‍या पक्षांनी 'ब्लॅकमेलिंग' करू नये म्हणून मत भाजप (पक्षी: शिवसेना) किंवा काँग्रेस (पक्षी: राष्ट्रवादी, ठाण्यातून शिवसेना आणि राष्ट्रवादीचे उमेदवार आहेत.) यांना द्यावं असा विचार येतो. पण दोन्ही पक्षांचे उमेदवार मला माझे प्रतिनिधी म्हणून अजिबात मान्य नाहीत. त्यातून संजीव नाईक (पक्ष: राष्ट्रवादी) यांच्या डॉक्टरेट या पदवीवरून आत्ताच मोठा धुरळा उडलेला आहे. त्याचवेळी अडवाणी पंतप्रधान म्हणूनही मान्य नाहीत. (शिवाजी जन्माला यावा पण तो दुसर्‍याच्या घरात, हे माझ्या मताच्या बाबतीत अगदी लागू आहे.) मनसेने शिकलेला माणूस उमेदवार म्हणून दिला आहे, पण मनसेच्या 'फक्त महाराष्ट्र' यापुढे काहीही विचार नसल्याने देशपातळीवर प्रतिनिधी म्हणून मनसेला मत द्यावे असं वाटत नाही. (विधानसभा किंवा महानगरपालिकेच्या निवडणूकांतही मी मनसेला मत देण्याची शक्यता शून्यापेक्षा किंचीतच जास्त आहे; मनसे हा माझा पहिला पर्याय कधीच नसेल.) इतर अनेक अपक्ष, बसप वगैरेचे उमेदवार आहेत पण त्यांच्याबद्दल फारशी काहीही माहिती नसताना मत कसं देणार?

पण तरीही मी मतदानाला जाणार! सुशिक्षित, मध्यमवर्गीय लोक मतदानाला बाहेर पडतात, त्यांचीही 'व्होटबँक' आहे हे लक्षात आल्याशिवाय किमान शहरी भागांतूनतरी या कर भरणार्‍या आणि त्याबदल्यात फारसं काहीही न मिळणार्‍या जनतेला काहीही मिळणार नाही. पुढच्या पिढीने मला या गोष्टीचा जाब मागितला तर माझ्याकडे त्याचं उत्तर हवं म्हणूनतरी मी मतदानाला (सुट्टी घेऊन) जाणार.

आपल्या मतदारसंघातल्या उमेदवारांची माहिती इथे मिळेल, जरूर पहा आणि या वेबसाईटचा शक्यतोवर प्रचार करा.

अदिती
स्वाक्षरीत प्रत्येक वेळी 'पंच' असावा असं थोडीच आहे?

छोटा डॉन's picture

29 Apr 2009 - 11:07 am | छोटा डॉन

सुशिक्षित, मध्यमवर्गीय लोक मतदानाला बाहेर पडतात, त्यांचीही 'व्होटबँक' आहे हे लक्षात आल्याशिवाय किमान शहरी भागांतूनतरी या कर भरणार्‍या आणि त्याबदल्यात फारसं काहीही न मिळणार्‍या जनतेला काहीही मिळणार नाही. पुढच्या पिढीने मला या गोष्टीचा जाब मागितला तर माझ्याकडे त्याचं उत्तर हवं म्हणूनतरी मी मतदानाला (सुट्टी घेऊन) जाणार.

जबरदस्त ऽऽऽऽ
हाच किलींग इन्स्टिंक्ट पाहिजे, नुसते मतदानाला नाहीतर खुद्द राजकारणात उतरायला पाहिजे ...
राजकारण हे जरी एक गटार असले तरी त्यात सुशिक्षीत व शुद्ध चारित्र्याचे लोक उतरल्याशिवाय ह्याचे शुद्धीकरण होणार नाही हे नक्की.
प्रतिसाद व विचार आवडले, अजुन ह्याच मुद्द्यांच्या अनुषंगाने विस्तारीत खरडीन ..
तुर्तास अदितीला समर्थन ..

