टोपण नाव

दवबिन्दु's picture
दवबिन्दु in काथ्याकूट
14 Apr 2009 - 4:28 pm
गाभा: 

माझ नाव माधव पन जुन्या काळि पालन्यात २-३ नाव ठेवायची पध्दत होती. नाव पन कशि तर जड जड आनि मोठ्ठाली. माझ नाव आत्यान ठेवल. बिन्दुमाधव. पन सगळे लोक मला माधव च म्हनतात.

मी मिपावर आलो तेव्हा पाह्यल तर सर्वे लोकानी छानछान नाव घ्येतलेली होती. मग मी माज नाव बिन्दु ठेवनार होतो म्हंजे मी कोन ते कोनाला कळ्लच नस्त. पन बिन्दु नाव आहे एका नटीच. सगळे मला पोरगीच समजले असते. म्हणुन मी बिन्दुला दव जोडला. आनी माझ नाव झाल इथं दवबिन्दु.

आपन लोक जर मिपावर टोपण नावाने असाल तर ते टोपण नाव कस काय सुचल, आनि तेच नाव का घ्यावस वाटल? डिटेलमधी लोवा.

प्रतिक्रिया

गुळांबा's picture

14 Apr 2009 - 4:48 pm | गुळांबा

मी मिपावर आलो तेव्हा अनेक नावे ट्राय करुन पाहिली पण बरिचशी मला आवडलेली चित्र विचित्र नावे कोणीतरि
दुसर्‍या लोकांनीच घेतली होती. पण त्याच दिवशी आमच्याकडे पंचपक्वान्नाचा एक भाग म्हणुन गुळांबा केला होता म्हणुन मी गुळांबा नाव घेतले.

(मात्र नंतर कोणतरीमाझ्या नावाची नक्कल करुन मेथांबा, साखरांबा नावे घेतली तेव्हा वाईट वाटले. नावाच्या आयडियेचे पेटंट मिळत नाही का?)

दवबिन्दु's picture

14 Apr 2009 - 4:59 pm | दवबिन्दु

लिहिलत म्हणुण थ्यांक्ु गुळांबा मला जास्त आवडत नाय. आपन नळी ओरपनारी लोक. पन तुमी आवडलात.

चिरोटा's picture

14 Apr 2009 - 5:45 pm | चिरोटा

माझ्या बाबतीतपण तसेच. सगळी विचित्र नावे बूक झाली होती.टी.व्ही.चालू होता आणि इतक्यात भेन्डि बाजार ची बातमी चालू झाली.!!
भेन्डि(गुळाम्बा-पोळी/मटण/चिकन्/मोरी/श्रिखन्ड्/आम्र्खन्ड/बासुन्दी ओरपणारा)
क्ष्^न + य्^न = झ्^न

पर्नल नेने मराठे's picture

15 Apr 2009 - 11:56 am | पर्नल नेने मराठे

माझ कस आहे 'चुचु' ;;)?
चुचु

प्रमोद देव's picture

15 Apr 2009 - 12:08 pm | प्रमोद देव

मी आधी "अत्त्यानंद" नावाने लिहीत असे (अजूनही मनोगतावर ह्याच नावाने वावरतो). अर्थात टोपण नाव घेण्यामागे स्वतःची ओळख लपवणे असा उद्देश कधीच नव्हता. इतरांची टोपण नावे पाहून स्वतःही तसे करून पाहण्यासाठी केलेला तो एक प्रयोग होता.
आता ह्या नावामागची भूमिका पाहू..... माझे नाव प्रमोद...ह्यातले मोद म्हणजे आनंद आणि प्र म्हणजे अधिक,अती वगैरे.
जसे गती-प्रगती; सिद्ध-प्रसिद्ध;शिक्षण-प्रशिक्षण वगैरे.
म्हणून अधिक+ आनंद ऐवजी मला अती+आनंद =अत्त्यानंद असे नाव घ्यावेसे वाटले. अतिरेकी आनंद ;)

आम्ही कोणत्याही कंपूत नाही. कारण आमचा स्वतःचाच एक कंपू आहे. ;)

घाशीराम कोतवाल १.२'s picture

15 Apr 2009 - 2:31 pm | घाशीराम कोतवाल १.२

मी पहिल माझ खर नाव ठेवल पण त्यात काहि दम वाटला नाहि
मग पु ल च्या एका पात्राचे नाव पाहिले आणखी बरिच नाव वापरली
मग एक दिवस तेंडुलकरांचा कोतवाल पाहिला
आणि हे नाव नक्कि केले घाशीराम कोतवाल
पन आता आमची व्हर्जन अप्डेट होते काय करणार नाव हेच ठेवायचे ना!!!

**************************************************************
कोणी पाजली तरच पिण्यात अर्थ आहे ,
कोणी पाजली तरच पिण्यात अर्थ आहे ,
स्वताच्या पैशाने प्यायला मी काय मुर्ख आहे ??

सँडी's picture

15 Apr 2009 - 2:01 pm | सँडी

मला हे कॉलेजात मिळालेलं टोपण नाव... पुढे सगळे मित्र याच नावाने बोलवा(बोंबला)यला लागली.
इकडे परदेशात आल्यापासुन थोडी गोची झाली. आमच्या गोर्‍या मैत्रीणींपैकी दोघींची नावं पण सँडीच...तिथे 'सँड' नामकरण झालं. पण भारतीय मित्रमैत्रीणींसाठी सँडीच राहिलो.

-सँडी
एखादी गोष्ट विसरायला पण तिची आठवण ठेवावी लागते.