सर्वाधिक वेळा पहायचे टाळलेले चित्रपट

टारझन's picture
टारझन in काथ्याकूट
19 Apr 2009 - 7:55 pm
गाभा: 

णमस्कार्स लोक्स,

आपण टिव्हीवर चित्रपट पहात असालच. काही चित्रपट आवडतात, काही नाही आवडत, खरे की नाय ?

पण एखादा चित्रपट डोक्यात गेला , तर कधी तो पुन्हा पघायचा येडचापपणा टाळतो! खरे की नाय ?

पण केबल वर पण रोज नवनवे चित्रपट कुढनं दाखवणार ? मग आपण चॅणल चेंज करतो ..खरे की नाय ?

माझ्या ओळखीतल्या एका इसमाने त्याचं पोरगं अभ्यास करत नाही म्हणून , "लव्ह ष्टोरी २०५० " हा चित्रपट दररोज एकदा, ह्या दराने सलग तीस दिवस दाखवला होता, त्या पोराची जी दातखिळी बसली आणि ते जे अभ्यासाला बसलं ते डायरेक्ट १०वी बोर्डाची परिक्षा पाहिल्यावरंच उठलं .. शाळेत पैलं आलं हो ते .. =))

असा अतिरेक आपण चित्रपटांवर पण करणे फारसे बरोबर नाही, पण तरीही, डोस्क्यात जाणारे चित्रपट आपण अर्ध्यापेक्षा जास्त वेळ पाहू शकत नाय , हे सत्य आहे. खरे की नाय ?

काही धागे/कौल्स्/काथ्याकुट्स पण ह्याच प्रकारात येतात .. पण आपण प्रतिक्रियांसाठी तरी धागा उघडतो .. खरे की नाय ? आणि लेखक साहेब वाचनकाउंट वाढलेला पाहून खुष होत खरे की नाय ?

ह्या काथ्याकुटात आपण सर्वाधिक वेळा आपण टिव्ही लाऊन बसल्यावर किंवा मित्रांनी प्लान बनवल्यावर पहाण्याचे टाललेल्या चित्रपटांची नावे (हिंदी, मराठी, इंग्रजी, तमीळ, तेलगू, भोजपुरी कुठलाही चालेल), किती वेळा टाळला, आणि वारंवार टाळण्याचे कारण, हे लिहावे. लिहाल की नाय ?

माझ्यापासून सुरुवात करतो. करू की नाय ?

मी वारंवार टाळलेले चित्रपट असे:

रब ने बना दी जोडीया, ३११०२ वेळा : ... कारणे : शारूक खाण .. प्लस खत्त्रा कथा .. गाणे हळूच डाऊण्लोड मात्र केले :)

यादें, २०००२०११० वेळा, कारणे - करिणा(की करुणा?) कापूर . हिचं थोबाड बघा: =))

णक्शा : , १६सहस्त्र वेळा, कारणे - काय खतर्णाक श्टोरी वगैरे होती .. वा .. एकदा थेटरातून पळून आलो त्या णंतर तोबा रे तोबा ...

दिल से , २२२२२२२ वेळा .. कारणे : पुण्हा शारूक खाण .. तेवढाच बकवास पिच्चर

मुझसे शादी करोंगे ? (८९००० नंतर काऊंट करणं सोडून दिलं ) एवढा बावळट पिक्चर पहिल्या दिवशी पहिल्या शो ला पाहिल्याचं दु:ख आजही आहे .. तब्बल ८० रुपयांचा चुथडा झाला हो :(

आता तुमचे येऊ द्या.. . देताल की नाय ?

प्रतिक्रिया

मराठमोळा's picture

19 Apr 2009 - 8:08 pm | मराठमोळा

आमचे नावडते सिनेमे खालीलप्रमाणे.. वाचणार का नाय?

१. कुछ कुछ होता है.... (कारण फालतु शाहरुख खान)
२. ओम शांती ओम...(कारण फालतु शाहरुख खान)
३. रब ने बना दी जोडी...(कारण फालतु शाहरुख खान)
४. हेलो ब्रदर........(कारण फालतु सलमान खान)
५. हनीमून ट्रॅवल्स (फालतु कथानक)
६. आपका सुरुर (कारण सांगायला नको)
७. रामु की आग (कारण सांगायला नको)
अजुनही बरेच आहेत.. आता आठवत नाहीत.. नंतर सांगतो... चालेल का नाय?