------
छोटा डॉन
एखादा "प्रण अथवा रिझॉल्युशन" म्हणजे काय ? जास्त काही नाही, मस्त गाजावाजा करुन ८ दिवसातच पहिली पाने पंचावन्न करणे.
आता आमचा "लेखन न करण्याच्या" प्रतिज्ञेचेच पहा ना ... ;)

निखिल देशपांडे's picture

29 Apr 2009 - 11:10 am | निखिल देशपांडे

सुशिक्षित, मध्यमवर्गीय लोक मतदानाला बाहेर पडतात, त्यांचीही 'व्होटबँक' आहे हे लक्षात आल्याशिवाय किमान शहरी भागांतूनतरी या कर भरणार्‍या आणि त्याबदल्यात फारसं काहीही न मिळणार्‍या जनतेला काहीही मिळणार नाही. पुढच्या पिढीने मला या गोष्टीचा जाब मागितला तर माझ्याकडे त्याचं उत्तर हवं म्हणूनतरी मी मतदानाला (सुट्टी घेऊन) जाणार.

फक्त ह्याच उद्देशाने मी सुद्धा सुट्टी घेउन मतदान करुन आलो.
==निखिल
आमचा सध्याचा संशोधनाचा विषय :- मुंबईतिल रिक्षांचे मिटर

छोटा डॉन's picture

29 Apr 2009 - 11:08 am | छोटा डॉन

सुशिक्षित, मध्यमवर्गीय लोक मतदानाला बाहेर पडतात, त्यांचीही 'व्होटबँक' आहे हे लक्षात आल्याशिवाय किमान शहरी भागांतूनतरी या कर भरणार्‍या आणि त्याबदल्यात फारसं काहीही न मिळणार्‍या जनतेला काहीही मिळणार नाही. पुढच्या पिढीने मला या गोष्टीचा जाब मागितला तर माझ्याकडे त्याचं उत्तर हवं म्हणूनतरी मी मतदानाला (सुट्टी घेऊन) जाणार.

जबरदस्त ऽऽऽऽ
हाच किलींग इन्स्टिंक्ट पाहिजे, नुसते मतदानाला नाहीतर खुद्द राजकारणात उतरायला पाहिजे ...
राजकारण हे जरी एक गटार असले तरी त्यात सुशिक्षीत व शुद्ध चारित्र्याचे लोक उतरल्याशिवाय ह्याचे शुद्धीकरण होणार नाही हे नक्की.
प्रतिसाद व विचार आवडले, अजुन ह्याच मुद्द्यांच्या अनुषंगाने विस्तारीत खरडीन ..
तुर्तास अदितीला समर्थन ..

------
छोटा डॉन
एखादा "प्रण अथवा रिझॉल्युशन" म्हणजे काय ? जास्त काही नाही, मस्त गाजावाजा करुन ८ दिवसातच पहिली पाने पंचावन्न करणे.
आता आमचा "लेखन न करण्याच्या" प्रतिज्ञेचेच पहा ना ... ;)

विसोबा खेचर's picture

29 Apr 2009 - 3:09 pm | विसोबा खेचर

मूलभूत हक्कांवर गदा येते हा आक्षेप मला १००% मान्य आहे

यू सेड इट!

तात्या, तुम्हाला एक विनंती, कृपया तुमचा निषेध मतपेटीतून नोंदवा.

विनंतीबद्दल धन्यवाद! परंतु ड्रायडेचा अन्याय दूर झाला तरच मतदान करू!

तात्या.

अभिज्ञ's picture

29 Apr 2009 - 6:07 pm | अभिज्ञ

तात्या व आदिती दोघांशी हि सहमत.
परंतु ज्यांनी मतदान केले आहे त्यांनाच सरकारने दारु प्यायला परवानगी द्यावी.
अशाने बरेच जास्त लोक मतदान करतील व आपली लोकशाहि पण सुदृढ होईल.
काय म्हणता?
;)

अभिज्ञ.
--------------------------------------------------------
पॉझिटिव्ह थिंकिंग....? अजिबात जमणार नाहि.

