थंडगार फालुदा

दिपाली पाटिल's picture
दिपाली पाटिल in पाककृती
22 Apr 2009 - 4:23 am

इकडे ही ssssssssssss गरमी वाढलीये म्हणून म्हटलं जरा थंड गार फालुदा बनवावा..

वाढणी: ४

साहित्यः
१ कप फालुदा शेव
१ मोठा चमचा (tbs)सब्जा -- ५-१० मि. पाण्यात भिजवून ठेवणे.
२ मोठे चमचे रोज (Rose) सिरप
२ कप थंड दुध
आइस्क्रिम (कुठले हि चालेल पण वनिला किंवा अमेरिके त एक गुलकंद चे आइस्क्रिम मिळते ते बेस्ट आहे.)
नहितर लाइट व्हिप्ड क्रिम पण छान लागते.

कृति:

थोड्या पाण्यात फालुदा शेव उकडून घ्यावी. अंदाजे ५-७ मि. लागतात.
चाळणी त शेव गाळून घ्यावीत. चार ग्लासेस मध्ये अंदाजे सारख्या प्रमाणात टाकावी.
सब्जा गाळुन घ्यावे व त्याचे ही ४ भाग करुन फालूदा शेव च्या वरून घालावे.
आता रोझ सिरप घालावे.
थंड दुध घालावे.
मोठ्ठा स्कुप आइस्क्रिम/लाइट व्हिप्ड क्रिम घालावे.
वरून गुलकंद वा रोझ सिरप घालुन सजवावे.

प्रतिक्रिया

क्रान्ति's picture

22 Apr 2009 - 6:06 am | क्रान्ति

फोटो दिसत नाहीय.
क्रान्ति {मी शतजन्मी मीरा!}
www.mauntujhe.blogspot.com

मदनबाण's picture

22 Apr 2009 - 10:02 am | मदनबाण

हा प्रकार मला फार फार आवडतो...पण फोटो का बरं दिसत नाही ???

मदनबाण.....

I Was Born Intelligent,But Education Ruined Me.
Mark Twain.

पर्नल नेने मराठे's picture

22 Apr 2009 - 10:52 am | पर्नल नेने मराठे

माझि आई जेलि पन घाल्ते, रेक्स जेलि चे प्याकेत मिल्ते बाझारात.

चुचु

ब्रिटिश टिंग्या's picture

22 Apr 2009 - 11:09 am | ब्रिटिश टिंग्या

तुम्ही मराठीची एवढी का मारताय?
तुम्हाला चुचु ह्या आयडीने मराठी आंतरजालावर येउन 23 आठवडे 4 दिवस झाले आहेत! आता तरी शुद्धलेखन सुधरवा!

धन्यवाद,
टिंगोपंत.

नेत्रेश's picture

23 Apr 2009 - 2:48 am | नेत्रेश

वा!

चतुरंग's picture

23 Apr 2009 - 3:12 pm | चतुरंग

'शुद्धलेखन सुधरवा?'

'लेखन सुधरवा किंवा 'शुद्धलेखन करा' हे योग्य वाटते! ;)

चतुरंग

परिकथेतील राजकुमार's picture

22 Apr 2009 - 11:47 am | परिकथेतील राजकुमार

इकडे ही ssssssssssss गरमी वाढलीये म्हणून म्हटलं जरा थंड गार फालुदा बनवावा..

बनवाकी पण त्याचे असे साग्रसंगीत वर्णन करुन आणी फोटु टाकुन आमच्या जीवाची अशी काहिली का करता ?

©º°¨¨°º© परा ©º°¨¨°º©
फिटावीत जरा तरी जगण्याची देणी, एक तरी ओळ अशी लिहावी शहाणी...
आमचे राज्य

दिपाली पाटिल's picture

22 Apr 2009 - 11:06 am | दिपाली पाटिल

कुणी सांगेल का आता दिसतंय की नाहि??

दिपाली :)

वल्लरी's picture

22 Apr 2009 - 11:28 am | वल्लरी

हो दिसतो आहे फालुदा आता..
एकदम सहीचं .....
---वल्लरी

लवंगी's picture

23 Apr 2009 - 4:05 am | लवंगी

छान दिसतोय

पाषाणभेद's picture

22 Apr 2009 - 11:08 am | पाषाणभेद

:-)
- पाषाणभेद उर्फ दगडफोड्या (- राजेंनी बहाल केलेले नाव)

वेताळ's picture

22 Apr 2009 - 11:14 am | वेताळ

फोटो आणि कृती अतिशय उत्तम.........तुमच्या कडे फालुदा खायला यायला हवे.
खविस,हडळ,मुंजा,गोस्ट,डेव्हिल,वेताळ

अश्विनि३३७९'s picture

22 Apr 2009 - 11:15 am | अश्विनि३३७९

सब्जा भिजवण्या ऐवजी पाण्यात उकळून घ्यावा...
नुसता भिजवुन घेतला तर स्टोन चा त्रास होण्याची शक्यता असते ..