आपला मराठमोळा.
कोणत्याही गोष्टीचा ताप येईपर्यंत ठीक असते, पण तिचा कर्करोग होऊ देऊ नये!!

नितिन थत्ते's picture

19 Apr 2009 - 9:33 pm | नितिन थत्ते

करिणा(की करुणा?) कापूर =))

पूर्वी आरती मध्ये 'कर्पुरगौर भोळा' असे ऐकले होते. कापरासारखा गोरा कसा दिसत असेल हा बरेच दिवस प्रश्न होता.
करीना 'कापूर' ला पाहून सुटला.

खराटा
(रंग माझा वेगळा)

दशानन's picture

19 Apr 2009 - 10:09 pm | दशानन

>>दिल से , २२२२२२२ वेळा .. कारणे : पुण्हा शारूक खाण .. तेवढाच बकवास पिच्चर

शहारुख खान बकवास असू शकतो, पण तुम्ही नितांत सुंदर गाणी व चित्रांकण असलेल्या चित्रपटाला तुम्ही बकवास लिहलेले पाहून नवल वाटले. जेव्हा तो चित्रपट प्रदर्शित झाला तेव्हा तुम्ही शक्यतो ८-९ वी मध्ये असाल, नायक-हिरोईन सुंदर अथवा तुम्हाला आवडली नाही ह्यामुळे स्टोरी बकवास होत नाही मित्रा, जो काळ त्या चित्रपटामध्ये दाखवण्याचा व परिस्थिती दाखवण्याचा प्रयत्न मणीरतन्म ने केला आहे तो खुप वेगळा होता, योगायोग म्हणा अथवा काही ही पण आजच एक महिला आतंकवादीला मारताना आपले दोन जवान शहिद झाले, महिला आतंकवादी नव्वदच्या दशकामध्ये नवीन प्रकार नक्कीच नवीन नव्हता (उदा. राजीव गांधी हत्या), पण काश्मिर साठी नक्कीव नवीन होता, एक सुंदरशी प्रेम कहानी मनीरत्नम ने दाखवण्याचा प्रयत्न केला होता ह्या चित्रपटातून. मनीषा कोयरालाचा अभिनय मला फक्त ह्याच चित्रपटामध्ये आवडला होता हा देखील एक योगायोग.

जर चित्रपट पुर्ण पाहीला नसेल तर नक्की पहावा, काय आहे आजकाल देशातील गरिबी, झोपडपट्टी दाखवण्याचे युग आहे असे म्हणतात पण खरं तर ह्या आधीच २०-३० वर्षाआधीच ह्याची सुरवात सलाम बॉम्बे सारख्या चित्रपटातून झाली होती, विदेशामध्ये दिल से एक हिट चित्रपट होता, आपल्या जनते ने तो चित्रपट नाकारला ह्यांचे कारण वेगळे आहे ह्यावर एक वेगळी चर्चा होऊ शकते, त्यावेळी जनता प्रेमपटामध्ये गुरफटलेली होती 1998 मध्ये जेव्हा हा चित्रपट रिलिज झाला ह्याच्या आधी व नंतर देखील काश्मिरची हालत सामान्य नव्हती. मे बी शाहरुख ईज बॅड ऍक्टर बट एज अ मुव्ही दिल से ईज समथींग डिफरंन्ट.... खरोखर तुमच्या लिस्ट मध्ये दिल से चे नाव पाहून नवल वाटले !

अडाणि's picture

20 Apr 2009 - 1:40 am | अडाणि

सहमत !!!

-
अफाट जगातील एक अडाणि.

यन्ना _रास्कला's picture

20 Apr 2009 - 5:21 am | यन्ना _रास्कला

दिल्सेच्या आधी रोजा पिक्चर आल होत. त्यामुळ वातावरण होत. पण दिल्से मधे भारतिय जवान नायिकेवर बलात्कार करतात हे काय भारतिय जन्तेला पटल नाय. कारन लोकान्च्या मनामधे अजुनबी सैनिकान्च्याबद्दल लई आदर हाय.