श्रीयुत संतोष जोशी's picture

30 Apr 2009 - 7:30 pm | श्रीयुत संतोष जोशी

हे विचार करण्यासारखे आहे.

हे राज्यं व्हावे ये तो श्रींची इच्छा.

अमोल केळकर's picture

29 Apr 2009 - 9:50 am | अमोल केळकर

आमचे हक्काचे / आणि खरोखरच जनतेची कामे करणारे ( मुख्यतः मुंबईकरांचा जिव्हाळ्याचा असलेले रेल्वे संबंधी प्रश्न ) उमेदवार श्री. आनंद परांजपे आमच्या मतदारसंघ सोडून (ठाणे) कल्याणची सुभेदारी करावयास गेल्याने माझ्या सारख्या अनेक लोकांची निराशा झाली आहे.
त्यामुळे सध्याच्या परिस्थितीत ठाणे मतदारसंघातील मनसेचे उमेदवार श्री राजन राजे यांनाच आमचे मत
-------------------------------------------------
छोट्या दोस्तांसाठी गंमत गाणी इथे वाचा

दवबिन्दु's picture

29 Apr 2009 - 10:22 am | दवबिन्दु

उस्सुकता आहे पन कान्ग्रेसला अजाबात मत देनार नाही. धुलधान केली देशाची ५० वरषे
सततेमधे राहुन. धड दलिताच भल नाय धड मुसलमानाचे भल नाय, कायच नाय नुस्ति खाबुगिरि.

.
अब्बी ऊठी अण्डा बनायी पकायी खायी और आयी। आँ, पैचान कौन । नई रे, चंदा भी नई, सोनि भी नई, अबे खुफियापनती क्या कर रहा है, ज्युली बोल रहि हू मै, शेखरअन्ना है?

मराठी_माणूस's picture

29 Apr 2009 - 10:28 am | मराठी_माणूस

दिले . रजा घेउन, ज्या गावी मतदार यादीत नाव होते त्या गावी जाउन दीले.

(आवांतरः चर्चेचा मथळा "तुम्ही कुणाला मत दिले/देणार ? का ?" असा आहे, तरी काहीनी , दीले असते तर वै. लिहले आहे , ह्या जर तर ला काही अर्थ नाही)

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

29 Apr 2009 - 11:02 am | ३_१४ विक्षिप्त अदिती

आपण चर्चाप्रस्ताव नीट वाचला नाही आहेतः

मत द्यायला तुम्ही पात्र नसाल/ गैरहजर असाल तरीसुद्धा आपले राजकीय मत तुम्हाला मांडता येईल.
असं चर्चाप्रस्तावक मुक्तसुनीत यांनी लिहिलं आहेच.

आता हे असं वाक्य चर्चाप्रस्तावात असावं का नसावं हा मुद्दा इथेतरी अवांतर आहे. :-)
या चर्चेततरी यापुढे माझ्याकडून या विशिष्ट मुद्द्यावर प्रतिसाद येणार नाहीत. कारण हा मुद्दा या चर्चेत अवांतर आहे.

अदिती
स्वाक्षरीत प्रत्येक वेळी 'पंच' असावा असं थोडीच आहे?

मराठी_माणूस's picture

29 Apr 2009 - 11:12 am | मराठी_माणूस

चर्चा प्रस्तावात तसा उल्लेख असला तरी , ह्या जर तर ला काही अर्थ नसतो , त्यातुन निष्पन्न काहीच होणार नसते. मत दिल्यावर मात्र सत्तेत किंवा विरोधात तुमचा काही तरी सहभाग असतो. उंटावरुन शेळ्या हाकण्यात काहीच अर्थ नाही.

