गेले ४-५ महिने घराच्या बाहेर झाडांचे खराटे, थंड वारे, एकतर बर्फ तरी नाहीतर नुसतीच भयानक थंडी, सगळे पक्षी उष्ण देशात पळून गेलेले असं चित्र बघून नुसता कंटाळा आला होता. अशातच एक दिवस म्हणजे साधारण २०-२२ मार्चच्या आसपास एक पक्षी चोचीत काडी घेऊन उडत चाललेला दिसला. आम्हाला चाहूल लागायच्या आधी पक्ष्यांना चाहूल लागली होती वसंतऋतूच्या आगमनाची! आता ३-४ दिवसातच अजून काही पक्ष्यांची घरटं बांधण्यासाठीची लगबग दिसू लागली. गेले कित्येक दिवस हरवलेला पक्ष्यांचा आवाज सकाळी सकाळी जाग आणू लागला आणि थंडीमुळे, बाहेरच्या धुकट, आर्द्र हवेमुळे मनाला आलेली मरगळ पळून जाऊ लागली.
आता फिरायला बाहेर पडल्यावर हळूहळू झाडांच्या निष्पर्ण फांद्यांवर तांबूस कळ्या, अगदी नखाएवढी हिरवी पालवी दिसू लागली. वातावरणात झपाट्याने बदल होऊ लागला. सूर्यदेवही जरा जास्त वेळ आकाशात रेंगाळू लागले. काही दिवसांपूर्वी स्थलांतरीत झालेले पक्षीही परतताना दिसू लागले.
जमिनीलगत निळ्या, जांभळ्या, गुलाबी रंगाची फुले दिसू लागली. जमिनीतून पातीफुलांची (डॅफोडिलची फुले)हिरवी पाती वर डोकाऊ लागली आणि ५-७ दिवसातच त्यावर फुलेही उमलून आली.
पक्ष्यांचा किलबिलाट तर दिवसेंदिवस वाढतच आहे. सध्या झुडुपांवर अनेकविध रंगाची फुले दिसत आहेत. दुकानांमध्येही वसंतांच्या स्वागतासाठी निरनिराळ्या वस्तू, अनेक प्रकारची रोपे, फुलझाडांचे बी यांची भरपूर प्रमाणात आवक झाली आहे.आता झाडांवरची पानेही वाढू लागली आहेत.
घराबाहेरच्या हिरवळीवर ससे पळत आहेत..
सर्वच जण शिशिरापर्यंतच असलेले हे वैभव लुटण्यासाठी सज्ज झाले आहेत. :)
फोटो :- मी आणि लिखाळ.
--शाल्मली.
प्रतिक्रिया
13 Apr 2009 - 4:31 pm | स्वाती दिनेश
वसंताचं आगमन झालं आहे ,
मुखपृष्ठावर डाळ,पन्ह्याचं हळदीकुंकू आणि इथे वसंताचं वर्णन.. वावा..
स्वाती
13 Apr 2009 - 4:31 pm | स्मिता श्रीपाद
आज हळदिकुंकवा सोबत या लेखाची पण मेजवानी :-)
डाळं,पन्हं पाहुन डोळ्याचं पारणं फिटलं होतंच...त्यात आता या सुरेख फोटोंची भर :-)
जियो... :-)
-स्मिता
13 Apr 2009 - 5:23 pm | वल्लरी
लेख आणि फोटो दोन्ही छानचं
हळदीकुंकू पोह्चले बरं का शाल्मली ... :)
---वल्लरी
13 Apr 2009 - 6:32 pm | शितल
सुंदर फोटो !
:)
13 Apr 2009 - 7:19 pm | मदनबाण
व्वा.लिखाळराव व तुम्ही काढलेले फोटु छान आहेत. :)
मदनबाण.....
I Was Born Intelligent,But Education Ruined Me.
Mark Twain.
13 Apr 2009 - 7:32 pm | परिकथेतील राजकुमार
फोटु बघुनच कसे मस्त अल्हाददायक वाटत आहे :)
©º°¨¨°º© परा ©º°¨¨°º©
फिटावीत जरा तरी जगण्याची देणी, एक तरी ओळ अशी लिहावी शहाणी...
आमचे राज्य
13 Apr 2009 - 7:39 pm | प्राची
सुंदर फोटो :)
14 Apr 2009 - 4:19 am | रेवती
आमच्याकडे फुले यायला अजून सुरुवात नाही झाली,
त्याआधीच हे फोटो बघून इतकं बरं वाटतय.
ससा छान दिसतोय. त्यालाही वसंत ऋतूचं येणं सुखावत असेल.
पहिल्या फोटोतली गुलाबी फुलं आवडली. त्यात पुन्हा छोटं पिवळं फुल मस्त दिसतय.
आमच्याकडे डॅफोडील्सना थोडे थोडे कोंब फुटलेत.
सशाच्या फोटोच्या वरचा फोटो ज्यात फक्त गुलाबी रंगाची फुलं आहेत व पानं फारशी नाहीत ते मजेशीर दिसतय.
रेवती
14 Apr 2009 - 7:50 am | आनंदयात्री
फोटो अत्यंत सुंदर आहेत ... :)
आयला घराबाहेरच्या हिरवळी ससे वैगेरे म्हणजे लैच्च भारी !!
-
(गल्लीतल्या डुकरांना दगड मारुन हाकलणारा)
आंद्या
14 Apr 2009 - 7:52 am | दशानन
ए-वन क्लास !
सुरेख !
14 Apr 2009 - 7:53 am | बेसनलाडू
(वासंतिक)बेसनलाडू
14 Apr 2009 - 10:28 am | विसोबा खेचर
सर्वच चित्र छान परंतु पहिलं चित्र जीवघेणं!
तात्या.
18 Apr 2009 - 1:12 pm | शाल्मली
सर्व वाचकांचे मनापासून आभार!
:)
--शाल्मली.
18 Apr 2009 - 1:18 pm | जागु
सुंदर.