सागर's picture

19 Apr 2009 - 10:11 pm | सागर

टारुबाळा,

खूप सुंदर धागा सुरु केला आहे =)) =))
माझे नावडते चित्रपट
१. रब ने बनादी जोडी (एकदाही नाही पाहिला =)) )
२. ओम शांती ओम (एकदाही नाही पाहिला =)) )

मजा येईल येथील यादी पाहताना
- सागर

दशानन's picture

19 Apr 2009 - 10:25 pm | दशानन

सलमान खान !

हम आप के है कोन ? - एकदा ही नाही पाहीला ना पाहण्याची इच्छा.

मराठी

माहेरची साडी- हळद रुसली कुंकु ह्सले ( असेच काहीतरी नाव असावे)
पहिल्या पाच मिनिटाच्या आत बाहेर पळालो होतो त्यानंतर मराठी चित्रपट सरळ कायदाचे बोला व जत्रा पाहीला :(

दिपक's picture

20 Apr 2009 - 2:21 pm | दिपक

फक्त माधुरीसाठी हम आपके हैं कौन कितीही वेळा पाह्यची तयारी आहे . :)

बाकी 'माहेरची साडी' साठी सहमत.. टिव्हीचे चैनल्स सर्फ करत असताना चुकुन अंगावर शाल ओढलेला अजिंक्य देव किंवा रडत असलेली अलका कुबल दिसली की घरातले सगळे एकसाथ ओरडतात "बदल बदल चैनल बदल"... :D


कांटे नही कटते लम्हें इतंजार के
नजरें बिछाके बैठे है रस्ते पे यार के
दिलने कहां देखे जो जलवे हुस्न यार के
लाया हैन कौन इन्हें पलक से उतार के...

देवदत्त's picture

20 Apr 2009 - 10:05 pm | देवदत्त

छान :)
फक्त एक
लाया हैन कौन इन्हें पलक से उतार के...
हे माझ्या मते "लाया हैं कौन इन्हें फलक से उतार के..." असे आहे. :)

दिपक's picture

21 Apr 2009 - 7:49 am | दिपक

हो बरोबर "फलक से उतार के..." :)

मिसळभोक्ता's picture

20 Apr 2009 - 12:32 am | मिसळभोक्ता

तब्बल ८० रुपयांचा चुथडा झाला हो

का कोण जाणे, चुथडा हा शब्द मला नेहमीच अश्लील वाटत आला आहे. बाकी काथ्याकूट जबरी. मी आजवर मनोजकुमारचा उपकार हा सिनेमा एकदाही नाही पाहिला.

-- मिसळभोक्ता

यन्ना _रास्कला's picture

20 Apr 2009 - 5:23 am | यन्ना _रास्कला

नसरुद्दिन शाहाचे पिक्चर बघायला आवडत नाहीत. तो लाउड आक्टिंग करतो.

हेरंब's picture

20 Apr 2009 - 2:49 pm | हेरंब

नसरुद्दिन शाहाचे पिक्चर बघायला आवडत नाहीत. तो लाउड आक्टिंग करतो.
नासिरला नांवे ठेवणारे तुम्हीच पहिले असावेत या जगात! त्याचा अभिनय पहायचा असेल तर
निशांत, पार, चक्र, स्पर्श, इजाजत, वेन्स् डे, आणि असे अनेक मास्टरपीस आहेत.
इतक्या वर्षांच्या सिनेसृष्टीच्या इतिहासात नासिर आणि शबाना यांच्या अभिनयाला तोड नाही.

यन्ना _रास्कला's picture

21 Apr 2009 - 4:25 am | यन्ना _रास्कला

नसरुद्दिनला त्याच नाव कस काय शोभत ते नीट सांगा. माला तर तो मानुस डोक्यात हवा गेलेला वाटतो.

विनायक प्रभू's picture

20 Apr 2009 - 5:28 am | विनायक प्रभू

पुर्ण बघितला नाही. अर्ध्या तासातच पळुन आलो. आजही पळत आहे.