छोटा डॉन's picture

29 Apr 2009 - 11:22 am | छोटा डॉन

>>मत दिल्यावर मात्र सत्तेत किंवा विरोधात तुमचा काही तरी सहभाग असतो. उंटावरुन शेळ्या हाकण्यात काहीच अर्थ नाही.
???
म्हणजे तुमच्या मते जर तुम्ही प्रक्रियेत सहभागी असाल तरच तुम्हाला "मतप्रदर्शनाचा" अधिकार आहे. म्हणजे एखाद्या गोष्टीविषयी तुमचे मत असावे असे तुम्हाला वाटत असेल तर प्रथम तुम्हाला त्या प्रक्रियेत सामील व्हावे लागेल ...

पण साहेब, काही अपरिहार्य अडचणी असतात त्याचे काय ?
का उगाच एकच मुद्दा लाऊन धरुन त्याचाच अनुषंगाने ठोकत रहायचे ?

आपल्या थेअरीप्रमाणे :
१. कुठला चित्रपट वाईट किंवा चांगला ठरवण्यासाठी मला त्या चित्रपटात "काम करावे" लागेल
२. क्रिकेट सामन्यात खेळल्याशिवाय मी त्यावर मत प्रदर्शीत करु शकत नाही ...
३. एखादे गाणे नाही आवडले हे सांगण्यापुर्वी मला किमान गल्लीतल्या गणेशोत्सवात एक मैफिल करायला हवी ...
४. एखादा लेख आवडला नाही हे सांगण्यापुर्वी मला एक पुस्तक प्रकाशित करावे लागेल ...

मेक्स सेन्स ???

असो, आपला प्रतिसाद आम्हाला आवडला नसुन आम्ही त्याला "असहमत" आहोत हे सांगण्यासाठी मात्र आम्हाला "प्रतिसाद" खरडावा लागला, तुमची थेअरी इथे चालली बॉ करेक्ट ...!!!
आता आम्ही प्रक्रियेत सहभागी असल्याने आमचा प्रतिसाद आता "व्हॅलिड" ठरला ;)

------
छोटा डॉन
एखादा "प्रण अथवा रिझॉल्युशन" म्हणजे काय ? जास्त काही नाही, मस्त गाजावाजा करुन ८ दिवसातच पहिली पाने पंचावन्न करणे.
आता आमचा "लेखन न करण्याच्या" प्रतिज्ञेचेच पहा ना ... ;)

मराठी_माणूस's picture

29 Apr 2009 - 11:30 am | मराठी_माणूस

कोठल्याही गोष्टीवर मत प्रकट करणे आणि लोकसभेच्या निवडणुकिसाठी मत पेटीत टाकणे ह्या दोन भिन्न गोष्टी आहेत. चित्रपट , क्रिकेट ह्यावर मत प्रगट करुन काही फारसा फरक पडत नाही. पण निवडणूका मधुन देशाचे भविष्य घडते. पटत नसेल तर सोडुन द्या.

छोटा डॉन's picture

29 Apr 2009 - 11:39 am | छोटा डॉन

कोठल्याही गोष्टीवर मत प्रकट करणे आणि लोकसभेच्या निवडणुकिसाठी मत पेटीत टाकणे ह्या दोन भिन्न गोष्टी आहेत. चित्रपट , क्रिकेट ह्यावर मत प्रगट करुन काही फारसा फरक पडत नाही. पण निवडणूका मधुन देशाचे भविष्य घडते.

हे पटले पुर्ण पण मतदान न केल्यास मत व्यक्त करण्याचा अधिकार नाही हे नाही पटले.
असो.