दिपाली पाटिल's picture

22 Apr 2009 - 11:18 am | दिपाली पाटिल

धन्यवाद या टिप बद्द्ल.. पुढच्या वेळी नक्कि उकळून च घेइन.

दिपाली :)

सँडी's picture

22 Apr 2009 - 11:23 am | सँडी

फोटो पाहुनच थंडावा मिळाला!

चला अजुन एक आईस्क्रिम गडपुन येतो...

-सँडी
काय'द्याचं बोला?

काजुकतली's picture

22 Apr 2009 - 11:29 am | काजुकतली

दिपाली रेसिपी अगदी मस्त आणि सोप्पी, शिवाय अश्विनीची टिपही छान. मी सब्जा नेहमी भिजतच घालायचे. आता उकळुन घेईन..

साधना

स्वाती दिनेश's picture

22 Apr 2009 - 11:37 am | स्वाती दिनेश

दिपाली,
फालुद्याचा फोटो झकासच,मस्त!
मी जेलीही घालते.
स्वाती

नाटक्या's picture

22 Apr 2009 - 8:05 pm | नाटक्या

एकंदर कट्ट्याला धमाल येणार असे दिसते आहे. या कट्ट्यला नाही करता आला तर उन्हाळी (बार्बेक्यू) कट्ट्याला हे मस्त आणि मस्ट आहे..

- नाटक्या

प्राजु's picture

22 Apr 2009 - 10:39 pm | प्राजु

थंडगार फालुदा पाहून अंमळ जळफळाट झाला. ;)
मस्त फोटो. सोप्पी आहे पाकृ.
जरा हा पोलन्स चा सिझन संपला की करतेच घरी.
धन्यवाद दिपाली.
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/

विसोबा खेचर's picture

22 Apr 2009 - 11:45 pm | विसोबा खेचर

सुंदर फोटू आणि पाकृ..!

दिपालीदेवींचा विजय असो.. :)

तात्या.

हुप्प्या's picture

23 Apr 2009 - 3:05 am | हुप्प्या

अमेरिकेतील देशी ग्रोसरकडे फालुदा शेव मिळते का? की अन्य कुठे? कोणता ब्रँड असतो?
बाकी फोटो अगदी मस्त.

दिपाली पाटिल's picture

23 Apr 2009 - 4:01 am | दिपाली पाटिल

अमेरिकेतील देशी ग्रोसरकडे फालुदा शेव मिळते का? की अन्य कुठे?

इंडिया कॅश अन कॅरि मधे मिळते..

कोणता ब्रँड असतो?

लोकल ब्रँड च असतो, त्याला नाव असं काहि नाहिये.

दिपाली :)

माझी वहिनी घरी बनवते..
तादुळाचे पीठाची उकड काढुन चकली यत्राने थड पाण्यामधे शेव पाडावी.

सुर तेच छेडीता......
* * * Waiting For Good Luck To Come In My Life * * *

समिधा's picture

23 Apr 2009 - 3:10 am | समिधा

झकास फोटो.करायची आठवण केलीस इथे येउन विसरलेच होते
तुला जर उष्णतेचा त्रास कमी करायचा असेल तर तु सब्जा च्या एवजी तुळशीचे बी भिजत घालुन वापरु शकतेस
चवीत फरक पडत नाही.

समिधा
(चांगल्या मैत्री सारखे सुंदर दुसरे काही नाही.)

दिपाली पाटिल's picture

23 Apr 2009 - 4:04 am | दिपाली पाटिल

धन्यवाद समिधा.. अगं पण मी कित्ती तुळशी लावली तरि जगत च नाही. तसा सब्जा ही थंड च असतो ना?? :/

दिपाली :)

समिधा's picture

23 Apr 2009 - 4:08 am | समिधा

पण तुळशीची बी अधिक चांगली.ईथे भारतीय दुकानात मिळते. ती भिजत घालायची

समिधा
(चांगल्या मैत्री सारखे सुंदर दुसरे काही नाही.)