लंबूटांग's picture

20 Apr 2009 - 6:41 am | लंबूटांग

पहायचे टाळलेले

रब ने बना दी जोडी- (कारण फालतू शाहरुख खान)
हॅलो ब्रदर - (कारण फालतू सलमान खान)
आपका सुरुर आणि कर्झ्झ्झ्झ.... (कारण सांगायला नको)
रामु की आग (कारण सांगायला नको)

बाकी पाहून पस्तावलेलो चित्रपट सुद्धा बरेच आहेत.

ओम शांती ओम - माझ्या रूममेट ने सांगितले की मस्त आहे पिक्चर म्हणून पाहिला आणि पस्तावलो. (नंतर कळले त्याला 'आप का सुरूर' पण प्रचंड आवडला होता.)

मोहोब्बते - मी आजपर्यंत कधीच एका दमात पूर्ण पाहू शकलेलो नाही.

मेला - हा चित्रपट आमिर खान सारख्या कलाकाराने केला आहे ह्याचा प्रचंड धक्का बसला होता. मी काही मिनिटेच बघितला कसा बसा.

1 2 3 आणि मेरे बाप पहले आप - डोके फोडायची प्रचंड इच्छा झालेली (स्वतःचे नाही- त्या डायरेक्टर आणि प्रोड्युसर चे)

सध्या इतकेच आठवतायत.

सँडी's picture

20 Apr 2009 - 6:50 am | सँडी

दिल्ली-६ : (१०मिनिटात सगळे पैसे वाया गेल्यासारख वाटल्याबरोबर लग्गेच सटकलो. आता त्या थिएटर कडे जायला सुध्दा संकोच वाटतो.)

-सँडी
एखादी गोष्ट विसरायला पण तिची आठवण ठेवावी लागते.

लंबूटांग's picture

20 Apr 2009 - 7:11 am | लंबूटांग

आयला, हा राहिलाच की वरच्या यादीत लिहायचा.

भरपूर शोधाशोध करून डाउनलोड केला (नशीब theater मधे नाही गेलो) आणि रात्री ११ ३० ला बघायला सुरुवात केली आणि जागून पूर्ण पाहिला. अहाहा..काय ती स्टोरी आणि स्पेशल इफेक्टस पण शोल्लिड होते एक एक. बहुधा फावल्या वेळात दिल्ली ६ मधेच कुठल्या तरी घरात बसून बनवले असावेत.

theater मधे न जाण्यावरून आठवले.

काय दुर्बुद्धी झाली आणि भारतात घराजवळ theater असताना सुद्धा त्या अक्षय कुमार चा मै खिलाडी... (तो पण टी व्ही वर पाहिलेला) सोडून एकही चित्रपट न पाहिलेला मी, बॉस्टनमध्ये कोणत्याच theater मधे दाखवत नव्हते म्हणून commuter rail ने तास भर प्रवास करून रूममेट्स बरोबर सिंग इज किंग बघायला गेलो. एक शो मिस झाला म्हणून ४ तास टाइम पास केला. तो चित्रपट एक तर बकवास आणि आमच्या मागे बसलेले गुज्जूभाई त्याहून बकवास. फालतू जोक्स पण २ मिनीटाने कळायचे त्यांच्या पैकी एकाला. मग आधी तो हसायचा आणि मग बाकीच्यांना समजावायचा आणि मग ते हसायचे. ~X(

सँडी's picture

20 Apr 2009 - 7:22 am | सँडी

मग आधी तो हसायचा आणि मग बाकीच्यांना समजावायचा आणि मग ते हसायचे.
हे असले नमुने खुपच कंटाळवाणे. नको तिथे अक्कल पाघळतात. 'हंगामा' पाहताना अशीच एक 'नमुनी' तिच्या नवर्‍याला(आणि अप्रत्यक्षपणे आजुबाजुच्या लोकांना) आख्खा चित्रपट/विनोद समजुन सांगत होती. बिचारा उगाचच परत परत हसत होता.(नंतर आम्हीही कंटाळुन उस्फुर्तपणे त्याला सामील झालो, तेव्हा कुठे तिने शांतीचं बोट तोंडात धरलं.)