तुम्ही प्रतिसादातच "पटले नसले तर द्या सोडुन" असे लिहले आहे तरी पण मी लिहतो ...
कसे आहे की तुमच्या आमच्यासारखे अनेक लोक इथे येऊन आपापले मत व्यक्त करत असतात, चर्चा होत असते, नवे मुद्दे निघतात, वाद होतात, माहितीची देवाणघेवाण होते. ह्यातुन त्या "विषयातले ( इथे मतदारसंघ अथवा उमेदवार घ्यावे ) " अनेक नवे पैलु समोर येतात व त्याबद्दल नाही म्हटले तरी बरीच माहिती कळते ...
मिपावर लिखाण न करता "वाचनमात्र" असणारे कित्येकजण आहेत, मिपावरच कशाला पण वॄत्तपत्रे , वाहिन्या मी ह्या पातळीवर समानच मानतो.
मग ह्यातल्या एखाद्याला जर मतदारसंघाबद्दल काहीच माहिती नसेल अथवा तो गोंधळात असेल तर इथल्या चर्चा पाहुन त्याला योग्य तो मार्ग सापडेल अशी आशा ठेवण्यात काय हरकत आहे ? समजा काही मुद्दे पटुन त्याने "क्ष" व्यक्तीला मतदान केले व ती व्यक्ती निवडुन जाऊन पुढे काही का होईना पण कामे करुन लागली तर फायदा कुणाचा ?
म्हणुन लोक वाचतील ह्या भावनेना का होईला पण माहितीच्या आदानप्रदानाच्या हेतुन सर्वांना "चर्चेत सामिल होण्यास" प्रत्यवाय नसावा असे आमचे मत आहे.

मतदान ही वैयक्तिक जबाबदारी असली तरी इथे मुद्द्यांवर चर्चा करुन आपण एक सामाजिक जबाबदारी पार पाडतो आहोत असे नाही का वाटत ????

पटले का ? नसेल तर द्या सोडुन, जाऊ द्या ...!!!

------
(विस्तारीत)छोटा डॉन
एखादा "प्रण अथवा रिझॉल्युशन" म्हणजे काय ? जास्त काही नाही, मस्त गाजावाजा करुन ८ दिवसातच पहिली पाने पंचावन्न करणे.
आता आमचा "लेखन न करण्याच्या" प्रतिज्ञेचेच पहा ना ... ;)

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

29 Apr 2009 - 11:31 am | ३_१४ विक्षिप्त अदिती

प्रण मोडला डॉन्याच्या तार्कीक प्रतिसादामुळे!

मराठी_माणूस, तुमच्याच सिद्धांताप्रमाणे तुम्ही जर भारताबाहेर असाल तर भारताबद्दल, भारतातल्या लोकांच्या बोलण्याबद्दल बोलण्याचा किंवा या देशात असाल तर देशाबाहेरच्यांच्या मतप्रदर्शनाबद्दल मतप्रदर्शन करण्याचा तुम्हाला नैतिक अधिकार नाही. तुम्ही वरच्या प्रतिसादांमधे भारतात रहाणारे आणि न रहाणारे या दोन्ही बाजूंबद्दल प्रतिक्रीया व्यक्त करताना दिसता! :-)

अदिती
स्वाक्षरीत प्रत्येक वेळी 'पंच' असावा असं थोडीच आहे?

मराठी_माणूस's picture

29 Apr 2009 - 11:38 am | मराठी_माणूस

मुद्याचे गांभिर्य लक्षात घेतलेले दिसत नाही. असो . माझ्या पुरता विषय संपला.

काळा डॉन's picture

29 Apr 2009 - 10:32 am | काळा डॉन

पुण्यात असतो तर डिएसकेला मत दिले असते.

ब्रिटिश टिंग्या's picture

29 Apr 2009 - 11:17 am | ब्रिटिश टिंग्या

सुप्रियाताई सुळेंना!

- टिंग्या पवार

रम्या's picture

29 Apr 2009 - 11:30 am | रम्या
अवलिया's picture

29 Apr 2009 - 11:36 am | अवलिया

ह्म्म. चांगली चर्चा !

--अवलिया

बाकरवडी's picture

29 Apr 2009 - 12:24 pm | बाकरवडी

मणशेला दिले असते. (कोनी का निवडून येऊदे मसणात नाही नेले म्हणजे झाले !)

