धम्मक लाडू आणे चापट पोळी

श्रीयुत संतोष जोशी's picture
श्रीयुत संतोष जोशी in पाककृती
18 Apr 2009 - 7:13 am

नमस्कार,
साहित्य :
१ लहान ( वय वर्षे ५ ते १५ मधील कोणत्याही गटातील ) भेदरलेला / ली मुलगा किंवा मुलगी.
संतप्त आई किंवा बाबा ; तोंडी लावण्याकरीता आत्या , आजोबा , आजी , मावशी इ.

कृती:
ही अशी कृती आपल्या घरात नेहमी घडत असेलच.
अभ्यास न केल्यामुळे किंवा त्याचे नुसते सोंग आणल्यामुळे ; मस्ती केल्यामुळे (जास्त की कमी हा प्रश्न इथे येत नाही ) ; सांगितलेले न ऐकल्यामुळे अनेकवेळा चापट पोळी खायचा प्रसंग येतो.
ही गालावर ; चुकवण्याचा प्रयत्न केल्यास हातावर आणि त्यानंतर मग अजून जोमाने परत गालावर पाठीवर कुठेही खाऊ शकतो.
अर्थात कधी कधी लाडात सुद्धा खाण्यात मजा येते.

आता धम्मक लाडू : हा प्रकार वरचेवर बनत नाही . त्यासाठी कारणही तेव्हढंच सबळ असावं लागतं.
उदा. बाबांनी सिगरेट ओढताना पकडणे पण दुसर्‍याने चहाडी करून सांगितल्यास जास्त मजा येते.
किंवा नापास झाल्यास अथवा ते बरेच दिवस लपवून ठेवल्यावर उघडकीस आल्यावर वगैरे.

हे काही मासलेवाईक दाखले आहेत . आपण आपली भर घालण्यास हरकत नाही.
वरील दोन्ही प्रकारात खाण्यार्‍यापेक्षा देणार्‍यास जास्त मजा येते.

प्रतिक्रिया

विनायक प्रभू's picture

18 Apr 2009 - 7:15 am | विनायक प्रभू

धागा

अनंता's picture

19 Apr 2009 - 11:48 am | अनंता

चांगला प्रयत्न.

घरी आमच्या शब्दाला काडीचीही किंमत नसल्याने, संस्थळावर आम्ही फुकट समुपदेशन करत असतो ;-)

परिकथेतील राजकुमार's picture

18 Apr 2009 - 11:10 am | परिकथेतील राजकुमार

फोटु ?

©º°¨¨°º© परा ©º°¨¨°º©
फिटावीत जरा तरी जगण्याची देणी, एक तरी ओळ अशी लिहावी शहाणी...
आमचे राज्य

क्रान्ति's picture

19 Apr 2009 - 6:10 am | क्रान्ति

पण ही पा़कृ सगळ्यांसाठी नाही ना!:/
आणि खाणा-याच्या डोळ्यांत पाणी येतं, त्याचं काय? :''(
क्रान्ति {मी शतजन्मी मीरा!}
www.mauntujhe.blogspot.com

अदित्य's picture

19 Apr 2009 - 3:17 pm | अदित्य

माझ्या लहानपणि आणि नन्तर पण म्हणजे आत्ता काल परवा पर्यन्त मि ह्या डिश चा मनमुराद (माझ्या वडिलधारयान करिता ) आस्वाद घेत आलो आहे, कारण रोज नवनविन शोध लाउन सर्वान त्रस्त करने हा माझा मु़ख्य परिपाठ आहे (हळुहळु सर्व काहि सागिनच) त्यामुळे हे दोन मेन्यु माझ्या साठि मेन कोर्स म्हणुन येतात. छान चव आहे, आपणा सर्वानि कधि ना कधि आस्वाद घेतलाच असेल. भेटु पुन्हा.

त्याचे फोटो दिले असते तर .... अन त्या पासून बचाव कसे करावे याची ही कृती दिली असती तर अज्जून मज्जा आली असती :-)

विंजिनेर's picture

20 Apr 2009 - 10:15 am | विंजिनेर

राम गणेश गडकरींच्या अश्या खुसखुशीत भाषेत लिहिलेल्या अनेक पाकृ. वाचल्याचे आठवत आहे.
त्यात शारिरीक पाकृ. बरोबर काही इतर कृती सुद्धा होत्या.. उदा:

"पिस्ता चटणी: वाडगे भर पिस्ते घरातील मंडळींच्या सहज हाताला लागतील अश्या ठिकाणी ठेवावे. १/२-१ तासात हमखास पिस्त्याचे चटणी होते"
अजुन कोणाला आठवता आहेत काय?

----
कळप-मनोवृत्तीचा सूक्ष्म अभ्यास करण्यात आम्ही गढलेलो असल्यामुळे कंपूबाजी करायला आमच्याकडे वेळ नाही