-सँडी
एखादी गोष्ट विसरायला पण तिची आठवण ठेवावी लागते.

सनविवि's picture

20 Apr 2009 - 7:31 am | सनविवि

दिल से!!!

अनंता's picture

20 Apr 2009 - 9:46 am | अनंता

स्लमडॉग मिलेनियर.

घरी आमच्या शब्दाला काडीचीही किंमत नसल्याने, संस्थळावर आम्ही फुकट समुपदेशन करत असतो ;-)

मितालि's picture

20 Apr 2009 - 9:46 am | मितालि

पुजा भट आणि दिनो मोर्या चा हॉलिडे.. सालसा डान्स वर आहे म्हणे..
५५० रु चि टिकिटे आणि आधि केलेलि खादाडि वरची उधळपट्टी यावर पाणी सोडुन बरोबर १५ व्या मिनिटाला सिनेमागृहातुन पळुन आलेलो..

मैत्र's picture

20 Apr 2009 - 10:30 am | मैत्र

हा तर शिरोमणी आहे ....
दुसरा ओम शांती ओम... काय कथा आणि काय पटकथा... जसपाल भट्टीच्या फ्लॉप शो मध्ये श्रेयनामावलीत यायचं - ओव्हरऍक्टिंग.
शाहरुख साठी ते नेहमीच लागतं. ओम शांती ओम मध्ये ते सर्वजण हक्काने वापरू शकतात...
पण सगळ्यात महान सावरिया. समजत होतं की हे जे काही बघतोय हे भयानक आहे. पण पुढे काही तरी घडेल या भाबड्या आशेने पहात राहिलो आणि तीन तास हठयोग झाल्यावर आत्मज्ञान व्हायच्या आधी काही कळायच्या आत संपलाच की हो पिक्चर !!
केवळ भयाण...

परिकथेतील राजकुमार's picture

20 Apr 2009 - 10:59 am | परिकथेतील राजकुमार

अतिशय डोक्यात गेलेले काहि चित्रपट :-
१)शिकारी

२) कुछ कुछ होता है

३) कुंवारी दुल्हन (हसायला काय झाले ?)

४) अजय अका महादेव देवगण याचे सर्व चित्रपट

५)नाथा पुरे आता

©º°¨¨°º© परा ©º°¨¨°º©
फिटावीत जरा तरी जगण्याची देणी, एक तरी ओळ अशी लिहावी शहाणी...
आमचे राज्य

सागर's picture

20 Apr 2009 - 11:29 am | सागर

४) अजय अका महादेव देवगण याचे सर्व चित्रपट

मी सहमत नाहिये. गंगाजल, लज्जा, अपहरण, जमीन,ईश्क या चित्रपटांत अजय देवगण ने चांगले काम केले आहे.
बाकी % च्या बाबतीत सहमत होईन. अजय देवगण चे जास्तीत जास्त चित्रपट बोगस असायचे आधी. उदा: प्लॅटफॉर्म, जिगर, इ...इ... :)

- सागर

मैत्र's picture

20 Apr 2009 - 11:54 am | मैत्र

या दोन चित्रपटात त्याने उत्तम काम केले आहे.
जख्म साठी त्याला राष्ट्रीय पुरस्कार मिळाला आहे.
आणि हो भगतसिंग !!

स्वाती दिनेश's picture

20 Apr 2009 - 11:28 am | स्वाती दिनेश

टारोबा,
धन्य आहेस..काय धागा काढशील नेम नाही रे..
न आवडलेले शिनूमे.. ह्म्म.. काय आणि किती लिहू?
स्वाती

घाशीराम कोतवाल १.२'s picture

21 Apr 2009 - 3:27 pm | घाशीराम कोतवाल १.२

न आवडलेले शिनूमे.. ह्म्म.. काय आणि किती लिहू?

अहो स्वाती ताई एक तरी नाव लिहा की ;););)
**************************************************************
कोणी पाजली तरच पिण्यात अर्थ आहे ,
कोणी पाजली तरच पिण्यात अर्थ आहे ,
स्वताच्या पैशाने प्यायला मी काय मुर्ख आहे ??