:B :B :B बाकरवडी :B :B :B

llपुण्याचे पेशवेll's picture

29 Apr 2009 - 12:37 pm | llपुण्याचे पेशवेll

१. कलमाडी: या माणसाला मत द्यायचा काही प्रश्नच येत नाही. पुण्याची बकाल आणि नियोजनशून्य वाढ होऊ देऊन पुणेकरांचे जीवन असह्य करणार्‍या कलमाडीला माझे मत मुळीच नाही. केवळ शेतकर्‍यांच्या जमिनी त्याना खोटी आमिषे दाखवून त्यांच्याकडून काढून घेऊन त्याना भिकेला लावायचे आणि त्या परिसराचा नियोजनशून्य सिमेंट जंगलीकरण करायचे, वारंवार उखडणारे रस्ते बनवायचे आणि रस्ता दुरूस्तीची कामे काढून कंत्राटदारांच्या संगनमताने पैसे खात रहायचे येवढे एकच यांचे काम. बीआरटी सारखा अव्यापारेषूव्यापार पुणेकरांवर लादायचा अशा अनेक कारणांमुळे कलमाडी बाद ठरतो.
२. अनिल शिरोळे: स्वतः माणूस म्हणून तसेच नगरसेवक म्हणून चांगले पण राममंदिराच्या नावावर वर्षानुवर्षे राजकारण करणार्‍या
आणि राममंदिर उभारणीच्या प्रक्रियेलाच खीळ घालणार्‍या भाजपाला या वेळे नक्की मत नाही. म्हणून अनिलरावही बाद.
३. डिसके: बसपा आणि इतर भैय्ये पक्ष सोडून इतर कोणत्याही पक्षाकडून उभे राहीले तर त्याना मत दिले असते. काँग्रेसकडून उभे राहीले असते तर वर्षानुवर्षाचा काँग्रेसचा ढोंगी इतिहासाकडे काणाडोळा करुन याना मत दिले असते. तेच जर हे भाजपाकडून उभे राहीले असते तर भाजपाचे ढोंगीपणाचे अपराध माफ करून डिसकेंमुळे भाजपाला मत दिले असते.
४. अरुण भाटीया यानी जर मराठीत बोलून मत मागितले असते तर त्याना मत दिले असते. जर ते पुण्याचे प्रतिनिधित्व करणार असतील तर चांगले मराठीत बोलता यायलाच पाहीजे. अन्यथा माझे मत त्या उमेदवाराला नाही. म्हणूनच भाटीयाही बाद.
५. रणजित शिरोळे: स्वतः उमेदवाराचा प्रत्यक्ष परिचय नाही. त्याचे कोणतेही भाषण ऐकलेले नाही. पण राजच्या प्रभावामुळे माझे मत रणजित शिरोळे याला.

पुण्याचे पेशवे
एरवी सगळे कागद सारखेच. फक्त कागदाला अहंकार चिकटला की त्याचे सर्टीफिकेट होते.
Since 1984

मैत्र's picture

29 Apr 2009 - 3:06 pm | मैत्र

त्यांना मत द्यावं असं त्यांच काय कर्तृत्व किंवा समाज कार्य आहे?
एक मोठा उद्योगपती याव्यतिरिक्त त्यांचा समाजाशी काय संबंध आहे.
घराला घरपण देणारी माणसं. पुण्याशी संबंध नसलेल्या विश्व नावाच्या गावाशिवाय कुठे यांचे दर मध्यमवर्गाला परवडण्यासारखे होते? त्यांचे बांधकाम आणि टोयोटा सोडता कुठे जनतेशी संबंध आला किंवा आजवर असं कुठे अनुभवात किंवा वाचनात आलं आहे की फार उत्तम मनुष्य आहे...
कुतुहल म्हणून विचारतोय..

llपुण्याचे पेशवेll's picture

30 Apr 2009 - 3:11 pm | llपुण्याचे पेशवेll

>>एक मोठा उद्योगपती याव्यतिरिक्त त्यांचा समाजाशी काय संबंध आहे.
कमीतकमी आजपर्यंततरी डीएस्केनी कोणाला दमदाटी करून एखाद्याची जागा हिरावून घेतल्याचे ऐकिवात नाही. कोणास तसे माहीत असेल तर सांगावे माझे मुद्द्याचा मी परत विचार करेन.
मनुष्य चांगला, धडपड्या आणि कष्टाळू आहे. त्यांची अनेक वर्षापूर्वी मुलाखत ऐकली होती. त्यावरून तरी असे वाटले. त्यांच्या उद्योगातील यशामुळे ते नक्की चांगले प्रशासक होऊ शकतील असे वाटते. पूर्वीचे डिएस्के विश्व आता किती जवळ आले आहे ते त्या भागाचा आता झालेला विकास(?) पाहीला की वाटते.

(मी डिसके यांच्या कोणत्याही गृहप्रकल्पार रहात नाही किंवा स्वस्तात घर देतो असे त्यानीही मला सांगितलेले नाही)
पुण्याचे पेशवे
एरवी सगळे कागद सारखेच. फक्त कागदाला अहंकार चिकटला की त्याचे सर्टीफिकेट होते.
Since 1984

परिकथेतील राजकुमार's picture

29 Apr 2009 - 12:54 pm | परिकथेतील राजकुमार

मतदान केले नाही !
पण 'विदेशी' बाईला थोपवण्यासाठी 'देशी' बाईला मतदान करा असा सल्ला मात्र अनेकांना दिला.

परा(ज)कारणी
©º°¨¨°º© परा ©º°¨¨°º©
फिटावीत जरा तरी जगण्याची देणी, एक तरी ओळ अशी लिहावी शहाणी...
आमचे राज्य

ऋषिकेश's picture

29 Apr 2009 - 1:38 pm | ऋषिकेश

आमच्याकडे मतदान उद्या आहे.
मी व्यक्ती पाहून मत देणार आहे. कारण मला अजून असा कोणताहि पक्ष वाटत नाहि ज्याला स्वतःची "ठाम" विचारधारा आहे. जर सगळे पक्ष वेळप्रसंगी एकमेकांसारखे वागणार असतील तर मत देण्यासाठी उरतात त्या व्यक्ती.
माझे निकष:

  • व्यक्तीने मतदारसंघातील जनतेसाठी काहि काम केलं आहे का?
  • त्याच्या योजना काय आहेत?
  • मुंबईसाठी तो काय करेल/करतो?
  • माझ्या मतदार संघातील प्रश्न तो जाणतो का? त्यावर त्याच्याकडे काहि उपाय आहेत का?
  • माझ्या भागाचं प्रतिनिधीत्त्व दिल्लीत तो करू शकेल का?
  • देशाला त्या व्यक्तीला निवडून देऊन कोणत्याहि प्रकारचा धोका / अपाय होण्याची शक्यता आहे का?

माझ्यापुरतं तरी उमेदवाराचे वय, लिंग, पुस्तकी शिक्षण, जात, धर्म या गोष्टींना विषेश महत्त्व नाहि

ऋषिकेश

इनोबा म्हणे's picture

29 Apr 2009 - 3:20 pm | इनोबा म्हणे

आम्ही राजसाहेबांवर विश्वास ठेऊन रणजितसिंह शिरोळेंनाच दिले.

घाशीराम कोतवाल १.२'s picture

2 May 2009 - 11:32 am | घाशीराम कोतवाल १.२

आम्ही राजसाहेबांवर विश्वास ठेऊन बाळा नांदगावकरांनाच मत दिले आहे

**************************************************************
धन्य हा महाराष्ट्र
लाभली आम्हा अशी आई
बोलतो आम्ही मराठी
गत जन्माची जणू पुण्याई"

स्पंदन's picture

30 Apr 2009 - 6:24 am | स्पंदन

चांगली चर्च्या रंगली आहे...
मता चे दान देण्यासाठी मत आसायेला पाहिजे, आणि आमच्या मतांच्या "चिंदठ्या" या राजकारणी लोकांनी केव्हाच केल्या आहेत !! मत कोणलाही द्या... आमच्या (सामांण्ये लोक) मतांचा कधी विचारच झाला नाही... होइल असे वाटत पण नाही....कोणी ही निवडुन आला तरी माझ्या बापाला काय मिळ्णार??? ऊगा कश्याला ऊन्हात तास दोन तास उभा राहच्ये म्हणतो मी !!