शोधा म्हन्जे सापडेल's picture

20 Apr 2009 - 6:41 pm | शोधा म्हन्जे सापडेल

घरी आणी इतरत्र काहीच काम नसल्यामुळे मित्राबरोबर बघितलेले.........आणि टी.व्ही वर लागले तरी टी.व्ही बंद करण्याची इच्छा होणारे..........
मेला चित्रपट बघताना खरंच असं वाटलं की हा शिणेमा आमिरने का केला असावा ??
त्याच्या नंतर
१.अब तुम्हारे हवाले वतन साथीयो ( अमिताभ , अक्शय कुमार आणी बौबी देओल )........... ११.४५ च्या रात्रीच्या शोला गेलो होतो तो ४.३० ला शिणेमा संपला........डोकं फोड्ण्याएवढीही शक्ती राहीली नव्हती...
२. मसीहा (सुनील शेट्टी ) या मधे "दुष्मन..जान का नही.. माल का..." हे वाक्य कमीत कमी १५०० वेळा तो म्हणला असेल.
३.ओफीसर (सुनील आणी रवीना)
४. क्रांती (बौबी देओल , अमीशा, कबीर बेदी)
५. कारोबार (जुही, अनील , रुशी कपूर)
६.उलझन (दिप्ती भटनागर, पुरू राजकुमार)
७. सोच (रवीना, आदिती गोवीत्रीकर, अरबाझ, संजय कपूर)
६. माझ्या एका मित्राला उर्मिलाबाइ खुप आवडायच्या..... त्यामुळे मैत्रीच्या शपथा, त्याने माझे सगळे पैसे भरणे वगैरे प्रकार सहन करुन, मस्त (उर्मिला, आफ्ताब) नावाची डोकेदूखी ३ वेळा पाहिली...........
असे अजुन काही भयनक शिणेमे पाहिलेले आहेत... जसे आठवतील तसे लिहीन.........

पीस इज, नौट व्हेन देअर इज नो व्हायलन्स ,बट् व्हेन फ्लावर्स ब्लूम.............

ठकू's picture

20 Apr 2009 - 7:01 pm | ठकू

'पागलपन' नावाचा करण नाथ हिरो असलेला सिनेमा मी पाहिला होता. मध्यंतरानंतर तो चित्रपट सहन करणं अशक्य झालं होतं.

-ठकू
www.mogaraafulalaa.com
गुण गावे गाढ वाचे, पाय धरावे बा येकाचे

शिवापा's picture

20 Apr 2009 - 7:56 pm | शिवापा

क्रिश हा पिच्चर कधि एकदा लागतो आणि डब्यात जातो याची वाट पहात होतो. बघावसा वाटने तर दुर पण प्रोमोज पाहिले तरी संताप यायचा. हा हीट तर आहेच पन एम बि ए च्या पोरांनी यावर केस स्टडी बनवली होति. मा़झ्या ओळखीतल्या कोणी हा पिच्चर नाहि पाहिलाय. हिट नेमका कसा झाला होता ते पण नाहि समजले.

पाषाणभेद's picture

21 Apr 2009 - 1:16 pm | पाषाणभेद

माला तर परत्येक पिच्चर बगावाच लागतो. मी परत्येक पिच्चर थेटरवर जेवढे दिस आसतो त्याच्या ३ पट पाहातो. पन सगळा पिच्चर पार कमी येळा बघतो.

हां आता काहीयेळा सुरवात जाती. काय काय पिच्चर पाहातांना झोप लागत नाय हाच आमच्या परकुतीचा दोष हाय. काही येळेला गरदी जास आसल तर उभ्या उभ्या पिच्चर पाहावा लागतो.

आपन कायबी ध्यानात ठिवत नाय. पिच्चर चालल का पळल ये आमी फस शो लाच सांगतो.

"राम्या, ल्येका माझी बॅट्री कुठे हाय?"
- पाषाणभेद उर्फ दगडफोड्या (- राजेंनी बहाल केलेले नाव)