तिमा's picture

30 Apr 2009 - 10:12 am | तिमा

आत्ताच मत देऊन आलो. सगळ्या उमेदवारांची यादी काळजीपूर्वक वाचली. मग फक्त राष्ट्रीय पक्षांवर लक्ष केंद्रित केले. कारण केंद्रात फक्त राष्ट्रीय पक्षच असावेत अशा मताचा मी आहे. शेवटी जो पक्ष बहुमताच्या जवळ येईल असे वाटले व ज्याचा उमेदवार गुन्हेगार नाही अशा पक्षाला मत दिले.

हर शख्सको अपना बनाके देख लिया
मिलेंगे ना किसीसे ये दिलमें ठानी है|

अविनाशकुलकर्णी's picture

30 Apr 2009 - 10:26 am | अविनाशकुलकर्णी

मला एका पक्षाच्या कारय्कर्त्याने दुर्गातली बिर्यानि व सिगनेचरची चपटी दिली..त्याने सांगितले त्याला मत दिले..दिवस मस्त गेला...

भाग्यश्री's picture

30 Apr 2009 - 11:57 pm | भाग्यश्री

असे नागरिक असतील तर राजकारण्यांकडून तरी काय अपेक्षा ठेवायची!! :|
www.bhagyashree.co.cc

देवदत्त's picture

30 Apr 2009 - 2:09 pm | देवदत्त

मत द्यावे न द्यावे असा विचार करत शेवटी मतदान करून आलो.
आमच्या भागातील त्यातल्या त्यात चांगला वाटलेल्या उमेदवाराला.

(गेले काही दिवस मिपाची धावती भेटच व्हायची. त्यामुळे हा धागाही नीट वाचता आला नाही.
ह्याबाबतील माझे विचार अनुदिनीवर टाकल्यानंतर हा पुन्हा वाचनात आला. म्हणून पुन्हा इथे न लिहिता त्याचा दुवा देतो. )

काजुकतली's picture

1 May 2009 - 3:24 pm | काजुकतली

मी ह्यावेळी पक्ष पाहुन मतदान केले.. पक्ष नविन आहे, काहीतरी वेगळे करेल अशी आशा आहे, पण त्याने माझ्या भागात उभ्या केलेल्या उमेदवाराचे नावही मी आधी ऐकले नव्हते.. (आणि ज्यांची ऐकलेली त्यांची नावे काही वर्षांपुर्वी पेपरात खुन वगैरे प्रकरणी वाचलेलीही)

पक्ष मी आधीच ठरवलेला, त्यामुळे त्याच्या उमेदवारापुढे बटन दाबुन मोकळे झाले.. :)

साधना

यन्ना _रास्कला's picture

2 May 2009 - 9:12 am | यन्ना _रास्कला

येन्ट्री आनि येक्जिट पोल हे केवापन निवडनुका नंतर मतगनना झाल्याव करावेत अस मला वाटत. मी हत्तीला मत दील.

*/*\*/*\/*\*/*\*/*\*/*\*/*\*/*\*/*\*/*\*/*\*/*
आनि डोळ्याइतक्याच जड आवाजात त्यान पहिला पोलीसी सवाल केला, डायवर कोन हाय !

अवधुत's picture

2 May 2009 - 11:36 am | अवधुत

या वेळी मतदान आमच्या विभागातील उमेदवारांचा विचार न करता, पंतप्रधान पदाचा उमेदवार डोळ्यापुढे ठेऊन केले.......!!!!

--------------------------------------------------------------------------------------------
अवधुत
अन धन्यवाद देवाचे...

अवधुत's picture

2 May 2009 - 11:36 am | अवधुत

या वेळी मतदान आमच्या विभागातील उमेदवारांचा विचार न करता, पंतप्रधान पदाचा उमेदवार डोळ्यापुढे ठेऊन केले.......!!!!

--------------------------------------------------------------------------------------------
अवधुत
अन धन्यवाद देवाचे...